वालदिल झालेला , रडकुंडीला आलेला केदार माझ्या समोर बसला होता.

केदार ज्या कंपनीत काम करत होता त्या कंपनीची अवस्था दिवसें दिवस मोठी नाजूक बनत चालली होती, कामगार कपात सुरु होती, पगार वेळेवर मिळत नव्हते आणि त्यातच केदारचे त्याच्या वरिष्ठाशी बिनसले, हे निमित्त करुन आपल्याला नोकरी वरून काढून टाकले जाईल अशी भिती केदारच्या मनात होती.

आणि जर नोकरी जाणारच असेल तर दुसरी नोकरी केव्हा मिळेल हा प्रश्न ही होताच.

शक्यतो मी दोन प्रश्न एकाच वेळी एकाच पत्रिकेवरून सोडवत नाही,  पण केदार ची एकंदर अवस्था पाहता मी याला अपवाद करून ,

माझी नोकरी जाईल का?

आणि

माझी नोकरी गेली तर दुसरी केव्हा मिळेल ?

असे दोन्ही प्रश्न एकदमच एकाच पत्रिके वरून पाहावयाचे ठरवले.

केदार चा प्रश्न जेव्हा मला पूर्ण समजला ती वेळ म्हणजे 24 जुलै 2017, 13:28: 47 आणि स्थळ गंगापूर रोड , नाशिक असा तपशील घेऊन प्रश्नकुंडली तयार केली. ती सोबत छापलेली आहे.


 


जातकाने प्रश्न विचारता क्षणीच प्रश्नकुंडली मांडली आहे, जातक समोरच बसला आहे, तेव्हा या कुंडलीतला चंद्र, जो मनाचा कारक असतो, काय म्हणतो ते पाहणे महत्त्वाचे आहे. अशा वेळेचा चंद्र जातकाची मन:स्थिती बर्‍या पैकी अचूक दाखवतो असा अनुभव आहे.प्रश्न : सध्याची नोकरी जाईल का ? आणि गेली तर दुसरी लागेल का?


चंद्र:  स्व-राशीत कर्केत , दशम (10) स्थानात, बुधाच्या नक्षत्रात, बुध दशमात (10), बुधाच्या राशी नवम (9) आणि व्यय (12) स्थानांवर

चंद्र:  10 /  10 / 9, 12 / 10

10 हे नोकरीचे प्रमुख स्थान आणि  9 हे नोकरीचे प्रमुख विरोधी स्थान , 12 गुप्त शत्रू / व्यय (लॉस) यांची उपस्थिती जातकाचा प्रश्न तळमळीचा आहे हे सुचवते. पत्रिका ‘रॅडीकल’ आहे.

नोकरी – व्यवसाया बाबतीतल्या सर्व प्रश्नां साठी दशम (10) हे स्थान महत्त्वाचे (प्रिन्सीपल ) असल्याने त्याचा सब कोण आहे , कसा आहे हे पाहणे अत्यावश्यक असते.

दशमाचा (10) चा सब आहे ‘केतू’
केतू कायमच वक्री असल्याने त्याला मार्गीच समजले जाते. केतू मंगळाच्या नक्षत्रात आहे आणि मंगळ मार्गी आहे.
या केतू चे कार्शेयत्व असे आहे: केतू चतुर्थ (4) स्थानात, केतू ला राशी स्वामित्व नाही, केतू मंगळाच्या नक्षत्रात , मंगळ नवम (9) स्थानात , मंगळाच्या राशीं सप्तम (7) आणि द्वितीय (2) स्थानांवर.
केतू: 9 / 4 / 2. 7 / —

केतू वर बुधाची दृष्टी , बुध दशमात (10) , बुधाच्या राशी नवम (9) आणि व्यय (12) स्थानांवर, बुध केतू च्या नक्षत्रात , केतू चतुर्थ (4) स्थानात , केतू ला राशी स्वामित्व नाही. बुध:  4 / 10 / — / 9, 12
केतू शनीच्या राशीत. शनी द्वितीय (2) स्थानात, शनीच्या राशी चतुर्थ (4) आणि पंचम (5) स्थानी, शनी बुधाच्या नक्षत्रात  बुध दशमात (10) बुधाच्या राशी नवम (9) आणि व्यय (12) स्थानांवर

शनी: 10 / 2 / 9 , 12 / 4 , 5

म्हणजे केतू चे एकंदर कार्येशत्व असे असेल:

केतू: 9 / 4 / 2. 7 / —
दृष्टी बुध:  4 / 10 / — / 9, 12
राशीस्वामी शनी: 10 / 2 / 9 , 12 / 4 , 5

दशमाचा सब केतू नोकरी जाण्याचे संकेत 9, 5 च्या माध्यमातून देत आहे तसेच नोकरी मिळण्याचे संकेत 10, 2 च्या माध्यमातून देत आहे. प्रश्न नोकरीच्या संदर्भातला असल्याने केतु स्वत:, नक्षत्रस्वामी बुध आणि राशी स्वामी शनीच्या माध्यमातून चतुर्थ (4) स्थानाचे कार्येशत्व ‘नोकरी जाऊन घरी बसण्याचे ‘ संकेत ही देत आहे. अर्थात ही काहीशी मायनर टेस्टीमोनी असली तरी प्रश्नकुंडलीत कोणता फॅक्टर कधी महत्वाचा ठरेल हे सांगता येत नाही म्हणून या सगळ्या नोंदी ठेवत बारकावे टिपत राहायचे. उपयोग झाला तर उत्तमच, आणि नाही झाला तरी असे बारकावे टिपायची डोळ्याला सवय होत राहते !

आपल्याला पुढे जायला हरकत नाही.प्रश्न विचारते वेळी बुधाची महादशा , शुक्राची अंतर्दशा आणि राहू विदशा चालू होती.

बुधा ची महादशा जानेवारी 2030 पर्यंत चालणार आहे .

बुधाचे कार्येशत्व 4 / 10 / — / 9, 12 असे नोकरी जाण्याचे आणि मिळण्याचे दोन्ही संकेत देणारी आहे. बुधाचा सब चंद्र:  10 /  10 / 9, 12 / 10 म्हणजे बुधाचा सब चंद्र पण नोकरी जाण्याचे आणि मिळण्याचे दोन्ही संकेत देत आहे.

बुधाच्या महादशेत चालू असलेली शुक्र अंतर्दशा एप्रिल 2019 पर्यंत चालणार आहे . प्रश्न कुंडलीचा एकंदर आवाका सहा महीने इतकाच (काही अपवादात्मक परिस्थितीत एक वर्ष) असल्याने जातकाच्या प्रश्ना बाबतीत जे काही घडायचे ते सारे या शुक्राच्या अंतर्दशेतच घडायला हवे , या पलीकडे जाण्याची आवश्यकता नाही.

अंतर्दशा स्वामी शुक्राचे कार्येशत्व असे असेल:

शुक्र  अष्टमात (8) , शुक्राच्या राशी अष्टम (8) आणि लग्न (1) स्थानी, शुक्र मंगळाच्या नक्षत्रात , मंगळ नवम (9) स्थानात , मंगळाच्या राशीं सप्तम (7) आणि द्वितीय (2) स्थानांवर.

शुक्र: 9 / 8 / 2 ,7 /1, 8

या शुक्राचे कार्येशत्व एव्हढ्यावरच संपत नाही !

लक्ष देऊन पाहिले तर असे दिसते की या शुक्राच्या नक्षत्रात एकही ग्रह नाही (शुक्र कोणाही ग्रहाचा नक्षत्र स्वामी नाही) अशा परिस्थितीत शुक्राला ‘पोझिशनल स्टॅटस’ मिळते आणि मग शुक्र ज्या भावांचा सबलॉर्ड असतो त्याचा तो प्रथम दर्जाचा कार्येश होतो !

शुक्र षष्ठम (6) आणि व्यय (12) स्थानाचा सब लॉर्ड आहे आणि  शुक्राच्या नक्षत्रात एकही ग्रह नाही त्यामुळे तो या दोन्ही 6, 12 चा कार्येश होतो.

शुक्र 27 वृषभ आणि शनी 27 वृश्चीक असे असल्याने त्यांच्यात पूर्ण अंशात्मक प्रतियोग आहे त्यामुळे शनीचे कार्येशत्व पण शुक्राला मिळेल , शनी: 10 / 2 / 9 , 12 / 4 , 5

षष्ठम भावा कडे बघितले तर असे दिसेल की या भावात एकही ग्रह नाही, गुरु भावेश आहे पण गुरुच्या नक्षत्रात एकही ग्रह नाही. म्हणजे षष्ठम भावाचा गुरु हा एकमेव कार्येश होतो अशा परिस्थितीत गुरु ज्या ग्रहांचा सब आहे असे सर्व ग्रह या भावाचे प्रबळ कार्येश होतात, गुरु शुक्राचा सब आहे. म्हणजे शुक्र हा षष्ठम  स्थानाचा ‘अ’ दर्जाचा कार्येश आहे.

तृतीय भावा कडे बघितले तर असे दिसेल की या भावात एकही ग्रह नाही, गुरु भावेश आहे पण गुरुच्या नक्षत्रात एकही ग्रह नाही. म्हणजे तृतीय भावाचा गुरु हा एकमेव कार्येश होतो अशा परिस्थितीत गुरु ज्या ग्रहांचा सब आहे असे ग्रह या भावाचे प्रबळ कार्येश होतात, गुरु शुक्राचा सब आहे. म्हणजे शुक्र हा तृतीय स्थानाचा ‘अ’ दर्जाचा कार्येश आहे.

शुक्राचे एकंदर कार्येशत्व :

शुक्र: 9 / 8 / 2 ,7 /1, 8

पोझिशनल स्टॅटस असल्याने , ‘सब’ म्हणून कार्येशत्व: 6, 12

शनीच्या दृष्टीने मिळालेले कार्येशत्व: 10 / 2 / 9 , 12 / 4 , 5

खास नियमाने मिळालेले कार्येशत्व: 3, 6

शुक्राचा सब गुरु आहे गुरुचे कार्येशत्व , गुरु व्ययात (12) , गुरुच्या राशी तृतीय (3) आणि षष्ठम (6) स्थानी , गुरु चंद्राच्या नक्षत्रात चंद्र स्वराशीत कर्केत , दशम (10) स्थानात.

गुरु:  10 / 12 / 10 / 3, 6

म्हणजे शुक्राचा सब , गुरु हा नोकरी मिळण्या बाबत अनुकूल आहे आणि 3, 12 च्या माध्यमातुन नोकरी जाण्याचे संकेत देत आहे.

या सार्‍याचा आढावा घेतल्यास असे दिसते की या शुक्राच्या अंतर्दशेत जातकाची नोकरी (9, 5 , 12)  जाईल आणि दुसरी नोकरी मिळेल (2, 10 )

अशा तर्‍हेने शुक्र अंतर्दशा नोकरी जाण्यास आणि दिसरी नोकरी मिळण्यास अनुकूल आहे दिसत असल्याने आपण पुढे जाऊन या शुक्र अंतर्दशेतल्या विदशा तपासू.

या शुक्राच्या अंतर्दशेत , सध्या राहू विदशा चालू असून ती 10 नोव्हेंबर 2017 पर्यंत चालणार आहे. राहू विदशे नंतर गुरु ची विदशा येईल ती मार्च 2018 पर्यंत असेल , या दोन्ही विदशांचा मिळून कालावधी साधारण 8 महीन्यांचा आहे, प्रश्नकुंडलीचा आवाका साधारण इतकाच असल्याने गुरु च्या पुढच्या विदशा आपल्याला पहावयाच्या नाहीत. जातकाच्या प्रश्नाचे जे काही उत्तर असेल ते या दोन विदशांच्या माध्यामातूनच द्यावे लागेल

प्रथम आपण ‘राहू’ विदशा तपासू.

राहू चे कार्येशत्व:

राहू दशमात (10) स्थानात,  राहूला राशी स्वामित्व नाही,  राहू  केतूच्या नक्षत्रात ,  केतु चतुथ  (4) स्थानात , केतूला राशी स्वामित्व नाही.
राहू: 4 / 10 / — / —

राहू बुधाच्या युतीत , बुध दशमात (10) , बुधाच्या राशी नवम (9) आणि व्यय (12) स्थानांवर, बुध केतू च्या नक्षत्रात , केतू चतुर्थ (4) स्थानात , केतू ला राशी स्वामित्व नाही. बुध:  4 / 10 / — / 9, 12

राहू रवीच्या राशीत.  रवी नवमात (9) स्थानात, रवीची राशी लाभ स्थानी  (11) , रवी शनीच्या नक्षत्रात , शनी द्वितीय स्थानात  (2)  शनीच्या राशी चतुर्थ  (4) आणि पंचम (5) स्थानांवर.
रवी: 2 / 9 / 4,5  / 11

म्हणजे राहू  चे एकंदर कार्येशत्व असे असेल:

राहू : 9 / 4 / 2. 7 / —
युती बुध:  4 / 10 / — / 9, 12
राशीस्वामी रवी: 2 / 9 / 4,5  / 11

विदशा स्वामी राहू नोकरी जाण्याचे संकेत 9, 5, 12 च्या माध्यमातून देत आहे तसेच नोकरी मिळण्याचे संकेत 10, 11 च्या माध्यमातून देत आहे.

राहू चा सब शुक्र आहे , त्याचे कार्येशत्व आपण पाहीले आहे त्या नुसार शुक्र नोकरी जाणे आणि नोकरी मिळणे अशा दोन्ही घटनांसाठी नुकूल आहे.

या सार्‍याचा विचार करता या राहू च्या विदशेत जातकाची नोकरी जाईल असे दिसत आहे.

नोकरी जाण्या बाबतची आपली ‘महादशा – अंतर्दशा – विदशा ‘ साखळी अशी असेल:

बुध – शुक्र – राहू

बुध महादशा 2030 पर्यंत चालणार, तसेच नोकरी जाणे – नोकरी मिळणे अशा सारख्या घटनां आयुष्यात अनेक वेळा घडू शकतात त्यामुळे आपण महादशे पेक्षा अंतर्दशा आणि विदशा यांना म्हणजेच शुक्र – राहू या साखळीला जास्त महत्त्व देऊ.

आता गोचरीचा कौल घ्यायचा.

प्रश्न कुंडली आहे , घटना काही महिन्यांत घडणार आहे त्यामुळे रवी चे भ्रमण तपासावे लागेल.

आपल्याला एकतर

शुक्राची रास  – राहू चे नक्षत्र

किंवा

रवी (राहूचा राशी स्वामी) – शुक्राचे नक्षत्र

असे रवीचे भ्रमण पाहावयाचे आहे.

प्रश्न विचारला आहे 24 जुलै रोजी , रवी कर्केत होता. 17 ऑगष्ट रोजी रवी सिंहेत दाखल होईल , सिंहेत शुक्राचे नक्षत्र आहे असल्याने इथे रवी – शुक्र ही साखळी जुळते हा कालावधी असेल

1 सप्टेंबर 2017 ते 13 सप्टेंबर.

पण आपण जर जरा पुढे जाऊन पाहिले तर असे दिसेल की रवी जेव्हा शुक्राच्या तूळ राशीत येइल तेव्हा शुक्राच्या तूळेत राहू चे नक्षत्र असल्याने इथेही शुक्र – रवी अशी साखळी जुळते. हा कालावधी येतो

24 ऑक्टोबर 2017 ते 06 नोव्हेंबर 2017.

आता प्रश्न पडतो यातला कोणता कालावधी निवडायचा?

कारण दोन्ही कालावधी राहू विदशे मध्ये येतात (10 नोव्हेंबर 2017 पर्यंत)

आता या दोन्ही कालावधीत येणार सुक्ष्मदशा पाहू , काही सुगावा लागतो का !

आपला पहीला कालावधी आहे 1 सप्टेंबर 2017 ते 13 सप्टेंबर.
या कालावधीत
बुधाची सुक्ष्मदशा 07 सप्टेंबर 2017 पर्यंत आहे आणि नंतर 13 सप्टेंबर 2017 पर्यंत केतु सुक्ष्मदशेचा भाग असेल.

आपला दुसरा कालावधी आहे 24 ऑक्टोबर 2017 ते 06 नोव्हेंबर 2017
या कालावधीत
चंद्राची सुक्ष्मदशा 01 नोव्हेंबर 2017 पर्यंत आहे आणि नंतर 06 नोव्हेंबर 2017 पर्यंत मंगळ सुक्ष्मदशेचा भाग असेल.

म्हणजे थोडक्यात बुध , केतु , चंद्र आणि मंगळ या पैकी कोणत्या ग्रहाची सुक्ष्मदशा फलदायी होणार ते आपल्याला ठरवायचे आहे.

आपण ‘नोकरी जाणे’ या घटनेचा विचार करत असल्याने : 3, 5, 9 ही स्थाने तर महत्त्वाची आहेतच , जोडीला 8 आणि 12 पण विचारात घ्यावे लागतील आणि नोकरी गेल्यावर काही काळ घरी बसावे लागल्यास 4 स्थान पण दुर्लक्षून चालणार नाही.

आता प्रथम पाहू 3: तृतीय (3) स्थानाचा भावेश गुरु हा एकमेव कार्येश होत असल्याने खास अधिकाराने शुक्र (जो गुरु च्या सब मध्ये आहे) पण तृतीय (3) स्थानाचा कार्येश होणार. आपला अंत्रद्शा स्वामी शुक्र असल्याने तो तृतीय स्थानाची सोय करणार आहे. आणि गुरु आपल्या सुक्ष्मदशा स्वामींच्या यादीत नाही.

पंचम (5) स्थानाचे मंगळ आणि रवी प्रथम दर्जाचे कार्येश आहते. रवी आपल्या सुक्ष्मदशा स्वामींच्या यादीत नाही , मंगळ सुक्ष्मदशा स्वामींच्या यादीत आहे . आपला अंतर्दशा स्वामी राहू रवीच्या राशीत असल्याने तो स्वत:च पंचमाचे फळ देईल. त्यामुळे पंचम (5) स्थानाची सोय झालेली आहे.

नवम (9) स्थानाचे शुक्र आणि केतू हे अ दर्जाचे कार्येश आहेत . केतू सुक्ष्मदशा स्वामी म्हणून प्रभावी ठरेल.

अष्टमाचा (8) चा शुक्र हा भावेश म्हणून एकमेव कार्येश होत असला तरी मंगळ , चंद्र आणि राहू हे शुक्राच्या सब मध्ये असल्याने ते ही अष्टमाचे प्रबळ कार्येश होतील. म्हणजे शुक्र आणि राहू अष्टम स्थानाची जबाबदारी पेलतील. दोन्ही आपल्या साखळीत दशास्वामी आणि विदशा स्वामी म्हणून आहेतच.

व्यय स्थानाचे (12) कार्येश गुरु आणि शनी, चंद्र आहेत .

आता राहिले चतुर्थ स्थान (4) , बुध आणि राहू चतुर्थ स्थानाचे प्रबळ कार्येश आहेत , दोन्ही आपल्या साखळीत दशास्वामी आणि विदशा स्वामी म्हणून आहेतच.

या सगळ्याचा विचार करता चंद्र – मंगळ याच्या सुक्ष्मदशां पेक्षा बुध – केतू या सूक्ष्मदशां नोकरी जाण्याचीन घटना घडवून आणेल असे दिसते. मंग़ळाची सुक्ष्मदशा देखील आश्वासक असली तरी क्षेत्र कुंंडलीत केतु पंचमात आहे तर मंगळ दशमात आहे हा विचार करता केतू जास्त उजवा ठरतो. शिवाय केतू हा छायाग्रह तर आहेच शिवाय तो बुधाच्या अंशात्मक प्रतियोगात असल्याने बुधा पेक्षा जास्त प्रभावशाली ठरतो.

1 सप्टेंबर 2017 ते 13 सप्टेंबर. या कालावधीतल्या 07 – 13 सप्टेंबर 2017 पर्यंतचा केतु सुक्ष्मदशेचा भाग घटना घडवून आणण्याची मोठी शक्यता आहे. या कालावधीतल्या एफेमेरीज तपासल्या तर लक्षात तेते की 5 सप्टेंबर 2017 पर्यंत महादशा स्वामी बुध वक्री असेल , बुध मार्गी झाल्यानंतर म्हणजेच 6 सप्टेंबर 2017 नंतर केतु च्या सुक्षमदशेत घटना घडेल असा तर्क आपण करु शकतो.

01 सप्टेंबर 2017 ते 13 सप्टेंबर 2017 या 13 दिवसात जातकाची नोकरी जाईल.


आता जातकाचा पुढचा प्रश्न , जर नोकरी जाणार असेल तर नवीन नोकरी कधी मिळेल?


जातकाची नोकरी राहू च्या विदशेत जाणार असा आपला तर्क आहे. त्या मुळे याच राहू च्या विदशेत जातकाला नवीन नोकरी मिळणे अवघड आहे.

शुक्र अंतर्दशे अंतर्गत राहू  च्या विदशे नंतर गुरु ची विदशा चालू होईल ती 10 नोव्हेंबर 2017 रोजी आणि 28 मार्च 2018 पर्यंत चालेल.

या विदशा स्वामीचे कार्येशत्व आपण पाहीले आहे:

गुरु व्ययात (12) , गुरुच्या राशी तृतीय (3) आणि षष्ठम (6) स्थानी , गुरु चंद्राच्या नक्षत्रात चंद्र स्वराशीत कर्केत , दशम (10) स्थानात.

गुरु:  10 / 12 / 10 / 3, 6
गुरु नोकरी बाबत 10, 6 च्या माध्यमातून बलवान आहे

गुरु चा सब आहे शुक्र , शुक्र नोकरी मिळण्या बाबत  अनुकूल आहे.

म्हणजे गुरु विदशेत जातकाला नोकरी मिळणार.

आपली साखळी अशी असेल : बुध – शुक्र – गुरु

बुध महादशा 2030 पर्यंत चालणार, तसेच नोकरी जाणे – नोकरी मिळणे अशा सारख्या घटनां आयुष्यात अनेक वेळा घडू शकतात त्यामुळे आपण महादशे पेक्षा अंतर्दशा आणि विदशा यांना म्हणजेच शुक्र – गुरु या साखळीला जास्त महत्त्व देऊ.

आता गोचरीचा कौल घ्यायचा.

प्रश्न कुंडली आहे , घटना काही महिन्यांत घडणार आहे त्यामुळे रवी चे भ्रमण तपासावे लागेल.

आपल्याला एकतर

शुक्राची रास  – गुरु चे नक्षत्र

किंवा

गुरुची  राशी – शुक्राचे नक्षत्र

असे रवीचे भ्रमण पाहावयाचे आहे.

गुरु विदशेचा कालावधी आहे  – 10 नोव्हेंबर 2017 ते  28 मार्च 2018 या कालावधीतले  रवीचे भ्रमण पाहावयाचे आहे.

10 नोव्हेंबर 2017 ते 16 नोव्हेंबर 2017 या काळात रवी शुक्राच्या तूळेत गुरु च्या नक्षत्रात असेल , इथे आपली साखळी जुळते

रवी त्यानंतर मंगळाच्या वृश्चिकेत 17 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर असा असेल. मंगळ आपल्या साखळीत नाही.

त्यानंतर रवी 30 डिसेंबर ते 11 जानेवारी 2018 या कालावधीत रवी गुरुच्या धनेत शुक्राच्या नक्षत्रात असेल.  इथे आपली साखळी जुळते.

या नंतर 28 मार्च 2018 पर्यंत रवी मकर , कुंभ आणि मीनेत असेल हे भ्रमण निरुपयोगी आहे.

म्हणजे

10 नोव्हेंबर 2017 ते 16 नोव्हेंबर 2017

आणि

30 डिसेंबर ते 11 जानेवारी 2018

हे दोन कालावधी असे आहेत की जिथे आपली साखळी जुळते. आता या दोन पैकी कोणता कालावधी ?

या काळात गुरुच्या विदशेत येणार्‍या सुक्ष्मदशा पाहू.

10 नोव्हेंबर 2017 ते 16 नोव्हेंबर 2017 या कालावधीत गुरु सुक्ष्मदशा असेल.

30 डिसेंबर ते 11 जानेवारी 2018 या कालावधीत बुध , केतू या सुक्ष्मदशा असतील.

नोकरी साठी बुध , केतू प्रतिकूल आहेत , त्या तुलनेत गुरु बलवान आहेच शिवाय ज्या ग्रहाची विदशा त्याच ग्रहाची सुक्ष्मदशा हा नेहमीचा पडताळा असल्याने आपण 10 नोव्हेंबर 2017 ते 16 नोव्हेंबर 2017 या कालावधीची निवड करू.

10 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर या कालावधीत जातकाला दुसरी नोकरी मिळेल.

 

आपली अनुमाने अशी आहेत:

1 सप्टेंबर 2017 ते 13 सप्टेंबर 2017 या कालावधीत जातकाची नोकरी जाईल.
10 नोव्हेंबर 2017 ते 16 नोव्हेंबर 2017  या कालावधीत जातकाला दुसरी नोकरी मिळेल

पडताळा:

8 सप्टेंबर 2017 , शुक्रवार जातकाची नोकरी गेली .

13 नोव्हेंबर 2017, सोमवार जातक नव्या नोकरीत रूजु  झाला आहे.

 

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.