हा प्रांत मलाही तुलनात्मक दृष्ट्या काहीसा नवाच आहे. डाऊसिंग पेंडुलम बद्दल पूर्वी काही वाचले होते पण त्यावेळी आपले नेहमीच्या ज्योतिष पद्दतीच अजून व्यवस्थित समजल्या , उमजल्या नसताना त्याला आणखी एक नविन फाटा फोडून नविन वैचारीक गोंधळ निर्माण करुन घ्यायची माझी तयारी नव्हती.
पण झाले असे की सुमारे तीन वर्षापूर्वी एकदा प्रवासात एका हॉंगकॉंगच्या व्यक्तीशी ओळख़ झाली,ते स्वत: डाऊसिंग मधले तज्ञ असल्याने त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांनी या विषयावर बरीच माहीती मला दिली एव्हढेच नव्हे एक ‘पेंडुलम’ हॉंगकॉंगहून भेट म्हणून पाठवून दिला. ‘पेंडुलम’ भेट मिळाला हा एक दैवी संकेत मानून मी काही प्रयोग करायला सुरवात केली. सुरवातीला म्हणावे तसे काही दृष्य परिणाम आढळले नाहीत पण नेटाने प्रयत्न चालू ठेवले, हळू हळू या पेंडुलम कडून काही विषीष्ठ संकेत मिळताहेत हे दिसायला लागले, उत्साह वाढला. आणखी काही काळ प्रयोग केल्यानंतर लक्षात आले की भविष्यातल्या घटनांबद्दल अंदाज बांधायला या पेंडूलमचा मर्यादित स्वरुपात का होईना चांगला उपयोग होऊ शकतो.
2005 च्या सुमारास जेव्हा माझा ‘कृष्णमुर्ती पद्दती’ शी परिचय झाला तेव्हा कृष्णमुर्ती पद्दती वरच्या पुस्तकांतून दिलेल्या अद्भूत या शब्दात वर्णन करता येईल अशा केसस्ट्डीज वाचून मी अक्षरश: भारावून गेलो होतो, काल निर्णया ची गुरु किल्लीच आपल्या हातात आली असे वाटले सुद्धा होते पण ‘के.पी.’ चा हा फुगा फूटायला फार काळ लागला नाही!
के.पी. चा हा अनुभव गाठीशी असल्याने अर्थातच, डाऊसिंग पेंडुलम बद्दल सुरवातीपासूनच जादा अपेक्षा ठेवल्या नव्हत्या, मी वापरत असलेल्या के.पी, युरेनियन इ. प्रणालींना पुरक म्हणून जरी उपयोग झाला तरी पुरे अशा मर्यादित अपेक्षांच्या परिघात राहूनच मी या डाऊसिंग पेंडुलमचा अभ्यास चालू ठेवला.
आज मी या पद्धतीचे माझे अनुभव आपल्या समोर मांडायचे ठरवले आहे. या पद्धतीचे मूल्यमापन करण्या इतका मी मोठा नाही, किंवा ते धाडस करण्या एव्हढा या पद्धतीचा माझा अभ्यास व अनुभवही नाही.
थोड्याफार प्रयत्नांने कोणालाही हे तंत्र अवगत करुन घेता येईल असे मला वाटते. याला फारसा खर्च ही येत नाही. पाहीजे ती चिकाटी, श्रद्धा त्याच बरोबर या तंत्राच्या मर्यादा पण लक्षात घेतल्या तर मोठी निराशा होणार नाही. हा प्रांत गणित, विज्ञान आणि बुद्धीप्रामाण्याच्या पलीकडचा असल्याने हे तंत्र वापरताना अतिचिकित्सक वृत्ती असू नये.
या विषयावर लिहण्यासारखे बोलण्यासारखे बरेच आहे तेव्हा ही एक लेख माला होणार आहे , त्याची एक साधारण रुपरेषा अशी असेल:
- हे पेंडुलम, पेंडुलम म्हणजे काय रे भाऊ?
- पेंडुलम डाऊसिंग पद्धतीचा धावता आढावा.
- पेंडुलम कसा काम करतो?
- हा पेंडुलम कोठे भेटेल?
- मला हे जमेल?
- काही खास ट्रेनिंग लागते का?
- कोणती पुर्वतयारी करावी लागेल?
- कशाचीही उत्तरें मिळतात का?
- पेंडुलम 101
- एक टिपीकल ‘पेंडुलम’ सेशन
- पेंडुलम डाऊसिंग चा रोजच्या जीवनातला उपयोग
- के.पी.आणि पेंडूलम
आणि बरेच काही, तेव्हा माझ्या या ब्लॉगला नियमित भेट देऊन , ही लेखमाला वाचावी, आपली मतें सुचना मला कळवाव्यात ही विनंती.
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
हे पेंडुलम, पेंडुलम म्हणजे काय रे भाऊ?
पेंडुलम डाऊसिंग पद्धतीचा धावता आढावा.
पेंडुलम कसा काम करतो?
हा पेंडुलम कोठे भेटेल?
मला हे जमेल?
काही खास ट्रेनिंग लागते का?
कोणती पुर्वतयारी करावी लागेल?
कशाचीही उत्तरें मिळतात का?
पेंडुलम 101
एक टिपीकल ‘पेंडुलम’ सेशन
पेंडुलम डाऊसिंग चा रोजच्या जीवनातला उपयोग
के.पी.आणि पेंडूलम. Dowsing varachi mahiti ajun dili tar bar hoil aapalai vachak
श्री. सावंतजी,
या विषयावर लिहायचे मनात आहे , तशी सुरवात पण केली पण वाचकांना अत्यल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे पुढ्चे लिखाण स्थगित केले आहे पण वेळ मिळताच नक्की पुढ्चे भाग लिहेन,
सुहास गोखले
गुरुजी लिहा की फक्कड मार्गदर्शक लेख ह्यावर. मी काही ठिकाणी वाचल्याप्रमाणे डाऊझिंग बऱ्याच वेळा जे result सुचवतो त्याची पुढे येणारी अनुभूती चित्तथरारक असते. अर्थात मनाची एकाग्रता आणि शुद्धता ही तितकीच महत्वाची आहे. अंगठी व फोटोवरही डाऊझिंग करून मार्गदर्शन करता येते असे म्हणतात. तुमच्या अभ्यासु लेखाची आमच्या सारखे उत्सुक वाचक आतुरतेने वाट पाहत असतात. (असाच आग्रह करत असताना एकदा गुरुजींचा म्हणजे तुमचाच ओरडा कम इशारा ही फेसबुकवर मिळालेला, इति गोविंदाचार्य आणि अयोध्या बाबाजींबद्दल आग्रह आणि तुमचा डायबिटीस वर लिहिण्याचा मूड) हाहाहा…. असो. -आपला दूरस्थ वाचक ओमकार
श्री ओंकारजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद , या विषयावर लिहण्या सारखे बरेच आहे , जरा वेळ मिळाल की नविन काही लिहण्याचा नक्की प्रयत्न करेन
शुभेच्छा आणि धन्यवाद
सुहास गोखले