प्रश्न कुंडलीच्या आत्ता पर्यंतच्या अभ्यासा वरुन आपण अंदाज बांधला आहे की हिरा ऑफिस मध्ये ‘बॉस च्या केबिनच्या आसपास, , कॉन्फरन्स रुम, चहा-कॉफीची व्हेडिंग मशीन्स , मायक्रोवेव्ह ओव्हन, गॅस बर्नर, हिटर्स असलेल्या भागात’ पडला असण्याची मोठी शक्यता आहे पण ग्रहांचा कौल , हिरा अरुणाला परत मिळण्याची शक्यता अगदी कमी म्हणजे ‘ना’ के बराबर आहे असे सांगत आहे.

या लेखमालेतले  पहीले दोन भाग इथे वाचा ..

ज्युवेल थीफ ! (भाग – २) )

ज्युवेल थीफ ! (भाग – १)

खरेतर या टप्प्यावर केस बंद करता आली असती, पण कुंडलीचा पूर्ण अभ्यास झाल्या शिवाय आणि सर्व शक्याशक्यतेचा विचार झाल्या शिवाय तसे करणे मला प्रशस्त वाटत नाही.

मी विचार करु लागलो “या हिर्‍याचे नेमके काय झाले असावे?” आजच्या क्षणाला तो हिरा अरुणा जवळ नाही हे तर निखळ सत्य आहे. मग हिरा गेला कोठे ? एकतर तो हरवला म्हणजेच अरुणा म्हणते तसा तो अंगठीतून निखळून पडला असेल. दुसरी शक्यता तो हिरा कोणीतरी चोरला असेल. पण एखाद्याची अंगठी चोरीस जाऊ शकते पण अंगठी घालणार्‍या व्यक्तीच्या नकळत त्या अंगठीतला नेमका हिरा अलगद काढून घेणे जवळजवळ अशक्य आहे. तसा कोणताही प्रयत्न झाला असता तर तो अरुणाच्या लक्षात आल्या शिवाय राहीला नसता.

हिरा हरवला आहे तो अंगठीतून निखळून पडल्यानेच आणि हे अरुणाच्या अ‍ॅफिस मध्येच घडले असावे. अरुणाने तो हिरा शोधायचा प्रयत्न केला आहे पण हिरा सापडला नाही. पण अरुणाला हिरा सापडला नसला तरी तो हिरा दुसर्‍या कोणाला तरी सापडू शकतोच ना?  बस्स ही एक शक्यता अजुन आपण तपासली नाही…

तेव्हा  ‘हिरा दुसर्‍या व्यक्तीला सापडण्याची शक्यता आहे आहे का ? ‘ ते एकदा तपासावे आणि मगच केस बंद करावी , या विचाराप्रत येऊन मी पुन्हा एकदा त्या प्रश्नकुंडलीत डोके खुपसले.

या केस बाबतीत बनवलेला वेस्टर्न होरारी चार्ट पुन्हा एकदा छापत आहे.

 

वेस्टर्न होरारी चार्ट चा तपशील:

दिनांक: २० एप्रिल २०१५,  वेळ: १९:०९:१८ , ठिकाण: देवळाली कँप , नाशिक

चार्ट टाईप: ट्रॉपीकल,प्लॅसीड्स

आपण हिरा कोणा दुसर्‍या व्यक्तीला सापडला का ते तपासणार आहोत. होरारी मध्ये अशी तिर्‍हाईत / परकी व्यक्ती (किंवा चोर!’) सप्तमस्थाना वरुन पाहीली जाते. सप्तमेश आणि सप्तमातले ग्रह त्या तिर्‍हाईत व्यक्तीचे प्रतिनिधीत्व करतात. जर चोरीची शक्यता वाटत असेल तर  ‘बुध’ हा चोराचा नैसर्गिक प्रतिनिधी देखील विचारात घ्यावा लागतो.

सप्तम स्थान ०४ वृषभ २४ वर चालू होते,  शुक्र सप्तमेश आहे,  मंगळ (अरुणा) , चंद्र (हिरा)   आणि बुध (चोर!) हे तिघेही सप्तमातच आहेत. इथे पहा हरवलेल्या वस्तुचा प्रतिनिधी चंद्र  सप्तमात आणि बुध जो चोराचा प्रतिनिधी पण सप्तमात ! म्हणजे हिरा नक्की कोणाला तरी सापडणार !

सप्तमातल्या ग्रहांचा विचार करता  मंगळ हा अरुणाचा प्रतिनिधी म्हणून बाद, चंद्र हरवलेल्या वस्तुचा नैसर्गिक प्रतिनिधी म्हणून तो ही बाद करायचा. शुक्र ही हरवलेल्या वस्तुचा प्रतिनिधी असल्याने त्याला सोडून देता येईल. आता एकटा बुध राहीला आहे त्यात तो चोराचा नैसर्गिक प्रतिनिधी, त्यामुळे या बुधा वरच जरा लक्ष केंद्रित करुया.
या ‘बुधा’ कडे लक्षपूर्वक पाहीले असता हे लक्षात येत की , चोराचा सिग्निफिकेटर बुध ( ११ वृषभ ३७) हा हरवलेल्या वस्तुचा कारक गुरु  (१२ सिंह ४८) शी अगदी लौकरच (१ डिग्री फक्त!) केंद्र योग करत आहे.

तसेच सप्तमेश शुक्र (परक्या व्यक्तीचा सिग्निफिकेटर, डबल रोल!) (१० मिथुन २१) पण  हिर्‍याशी म्हणजेच गुरु (१२ सिंह ४८) शी अगदी लौकरच  ( २ डिग्रीज फक्त!) लाभ योग करत आहे.

ही दोन कंन्फर्मेशन्स सांगतात की तो हिरा एका परक्या व्यक्तीला सापडणार आहे.

हे ठीक , पण आता प्रश्न उरतो तो हा की ती व्यक्ती तो हिरा अरुणाला परत करेल का?

तसे व्हायचे असेल तर मंगळ (अरुणा) आणि गुरु (हिरा) यांच्यात कोणता तरी योग व्हायला हवा ! पण आपण आधी पाहीले त्यानुसार असे योग होत नाहीत!!

मी पत्रिके कडे जरा निरखून पाहीले आणि काय आश्चर्य , असा योग होतो आहे !!
बुधाच्या (चोर!) माध्यमातून मंगळ (अरुणा) आणि गुरु (हिरा) यांच्यात योग होतो आहे. याला ‘ट्रानसलेशन ऑफ लाईट’ असे म्हणतात.

हे कसे होते?

याबाबत अनेक ग्रंथांचे वाचन करुन मी काही नोट्स तयार केल्या आहेत , त्या आपल्या समोर सादर करतो.. माझे बरेचसे वाचन इंग्रजीत असते आणि स्वाभाविकच नोट्स पण इंग्रजीत तयार केल्या जातात, आता त्याचे सुलभ मराठी भाषांतर करण्या इतपत वेळ नाही म्हणून त्या नोट्स जशा आहेत तश्या म्हणजे इंग्रजीत सादर करतो.

Translation of light

When the significators of the querent and the quesited are linked by a separating aspect, that is to say an aspect that has already been exact, this means that the contact has already taken place. But that is very unhelpful for the development of the situation, because there is no new aspect or connection between the querent and the quesited coming along. However, there is one way in which a contact can still occur, and that is when a third and swifter planet aspects first one significator and then the other. We then say that the third planet translates light from one to the other. Very often this third planet represents a third party who gives voluntary help, or it may represent favorable circumstances. In order to decide precisely what it means, we must look at its nature and at the house over which it rules. It is important to note that this third planet must aspect the two significators one after the other; but, in the meantime, it also must not form an aspect to some other planet. If it does, we have a situation in which the fourth planet can interpose its own influence, and this is a negative development as far as the question is concerned.

Some astrologers restrict translation of light to the Moon. This is not so strange, because, among other things, the Moon is always the fastest moving, and we must always have a planet that is quicker than      the two significators. However, it is always possible for some other planet to be moving faster than the two significators, especially when a normally swift significator (such as Mercury or Venus) is almost stationary in the zodiac around the time when it is turning retrograde or direct. At such time, Jupiter, for example, can move faster than Mercury or Venus, and thus fulfill the role of the third party.

Sometimes we encounter variations on the translation of light theme; but, in every case, two features have to be present —no further aspect must be formed between the two significators, and the third planet must link the two rulers by aspecting them one after the other. That is to say, we do not find translation of light so often in its pure form (which does not crop up very often), but variants are common enough.

बुध , मंगळ आणि गुरु यांची मुळची स्थिती अशी आहे:

(समजायला सोपे जावे म्हणून पत्रिकेतले इतर सर्व ग्रहांचे डिटेल्स पुसले आहेत)

 

 

बुध सध्या ११ वृषभ ३७ वर आहे , बुध फक्त १ डिग्री ११ मिनिटें पुढे सरकुन १२ वृषभ ४८ वर आला की तो हरवलेल्या वस्तुचा कारक गुरु  (१२ सिंह ४८) शी केंद्र योग करत आहे.  हिरा त्या परक्या व्यक्तीला सापडणार!

 

 

हा योग झाल्या नंतर बुध पुढे सरकुन  वृषभेत १४:३४ वर आला की तो मंगळाशी युती करेल आणि तो गुरु आणि मंगळ यांच्यात ट्रांसलेशन ऑफ लाईट च्या माध्यमातून योग घडवून आणेल . हिरा अरुणाला परत मिळणार!

आणि महत्वाचे “ट्रांसलेशन ऑफ लाईट’ ची महत्वाची अट : हे दोन्ही योग करत असताना मांडवली वाल्या ग्रहाने मांडवलीत नसलेल्या इतर कोणाही ग्रहां कसलाही योग करता कामा नये’ , पण पूर्ण होते कारण बुध इतर कोणाशी कसलाही योग करत नाही.

याचाच अर्थ असा होतो की हिरा प्रथम त्या व्यक्तीला सापडणार आणि नंतर त्या व्यक्ती कडून अरुणाला मिळणार.

गुरु (हिरा) आणि मंगळ (अरुणा) दोघेही केंद्रातच असल्याने घटना झटपट घडणार , गुरु आणि मंगळ अगदी नुकतेच केंद्रयोगातून अलग झाले आहेत (हिरा हरवला!) त्याला आता २ डिग्रीज झाल्या आहेत (   गुरु १२ , मंगळ १४) , हिरा अरुणा ऑफिस मध्ये आल्या आल्या तिने घेतलेल्या सकाळच्या पहील्या कॉफीलाच हरवला असणार.   बुधाला गुरु शी योग करायला अवघे १ डीग्री ११ मिनिटें लागणार असल्याने , त्या हिशेबाने हिरा त्या परक्या व्यक्तीला उद्याच सापडणार आहे ! पुढे जाऊन , हा बुध ३ डीग्री पुढे सरकून मंगळाशी (अरुणा) युती करणार आहे, म्हणजे साधारण पुढच्या तीन दिवसांत हिरा अरुणाला परत मिळण्याची मोठी शक्यता आहे !

आता प्रश्न उरतो , ही परकी व्यक्ती कोण असू शकते ?

अर्थातच ही परकी व्यक्ती अरुणाच्या ऑफीस मध्ये काम करणारी व्यक्ती असणार पण अरुणाच्या ऑफिस मध्ये अनेक जण काम करत असतील मग यातली नेमकी व्यक्ती कशी हेरायची !

आपण जरा तर्क करु ,  एक लक्षात आले आहे की हिरा अरुणाला मिळण्याच्या बाबतीतले कौल काहीसे प्रतिकूल आहेत, शनी ची द्वितीय स्थानातली उपस्थिती पण हेच सुचित करत आहे की हिरा मिळण्यात अडथळे , विलंब लागू शकेल. आता जर अरुणाचे टीम मेंबर्स, अरुणाचा बॉस व इतर अधिकारी वर्ग , ऑफिस मधले इतर सुशिक्षीत कर्माचारी अशां पैकी कोणाच्या नजरेत हा हिरा आला तर तो अरुणाला लगेच मिळू शकेल. पण ऑफिस मधले कंत्राटी कामगार , कार ड्रायव्हर्स, सफाई कर्मचारी , सुरक्षा रक्षक या पैकी कोणाला तो हिरा सापडला तर तो परत देताना खळखळ होण्याची शक्यता आहे.

परक्या व्यक्ती साठी सप्तम (७) स्थान म्हणजेच सप्तमेश, सप्तमातले ग्रह हे विचारात घ्यायचे. हिरा कोणाला सापडला तरी तो सहजासहजी अरुणाला परत मिळणार नाही असे संकेत आहेत. याचा अर्थ ज्या व्यक्तीला हिरा सापडेल, तो हिरा अरुणाचा आहे हे माहीती असताना सुद्धा ती व्यक्ती तो हिरा स्वत: कडेच ठेवायचा प्रयत्न करेल म्हणजे ही एक प्रकारे चोरीच म्हणावे लागेल! त्यामुळे चोराचा नैसर्गिक प्रतिनिधी जो ‘बुध’ आणि तो स्वत;च मांडवली पण करणार आहे त्यामुळे फक्त त्याचाच  विचार करावा लागेल.

चोराचे वर्णन जेव्हा करावयाचे असते तेव्हा चोराच्या प्रतिनिधी पेक्षा सप्तमेशाला जास्त महत्व द्यावे त्याच वेळी बुधाचा डिस्पोझिटर (बुधाचा राशी स्वामी) पण बघावा लागतो.  शुक्र सप्तमेश आहे आणि बुध वृषभेत असल्याने बुधा चा डिस्पोझीटर शुक्रच आहे. म्हणजे एकट्या शुक्राचाच विचार करणे योग्य.

शुक्र ! म्हणजे ती परकी व्यक्ती एक स्त्री असण्याची शक्यता आहे . शुक्र अष्टमात आहे.  अष्टम स्थान सांडपाणी, गटारें इत्यादी म्हणजे ती स्त्री सफाई कर्मचारी असू शकते!

….

ठरल्या प्रमाणे रात्री  १० वाजता अरुणाचा फोन आला. मी तिला सांगीतले:

 • हिरा ऑफिसामध्ये बॉस च्या केबिनच्या आसपास, , कॉन्फरन्स रुम, चहा-कॉफीची व्हेडिंग मशीन्स , मायक्रोवेव्ह ओव्हन, गॅस बर्नर , हिटर्स असलेल्या भागात पडला असेल, त्या भागात पुन्हा एकदा कसोशीने शोध करावा.
 • हिरा एक दोन दिवसात ऑफीस मधल्या कोणालातरी , खास करुन एखाद्या स्त्री सफाई कर्मचार्‍याला सापडण्याची शक्यता आहे , त्या व्यक्तीची चौकशी केल्यास त्या व्यक्ती कडे हिरा सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

अरुणाचे हुंदके थोडा वेळ ऐकून घेऊन शेवटी मी तीला समजावले , ज्योतिष हा एक अंदाजच असतो, सगळे असेच होईल असे नाही, पण काही हिंट्स . क्लूज नक्की मिळाले आहेत त्या आधारे शोध घेतल्यास कदाचित हिरा सापडेल ही , कोण सांगावे!

अरुणाने दुसर्‍या दिवशी मी सांगीतलेल्या सर्व ठिकाणी पुन्हा तपासले , हिरा सापडला नाही. अरुणाच्या ऑफीसात दोन सफाई कर्मचारी होते, त्यात एक स्त्री होती. अरुणाने तिला खडसावून विचारले पण तीने असे काही सापडले नाही असे साफ सांगीतले.

अरुणा तिच्या बॉस च्या मदतीने ऑफिसच्या सफाईच्या वेळेचे सी.सी. टीव्ही. फुटेज रोजच्या रोज तपासत राहीली! दोन दिवसां नंतरच्या एका क्लिप मध्ये, कॉफी व्हेडिंग मशीनच्या जवळ ती स्त्री कर्मचारी सफाई करताना खाली वाकुन काही उचलताना दिसली. पण ती स्त्री पाठमोरी दिसत असल्याने तिने नेमके काय उचलले ते स्पष्ट होऊ शकले नाही.

अरुणाच्या बॉस ने त्या स्त्री सफाई कर्मचार्‍याकडे बरीच चौकशी केली पण कशाला ती बाई बधली नाही. तीने खाली वाकून काही उचलल्याचे मान्य केले पण वाकून उचलले तो कागदाचा एक कपटा होता, हिरा वगैरे नाही असे निक्षुन सांगीतले. अरुणाने त्या स्त्री

सफाई कर्मचार्‍या वर संशय ठेवत पोलिस कंम्प्लेंट केली. पोलिसांनी ते सी.सी.टीव्ही. फुटेज बघून त्या स्त्री सफाई कर्मचार्‍याची त्यांच्या पद्धतीने (?) चौकशी केली , शेवटी ती महीला कबूल झाली !

हिरा अरुणाला परत मिळाला!!

हिरा है सभी के लिए!!

(लेखमाला समाप्त)

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

6 प्रतिक्रिया

///////////////
 1. Suresh vanapalli

  Wah! Mast lekh.
  He vachun kalale ki engg madhye Maths sodvane kigitari patine soppe asel.
  Ase sagle andaz barobar bandhne he ek Shashtrach ani kala dekhil..!!

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद सुरेशजी,

   गणित आणि तर्कशास्त्र हे ज्योतिषशास्त्राचे आधार स्तंभ आहेत. कॉम्प्युटर आल्यामुळे यातला गणिताचा भाग आता बरच सोपा झाला आहे. मात्र तर्कशास्त्र हे लागतेच! प्रश्नाचे उत्तर पत्रिकेत असतेच असते, ते शोधण्यातच सारे कौशल्य असते. आपण म्हणता तशी ती कला आहे. ज्योतिषाची पुस्तके वाचून तसेच क्लास जॉईन करुन फक्त आऊट लाईन समजेल पण त्याच्या पलीकडे जाऊन काहीच साध्य होणार नाही, उपलब्ध माहीतीचा तर्कशुद्धतेने वापर करुन भाकित करणे ही एक कलाच आहे, ती मात्र शिकवून येत नाही, एकतर ती जन्मजात्च अंगाट्त असावी लागते किंवा अनेक वर्षाच्या सारावाने काहीशी आत्मसात करता येईल. गुरुचे मार्गदर्शन, इंटीईश्युन ची साथ, शुद्ध आचरण हे घटक पण तितकेच आवश्यक आहेत.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.