झाडा खाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले

चिंब मनी आज पुन्हा , आठवूनी मेघ जुना , कोणी भिजलेले

रच काय वेस्पा च्या स्कुटरीं होत्या नै…

त्या स्कुटरींचा एक झमाना होता… त्या स्कुटरीत जो भारदस्त पणा होता , दिमाख होता तो आत्ताच्या मोटारसायकलींच्या सुळसुळाटात नाय बॉ …
मोटारसायकलीचा सगळा रुबाब टायर पंक्चर झाले की क्षणात उतरतो .. आमच्या स्कुटरीचे तसे नाय .. स्टेपणी असतीय अशा वख्ताला !

पण तो काळ गेला तो गेलाच , सोबत त्या स्कुटरीं पण  गेल्या  … आता उरल्यात त्या फक्त त्यांच्या आठवणीं … मनात कोपर्‍यात घट्ट जपून ठेवलेल्या. अल्बम मधल्या जुन्या काळ्या – पांढर्‍या फोटों सारख्या…

माझ्या मनातली स्कूटर मात्र अजूनही तरुण आहे , म्हणून बाकीचे रंग काळवंडले तरी ती अजूनही आपले तारुण्यातले रंग राखून दिमाखात उभी आहे…

अगदी ह्या फटूत दिसते ना तश्शी..

कालाय तस्में महा:

शुभं भवतु

About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.