गोष्ट तशी माझ्या लहानपणीची पण त्या घटनेतून मिळालेला धडा मात्र पदोपदी पुन्हा पुन्हा मिळत असतो. मी असेन आठ – दहा वर्षाचा, म्हणजे बघा, मी तिसरी-चौथीत शिकत असतानाची ही गोष्ट, तेव्हा काय झाले, एके दिवशी आमच्या गल्लीत एक बासरीवाला बांबूच्या बासर्या विकायला आला, त्याच्या खांद्यावर एक मोठा बांबू आणि त्याला लगडलेल्या विविध आकाराच्या बासर्या! तो बासरीवाला बासरीवर त्या काळात गाजत असलेले एक हिंदी चित्रपटातले गाणे अत्यंत सुमुधुर पणे वाजवत होता. मला जन्मजातच संगीताची आवड, एक दैवी देगणीच लाभली आहे म्हणा ना, मला ते बासरी प्रकरण फार आवडले! तशी माझ्या कडे एक बांबूची बासरी होतीच ती काही चांगली वाजत नव्हती, या बासरीवाल्या कडची बासरी चांगली वाजतेय , ही जर बासरी आपल्याला मिळाली तर आपण ही अशीच सुंदर बासरी वाजवू शकू ! बस्स , अगदी अश्शीच बासरी आपल्याला हवी, आपल्यालाही बासरीवर…