“तुमचे काय , ज्योतिषाची बख्खळ कमाई चालू आहे !”

असे काहीसे मत्सरी / कुत्सीत बोलणे नेहमीच ऐकायला येते त्याशिवाय

“ज्योतिषी लूट करुन गब्बर होतात, आर्थिक शोषण करतात..”

हा अंनिस वाल्यांचा आवडता दावा आहेच !!

खरेच का ज्योतिषी एव्हढे कमावतात ?

चला तर हिशेबालाच बसू या … होऊ दे दूध का दूध , पानी का पानी !

हे अ‍ॅनलायसिस करताना मी खालील गोष्टी गृहीत धरल्या आहेत:

ज्योतिषी: जन्मपत्रिका / प्रश्नकुंडली मांडून ज्योतिष सांगणारे (म्हणजे यात हस्तरेखा, टॅरो कार्ड्स इ.पद्धतीने भविष्य सांगणारे वगळले आहे.). हा ज्योतिषी खरोखरीच प्रामाणिकपणे पत्रिकेचा अभ्यास करुन भविष्य सांगणारा आहे, काहीतरी थातुरमातुर सांगणारा नाही तसेच इंटीईश्युन वगैरे तंत्रे  वापरणारा नाही.

कमाई: फक्त ज्योतिष सांगून होणारी , इतर वस्तूंचा (खडे , रत्ने, माळा , यंत्रे , पुस्तके ई.) व्यापार करुन होणारी कमाई यात गृहीत धरलेली नाही.

व्यवहार: स्वच्छ्पणे मानधनाची रक्कम आकारतात त्याच ज्योतिषांचा विचार केला आहे. म्हणजेज “ठेवा पंचांगावर तुमच्या ईच्छे ला येईल ते” असे सांगणारे ज्योतिषी वगळले आहेत.

चला आता हिशेब करुया !

ज्योतिषी एका वर्षात किती दिवस काम करतो ?

वर्षातल्या  सर्वच्या सर्व ३६५ दिवस कोणीही काम करत नाही , मग तो ज्योतिषी असो किंवा अन्य कोणत्याही नोकरी – व्यवसायातली व्यक्ती.

मग या ३६५ दिवसांपैकी किती दिवस ज्योतिष्या साठी उपलब्ध असतात ?

 • आठवड्याची सुट्टी : ५२ दिवस काम नाही.
 • मोठे सण (दिवाळी, दसरा, गणपती, गुढीपाडवा इ.) : १२ दिवस काम नाही.
 • पक्ष पंधरवडा: १५ दिवस काम नाही.
 • नैमत्तीक कारणे , प्रवास, आजारपण : २४ दिवस काम नाही.
 • अमावस्या: १२ दिवस काम नाही.

हा हिशेब होतो ११५ दिवसांचा , म्हणजे वर्षातले फक्त २५० दिवसच काम होऊ शकते. म्हणजे सरासरी २१ दिवस प्रति महीना.

ज्योतिषी एका दिवसात किती जातक (केसीस) हाताळू शकतो ?

 1. जातक – ज्योतिषा यांच्यातला व्यवहार हा :प्रत्यक्ष भेट
 2. ईमेल (पत्र -व्यवहार)
 3. फोन
 4. वेब चॅट

अशा मार्गाने होत असतो .

जातक जर प्रत्यक्ष भेटणार असला तर सामान्यत: ज्योतिषाच्या कामाचे टप्पे खालील प्रमाणे असतात:

 1. जातकाचे स्वागत व प्राथमिक बोलणीं.
 2. जातकाचा प्रश्न समजाऊन घेणे
 3. जातकाची माहीती घेऊन पत्रिका तयार करणे
 4. जातकाच्या पत्रिकेचा त्याने विचारलेल्या प्रश्ना च्या अनुरोधाने अभ्यास करणे.
 5. जातकाला त्याच्या प्रश्ना बद्दल मार्गदर्शन करणे
 6. जातकाच्या शंकांचे निरसन करणे.
 7. जातकाची पाठवणी करणे

जातक ईमेल , फोन इ अन्य मार्गाने सेवा घेणार असला तरी त्यात फारसा मोठा बदल होत नाही , फक्त संपर्काचे माध्यम बदलेल पण लागणारा वेळ व होणारी मेहनत तितकीच असते.

एक जातक (केस) हाताळण्याला लागणारा वेळ ?

 1. जातकाचे स्वागत व प्राथमिक बोलणे: १० मिनिटें
 2. जातकाचा प्रश्न समजाऊन घेणे: १५ मिनिटें
 3. जातकाची माहीती घेऊन पत्रिका तयार करणे : ५ मिनिटें
 4. जातकाच्या पत्रिकेचा अभ्यास करणे : ४५ मिनिटें
 5. जातकाला त्याच्या प्रश्ना बद्दल मार्गदर्शन करणे : २० मिनिटें
 6. जातकाच्या शंकांचे निरसन करणे: १५ मिनिटें
 7. जातकाची पाठवणी करणे: १० मिनिटें

ह्या हिशेबाने एका केस साठी २ तास  वेळ लागू शकतो. (काही वेळा याहूनही जास्त वेळ लागू शकतो) अगदी झटका केला तरीही १ तास ३० मिनीटें लागतीलच (पण याहून कमी वेळात तर जातकाची रवानगी होत असेल तर त्याला चटावरचे श्राद्ध म्हणता येईल ! )

आपण सरासरी २ तास लागतील असे गृहीत धरु . हा वेळ एक जातक व एक प्रश्न असे असेल तर , जातकाचे जास्त प्रश्न असतील किंवा एखादा गुंतागुंतीचा प्रश्न असेल तर खूपच जास्त वेळ लागू शकतो.

ज्योतिषी एका दिवसात किती काम करु शकेल ?

ज्योतिषाच्या एकट्याच्या वैयक्तीक ज्ञान / कौशल्यावर त्याचे यश अवलंबून असते, त्यामुळे बहुतांश सगळेच काम त्याला एकट्याला पार पाडावे लागते. हाताखाली दोन- चार माणसें ठेवून काम करुन घेणे असा प्रकार जवळ जवळ शक्य नसतो. (अर्थात काही बडे ज्योतिषी असे करत असतील ही पण त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतकी कमी असेल) , त्यातही ज्योतिषाचे काम हे डोक्याचे आहे, मेंदूला परिश्रम देणारे असते.. थकवा फार लौकर येतो त्यामुळे एकटी व्यक्ती सर्व अवधाने सांभाळत किती केसीस एका दिवसात हाताळू शकेल याला नैसर्गिक मर्यादा पडतात.

ज्योतिषाच्या कामा साठी ज्योतिषाकडे किती वेळ उपलब्ध असतो ?

दिवसातले एकूण २४ तास त्यापैकी :

 • झोप: ६  ते ८ तास
 • चहा , नाष्टा, जेवण इ. २ – ३ तास
 • अंघोळ , प्रातर्विधी इ: १ – १॥ तास
 • पूजा / साधना / आराधना : ०.५ – १  तास
 • वृत्तपत्रे / टी.व्ही. इ:  ०.५ – १ तास
 • काही कौटुबिक कामे / करमणुक / विश्रांती : २ – ३ तास

ढोबळ हिशेबाने दिवसातले १४ तास गेले, राहीले १० तास !

हे इतकेच १० तास ज्योतिषाला व्यवसायासाठी उपलब्ध आहेत . पण हे सगळे १० तास जातकाच्या केसेस साठी मिळत नाहीत , यातही काही कटौती होते:

फोन कॉल्स : पूर्णवेळ , व्यावसायीक ज्योतिष्याला दिवसाला ७ / ८ फोन कॉल्स येणे अगदी सहज शक्य असते , चौकशी करणे , अपॉईंटमेंट या संदर्भातले कॉल्स तर असतातच शिवाय शंका विचारणारे , फिडबॅक देणारे ,  ख्याली खुशालीचे कॉल्स पण असतात, व्यवसाय म्हणले की हे कॉल घ्यावे लागतात. (यात टेले-मार्केंटीग वाल्यांचे कॉल्स धरले नाहीत !)  आणि प्रत्येक कॉल मागे  ३ -५ -१० मिनीटे सहज जातात. अगदी सरासरी ५ मिनिटांचा हिशेब केला तरी ३० – ४५ मिनिटें यात जातातच.

इमेल्स , एसेमेस, फेसबुक, व्हॉट्सॅप : आजकाल या माध्यमां द्वारा मोठ्या प्रमाणत संपर्क साधला जातो, असे मेजेस वाचणे व त्याला उत्तर देणे यासाठी ही बराच वेळ द्यावा लागतो. रोजच्या १० – १२ इमेल्स ,  ५ -६  एसएमएस , १० व्हॉट्सॅप मेसेजेस ,  १० -१५ मिनिटांचा फेसबुक सेशन पण धरायला पाहीजे. या सगळ्यात  साधारण ३० मीनीटे ते १ तास रोजचा मोडू शकतो.

सेक्रेटरी ठेऊ शकणारे काही बडे ज्योतिषी आहेत ही पण मघाशी म्हणलो तसे असे ज्योतिषी अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके आहेत. जवळ जवळ सगळ्याच ज्योतिषाचे दुकान हे ‘वन मॅन शो’ असल्याने या दोन्ही अ‍ॅक्टीव्हीटीज साठी सुमारे दीड -दोन तासाचा वेळ हा द्यावाच लागतो.

काही ज्योतिषी वेबसाईट वाले असतात, काहींचे ब्लॉग असतात , काही वृत्तपत्रें , मासिकें यात लिखाण करत असतात या कामासही काही वेळ द्यावा लागतो. एखादी अभ्यासपूर्ण पोष्ट प्रकाशीत करायची असेल  तर विषय ठरवणे , माहीती गोळा करणे, रचना करणे , टायपींग करणे , एडीटींग / प्रुफ रीडींग या सगळ्या गोष्टींना कल्पनेच्या बाहेर वेळ लागतो.

कोणताही चांगला ज्योतिषी आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतो, त्यासाठी ग्रंथांचे वाचन – मनन करणे, काही संशोधन पर प्रकल्प हाती घेणे अशा कामांनाही वेळ द्यावा लागतो.

बरेचसे ज्योतिषी त्यांच्या घरातूंच हा व्यवसाय चालवत असतात , काही थोड्याजणांची ऑफिसेस असतात. जर ज्योतिषाचे वेगळे ऑफीस असेल तर त्या ऑफीस ला जाण्या – येण्याला लागणारा प्रवासाचा  वेळ (तो कदाचित  १ -२ तास ही असू शकतो)  गृहीत धरला पाहीजे.

शेवटी ज्योतिष हा व्यवसाय म्हणून स्विकारला असल्याने , व्यवसाय वृद्धी (मार्केटींग ) साठी काही वेळ द्यावा लागतो.

आणि ‘अंनिस’ वाले म्हणतात तसे गब्बर ज्योतिषी असेल तर लोकांचे शोषण (हा त्या ‘अंनिस’  वाल्यांचा अगदी आवडता शब्दप्रयोग !)  करुन मिळवलेला पैसा मोजायला पण वेळ द्यावा लागणार ना ?

या हिशेबाने ज्योतीषाला मुख्य कामा साठी अंदाजे ६ – ८ तासच उपलब्ध होतात. आपण आधी हिशेब केला होता त्याप्रमाणे एका जातकासाठी २ तास लागत असल्याने एका दिवसात ४ जातकांचे काम समाधान कारक रित्या करता येईल.

म्हणजे ‘प्रती दिवशी ४ केसेस’  हीच ज्योतिषाची ‘ईन्स्टाल्ड कपॅसीटी ‘ !

ज्योतिष्याला जे काही कमवायचे असेल ते ह्याच ४ जातकां कडून !

आता काही ज्योतिषी गर्वाने ‘आम्ही दिवसाला १० -१२ पत्रिका बघतो’ असे म्हणत असतात,  पण तेवढ्या पत्रिका दिवसाला बघायच्या तर एका केसला अर्ध्या – पाऊण तासा पेक्षा जास्त वेळ देता येणार नाही , म्हणजेच प्रत्यक्ष पत्रिकेचा अभ्यास करायला १५  मिनिटांच्या पेक्षा जास्त वेळ देता येणार नाही, एव्हढ्या वेळात पत्रिकेचा सांगोपांग अभ्यास होत नाही अगदी के.पी. मध्येही नाही !

अशा तर्‍हेने जर कोणी पत्रिका बघत असेल तर त्या ज्योतिषाकडे गेलेल्या जातकाचे दुर्दैवच म्हणावे लागेल !

ठीक आहे,  आता या ४ जातकां कडून कमाई किती होणार?

ते आपण पुढच्या भागात पाहू

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

6 प्रतिक्रिया

///////////////
 1. स्वप्नील

  खरच आहे सुहास जी , इतर व्यावसाईकांचे जसे कष्ट दिसतात तसे जोतीशांचे कष्ट दिसत नाहीत . याला सुधा बरीच करणे आहेत .

  0
  1. सुहास गोखले

   श्री. स्वप्नीलजी,

   आपले म्हणणे खरे आहे , एका पत्रिकेचा शास्त्रशुद्ध अभ्यास करायचा तर पूर्ण दिवस लागू शकतो. पण त्या पूर्ण दिवसाच्या मेहेनतीची भरपाई जातक करायला तयार नसतो त्यामुळे झटका करुन, वरवर पाहून काहि तरी थातुर मातुर / गोलमाल / दोन्ही ड्गरीं वर हात ठेवणारे (छापा मी जिंकलो, काटा तू हरलास !) सांगणारेच जास्त आहेत.

   सुहास गोखले

   0
 2. Anant

  श्री. सुहासजी,

  एकदम वेगळा विषय व मुद्देसूद.
  “हे काम डोक्याचे आहे, मेंदूला परिश्रम देणारे असते.. थकवा फार लौकर येतो “- १०१% सहमत.
  हा थकवा समोरच्यांना दिसत नाही – त्यांना वाटते दिवसभर बसून खोऱ्याने पैसे ओढतात.

  A study headed by Samuele Marcora, a University of Kent Professor of Exercise Physiology, has proven that thinking hard really can leave your body exhausted.

  धन्यवाद,

  अनंत

  0
  1. सुहास गोखले

   श्री. अनंतजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   जानेवारीत आम्ही नव्या (भाड्याच्या) जागेत स्थलांतर केले, नव्या जागेला सूट होईल असे एक छान (काहीसे महागडे) कार्पेट खरेदी केले. ते पाहताच माझे एक नातेवाईक पिचकारी मारुन गेले ” कार्पेट भारी आहे , तुमचे काय ज्योतिषाची बक्कळ कमाई आहे …!” त्या पिचकारी वरुन ह्या लेखाचा विषय सुचला !!

   बाकी ज्या कामात डोके / मेंदू वापरला जातो म्हणजे जी कामें बौद्धीक असतात त्यात थकायला जास्त होते आणि विश्रांतीची गरज ही जास्त असते , तुलनात्मक दृष्ट्या शारीरीक श्रमाची कामें करुन आलेला थकवा लौकर भरुन निघतो.

   ज्योतिषाच्या कामात तर सतत संगणका समोर बसावे लागते , किचकट फिगर्स (पत्रिका) अभ्यासाव्या लागतात, स्मरणशक्ती व लॉजीक फॅकल्टी वर अतोरिक्त ताण येतो, वेगाने कॅल्क्यूलेशन्स करावी लागतात त्यामुळे न्यूरॉन फटीग येतो, , जातकांशी बोलावे लागते , त्यामुळे डोळ्याचे त्रास, सॉन्डीलायसीस, अ‍ॅसिडिटी, कॉन्स्टीपेशन , बॅक पेन , कारपेल टनेल सिंड्रोम , व्होकल कॉर्ड्स व घसा या संबधातले आजार हे शारीरीक आजार होण्याची शक्यता जास्त असते . हे झाले शारीरीक, त्या शिवाय सतत जातकांच्या समस्या , त्यांची निगेटीव्हीटी ऐकत राहावी लागते , त्याचा व त्या निगेटीव्ह एनर्जी चा मानसिक त्रास होत असतोच , काही वेळा ‘सायकीक अ‍ॅटॅक ‘ चा सामना करावा लागतो ! (हा ‘सायकिक अ‍ॅटॅक’ तसा कोणावरही होऊ शकतो , त्याबद्दल मी कधीतरी लिहेन .. अधून मधून मला या बाबत आठवण करुन देत जा !)

   सुहास गोखले

   +1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.