पुण्यात क्लास सुरु !

पुण्यात क्लास सुरु !

दीर्घ प्रतिक्षे नंतर क्लास पुण्यात चालू करतोय.. 28  /  29 मार्च 2020 पासून  मग इतर लोक्स करतात तशी जैरात केलीच पायजे ना? म्ह्णूण जैरात बनवली, शिरीयसली ! class.suhas@gmail.com या ईमेल वर संपर्क साधा, लगोलग ! त्याचे काय आहे, पुण्यातली जागा लहान असल्याने जास्त लोक्स मावणार नाहीत , दोन बॅच करतो आहे पण तरीही... पैला येणार त्याला शीट भेटणार , स्टॅडींग अलौड नाsssय ! तेव्हा नाव नोंदणी केलेली बरी ... या मंडली, शिकूया जरा ज्योतिष का काय म्हणतात ते ! शुभेच्छा

ज्योतिष शिकायचेय ?

ज्योतिष शिकायचेय ?

माझे ज्योतिष शिकवणारे ऑन लाईन पद्धतीचे क्लासेस सध्या चालूच आहेत त्या जोडीला प्रत्यक्ष वर्गात शिकवला जाणारा एक अभ्यास वर्ग मी पुण्यात चालू करायचा विचार करत आहे. मी गेली दोन वर्षे एका बड्या सॉफ्टवेअर प्रकल्पावर सल्लागार म्हणून काम पहात आहे. तो प्रकल्प सध्या मुंबैत चालू असला तरी लौकरच म्हणजे ऑगष्ट मध्ये पुण्यात स्थलांतरीत होत आहे त्यामुळे मला ऑगष्ट पासून मुंबै ऐवजी पुण्यात कामा निमित्त भेट घ्यावी लागणार आहे, म्हणजेच आठवड्यातून दोन दिवस मी पुण्यात असेन, त्याचा सदुपयोग करुन पुण्यात एक ‘क्लास रुम ‘ पद्धतीचा ज्योतिष अभ्यासवर्ग सुरु करता येईल असा विचार करत आहे. त्याबद्दल मी विचार असा केला आहे; १) हा…

जातकाचा प्रतिसाद – ३४

जातकाचा प्रतिसाद – ३४

जातका कडून नुकताच प्राप्त झालेला हा एक उत्साहवर्धक प्रतिसाद ! 28 नोव्हेंबर 2018 मध्ये जातकाने 'नोकरी' विषयक प्रश्ना बाबत मार्गदर्शन घेतले होते. जातकाने तेव्हा प्रश्न विचारला होता: नमस्कार सुहासजी, hope u r doing well ! U might remember i have taken your consultation 2-3 times before..I have a horary question related to job i am hoping to get.. ..Let me know if I can share more details on whatsapp or mail and what will be your fees ! Regards, XXXXXXX   जातकाने विचारलेल्या या प्रश्नाच्या अनुरोधाने जातकाची जन्मपत्रिका आणि प्रश्नकुंडली यांचा एकत्रित अभ्यास केल्या नंतर मी काढलेले निष्कर्ष असे होते:…

पत्रिकेवरून नोकरी- व्यवसायाचा कल !

पत्रिकेवरून नोकरी- व्यवसायाचा कल !

जन्मपत्रिकेच्या अभ्यासावरून एखाद्या व्यक्तीला नोकरी – व्यवसाया बद्दल काही सांगता येते का? याचे उत्तर म्हणले तर ‘हो ‘ म्हणले तर ‘नाही’ असे आहे ! याचे कारण म्हणजे जन्मपत्रिका एखादी व्यक्ती नेमका कोणाता व्यवसाय करते हे सांगत नाही तर त्या व्यक्तीने कोणत्या प्रकाराचा व्यवसाय करावा हे सुचवते. म्हणजेच त्या व्यक्तीचा नैसर्गीक कल / नैसर्गिक गुणवत्ता , आवड – निवड , रुची दाखवते. पत्रिकेने दाखवलेला  हा ‘नैसर्गिक कल’ जिथे जास्त उपयोगात आणता येईल असा नोकरी -व्यवसाय निवडला तर जातकाला निश्चितच लाभदायक ठरतो. आता इथे ‘लाभदायक’ याचा अर्थ ‘भरपूर पैसा’ असे नाही तर तशा नोकरी – व्यवसाया मधून जातकाला कमालीचे समाधान आणि स्वास्थ्य…

जातकाचा प्रतिसाद – ३३

जातकाचा प्रतिसाद – ३३

जातका कडून मिळालेला आणखी एक उत्साहवर्धक प्रतिसाद! जातकाने जुलै २०१७ मध्ये संपर्क साधला होता. "विवाह योग कधी?"  असा प्रश्न होता , जातकाच्या जन्मपत्रिकेचा अभ्यास करून मी जातकाला ऑगष्ट २०१८ पासून विवाहा साठी अनुकूल कालावधी आहे आणि विवाह नोव्हेंबर २०१८ ते मार्च २०१९ या कालवधीत होण्याची मोठी शक्यता आहे असे कळवले होते. जातकाच्या या महिन्यात प्रतिसाद लाभला , मी भाकित केल्या प्रमाणे जातकाचा विवाह ऑगष्ट २०१८ च्या शेवटच्या आठवड्यात नक्की झाला आणि प्रत्यक्ष विवाह २१ फेब्रुवारी २०१९ रोजी साजरा होणार आहे! जातकाच्या ईमेल चा स्क्रीन शॉट सोबत आहे (गोपनीयते साठी जातकाचे नाव , ईमेल आयडी इ भाग खोडला आहे) Dear Suhas Sir,…

जातकाचा प्रतिसाद – ३२

जातकाचा प्रतिसाद – ३२

जातका कडून मिळालेला आणखी एक उत्साहवर्धक प्रतिसाद! जातकाने १६ सप्टेंबर २०१८ रोजी  संपर्क साधला होता. तेव्हा जातकाला नोकरी नव्हती , नविन नोकरी मिळेल का? असा प्रश्न होता , जातकाची जन्मपत्रिका आणि प्रश्नकुंडली यांचा एकत्रित विचार केला , साधारण काय होऊ शकेल याचा अंदाज आला. जातकाची जन्मवेळ बर्‍या पैकी अचूक असल्याने मी 'युरेनियन प्लॅनेटरी पिक्चर्स' हे तंत्रज्ञान पण वापरले आणि जास्त चांगले चित्र समोर उभे राहीले. जातकाला तसे कळवले. आज  जातकाने कळवले आहे की मी वर्वलेले भाकित बरोबर ठरले आहे. जातकाला मी दिलेल्या कालावधीतच  नोकरी मिळालेली आहे . मी  १५ डिसेंबर २०१८ ते १५ जानेवारी २०१९  या कालवधीत नोकरी मिळेल असे…

लोकप्रिय लेख

///////////////