या लेखमालेतला पहिला भाग इथे वाचा:

ज्योतिषाची कमाई किती ? – भाग १

हा लेख लिहण्या मागे माझे दोन हेतु आहेत:

 1. ज्योतिषी भरमसाठ कमावतात / शोषण करतात असा जो अपप्रचार केला जातो तो किती बिनबुडाचा आहे हे दाखवून देणे.
 2. ‘घर बसल्या चांगली कमाई करु’ या उद्देशाने ज्योतिष शिकू पाहणार्‍यांना सत्य परिस्थिती काय आहे याची जाणिव करुन देणे.

या लेखमालेच्या पहील्या भागात आपण पाहीले की एका जातका (त्याच्या एका प्रश्ना साठी) साठी किमान दोन तास तरी वेळ खर्च करावा लागतो, आणि दिवसात असे चार जातक जास्तीत जास्त हाताळता येतात.

आता या ४ जातकांकडुन होणारी कमाई (मानधन म्हणा !) किती असू शकेल ?

ज्योतिषाने किती मानधन घ्यावे हा त्याचा वैयक्तीक अधिकार आहे. कोणी १०० घेईल तर कोणी २०००, ऑटोरिक्षा सारखे टॅरिफ कार्ड ज्योतिषांच्या बाबतीत आलेले नाही किंवा केशकर्तनालये ,  लॉन्ड्री वाले, झेरॉक्स वाले जसे युनियन करुन आपल्या सेवेचे किमान दर निर्धारीत करतात तसे ज्योतीषांनी केलेले आढळत नाही.

काही ज्योतिषी २००० – ५००० (किंवा याहूनही जास्त) मानधन घेतात पण हे ‘हाय – फाय’ ज्योतिषी  आहेत , चित्रपट सृष्टी, राजकारण, बडे उद्योग , शेअर मार्केट अशा क्षेत्रातल्या लोकांत त्यांची उठबस असते.  पंचतारांकीत हॉटेल जसे सर्वसामान्य जनतेच्या आवाक्या बाहेर असते तसेच हे बडे ज्योतिषी (राजज्योतिषी!)  आपल्याला परवडत नाहीत किंबहुना सामान्याची पैसे द्यायची तयारी असली तरी आपली केस ते स्विकारत नाही कारण त्यांनी तसे केले तर त्यांचा ‘एक्स्लुझीव्हनेस’ संपेल, स्टॅन्डर्ड खालावेल , ते ‘डाऊन मार्केट’ ठरतील मग ‘सेलेब्रेटीज’ त्यांच्या कडे येणार नाहीत !

हे राजज्योतिषी वगळून उर्वरीत व्यावसायीक ज्योतिषांची मानधना च्या मागणी नुसार साधारण पणे अशी विभागणी करता येईल:

 • अ गट : साधारणपणे रुपये ७०० ते १००० एका प्रश्ना साठी
 • ब गट: : साधारणपणे रुपये ४०० ते ६०० एका प्रश्ना साठी
 • क गट: : साधारणपणे रुपये १०० ते ३०० एका प्रश्ना साठी

ह्या गटवारी नुसार रोजची जास्तीत जास्त कमाई (४ जातकांकडुन , ज्याला मॅनेजमेंट च्या भाषेत इन्स्टाल्ड कपॅसिटी म्हणतात ) किती ?

 • अ गट : रुपये २८०० ते ४०००
 • ब गट : रुपये १६०० ते २४००
 • क गट : रुपये ४०० ते १२००

याच हिशेबाने महीन्याची कमाई किती ? (२१ दिवसाचे काम गृहीत धरले आहे )

 • अ गट : रुपये ५८,८००ते ८४,०००
 • ब गट : रुपये ३३,६००ते ५०,४००
 • क गट : रुपये ८,४०० ते २५,२००

वर दिलेले हिशेब ही ‘आदर्श ‘ परिस्थिती आहे!

प्रत्यक्षात असे होत नाही, असे उत्पन्न दर महीन्याला बारबार – लगातार मिळत नाही, शेवटी  हा व्यवसाय आहे , सर्वच्या सर्व दिवशी प्रत्येकी ४ जातक येणार नाहीत हे उघडच आहे , काही वेळा एका दिवसात ५ -६ जातक येतील, काही वेळा एकही जातक न फिरकल्याने दिवस भाकड जाईल . ह्याचा विचार करताना सरासरी वर्क लोड (इन्स्टाल्ड कपॅसिटी च्या ) ७५ % धरता येईल.

ह्या ७५% च्या हिशेबाने पाहीले तर मघाच्या टोटल्स अशा दिसतील:

 • अ गट : रुपये ४४, १०० ते ६३,०००
 • ब गट : रुपये २५,२०० ते ३७,८००
 • क गट : रुपये ६,३०० ते १८,९००

हे आकडे ग्रॉस उत्पन्नाचे आहे हे लक्षात घ्या,  यातून लागू असलेले सरकारी कर  , संगणक (जो साधारण ३ वर्षाने अपग्रेड करावाच लागतो) ,  यु.पी.एस  / इनव्हर्टर , आवश्यक ते सॉफ्टवेअर , स्टेशनरी, झाटलोट, दिवाबत्ती , जातकांना केलेले चहापाणी , इंटरनेट , फोन , व्यावसायीक नियतकालीके, पुस्तके, ज्योतिष संस्था / संघटनांची सभासद वर्गणी हा जादाचा खर्च ही होत असतो , तो हिशेबात घेतला तर हे उत्पनाचे आकडे आणखी कमी होऊ शकतात. जर ज्योतिषी स्वतंत्र ऑफिस मधून व्यवसाय करत असेल तर जागेचे भाडे,  साफसफाई , ऑफिस पर्यंत जाण्या येण्याचा प्रवास खर्च पण होत असतो.

या वरुन आपल्या लक्षात येईल की :

गटातल्या ज्योतिषांची कमाई ( ६,३०० ते १८,९००) इतकी कमी आहे की या कमाई वर पोट भरणे केवळ अशक्य आहे. एखादा बांधकामा वर काम करणारा मजूर (३०० – ४०० रुपये हजेरी) सुद्धा या पेक्षा जास्त कमाई करत असेल !

गटातल्या ज्योतिषाच्या कमाईत (२५,२०० ते ३७,८००) घर खर्च तरी चालेल का अशी शंका आहे ! एखादा रिक्षाचालक सुद्धा ह्या पेक्षा जास्त कमाई सहज करु शकतो.

गटातल्या ज्योतिषांची कमाई (४४, १०० ते ६३,०००) जरी ५०,००० च्या आत-बाहेर असली तरी ती काही फार मोठी/ नेत्रदीपक कमाई आहे असे मुळीच नाही . आज बँक कर्मचारी, कॉलेजातले लेक्चरर्स , एव्हडेच काय आय.टी. लागलेला एखादा ट्रेनी इंजिनियर सुद्धा या पेक्षा जास्त कमाई अगदी खात्रीने करतो .

 

आणि एका प्रश्नाला १००० च्या घरात मानधन मिळवण्यासाठी १० – १५ वर्षे व्यवसायात घालवायला लागतात तेव्हा कोठे जरासे नाव होते आणि लोक एव्हढे पैसे द्यायला तयार होतात ! त्यामुळे असे ‘अ’ गटातले ज्योतिषी संख्येने फार कमी असतात.

 

‘क’ गटात साधारण पणे ६०% ,  ‘ब’ गटात ३५ % आणि ‘अ’ गटात ५% अशी स्थूल विभागणी दिसते.  ५० लाख+ लोकसंख्येच्या पुणे शहराचा विचार केला तर एका प्रश्नाचे  रुपये १०००+ घेणारे ज्योतिषी १० – १५ सुद्धा नसतील

त्यातच ज्योतिषांची ही कमाई  हा काही नियमीतपणे भेटणारा पगार नाही, हे व्यावसायीक  उत्पन्न आहे त्यात सातत्य नसते , कोणताही भरवसा नसतो , कधी कधी फाके ही पडतात !  नोकरीत मिळणारे बोनस , प्रॉव्हिडंट फंड / पेन्शन , ग्रॅच्युईटी, आरोग्य / अपघात विम्याचे संरक्षण असे कोणतेही अतिरिक्त फायदे ज्योतिषाला मिळत नाहीत, त्याची तरतूद ज्योतिषाला स्वत:च स्वत:च्या उत्पन्नातून करावी लागते ! इतकेच काय गृहकर्ज, वाहन कर्ज मिळवताना सुद्धा अत्यंत अडचणी येतात !

यामुळेच पूर्ण वेळ (प्रामाणिक) ज्योतिष सांगणे हा कोणत्याही अंगाने विचार केला तरी लाभदायक (मलईदार !)  व्यवसाय होऊच शकत नाही!

“ज्योतिषी लूट करुन गब्बर होतात, आर्थिक शोषण करतात”,  हे दावे किती फुसके आणि हास्यास्पद आहेत हे ह्या आकडेवारीने सहज दिसून येते.

जो जातक एका प्रश्नाचे ४०० रुपये मागीतले की तोंड वाकडे करतो / पाठ फिरवून निघून जातो,  त्याचे मी काय आणि कसे शोषण करु शकेन हो ?

शोषण म्हणे ! अहो पुण्यातल्या यच्चयावत ज्योतिषांच्या एका दिवसाच्या एकत्रित कमाई पेक्षा कितीतरी जास्त शोषण पुण्यातला एकटा पेट्रोल पंप मापात कमी , भेसळ करुन करत असेल! ह्याच्या पेक्षा कितीतरी जास्त शोषण पुण्यातल्या मीटर फास्ट केलेल्या रिक्षा करत असतील !! दरवर्षी जुलै- ऑगस्ट महिन्यात  कोट्यावधी रुपयांचे शोषण एकट्या पुण्यातली खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये करत असतील.  ‘तारीख पे तारीख’  चे खेळ करत, बिल वाढवून  पक्षकाराचे शोषण करणारे  वकील आहेत आणि ‘कट प्रॅक्टीस’ चे वैद्यकिय शोषण चाललेले असते त्याचे काय ?

तसे पाहीले तर पेट्रोल , रिक्षा , शिक्षण , कायदेविषयक सल्ला, वैद्यकिय उपचार  अत्यावश्यक आहेत , त्यावाचून आपले जगणे अशक्य आहे. तिथे सक्तीने शोषण होते किंबहुना असे शोषण होते आहे हे दिसत असताना सुद्धा आपण काहीही करु शकत नाही कारण आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो. पण ज्योतिषा कडे गेलो नाही तर काही आभाळ कोसळत नाही , ‘ज्योतिषाकडे जाणे’ हा पूर्णत: स्वखुषीचा मामला असतो. अशा परिस्थितीत फक्त ज्योतिषाचीच कमाई तेव्हढी ‘शोषण ‘ कशी काय ठरु शकते ?

ज्योतिष हा पूर्णवेळ व्यवसाय करुन गब्बर होता आले असते तर अनेक प्रख्यात ज्योतिषांनी सेवानिवृत्ती पर्यंत नोकर्‍या केल्याच नसत्या !

उदाहरणेच द्यायची तर:

 

 1. श्री. व.दा. भट : यांच्या सारखा तज्ञ , ग्रंथा कर्त्या विद्वान , व्यासंगी आणि अचूक भविष्य सांगणार्‍या ज्योतिष्याने सुद्धा नोकरी सोडून पूर्ण वेळ ज्योतिष व्यवसाय केला नाही, ते एक्स्प्लोझिव्ह रिसर्च अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी मध्ये पूर्ण मुदतीची नोकरी करुनच रितसर सेवानिवृत्त झाले.
 2. श्री. ज्योतिंद्र हसबे: महाराष्ट्राचे कृष्णमुर्ती असे ज्यांना गौरवले जाते , जे तज्ञ , ग्रंथकर्ते, विद्वान , व्यासंगी आणि अचूक भविष्य सांगणारे असूनही त्यांनी शेवट पर्यंत ‘प्रिमीयर ऑटोमोबाईल्स’ मध्ये नोकरी केली.
 3. श्री. सुरेश शहासने: कृष्णमुर्ती पद्धती वरची सगळ्यात चांगली पुस्तके लिहणारे अशी ज्यांची किर्ती आख्ख्या भारत भर आहे ,  तज्ञ , ग्रंथकर्ते, विद्वान , व्यासंगी आणि अचूक भविष्य सांगणारे आणि शेअर मार्केट , उद्योग जगतातल्या व्यक्तीं जातक असताना देखील  ते शेवटपर्यंत मुंबई महापालिकेत नोकरी करत होते.
 4. श्री. एस.पी. खुल्लर:  ज्यांनी कस्पल इंटरलिंक्स ही के.पी. चीच एक अत्यंत सुधारीत आणि रिफाईंन्ड पद्धती विकसित केली, त्यावर ६ ग्रंथ लिहले , हजारो विद्यार्थी घडवले ,  उत्तम क्यायंटेल पाठीशी असताना सुद्धा ते सेवानिवृत्त होई पर्यंत भारत सरकारच्या दूरसंचार विभागात विभागात नोकरीत होते.
 5. श्री. के.एन. राव: जे ज्योतिषातले भिष्म पितामह मानले जातात, एक ऋषीतुल्य व्यक्तीमत्व ,  अफाट ज्ञान , व्यासंग ,  डजनाच्या घरात ग्रंथा निर्मीती, हजारो दिद्यार्थी घडवले, देशा – विदेशात प्रवास करुन शास्त्राचा प्रचार केला, उच्च पदस्थ शासकीय अधिकारी, नवी दिल्ली सारख्या ठिकाणी वास्तव्य, राजकारण , उद्योग विश्व, चित्रपट सृष्टी यामधले जातक असे सर्व असताना देखील त्यांनी शेवट्पर्यंत इंडीयन रेव्हेन्यु सर्व्हिसेस मध्ये नोकरी केली.

मी फक्त पाच बड्या , मातब्बर ज्योतिषांची उदाहरणें दिली आहेत,  पण त्यावरुनच लक्षात येईल की:

अचूक भविष्याचे असंख्य पडताळे गाठीशी, मागीतले ते मानधन देण्याची तयारी असलेल्या  जातकांची रांग लागलेली, असे असतानाही या ज्योतिषांनी नोकरी सोडून देऊन पूर्णवेळ ज्योतिष व्यवसाय केला नाही.

या लोकांनी नोकरीत जाणारा वेळ ज्योतिषा साठी दिला असता तर जादाच्या कमाई बरोबरच अनेक नविन ग्रंथ निर्माण झाले असते , नवे संशोधन झाले असते, अनेक जादाचे विद्यार्थी घडवता आले असते.

हा विचार त्या ज्योतिषांनी नक्कीच केला असणार पण त्यांनी नोकर्‍या सोडल्या नाहीत याचे कारण ज्योतिषातल्या कमाई पेक्षा नोकरीतले उत्पन्न आणि सुरक्षीतता जास्त महत्वाची ठरली !

जर ज्योतिषाच्या दुकानाची कमाई  ‘अंनिस’ वाले म्हणतात तशी गब्बर असती तर या थोर ज्योतिषांनी केव्हाच धाड्धाड नोकर्‍या सोडल्या असत्या !

ठीक आहे , काहीजण दिवसात ८ तासा पेक्षा तास काम करतील, महीन्यात २१ दिवसांपेक्षा जास्त दिवस काम करतील, झटका करुन प्रत्येक दिवशी एक – दोन जातक जास्त हाताळतील तरीही ह्या आकडेवारीत असा कितीसा मोठा फरक पडेल १५ -२० % वाढ होईल, पण तरीही ह्या वाढीव रकमां  ‘लूट, पिळवणूक , शोषण, गब्बर ‘ अशा विषेषणांना पात्र ठरतील का?

याचाच परिणाम म्हणून,  पार्ट टाइम (नोकरी व्यवसाय करुन उरलेल्या वेळात) ज्योतिष सांगणार्‍यांची संख्या लक्षणीय म्हणजे ८० – ९० % आहे. अर्थात नोकरी – व्यवसाय करुन ज्योतिष सांगायचे असल्यामुळे दिवसा काठी एखादी पत्रिका पाहता येईल म्हणजे ते काही मोठे कमाईचे साधन होऊ शकणार नाही हे उघडच आहे. घरातले एखादे खर्चाचे कलम (दूध, भाजी, किराणा ) भागवू शकेल इतपत कमाई झाली तरी खूप !

काही मोजके व्यावसायिक ज्योतिषी प्रश्नाला १००० रुपयां किंवा जास्त दराने कमाई करु शकत असतील,  पण प्रश्नाला १००० रुपये देण्याची  तयारी असलेले जातक ही कमीच असतात.

एका प्रश्नाला ४०० रुपये सुद्धा द्यायला लोक  का- कू करतात हा माझ्या स्वत:चा अनुभव आहे.

मधल्या ‘ब’ गटातले ज्योतिषी हे पूर्णवेळ व्यवसाय करत असले तरी फक्त ज्योतिष सांगून होणारी कमाई तुटपुंजी असल्याने असे ज्योतिषी, वास्तू , फेंगशुई , वधू-वर सूचक मंडळ, विमा, इनव्हेस्टमेंट मॅनेजमेंट , कुरीयर एजन्सी , रियल इस्टेट ब्रोकिंग , ट्रॅवल – टुरिझम, क्लासेस , रामदेव बाबांची पतंजली उत्पादने विकणे असे इतर जोडधंदे राखून असतात.

मानधनाच्या मागणी चा विचार करता मी स्वत: ‘ब’ विभागात मोडतो.

मी एका पत्रिकेवर ३ – ४  तास काम करतो ,  अशा कामासाठी मी घेत असलेले मानधन  पाहता हा  सरळसरळ  आतबट्ट्याचा व्यवहार आहे !

मी  कॉर्पोरेट ट्रेनर , सॉफ्टवेअर सल्लागार म्हणुन काम पाहतो.

नुकताच  केटरिंग व्यवसायात चंचुप्रवेश केला आहे (गोखले इडली वाले !)

लौकरच मी मसाला  उदबत्ती ,  धूप , अत्तरें अशा सुगंधी द्रव्यांच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. (गोखले सुगंधी !)

हे बाकीचे उद्योग हाताशी असल्यानेच  मी माझे ज्योतिषाचे दुकान चालू ठेऊ शकलो आहे , नाहीतर केव्हाच भिकेला लागलो असतो ही वस्तुस्थिती आहे !

म्हणूनच ज्योतिष लोकांची लुबाडणूक करतात / लोकांचे शोषण करुन ज्योतिषी गब्बर झालेत अशी भाषा ऐकतो तेव्हा हसायला येते!

ज्योतिष हा पूर्णवेळ व्यवसाय म्हणून करुन चांगले घसघशीत उत्पन मिळवायचे असल्यास काही मार्ग (?)  आहेत !  ते कोणते ?

पुढच्या भागात पाहू …

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

18 प्रतिक्रिया

///////////////
 1. स्वप्नील

  सुहास जी अगदी बरोबर सांगितले आहे तुम्ही . खरीच वस्तुस्थिती मांडली आहे . आपली परवानगी असेल तर सदरचा लेख आपल्या नावाचा / ब्लोग उल्लेख करून माझ्या काही Contact मधील Wats up group ना प्रसिद्ध करू का ?

  0
  1. सुहास गोखले

   श्री. स्वप्नीलजी,

   अभिप्रया बद्दल धन्यवाद.

   मी जे लिहले ते आहे ते सत्य परिस्थिती वर आधारीत आहे . रियल फॅक्ट्स आहेत … हे कोणी तरी सांगायला हवे होते ते काम मी केले एव्हढेच !

   आपण माझा हा (किंवा अन्य कोणतेही लेख)इतरत्र शेअर करु शकता फक्त माझे / माझ्या ब्लोग़चे नाव त्यात असेल असे पाहा म्हणजे झाले. जास्तीतजास्त लोकांपर्यंत माझे हे विचार पोहोचावेत असेच मला वाटेल.

   सुहास गोखले

   +1
   1. स्वप्नील

    धन्यवाद सुहास जी ! आपल्या व आपल्या Blog च्या नावानिशी नक्कीच Share करेन !

    0
 2. स्वप्नील

  ….आणि ज्योतिष हा पूर्णवेळ व्यवसाय म्हणून करुन चांगले घसघशीत उत्पन मिळवायचे असल्यास काही मार्ग (?) आहेत ! ते कोणते ? हे हि वाचायला खूप उत्सुक हे काही वेगळे सांगायला नको

  0
 3. Himanshu

  One of that option is starting astrology classes….which you are going to start soon I guess 🙂

  0
  1. सुहास गोखले

   श्री. हिमांशुजी,

   अभिप्रया बद्दल धन्यवाद.

   ज्योतिष क्लासेस या ऑपशन बद्दल लिहतोच आहे …

   सुहास गोखले

   0
    1. सुहास गोखले

     नायं रे सायबानू तेका मेल मिलाक नाsssssssssय !
     (हल्ली ‘रात्रीस खेळ चाले ‘ शिरेल बघतोय ना तां वाइच मालवणी बोलुक रायलयं )

     सुहास गोखले

     0
 4. माधुरी लेले

  अगदी पटलं..सगळंच बेभरवशाचं.. मला वाटतं हे सर्व व्यवसायांना लागू आहे..काैशल्य, प्रयत्न सातत्य, अभ्यास आणि थोडसं नशीब या जोरावर प्रामाणिकपणे व्यवसाय करु इच्छिणार् याला १०-१२ वर्ष तरी जम बसायला लागतील..

  0
  1. सुहास गोखले

   माधुरी ताई ,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   मुळात लोक समजतात तेव्हढी कमाई या व्यवसायात नाही, ज्योतिषी लुट, शोषण करतात हा आरोप केला जातो ते किती चुकीचा आहे मला हेच सांगायचे आहे.

   चांगला व्यासंगी ज्योतिषी बनायला किमान १० वर्षे कसून अभ्यास करावा लागतो , हा कालावधी डॉक्टर, इंजिनियर , वकील तयार व्हायला लागणार्‍या वेळे पेक्षा जास्त आहे. पण मेहेनतीच्या तुलनेत मिळणारा मोबदला अत्यंत कमी आहे , त्यामुळे प्रामाणिक पणे हा व्यवसाय करुन भरभराट तर सोडाच साधे पोट भरणे सुद्धा अवघड आहे . एक तर जोड घंदा हाताशी ठेवायचा किंवा अन्य मार्गाने भरपाई करायची असे दोनच पर्याय आहेत , जोड घंद्या बदल मी लिहले आहेच (माझे जोड घंदे .. इडली , उदबत्त्या , धूप, अत्तर इ.) दुसर्‍या मार्गां बद्दल पुढच्या भागत लिहीत आहेच !

   सुहास गोखले

   0
 5. स्वप्नील

  …आणि सुहास जी एक आठवले म्हणून Share करतो . आमच्या कोल्हापूर मध्ये असाच एक जोतिषी आहेत फार काही अभ्यास नाही फक्त एक छोट्याश्या खोलीत बसून फक्त पंचांग पाहून मुहूर्त वगरे सांगणे आणि किरकोळ मार्गदर्शन करणे एवढेच . पण त्यावर त्यांनी आता एक नवीन Flat घेतला आहे .वर माधुरी जी जे नशीब म्हनाल्याना त्यावरून Click झाले .

  0
  1. सुहास गोखले

   श्री. स्वप्नीलजी,

   नक्की माहीती असल्या शिवाय यावर जास्त कॉमेंट करता येणार नाहीत . पण तरीही गणिते तुम्हीच करुन सांगा ना , पंचांग पाहून मुहूर्त वगरे सांगणे आणि किरकोळ मार्गदर्शन करणे एवढेच काम असेल त्याला कोणी १००० देणार नाही. या कामा साठी जास्तित जास्त १०० रु मिळतात, पत्रिका गुण मेलन ( ३६ गुण वाले) असेच 50 / 100 वाले काम , आजकाल हे काम ऑनलाईन फुकटात होते . ही कामे तशी किरकोळ असलि तरीही एका कामाला ३० – ४५ मिनिटें मोडताच ! लोक एकदा समोर येऊन बसले की जाता जात नाही. काही बाही सांगत बसताता (सुनेच्या कागाळ्या, तब्बेतीच्या तक्रारी, कोर्टाचे वाद, महागाई, भ्रष्टाचार , मोदी सरकार , आरक्षण !) काही तर गप्पा मारायचा मूड घेऊनच येतात, काहींना त्यांचे म्हणणे ऐकायला हक्काचा श्रोता हवा असतो. अनुभव घेऊन बघा !

   या हिशेबाने तो गृहस्थ दिवसाला १० – १५ ग्राहक ग्राहक हाताळत असेल , म्हणजेच दिवसाला १२०० – १५०० कमावत असेल. महीन्याला २५ – ३० हजार डोक्यावरुन पाणी. ही अगदी ‘आअडियल’ कंडिशन आहे , प्रत्यक्षात दिवसाकाठी १० – १५ ग्राहक मोठ्या मोट्या ज्योतिषां कडे सुद्धा येत नाहीत.

   त्या ज्योतिषा कडे उत्पन्नाचे इतरही मार्ग असतील .शेतीचे उत्पन्न असेल, भावाने / नातेवाईकाने पौसे दिले असतील , एखादी जुनी जागा विकून पैसे उभा केले असतील, भाड्याची जागा सोडण्या बद्दल घरमालका कडून रक्कम वसूल केली असेल , बायकोचे दागीने मोडून पैसे उभे केले असतील , सोसायटीचे कर्ज घेतले असेल इ. अनेक ऑपशन्स निघतील. नक्की माहीती पाहीजे.

   असो. नियमाला काही अपवाद ही असू शकतात.

   सुहास गोखले

   0
 6. Anant

  श्री. सुहासजी,

  छान लेख – विचार न करता समोरच्या व्यक्तीला “तुम्ही काय बक्कळ पैसा मिळविता ” असे विधान करणाऱ्यांच्या डोळ्यात एकदम झणझणीत अंजन घातले. अजून एक महत्वाचा मुद्दा राहिला – जातकाची गोपनीयता सांभाळणे, त्यांचे प्रॉब्लेम्स ऐकून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे यात खर्ची पडणारी शक्ती – याचा कुठेच हिशोब नाही.

  गोखले खानपान ( संधी मिळताच आस्वाद घेण्यास येऊच ) आणि सुगंधीला आमच्या शुभेच्छा !

  धन्यवाद.
  अनंत

  0
  1. सुहास गोखले

   श्री अनंतजी ,

   येवाक घर आपलाच असां !

   बाकी एक अनुभव सांगतो, जो पोष्ट मध्ये लिहला नाही… जेव्हा जातक प्रॉब्ल्मेम्स सांगत असतो तेव्हा फार मोठ्या प्रमाणात निगेटीव्ह एनर्जी तयार होत असते काही वेळा ‘सायकिक अ‍ॅटॅक ‘ होतो, याचा त्रास ज्योतिषाला होतोच होतो.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.