माझे ज्योतिष शिकवणारे ऑन लाईन पद्धतीचे क्लासेस सध्या चालूच आहेत त्या जोडीला प्रत्यक्ष वर्गात शिकवला जाणारा एक अभ्यास वर्ग मी पुण्यात चालू करायचा विचार करत आहे.
मी गेली दोन वर्षे एका बड्या सॉफ्टवेअर प्रकल्पावर सल्लागार म्हणून काम पहात आहे. तो प्रकल्प सध्या मुंबैत चालू असला तरी लौकरच म्हणजे ऑगष्ट मध्ये पुण्यात स्थलांतरीत होत आहे त्यामुळे मला ऑगष्ट पासून मुंबै ऐवजी पुण्यात कामा निमित्त भेट घ्यावी लागणार आहे, म्हणजेच आठवड्यातून दोन दिवस मी पुण्यात असेन, त्याचा सदुपयोग करुन पुण्यात एक ‘क्लास रुम ‘ पद्धतीचा ज्योतिष अभ्यासवर्ग सुरु करता येईल असा विचार करत आहे.
त्याबद्दल मी विचार असा केला आहे;
१) हा अभ्यासवर्ग ‘कृष्णमुर्ती पद्धती’ वर आधारीत असेल पण त्यात पारंपरीक ज्योतिषशास्त्राचा प्राथमिक पाठ्यक्रम (कृष्णमुर्ती पद्धती साठी जितका आवश्यक आहे तितका) नक्कीच घेतला जाईल.
२) ‘कृष्णमुर्ती पद्धती जशी आहे तशी ‘ अगदी सविस्तर पणे शिकवली जाईल. भरपूर उदाहरणे (केस स्ट्डीज) घेतल्या जातील.
३) कृष्णमुर्ती पद्धती शिकवतानाच , खरे ज्योतिष काय आहे, या शास्त्राच्या मर्यादा काय आहेत , या शास्त्राची नेमकी कुवत काय आहे? या शास्त्राचा नेमका उपयोग कसा करुन घेता येईल, मानसशास्त्रीय अंगाने जातकाचा, त्याच्या प्रश्नाचा आणि पत्रिकेचा कसा विचार करता येईल, आणि सगळ्यात मह्त्त्वाचे म्हणजे या शास्त्राद्वारे जातकांना मार्गदर्शन करताना कोणती पथ्ये पाळायची, व्यावसायिक शिस्त कशी जोपासायची, नितिमूल्ये कशी ठरवायची आणि पाळायची , कायदेशीर बाबी , अर्थकारण अशा अनेक बाबींचा या अभ्यासक्रमात उहापोह होईल. स्वानुभवातून मोलाचे मार्गदर्शन मिळेल.
४) कोणत्याही धार्मीक / आध्यात्मिक अवडंबरात न अडकता शुद्ध गणित आणि तर्कशास्त्रावर आधारीत ज्योतिष असेल त्यामुळे उपाय तोडगे , पूजा, नक्षत्र शांती, घराण्याचा शाप, पितृदोष असल्या कल्पनांना इथे थारा नाही.
५) अभ्यासक्रम आठवड्यातून एक दिवस , प्रत्येक वेळी सुमारे दीड – दोन तासाचे प्रत्यक्ष शिकवणे असा असेल, माझा दीड तास हा नेमका दीड तासच असेल , एक मिनिटही वाया घालवले जाणार नाही. संपूर्ण अभ्यासक्रम माझ्या अंदाजा नुसार सहा महिन्यात पूर्ण करता येईल.
६) अभ्यासक्रमाची फी साधारण रुपये १००० प्रति महीना असेल. तीन महीन्यांची फी आगावू भरावी लागेल. जागेचे भाडे आणि माझा नाशिक – पुणे प्रवासाचा खर्च लक्षात घेता एकदा भरलेली फी मी परत करु शकणार नाही.
७) अभ्यासवर्ग सध्यातरी माझ्या मुलाच्या पुणे- नगर रोड वरच्या सदनिकेत चालवला जाईल त्यामुळे उपलब्ध जागेचा विचार करता ५-६ विद्यार्थ्यांची लहानशी बॅच असेल , हे एका परीने चांगलेच राहील कारण त्यामुळे वैयक्तीक लक्ष देणे शक्य तर होईलच शिवाय क्लासचा वार / वेळ यात थोडीफार लवचिकता राहील.
८) क्लास चा वार आणि वेळ नंतर ठरवता येईल. मी सोमवार ते रवीवार मधले कोणतेही सलग दोन दिवस या साठी उपलब्ध असेल , दोन दिवस हाताशी असल्याने दोन बॅचेस चालवण्याचा विचार आहे.
९) दोन बॅचेस , प्रत्येकी ५-६ विद्यार्थ्यांच्या होत असतील तर आणि तरच असा अभ्यासक्रम चालवणे शक्य होईल अन्यथा नाही.
१०) मी कोणी फार मोठा पंडीत, ज्ञानी , विद्वान , व्यासंगी वगैरे कोणी नाही, ज्योतिषशास्त्राच्या प्रांताततले मला वाळूच्या कणा इतके सुद्धा नसेल असे थोडेसेच ज्ञान अवगत आहे पण मला जे येते ते चांगले येते याचा अभिमान आहे. मी जे शिकलो, वाचले, अनुभवले ते जास्तीतजास्त चांगल्या पद्धतीने आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा मी आटोकाट प्रयत्न करेन.
११) क्लास सप्तेंबर २०१९ मध्ये सुरु होईल , जर बाकीच्या बाबी जूळून आल्यातर १५ ऑगष्टचा सुमुहुर्त ही गाठता येईल !
ही पोष्ट केवळ असे क्लास चालवले तर त्याला काय प्रतिसाद मिळेल याचा अंदाज घेण्यासाठी आहे . आपण या अशा अभ्यासवर्गाला उत्सुक असाल तर मला कळवावे .
या पोष्टच्या तळाशी असलेल्या कॉमेंट सुविघे मार्फत :
आपले नाव , संपर्कासाठी फोन नंबर, आपल्याला कोणता वार (सोम.ते .रवी), कोणती वेळ सकाळ/ दुपार / संध्याकाळ सोयीची वाटते
ते कळवावे.
ज्यांच्या कडे माझा फोन नंबर आहे त्यांनी व्हॉट्स अॅप च्या माध्यमातून आपला विचार कळवावा. संपर्क करणार्यांना व्यक्तीश: उत्तरे दिली जातील.
शुभेच्छा
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
सर
मी या क्लास साठी इछुक आहे.
मी चिंचवड ला राहातो. मला रविवार संध्याकाळ ची वेळ सोयीची वाटते॰
धन्यवाद श्री नरेंद्रजी
आपली नोंद करुन घेतली आहे , कोर्स ची तयारी पूर्ण होताच मी आपल्याला कळवेन
सुहास गोखले
Sir me interested aahe. Malahi shanivar va ravivar sandhyakalchi vel yogya aahe
Name-Gorakshnath Kale
Mob no-9028205808/9423507467
धन्यवाद , आपलि नोंद कली आहे कोर्स ऑगष्ट 15 नंतर चालू करतोय आपल्याला कळवेनच
सुहास गोखले
Suhasji, I am interested. I stay in New Sangvi. Only sunday possible.
श्री विनितजी,
सप्रेम नमस्कार
आपण माझ्या ज्योतिष अभ्यास वर्गा बद्दल जी उत्सुकता दाखवली आहे त्या बद्दल मी आपले आभार मानतो.
अभ्यासवर्ग येत्या सप्टेंबर पासुन सुरु करत आहे, त्या संदर्भात सर्व माहिती मी आपल्याला कळवेन.
शुभेच्छा
आपला
सुहास गोखले