खरे तर  ज्योतिषाच्या कमाईचे चर्वण गेल्या भागातच संपले आहे  पण उपाय – तोडगे हा विषयच इतका गहन (?) आहे की त्याबद्दल जेव्हढे लिहावे तेव्हढे कमीच! त्यामुळे खास लोकाग्रहास्तव आणखी थोडे अधिक लिहावे असे मनापासून वाटले म्हणून  हा लेख (दोन भागात) .

एक डिसक्लेमर !

या लेखात मांडलेली उपाय – तोडग्यां  बाबतची  मतें माझी स्वत:ची आहेत .

अतर्क्य , अनाकलनिय,  अतिंदिय शक्तींचा अनुभव मी बर्‍याच वेळा घेतला आहे , त्या मागची कारणमिमांसा शोधण्याचा बराच प्रयत्न केला आहे , खूप वाचले आहे , बर्‍याच लोकांना भेटलो आहे, त्यातून माझी ठाम मतें बनली आहेत,  ती आज जशी आहेत तशी मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

ह्या लेखात मी काही ठिकाणीं  ‘भाकड / फसवणूक /  बकवास’  असे शब्द प्रयोग जरुर केले आहेत पण  त्यात कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतु नाही, तसा गैरसमज कोणीही करुन घेऊ नये.

‘अमुक तमुक उपाय / तोडग्या चा  अनुभव आला पण ते खोटे कसे ?” या संभाव्य प्रतिवादाच्या संदर्भात जमेल तसा आणि शक्य तिथे मी शास्त्रीय / तर्कशास्त्रा वर आधारीत खुलासा केला आहे पण त्यावर याहुन जास्त वाद – विवाद घालायची माझी इच्छा नाही.

 

या लेखमालेतला पहिले भाग इथे वाचा:

ज्योतिषाची कमाई किती ? – भाग १

ज्योतिषाची कमाई किती ? – भाग २

ज्योतिषाची कमाई किती ? – भाग ३

ज्योतिषाची कमाई किती ? – भाग ४

 

उपाय –तोडग्यां बदल मी अनेक वेळा लिहले आहे , पुन्हा लिहतो ..

या उपाय तोडग्यांनी तुमच्या समस्या कधीच दूर होत नाहीत.

आणि या एका मुद्द्या बाबतीत मी ‘अंनिस’ वाल्यांशी १०० % सहमत आहे !!!

उपाय –तोडग्यांचा पसारा फार मोठा आहे , त्यांची वर्गवारी अनेक प्रकाराने करता येईल.

सात्विक-अघोरी , बिनखर्चाचे – खर्चिक,  साधे – जालिम !

साधे , सोपे , निरुपदर्वी, बिनखर्ची / अल्प खर्ची आणि बहुतांश सात्विक :

काही उपाय / तोडगे  साधेसुधे असतात ,  त्यांना  फारसा खर्च येत नाही (अर्थात उपाय सुवणार्‍याला घसघशीत मानधन द्यावे लागते हा जादाचा खर्च होतो one time investment  , तो भाग वेगळा!) , हे उपाय बरेचसे सात्विक असतात यात अघोरी असे फारसे काही नसते , पण हल्ली त्यात भेसळ व्हायला लागलीय असे दिसते कारण काही तरी अघोरी इलेमेंट असल्या शिवाय लोकांना तो उपाय ‘जालिम’ वाटतच नाही त्याला तो बिच्चारा (?) तोडगे वाला ज्योतिषी तरी काय करणार म्हणा !

जप करणे / मंत्र जपणे: यात देवाचे जप असतात जसे ‘श्रीराम जयराम जय जय राम’ इ. त्यातही दत्त , नवनाथ यांचे जप असल्यास उपायाला काहीसे गुढतेचे वलय मिळते ! नवग्रहाचे जप फार लोकप्रिय आणि ‘शनी चा जप ‘ तर अव्वल नंबरावर! ही झाली मिडियम पावभाजी ! जरासी ‘तिखी ( कोल्हापुरी? ‘) ‘ हवी असेल तर र्‍हीम , क्लिम असली अक्षरें आणि ‘चामुंडा’ वगैरे अघोरी देवतांचा समावेश करायचा , झाला एकदम   ‘जालिम ‘ तोडगा तैयार ! शिवाय जास्त मानधन उकळायला  ‘शाबरी ‘ मंत्राची स्पेशल शेजवान डिश आहेच ना !

आता या सार्‍या ‘जप / मंत्रा’ मागचे रहस्य काय ?

शनीचा / मंगळाचा / राहुचा जप: वास्तवीक शनी , मंगळ आदी ग्रह विषारी वायू व दगड मातीने बनलेले गोलक आहेत , राहु-केतु तर ग्रह नाहीतच , ते चक्क भूमितीतले बिंदू आहे त्यांना रंग,. रुप, आकार , वजन नाही, त्यांना आस्तित्वच नाही!

ग्रह तुमच्या आयुष्यातल्या घटना घडवून आणत नाहीत , हे ग्रह तुमचे काहीही चांगले / वाईट घडवून आणत नाहीत. त्यांच्यात ती कोणतीही ताकद नसते . मग हे ग्रह करतात काय ? हे ग्रह एक प्रकारचे संकेत आहेत , ते कोणत्या घटना घडण्याची शक्यता आहे ते सुचित करतात, पण ग्रह कोणतीही घटना घडवून आणत नाही .

तुम्ही केलेल जप त्या ग्रहांना समजणारच नाहीत तर ते कसे काय त्यामुळे प्रसन्न होणार ? शनीचा जप करुन , काळे तीळ  / उडीद / तेल वाहून काहीही होणार नाही. शनी हा विषारी वायूंनी भरलेला एक गोळा आहे , तुम्ही वाहीलेल्या वस्तू,  केलेले जप त्याच्यापर्यंत पोहोचणार नाहीत.

मुळात शनी तुमचे काहीही बरे- वाईट घडवू शकत नाही , त्याच्याकडे ती ताकदच नाही. शनी फक्त कोणत्या घटना घडणार हे सुचित करतो,  जसे ट्रॅफिक सिग्नल,  दरवाज्यावरची डोअर बेल आपल्याला फक्त सुचना द्यायचे काम करतात प्रत्यक्षात ट्रॅफीक लाईट नियंत्रण करणारा , डोअर बेल वाजवणारा वेगळाच असतो तसेच ग्रह फक्त घटना सुचित करतात प्रत्यक्षात घटना घडवणारी शक्ती वेगळीच आहे   ती अज्ञात आहे, तिच्या पर्यंत आपण पोहचू शकत नाही.

आणि हो, ह्या तेल / उडीदा चे त्या अज्ञात शक्ती ला काही देणे –घेणे नाही. त्या अज्ञात शक्तीला दिसते  ते तुमचे चांगले काम , फक्त तुमची चांगली कृत्ये . ती करा, प्रामाणिक पणे करा . शनीच्या देवळा बाहेर  रांगा लावू नका . ग्रहांचे जप करणे, पूजा करणे इ भाकड गोष्टींना थारा देऊ नका, त्यात  वेळ , श्रम व पैसा खर्च करु नका. मग कोणीही कितीही, कसलाही आव आणून  सांगू  देत.

 

जप करणे हे एक प्रकारचे अशुद्ध / क्रुड  मेडीटेशन असते त्यामुळे ‘ध्यान धारणेचे’ म्हणून जे काही मूलभुत लाभ असतात ते थोड्या फार प्रमाणात मिळू  शकतात. पण म्हणून त्या ‘जपा’ ने समस्या सुटेल, शनी प्रसन्न होऊन शुभ फळांची खैरात करणार असे काहीही होणार नाही !

ध्यानधारणेचा एक सहज सोपा मार्ग म्हणून जप करायला हरकत नाही पण कोणा देवाला, ग्रहाला आपले काम करवून घेण्या साठी ‘लाच’  देण्याचा हेतू त्यात नसावा.

जपाचे तथाकथित लाभ ( असल्यास !) मिळवायचे असल्यास तो जप मलाच करावा लागेल, दुसर्‍या कोणी  माझ्या संकल्प सोडून तो जप केला तर मला त्याचा काही एक फायदा  होणार नाही. मला झालेल्या आजारा साठी दुसर्‍याने औषध घेऊन मला कसा काय गुण येणार सांगा ?

तेव्हा तुमच्या वतीने दुसरा कोणी जप करतो अशी ऑफर (?) आली तर ओळखा ही एक सरळ सरळ तुम्हाला फसवून पैसे उकळण्याची चालाकी आहे , त्याला अजिबात भिक घालू नका ,मग कोणी कितीही काहीही  सांगू देत !

बाकी इतर मंत्र तंत्र:  तांत्रीक दृष्ट्या ‘मंत्र’ हा विविष्ट पद्धतीने अक्षरें उच्चारुन निर्माण केलेली ध्वनी कंपने असतात, ती विषीष्ट ध्वनी कंपने काही अतर्क्य परिणाम घडवून आणू शकतात…

….. पण……..

……पण………

त्यासाठी तो ‘मंत्र’ अगदी अचूक पद्धतीने  उच्चारला पाहीजे.. जिभ, दात , ओठ , श्वास यांचा अत्यंत नियंत्रीत वापर करुन  अक्षरांवर , शब्दांवर योग्य तो आघात देत अगदी अचूक (हो अगदी अचूक !)  ध्वनी कंपने निर्माण करता आली पाहीजेत , त्याच बरोबर ‘मंत्र’ म्हणणारी व्यक्ती अत्यंत शुद्ध आचरणाची , सुदृढ  मानसिक क्षमतेची , सर्व यम-नियम पाळणारी असावी लागते . कोणी ही उठावे , इकडे तिकडे कराकरा खाजवत ‘गायत्री मंत्र’ म्हणावा व रिझल्ट्स मिळवावेत इतके हे सोपे शास्त्र नाही. गायत्री मंत्राच्या बाबतीत तर ९९.९९% लोक तो मंत्र चुकीच्या पद्धतीने म्हणतात, अशा चुकीच्या पद्दतीने म्हणलेल्या मंत्राचा काही एक ठिम्म परिणाम होणार नाही.

पोथी वाचणे / पारायण करणे: जास्त लोकप्रिय : रुक्मीणी स्वयंवर , नवनाथ भक्तीसार , गुरुचरित्र ! या पोथ्यांत कोणतीही ताकद नाही,  मी इथे नावें घेत नाही (भावना दुखावतील ना !) पण बहुतांश पोथ्या भाकड आहेत , बुंदी पाडाव्या तशा पाडल्या आहेत. देवाची अचाट स्तुती, खोट्या नाट्या भाकड चमत्कारांचे चर्‍हाट आणि शेवटी ‘ देवा मला हे दे , देवा मला ते दे ” अशी मागीतलेली भीक या पलीकडे त्यात काही नाही. या पोथ्या वाचून तुमच्या कोणत्याही समस्या सुटणार नाहीत, हे १०० %.

पोथी वाचताना काही लोक सोवळे पाळतात, पूजा विधी करतात, फुलें – उदबत्त्या , दिवे – निरांजने लावतात, आरास करतात, आरती करतात, ह्या सगळयांचा मना वर काहीसा परिणाम होतो,  काहींना मन:शांती मिळते हा एक सायकॉलॉजीकल इफेक्ट सोडल्यास त्या पोथ्यात काहीही मॅजीक नाही.

८० % केसेस मध्ये ती पोथी वाचणार्‍याचे लक्ष पोथी पेक्षा बाहेर , आजुबाजुला काय चाललेय याकडेच असते , पोथी वाचत असताना फोन घेणे, किकेट चा स्कोअर विचारणे असले प्रकारही होतात ! एकच पोथी (किंवा त्यातला एखादा अध्याय) सतत वाचत राहील्याने काही काळानंतर ते पाठ होते मग यांत्रिकी पद्धतीने पोथी वाचली जाते , मग त्यातून एरव्ही मिळू शकणारी मन: शांती ही मिळत नाही !!

या पोथी (अध्याय) वाचनाचा तुमच्या समस्ये साठी काहीही उपयोग नाही. बर्‍याच वेळा या पोथी वाचनाचा अतिरेक होऊन मौल्यवान वेळ मात्र बरबाद होतो,  एखादी छानसी संधी हातातून निसटून जाते , वेळीच हालचाल न केल्याने बिघडलेली परिस्थिती जास्त गंभीर होते , आवाक्या बाहेर जाते. UPSC / MPSC  सारख्या मोठ्या परिक्षेत यश मिळावे म्हणून दिवसातले मौल्यवान तास ह्या असल्या पोथी वाचनात घालवणारे तरुण मी पाहीले आहेत , त्यांनी तोच वेळ अभ्यासाला दिला तर त्या परिक्षेत यश मिळण्याची शक्यता नक्कीच वाढू  शकेल ना ?  मुळात ह्या असल्या परिक्षांत अंतीम निवड कशी (?)  केली जाते हे सगळ्यांनाच माहीती आहे , मग पोथी वाचण्या पेक्षा योग्य (?) त्या ठिकाणी ‘फिल्डिंग’ (?)  लावणे जास्त फलदायी होणार नाही का?

 

नक्षत्र शांती: हा एक खुळचट पणा लोकांच्या माथ्यावर मारुन पैसे उकळले जातात. त्यातही मूळ, आश्लेशा अशी उगाचच बदनाम झालेली नक्षत्रे जोरात असतात. ह्या प्रकाराला काहीही अर्थ नाही. उगाच चार भाकड श्लोक ( मी श्लोक म्हणालो, मंत्र नाही हे लक्षात घ्या) , अशुद्ध , मधले चरण गाळून झटका केलेले असे काही पुटपुटण्याने कसली शांती होणार हो ?

असो.

लेख फार मोठा व्हायला लागलाय असे दिसतेय , तेव्हा या लेखाचा उर्वरीत भाग पुढच्या भागात …

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

6 प्रतिक्रिया

///////////////
 1. Umesh

  Sir mast
  Sagali pol khol kelit.(sir satyachi duniya naay ravali hay. )
  Ashe lokana lubadun aani Jo lubadun to jyotishi chagala.
  Sir tumacya class aani pustakache kuth paryant aale aahe.

  0
  1. सुहास गोखले

   श्री. उमेशजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   ज्योतिष वर्ग दिवाळीच्या सुमारास नक्की चालू होतील. पुस्तकाचे लिखाण चालू आहे.

   सुहास गोखले

   0
 2. वैभव जोशी

  व्यवसाय अडचण, प्रेमात अपयश , नातेवाईक नीट वागत नाहीत, इ.

  0
  1. सुहास गोखले

   श्री निलेशजी,
   तुमचे प्रश्न सोडवू शकत नाही , तुमचे प्रश्न तुम्हीच सोडवायचे असतात. ज्योतिषशास्त्र हे असले प्रश्न सोडवायचे शास्त्र नाही. तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुमच्या पाशीच आहे, जरा वस्तुनिष्ठ विचार करा.
   शुभेच्छा
   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.