या ब्लॉग वर मी काही ज्योतिष विषयक ग्रंथांची माहिती देण्यास सुरवात केली आहे त्या संदर्भात अनेकांनी  ‘हे ग्रंथ कोठे विकत मिळतील’  अशी विचारणा केली आहे, प्रत्येकाला व्यक्तिशः: उत्तरे देण्यापेक्षा , एकच सविस्तर माहितीची पोष्ट करावी म्हणजे सर्वांना त्याचा लाभ होईल असा विचार करून ही पोष्ट लिहीत आहे.

ज्योतिषविषयक ग्रंथांसाठी पुण्यात माझ्या माहिती प्रमाणे चंद्रकांत शेवाळे यांच्या ‘रोहिणी बुक डेपो’ व्यतिरिक्त कोणी मोठा ग्रंथ विक्रेता नाही. (चूक भूल देणे घेणे!)

रोहिणी बुक डेपो

६४४/अ, बुधवार पेठ

जोगेश्वरी मंदिरा समोर

पुणे ४११ ००२

फोन:  ०२०-२४४५ ५८३८
पुण्यात ‘अनमोल’,‘रसिक’ यांच्या कडे सोमणशास्त्री, व.दा.भट यांचे ग्रंथ उपलब्ध असू शकतात. ‘पॉप्युलर’ मध्ये मला एकदा बी व्ही रमण यांचे काही ग्रंथ बघायला मिळाल होते, ‘इंटरनॅशनल’ यांच्या कडे कृष्णमूर्तींची तीन रीडर्स , सब लॉर्ड स्पीक्स इ. एकेकाळी उपलब्ध होते, सध्याची परिस्थिती काय आहे ते माहिती नाही, त्यांच्या कडे शरद उपाध्येंची पुस्तके उपलब्ध असतात. ‘उत्कर्ष’ यांच्या कडेही काही ग्रंथ मिळण्याची शक्यता आहे.

‘अनमोल’,‘रसिक’ – आप्पा बळवंत चौक, पुणे

‘पॉप्युलर’,‘इंटरनॅशनल’,‘उत्कर्ष’ – डेक्कन जिमखाना, पुणे

श्री.चंद्रकांत शेवाळे यांच्या ‘रोहिणी बुक डेपो’ यांच्या तर्फे ज्योतिषशास्त्रा वरच्या ग्रंथांची लायब्ररी एकेकाळी चालवली जात होती,   सध्याची परिस्थिती मला माहिती नाही.

श्री. एन. आर. सोनार यांनी ‘हॅन्डबुक ऑफ के.पी.’ हा एक अती उपयुक्त ग्रंथ संदर्भ तयार केला आहे. ‘रोहिणी बुक डेपो’ यांच्या कडे किंवा स्वतः: लेखकाकडे प्राप्त होऊ शकेल:

श्री. एन. आर. सोनार
अ-२, इंद्रायणी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोयायटी
एकलव्य कॉलेज जवळ, पौंड रोड
कोथरूड

पुणे ४११०३८
फोन: ०२०-२५२८६२७५, ९४२२५ १३९२६

श्री. एन. आर. सोनार यांनी कृष्णमूर्ती पद्धती वर आणखी एक नवा ग्रंथ सिद्ध केला आहे, तोही एकदा नजरे खालून घालावा.

बंगळूरू , मध्ये मला माहिती असलेली एक जागा म्हणजे ‘सपना बुक स्टॉल’ , यांच्या बंगळूरू मध्येच ६ शाखा आहेत, तीन-तीन मजली भव्य दुकाने आहेत. मी नेहमी त्यांचा मॅजेस्टिक सर्कल व कोरामंगला येथील शाखेतून ग्रंथ खरेदी करतो.  ज्योतिषशास्त्रा वरचे इंग्रजी मधील बरेचसे ग्रंथ इथे उपलब्ध असतात. यांची वेबसाइट आहे, त्या व्दारे आपल्याला हवी असलेले सर्व ग्रंथ आपण मागवू  शकता.

त्यांची वेबसाइट   https://sapnaonline.com/

कृष्णमूर्ती पद्धती वरचे ग्रंथ:
कृष्णमूर्तींच्या पश्चात त्यांच्या दोन्ही चिरंजीवांनी कृष्णमूर्तींच्या सहा रीडर्सची आपापसात वाटणी करून घेतली आहे, त्यामुळे ३ रीडर्स एका मुला कडून व उरलेली तीन दुसर्‍या मुलाकडून घ्यावी लागतात, हे दोघे चिरंजीव आपापल्या प्रकाशन संस्था मार्फत अनेक ग्रंथ प्रकाशित करत असतात.

थोरले चिरंजीव:

K. Subramaniam
Kirshman & co
New 5/2, Venkatesha Agraharam street
1st floor (near Sai Baba temple)
Mylapore
Chennai 800 004
phone: 2461 6278, 4214 128

धाकटे चिरंजीव

K. Hariharan
Krisnamurti Publications
F-21, 1st floor, spencer Plaza
769, Anna Sarai
Chennai 600 002

बुकगंगा:   http://www.bookganga.com .

माझ्या माहिती प्रमाणे फक्त वेबसाइट मार्फतच ग्रंथ विक्री होते. त्यांच्या कडील सध्याच्या उपलब्ध ग्रंथांची यादी बघता , बडया लेखकांचे ग्रंथ काही दिसले नाहीत, जे आहेत ते मला फारसे उपयुक्त वाटले नाहीत , अर्थात हे माझे वैयक्तीक मत आहे , आपण या वेबसाईटला भेट देऊन त्यांची यादी  एकदा  नजरे खालून घालायला हरकत नाही.

मुंबईच्या बाजारपेठेची मला माहिती नाही, तरी तारापोरवाला, गिरी बुक ट्रेडर्स यांच्या बद्दल ऐकले आहे, अनुभव नाही.

Giri Trading Agency
No.10 Ground floor
Parasmani Narayan Lane
Matunga
Mumbai
022-24141344, 022 24143140, 022 24158107

सप्तर्षी अॅस्ट्रॉलॉजी :  http://shop.saptarishisastrology.com/

या वेबसाइटवर ज्योतिषशास्त्रा वरचे हिंदी व इंग्रजी भाषेतील जवळजवळ सर्वच ग्रंथ उपलब्ध आहेत. (कृष्णमूर्ती रीडर्स व कृष्णमूर्तींचे दोन्ही चिरंजीव प्रकाशित करत असलेले ग्रंथ वगळता).ही केवळ ग्रंथ विक्रीचीसाईट नाही, माहितीचा अफाट खजिना आहे, जरूर भेट दया.
कै. सुरेश शहासने यांचे ग्रंथ त्यांचे चिरंजीव श्री. संदीप शहासने यांच्या कडे उपलब्ध होतील. त्यांचा पत्ता:
श्री. संदीप शहासने
१००, पार्डीवाला बिल्डिंग
सीताराम जाधव मार्ग
लोअर परेल
मुंबई ४००४१३
मोबा: ९८३३१४०७७०

कै.ज्योतिंद्र हसबे  आणि श्री. शरद जोशी यांचे सर्वच ग्रंथ , सुमेरू प्रकाशन यांच्या मार्फत प्रकाशीत झाले आहेत, सुमेरू प्रकाशन यांच्या कडून मेल ऑर्डर व्दारा मागवता येतील. पत्ता:
डी-६, राजहंस सोसायटी
टिळक नगर
डोंबिवली (पूर्व) ४२१ २०१
(०२५१)२४३५ ९६८

पाश्चात्त्य ग्रंथकारांचे ग्रंथ भारतात  मिळणे दुरापास्तच. त्यासाठी आपल्याला मेल ऑर्डरचाच पर्याय आहे. मी माझे ग्रंथ खालील वेबसाइट्स वरून मागवतो:

www.amazon.com
यांच्या कडे नवे व जुने (अॅमेझॉन मार्केट प्लेस) दोन्ही ग्रंथ उपलब्ध असतात. अलीकडच्या काळात अॅमेझॉन  ने  पोष्टेज चा खर्च खूप वाढवल्यामुळे अॅमेझॉन हा पर्याय आता महागडा बनला आहे, पण काही वेळा एखादा ग्रंथ फक्त त्यांच्या कडेच उपलब्ध असतो , तेव्हा इलाज रहात नाही.
www.amazon.in
यांच्या कडे नवे ग्रंथ उपलब्ध असतात (भारतीय लेखकांचे देखील). पोस्टेज चा खर्च लागत नाही, पण किंमती डॉलर चे रुपयांत रूपांतर करून आलेल्या असतात.

www.abebooks.com
यांच्या कडे फक्त जुनेच  ग्रंथ उपलब्ध असतात. ग्रंथ जुने असले तरी त्यांची अवस्था नव्या ग्रंथांसारखीच असते, पोष्टेज चा खर्च आवाक्यातला असतो.

www.booksepository.com
यांच्या कडे फक्त नवेच  ग्रंथ उपलब्ध असतात. इथे पोष्टेज चा खर्च नाही (फ्री शिपिंग). काही वेळा ‘जुना ग्रंथ + पोष्टेज’  यांच्या एकत्रित खर्चा पेक्षा ‘नवा ग्रंथ + मोफत शिपिंग’ हे समीकरण स्वस्तात पडते.या तिन्ही ठिकाणी डॉलर या चलनात पैसे भरावे लागतात, पण त्याची काळजी नाही, तुमच्या कडे जर ICICI Bank चे डेबिट /ATM कार्ड असले तर बिनधास्त वापरा. चालते. डॉलर चे रुपयांत रूपांतर करून तेव्हढे पैसे तुमच्या खात्यातून वजा होतात.

या तिन्ही ठिकाणांहून मागवलेले ग्रंथ (साध्या पोष्टाने) साधारण पणे २० ते ४० दिवसांत घरपोच मिळतात. ग्रंथ मिळाला नाही असे सहसा होत नाही आणि दुर्दैवाने तसे झालेच तर तक्रार केल्यास विनाविलंब तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतात (तुमच्या खात्यात जमा करतात).

माझ्या एका मित्राला कै. व्दारकानाथ राजेंच्या ग्रंथांचा पूर्ण संच (नवा) श्री क्षेत्र नरसोबाची वाडी (सांगली-कोल्हापूर) सारख्या खेडेगावात, सहज उपलब्ध झाल्याचे ऐकून मौज वाटली. कै. व्दारकानाथ राजेंचे ग्रंथ एकेकाळी खूप गाजले होते (१९३० ते १९६०), नंतरच्या काळात ते बाजारातून गायब झाले, सन २००० मध्ये त्यांचे सर्वच ग्रंथ पुन्हा प्रकाशित झाले आहेत (सावित्री प्रकाशन पुणे) , ते ही लौकरच संपतील (खरे खोटे माहीत नाही, पण मी असे ऐकले आहे की ह्या गंथां ची मुद्रण प्रत असलेली सि.डी. अपघातात नष्ट झाल्याने ह्या ग्रंथांचा स्टॉक एकदा का संपला की ते पुन्हा प्रकाशित होतील का नाही ते सांगता येणार नाही.) ग्रंथ चांगले आहेत, स्वस्त आहेत, आत्ता बाजारात उपलब्ध आहेत तेव्हाच घेऊन ठेवायला काहीच हरकत नाही.

श्री.सुनील गोंधळेकरांचे ग्रंथ त्यांनी स्वतः:च प्रकाशीत केल्यामुळे त्यांच्या कडे चौकशी केल्यास हमखास मिळू शकतील.त्याँच्या ‘4 स्टेप थिअरी’ वरच्या नोटस फक्त त्यांच्याच कडे उपलब्ध आहेत.
नक्षत्रदीप प्रकाशन
१०९, गोदावरी, लक्ष्मी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स
वर्तक नगर
ठाणे ४०० ६०६
फोन: २५८८ ८१७९१३)

सागर पब्लिकेशन्स यांनी अनेक उत्तमोत्तम ग्रंथांचे प्रकाशन केले असून त्यांच्या कडूनही मेल ऑर्डर व्दारा मागवता येतील.
www.sagarpublications.com/

काही दुर्मिळ ग्रंथ व पोथ्या दिल्लीला चांदणी चौकात ‘चौखंबा प्रकाशन’ येथे उपलब्ध आहेत.

चंद्रकांत भटट यांचे ग्रंथ खूप दुर्मिळ आहेत (त्यामुळे महागही आहेत), पैसे देऊनही मिळतील याची खात्री नाही तरी खाली दिलेल्या वेबसाईर्टस वर चौकशी केल्यास माहिती मिळू शकते.
कै.हसमुखराय मेहता , अहमदाबाद, गुजरात, http://www.astroclinic4u.com/sitemap.htm
श्री कनक बोसमिया http://kpastrologer.com/index.php

ज्योतिषशास्त्रा वरचे बरेच हिंदी व इंग्रजी Motilal Banarasidas  यांनी प्रकाशीत केले आहेत, ते त्यांच्या  वेबसाइट वर उपलब्ध आहेत. http://www.mlbd.com/

मला वाटते मी बहुतांश ग्रंथ विक्रेत्यांचा आढावा घेतला आहे. आणखी ही काही नक्कीच असू शकतील याची मला कल्पना आहे, तरी काहींचा उल्लेख राहिला असल्यास तो केवळ त्यांच्या विषयीच्या माझ्या अज्ञानातूंनच आहे.

दिलेल्या माहिती  मध्ये काही चूकां वा त्रुटी असू शकतात.या व्यतिरिक्त आपल्या कडे काही जादा वा वेगळी माहिती असल्यास मला जरूर कळवावे.

 ‘हे ग्रंथ कोठे कोणत्या वेबसाईट वरुना  डाऊन  लोड  करायला मिळतील’  अशी विचारणा (?)केली गेली आहे,ह्याला एकच उत्तर आहे ते म्हणजे, पैसे न भरता डाऊनलोड  करणे ही चोरी आहे ‘

पुढ्च्या काही पोष्टस मधुन इतर काही रिसोर्सेसची माहीती देतो: ई मॅगॅझीन्स, डिस्कशन ग्रुप्स, फोरमस, नियतकालिके इ.

तेव्हा ब्लॉग ला भेट देत राहा,आपल्या सुचनां  व अपेक्षा कळवत राहा.

शुभं भवतु

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.