जसजसा माझा ज्योतिष्याचा अभ्यास वाढत गेला तसा तसा माझा ग्रंथ संग्रह पण वाढत गेला. सुरवातीला ज्योतिषशास्त्रा वरच्या मूलभूत ग्रंथांची द्णक्या खरेदी झाली.

पण लौकरच लक्षात आले की जवळजवळ सर्वच ग्रंथांतून एकच माहीती त्याच त्या ठरावीक पद्धतीने मांडली गेली आहे, आता तुम्ही म्हणाल, ‘राहू’ हा राहूच आहे मग त्याचे वर्णन कोणी का करेना ते एकच असणार, ह्या लेखकाचा ‘राहू’, त्या लेखकाच्या ‘राहू’ पेक्षा वेगळा कसा असणार? मुद्दा तो नाहीच, मी माहिती द्यायच्या पद्धती बद्दल बोलतोय.

काही अपवाद वगळता, बहुतांश भारतीय लेखकांचे ग्रंथ मग ते मराठी, हिंदी असो वा इंग्रजी भाषेत; एका ठराविक साच्यातून काढल्या सारखे वाटतात.सर्वांची भिस्त मूळ संस्कृत ग्रंथांवरच असल्याने हा एकसुरीपणा दिसत असावा. मुळातच हा सर्व प्रकार भ्रष्ट भाषांतराचा असल्याने “अमुक ग्रह अमुक राशीत ही घ्या त्याची फळे” , “तमका ग्रह ह्या स्थानात, ही घे पडताळ्यांची यादी”, “हा ग्रह त्या ग्रहाच्या युतीत – कर काही ठोक विधाने” अ‍से ठाशीव प्रकार बघायाला मिळतात, या बरोबरच येते ती पानेच्या पाने भरलेली असंख्य योगांची लांबलचक जंत्री व त्यांची अशीच छापील फळे. ही पाने वाचून तर हसायला येते, यातला एक ही नियम पड्ताळून पाह्ण्याची  काही सोयच नाही कारण त्यातले बरेचसे योग हे शे-पाचशेच काय पण हजार वर्षात सुद्धा क्वचित केव्हा तरी होणारे असतात, असा योग असलेली एक तरी पत्रिका बघायला मिळेल का ही शंका आहे. यातच काही योग, जे मंद गती च्या ग्रहांच्या माध्यमातून होतात, ते तर आठवडे च्या आठवडे आकाशात दिसत असतात, म्हणजे त्या काळात जन्माला आलेल्या सर्वांच्या पत्रिकेत ते योग असणारच पण मग ते सगळेच त्या योगा द्वारे चक्रवर्ती सम्राट व्हायला हवे होते, सहस्र अश्व बाळगणारे , दासदासींनी युक्त भव्य प्रासादांत राहणारे असे असायला हवे  ना? हा प्रश्न जर मला पडू शकतो, तो ह्या तथाकथित जाड्या विद्वानांना का बरे पडला नसावा?

याचे एक सरळ उत्तर आहे ते म्हणजे ’बाबा वाक्य प्रमाणं” ! एकदा हे तत्त्व स्वीकारले की मग कोणताही अभ्यास करावा लागत नाही, कोणतेही तर्कशास्त्र वापरावे लागत नाही, कोणताही कार्यकारणभाव द्यायची गरज भासत नाही. कुठल्या योगांची कारणमीमांसा शोधायला नको की नियमांना तर्काच्या कसोटी वर घासून बघायला नको. हजारो पत्रिका जमवून,त्यांची शास्त्रशुद्ध छाननी करून निष्कर्ष काढायला नको , कोणतीही अभ्यासाची शिस्त जोपासायला गरज नको. जुन्या पोथ्या आहेत ना हाताशी, मग झाले तर ? घे पोथी ,उचल श्लोक, ठोक भाषांतर आणि छाप पुस्तक, असा प्रकार आजतागायत अव्याहतपणे चालू आहे.

मी पुन्हा एकदा नमूद करतो की काही सन्माननीय अपवाद जरूर आहेत पण ते गवताच्या गंजीत सुई शोधल्यासारखे विरळा आहेत.

हे भाषांतरवाले जरा तरी बरे, निदान त्यांनी त्या पोथ्यांचे भाषांतर करण्याचा प्रयत्न तरी केला आहे, त्या पोथ्यांत जे काही आहे त्याच्याशी ते प्रामाणिक असतात, ते त्या जुन्या पोथ्यांच्या मर्यादेच्या बाहेर सहसा जात नाहीत. पण एक दुसरी जमात जी स्वतः:ला संशोधक म्हणवते ती याहूनं मोठी भयंकर आहे! अगदी अलिकडच्या काळातल्या लेखकाचे एक पुस्तक, लेखक मुंबईचा, सिव्हील इंजिनियर, मला वाटले होते, अभियांत्रिकीच्या अभ्यासातुन जी एक शास्त्रीय वृत्ती निर्माण होते त्याचा काहीतरी इथे प्रभाव दिसेल, पण कसचे काय, संशोधनाचे निष्कर्ष म्हणत लेखकाने काही नियम दिलेत, पण त्याला आधार काय तर , “चार पत्रिकांत हा ग्रहयोग आढळला त्यावरुन हा नवा नियम सिद्ध होतो” (अगदी शब्दशः: असे  लिहिले आहे हो )! केवळ चार पत्रिकांच्या अभ्यासातुन नियम तयार होतात ?  याला संशोधन म्हणायचे की चेष्टा?

शुभ  भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////
 1. Suresh

  Suhasji,

  Granth mahitisathi dhanyavaad. Aple granthvishayak sarvch post vachlya. Baryach pustaknacha sandarbh dilyabaddal dhanyavaad.

  Ek prashna ahe- Krushnmurti paddhatichya baryach grandthancha reference apan dila ahe ani asehi mhantle ahe ki tyasathi adhi vedic jyotishacha paaya pakka hava. Krupaya apan Paranparik jyotish shiknyasathi konte books refer karavet yachi mahiti dyal ka?
  Jyotish shikayachi iccha ahe interest ahe pan suruvaat kothun karavi mahit nahi. Jar apan Paramparik jyotishavarachya kahi books cha reference dila tar bare hoil.

  Aplya mahitibaddal punha dhanyavaad..!!

  0
  1. सुहास गोखले

   श्री. सुरेशजी,

   सप्रेम नमस्कार,

   आपल्याला ज्योतिषशास्त्रात रुची आहे हे पाहुन आनंद वाटला.

   आपल्याला ज्योतिष शिकायचे असेल तर साधारण खाली उल्लेख केलेल्या मार्गाने गेलात तर सोपे जाईल.

   ज्योतिषशास्त्राचे : ग्रह, भाव, राशी, नक्षत्रें, ग्रहयोग, गोचर , दशा पद्धती असे प्रमुख पायाभूत घटक आहेत. त्याचा त्याच क्रमाने अभ्यास करावा.

   ग्रहांची प्राथमिक माहिती, कारकत्वे, बलाबल, ग्रहाची प्रत्येक राशीतली फळे, ग्रहाची भाव गत व नक्षत्रगत फळे, ग्रहयोग (असपेक्ट्स) इ माहीति बारकाईने करुन घेणे अत्यावश्यक आहे.

   त्या दृष्टीने:

   सर्व प्रथम गुरुवर्य श्री. वसंतराव भटांच्या ‘कुंडली तंत्र आणि मंत्र भाग – 1’ या ग्रंथापासून सुरवात करा. त्यांचा ‘कुंडली तंत्र आणि मंत्र भाग – 2’ पण आहे पण तो कुंडली कशी तयार करायची या बद्दलच्या माहीतीचा , गणित विषयक आहे, हा विषय ही महत्वाचा आहे पण अगदी सुरवातीच्या काळात याची आवश्यकता नाही, पण नंतर मात्र कधी ना कधी हा विषय अभ्यासणे तितकेच जरुरीचे आहे.

   यानंतर कै. द्वारकानाथ राजें यांचा ‘जातक दीप’ हा ग्रंथ वाचावा.

   ग्रहयोगा साठी गुरुवर्य श्री. वसंतराव भटांच्या ‘फलज्योतिषातले समग्र ग्रहयोग’ या ग्रंथाचा चांगला उपयोग होईल.

   राशी, नक्षत्रे, गोचरी व दशा पद्धती च्या अभ्यासा साठी मराठीत चांगले ग्रंथ नाहीत हे दुर्दैव, त्यासाठी आपल्याला इंग्रजी ग्रंथांचाच आधार घ्यावा लागतो. त्याला नाईलाज आहे.

   माझ्या ब्लॉग वर अशा ग्रंथांची यादी दिलेली आहे ती नजरे खालून घालावी, मी काही इंग्रजी ग्रंथांची परिक्षणे पण लिहली आहेत ते सर्वच ग्रंथ अप्रतिम असून विकत घेऊन संग्रही ठेवावेत असे आहेत, ग्रंथ विकत घेऊन वाचावेत, इंटरनेट वरुन चोरुन डाऊन लोड करु नका, ज्योतिषविद्या ही दैवी देणगी आहे, अशी चोरी मारी करणार्यारला ती प्राप्त होणार नाही, अशा चोरट्याने सांगीतलेले भविष्य कधीच बरोबर येणार नाही.

   आपल्याला आशीर्वाद देण्या इतका मी मोठा माणूस नाही पण एक मित्र म्हणून शुभेच्छा देतो.

   कळावे

   आपला

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.