जातकाचे प्रश्न जेव्हा जोखमीचे असतात तेव्हा मी ती केस स्विकारायच्या आधी प्रथम एक ‘शक्याशक्यता’ अभ्यास (Feasibility Study) करतो. त्यासाठी जातकाची ‘जन्मवेळ, जन्मगाव व जन्मस्थळ’ एव्हढीच माहीती गोळा केली जाते बाकी काहीही विचारत नाही ( जातका कडून फक्त इनक्वायरी आलेली असते , मानधन घेतलेले नसते, तेव्हा उगाचच जादाची खासगी माहीती गोळा करणे मला अप्रशस्त वाटते) , हा  ‘शक्याशक्यता’ अभ्यास केल्या नंतर जर मला केस हाताळण्याजोगी वाटली तर आणि तरच मी माझी मानधनाची रक्कम ठरवतो व जातकाला त्याप्रमाणे कळवतो आणि जातकाने ते मान्य करुन , मानधनाची रक्कम जमा केल्या नंतरच बाकीची माहीती (आयुष्यात घडलेल्या महत्वाच्या घटनां इ ) गोळा केली जाते.

सध्या हाताळत असलेली एक केस -:

जातकाने दिलेल्या ‘जन्मवेळ, जन्मगाव व जन्मस्थळ’ एवढ्याच , हो पुन्हा लिहतो, फक्त एवढ्याच माहीतीच्या आधारे मी  काम चालू करतो. प्रथम शास्त्रशुद्ध जन्मपत्रिका तयार करतो ,  जन्मपत्रिका तयार झाल्यावर माझी काही खास तंत्रे वापरुन त्याचे अ‍ॅनॅलायसिस करतो, त्यातून मला जातकाच्या आयुष्यातल्या आत्ता पर्यंत घडलेल्या घटनांचा वेध घेता येतो,  याचा उपयोग जातकाने सांगीतलेली जन्मवेळ बरोबर आहे का नाही ते ठरवण्या साठी करता येतो, एकदा जन्मवेळेची खातरजमा झाली की मग जातकाच्या आयुष्यात पुढे काय काय घडणार आहे याचा अंदाज घेणे सहज शक्य होते.

इथेही मी तेच केले, जातकाच्या गतायुष्यात घडलेल्या काही ठळक घटना मी नोंद केल्या , त्या घडल्या असणारच याची मला खात्री होतीच तरीही नक्की त्याच कालावधीत त्या घडल्या आहेत का याची खातर जमा करुन घेण्यासाठी मी जातकाला लिहले:

(जातक अमराठी , माझ्या इंग्रजी ब्लॉग वरुन आल्यामुळे सर्व ईमेल व्यवहार इंग्रजीत करावा लागला आहे)

“Thanks XXXXX.

I was just going through your birth chart and noticed some events , I would be interested whether such events indeed happened in your life or not? Please note that years mentioned are approximate and could vary depending on the accuracy of the birth time (typically +/- 4 minutes of error in the birth time would shift these years by +/- 1) . Alternatively let me know when such events happened in your life.

1984: Benefit to parent , some gain , help from influential people, some heart / eye / back pain related disease
1981: Event related to property sale or purchase, relocation, renovation
1994: Some unexpected or some stormy event, dispute between parents
2003: Some problem in your job / profession
2005: You came pretty close to a marriage

I am asking these questions as part of a feasibility study, based on your inputs I can decide whether the birth time is accurate enough to proceed further. You may also send some major life events in this regards.

Don’t worry what so ever information you have already shared and will be sharing with me will be kept in strictest confidence.

Hope this helps.

God bless you.

कळावे लोभ असावा ही विनंती.

आपला ,

सुहास गोखले

Suhas Gokhale

हे सर्व लिहताना जातकाची ‘जन्मवेळ, जन्मगाव व जन्मस्थळ’ एव्हढीच माहीती माझ्याकडे होती, जातकाला तर मी पाहीलेले सुद्धा नव्हते !

जातकाचे आज उत्तर आले ! माझा मूळचा प्रश्न ‘निळ्या’ रंगात , त्यला जातकाने दिलेले उत्तरें ‘लाल’ रंगात.

“Hi,

Thanks for the prediction-matching. I am noting my observations below:

1984: Benefit to parent , some gain , help from influential people, some heart / eye / back pain related disease (textile strike was over; that was a relief)
1981: Event related to property sale or purchase, relocation, renovation (purchased a new house: May-June-1980)
1994: Some unexpected or some stormy event, dispute between parents (somebody duped us financially in a big way; this led to many domestic clashes: June-Aug-1994)
2003: Some problem in your job / profession (self-created problems in job during Sept-Dec-2002; career blunder during April-June-2003, somebody misguided me for his selfish gains)
2005: You came pretty close to a marriage (Oct-Nov-2005 was luckiest period in life; anything that I did went well; naturally a few girls got fascinated with me, but nothing concrete)

पहा सर्वच्या सर्व पाचही घटना , हो पुन्हा एकदा लिहतो सर्वच्या सर्व पाचही घटना मी जशा सांगीतल्या तशाच आणि ज्या तारखांना सांगीतल्या त्याच कालावधीत घडल्या आहेत. ह्याला म्हणतात “डॉट टू डॉट अ‍ॅक्यूरसी !”

कोणी काहीही म्हणोत, जन्मपत्रिके वरुन असे बरेच काही सांगता येते हे नक्कीच !  काही ग्रहयोग, काही ग्रहांची स्थानगत , राशीगत, नक्षत्रगत फळे अगदी ठणठणीतपणे मिळतातच , फक्त ईतर काही घटकांच्या अनुषंगाने फळांची अभिव्यक्ती काहीशी वेगळी असू शकते किंवा तिव्रता कमी जास्त असते. पण ‘रिझल्ट ‘ मिळाले नाही असे होतच नाही.

ज्योतिषशास्त्रात काहीतरी तथ्य आहे / दम आहे आहे यात मला तरी तीळमात्र ही शंका नाही, कमी पडत असेल तर तो ज्योतिर्विदाचा अभ्यास, व्यासंग आणि अनुभव !

अर्थात हे असे बरोबर यायला जातकाची जन्मवेळ तितकीच अचुक ( +/- 2 मिनीटे) असावी लागते / दुरुस्त करुन घ्यावी लागेत , हे ओघानेच आले !!

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////
 1. Prashant

  Suhasji, when do we note the birth time during the birthing process in case of normal vs C-section birth? Should it be accurate to seconds or just minutes. In most cases the hospital clocks may not be synchronized with the world time server.

  0
  1. सुहास गोखले

   प्रशांतजी,

   जन्मवेळ कोणती घ्यायची याबाबत वेगवेगळी मते आहेत. पण आजकाल बहुतांश ज्योतिषी बालकाचा ‘पहिला श्वास’ म्हणजे ‘जन्म झाला’ असे मानतात. पण हा पहिला श्वास केव्हा घेतला गेला हे कसे ठरवणार ? काही निरिक्षणां नंतर ‘बाळाच्या रडण्याचा पहिला स्वर’ हीच ‘जन्मवेळ’ समजली जाऊ लागली.
   सिझेरियन सेक्शन पद्धतीने जन्माला आलेल्या बालकाच्या बाबतीत सुद्धा ‘रडण्याचा पहिला स्वर’ हीच जन्मवेळ मानली जाते.
   जन्मवेळ जितकी अचूक नोंदवता येईल तितके चांगले , किमान +/- 2 मिनिटांच्या फरकात तरी असावी.

   अर्थात फकत अचूक वेळ असून काय उपयोग? त्याचा वापर करुन सुक्ष्म भविष्य सांगायला ज्योतिर्विद सुद्धा बरीच तत्रे अवगत असलेला , अनुभवी , निष्णात असावा लागतो. उत्कृष्ठ कॅमेरा असला तरी फोटोग्राफर ही नितकाच चांगला हवा ना? चांगला कॅमेरा , चांगला फोटो काढायला मदत करतो हे नक्कीच पण कॅमेरा नाही तर लेंस मागची व्यक्ती चांगला फोटो काढ्ते, तसेच काहीसे आहे हे.

   सुहास

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.