चला बघुया तो हिरा कोठे आहे आणि तो सापडेल का !

या लेखमालिकेतला पहीला भाग इथे वाचा:

ज्युवेल थीफ ! (भाग – १)

हा प्रश्न ‘हरवले – सापडले’ या गटात मोडतो, असे बरेच प्रश्न मी पूर्वी तपासले आहेत. या बाबतीत मला पारंपरीक , के.पी. पेक्षा  वेस्टर्न होरारी पद्धतीचा जास्त उपयोग झाला असल्याने , या केस बाबतीतही मी वेस्टर्न होरारी चार्ट बनवला तो असा:

वेस्टर्न होरारी चार्ट चा तपशील:

दिनांक: २० एप्रिल २०१५,  वेळ: १९:०९:१८ , ठिकाण: देवळाली कँप , नाशिक

चार्ट टाईप: ट्रॉपीकल,प्लॅसीड्स

वेस्टर्न होरारीत प्रश्ना साठीची कुंडली मांडली गेली की सर्वप्रथम तपासायच्या त्या दोन गोष्टीं:

जन्मलग्न बिंदू (Ascendant) आणि चंद्र.

जन्मलग्न बिंदू चे अंश काय आहेत हे महत्वाचे असते. जर जन्मलग्न बिंदू (तो कोणत्याही राशीत असू शकतो) ० ते ३ अंशात असेल तर त्याचा अर्थ असा होतो की प्रश्न जरा वेळे आधीच विचारला गेला आहे (Premature), प्रश्नासंदर्भात अजून बरीच उलथापालथ होणार आहे, कदाचित ‘कहानी में व्टिस्ट’ पण आनेवाला हय! तेव्हा आत्ताच त्या प्रश्नाचे उत्तर शोधणे उचित नाही किंवा उत्तर शोधताना ही ‘व्टिस्ट’ वाली बाब लक्षात घेतली पाहीजे. (आणि बर्‍याच वेळा असा व्टिस्ट आहे का आणि असल्यास तो कशा प्रकारे असू शकेल याचा अंदाज पत्रिकेतून मिळतोच मिळतो, शोधा म्हणजे सापडेल!)

जर लग्न बिंदू २७ ते ३० अंशात असेल तर त्याचा अर्थ असा असू शकतो की परिस्थिती जातकाच्या नियंत्रणा बाहेर गेली आहे, प्रश्ना संदर्भात आता ‘जे जे होईल ते पाहाणे ‘ एव्हढेच काय ते जातकाच्या हातात आहे. आणखी एक अर्थ असा निघू शकतो की जातक प्रश्ना बाबतीत फारसा गंभीर नाही , त्याने अगदी कॅज्युअली, सहज, जाताजाता , टाईमपास , चेष्टा ,ज्योतिषाची परिक्षा घेणे अशा एखाद्या उद्देशाने प्रश्न विचारला आहे. याचा ही योग्य (?) तो उपयोग करुन घ्यावा लागतो.

चंद्रा कडे ही  लक्ष द्यावे , चंद्र जर ‘व्हाईड ऑफ कोर्स ‘ असेल म्हणजेच चंद्र सध्या ज्या राशीत ज्या अंशावर आहे तिथे पासुन चंद्र ती  राशी ओलांडे पर्यंत त्याचे कोणत्याही ग्रहा बरोबर योग होत नाहीत अशी स्थिती. या स्थितीत दुहेरी परिणाम मिळतात. म्हणजे प्रश्ना संदर्भातली परिस्थिती जातकाच्या नियंत्रणा बाहेर गेली आहे, प्रश्ना संदर्भात आता ‘जे जे होईल ते पाहाणे ‘ एव्हढेच काय ते जातकाच्या हातात आहे असा अर्थ निघू शकतो. किंवा प्रश्नाचे उत्तर नकारार्थी मिळण्याची मोठी शक्यता असते. चंद्र हा कालमापनासाठी वापरला जात असल्याने चंद्र त्याची सध्याची राशी बदले पर्यंत एक ही ग्रह योग करणार नसेल तर कालनिर्णय कसा करता येईल ?  चंद्राला राशी बदलल्या खेरीज नवा ग्रहयोग करता येणार नाही पण चंद्र पुढच्या राशीत गेल्यावर लगेचच  दुसर्‍या ग्रहांशी काही योग करत असेल आणि इतर अनुकूल परिस्थिती व ग्रहयोग असतील तर, तर प्रश्नात अपेक्षित असलेली घटना घडेलही, पण त्यासाठी प्रश्ना संदर्भात बरेच काही मोठे बद्ल झाल्या नंतरच! आणि ते कोणते बदल हे पण पत्रिका सांगू शकते , शोधा म्हणजे सापडेल !

प्राचीन ग्रंथांतुन आणखी एक निरिक्षण नोंदवून ठेवले आहे ते म्हणजे , जर प्रश्नकुंडलीत सप्तमात शनी असला तर काही समस्या निर्माण होऊ शकतात. सप्तमात शनी असेल तर ज्योतिषाच्या हातून कळत – नकळत चुक होते आणि केलेले भाकित चुकते!  याबाबत अनेक ग्रंथांचे वाचन करुन मी काही नोट्स तयार केल्या आहेत , त्या आपल्या समोर सादर करतो..

माझे बरेचसे वाचन इंग्रजीत असते आणि स्वाभाविकच नोट्स पण इंग्रजीत तयार केल्या जातात, आता त्याचे सुलभ मराठी भाषांतर करण्या इतपत वेळ नाही म्हणून त्या नोट्स जशा आहेत तश्या म्हणजे इंग्रजीत सादर करतो.

Saturn in 7th House

Querent is signified by the 1st house and the astrologer by the 7th.  If Saturn is in the 7th house, this means that the astrologer is going to have problems—caused perhaps by an error in arithmetic, by a poorly drawn chart, by overlooking some factors that affect the interpretation or, given that none of the relevant factors has been missed, by a faulty assessment of their meaning. The experience of many astrologers definitely goes to show that such mistakes can occur when Saturn occupies the 7h house of a horary chart; so it is not a bad idea to be extra careful if that happens. Nevertheless, it has been found in practice that such a chart still can be used effectively provided every precaution is taken.

Again, some questions have specifically to do with 7th house situations (marriage, teamwork, open enemies, etc.), so we should not reject all charts with Saturn in the 7th as impossible or dangerous to interpret. This would imply that there were no Saturnine marriage partners, enemies, and the like—which is obviously ridiculous.

Traditionalists still lay great emphasis on the “bad” side of Saturn in the 7th but experience teaches that Saturn in this house need not always be so troublesome. Caution is always advisable, but if we double-check the chart, see if we have overlooked such points as summer time, and pay extra attention to detail, that is probably sufficient. Usually we shall discover nothing more than some trifling fault or omission. The latest developments in horary astrology tend to confirm this.

Of course, there are other possibilities: for example, the client pays scant attention to the astrologer, throws the latter’s advice out of the window, or—and fortunately this rarely happens—the advice lands the astrologer in difficulties. Saturn is the planet of constraint, and astrologers who fail to abide by the moral and ethical constraints of the profession can stir up trouble for themselves—for instance, by offering medical advice they are not qualified to give. But astrologers who behave impeccably have nothing to fear in that respect from this position of Saturn.

आताच्या पत्रिकेत लग्नबिंदू ०४ वृश्चिक २४ असल्याने , लग्नबिंदू संदर्भातली काळजी नाही

चंद्र वृषभेत २४: १३ अंशावर आहे. आता हा चंद्र वृषभेत आहे तो पर्यंत तो कोणा ग्रहाशी योग करत आहे हे तपासायचे. हा वृषभेचा चंद्र पत्रिकेतल्या कोणत्याच ग्रहाशी योग करत नाही , म्हणजे तो ‘व्हाईड ऑफ कोर्स’ आहे ! पण एक दिलासा आहे, चंद्र जो सध्या वृषभेत आहे तो जेव्हा मिथुनेत गेल्या बरोबर (३ डिग्रीज) शनी बरोबर प्रतीयोग करतो आहे. म्हणजे चंद्र ‘व्हाईड ऑफ कोर्स’ आहे जरुर पण तरीही घटना घडू शकेल, फक्त  ‘ प्रश्ना संदर्भात बरेच काही मोठे बद्ल झाल्या नंतरच‘  हे लक्षात ठेवायचे!

एक नकार घंटा वाजली !

असू दे,  चंद्र व्हाईड ऑफ कोर्स असला म्हणून केस क्लोज करता येत नाही, प्रकरण अवघड आहे , शक्यता कमी आहे , गुंतागुंत होणार आहे असा आणि इतकाच अर्थ घेऊन पुढे सरकायचे!

इथे एक चांगला संकेत मिळत आहे तो म्हणजे जरी रवी षष्ठात (६) म्हणजे होरायझन च्या खाली असला तरी चंद्र अ‍ष्टमात (८) असल्याने होरायझन च्या वर आहे, त्यातही चंद्र वृषभेचा आहे उच्चीचा आहे , वस्तु सापडायची शक्यता पण आहे.

ओक्के, चला पुढच्या पायरीवर..

प्रश्नकर्ता नेहमीच लग्न स्थाना वरुन पाहतात. वृश्चिक लग्न असल्याने ‘मंगळ’ अरुणाचे प्रतिनिधित्व करेल.

‘हिरा’! मौल्यवान आणि वैयक्तीक मालकीची वस्तु! दुसर्‍या (२) भावा वरुनच बघायला पाहीजे म्हणजे दुसर्‍या भावाचा स्वामी हा हरवलेल्या वस्तुचे प्रतिनिधित्व करणार, तसेच दुसर्‍या भावातील ग्रह, दुसर्‍या भावाचा नैसर्गिक कारक , हरवलेल्या वस्तुचा नैसर्गिक कारक पण महत्वाचे होणार. दुसर्‍या भावाचा नैसर्गिक कारक शुक्र असतो,  आणि मौल्यवान वस्तु, दागिने, आभूषणांचा कारक शुक्र असतो. चंद्र एरवी जातकाचा प्रतिनिधी मानला जात असला तरी ‘हरवले-सापडले’  होरारीच्या बाबतीत या नियमाला अपवाद करुन चंद्राला हरवलेल्या वस्तुचे प्रतिनिधीत्व बहाल केले जाते.

दुसर्‍या भावाची सुरवात ०३ धनु ३८ अशी आहे, धनेचा अधिपती गुरु हरवलेल्या वस्तुचा सिग्निफिकेटर होणार, द्वितीय स्थानातले ग्रह सुद्धा हरवलेल्या वस्तुचे सिग्निफिकेटर होतात, या न्यायाने, द्वितीयेतला हा शनी सुद्धा हरवलेल्या वस्तुचा (हिरा) सिग्निफिकेटर होणार. म्हणजे गुरु (भावाधिपती) , शनी (भावातील ग्रह) , शुक्र ( द्वितीय भावाचा नैसर्गिक कारक + मौल्यवान वस्तुंचा कारक), चंद्र (हरवलेल्या वस्तुचा जन्मसिद्ध प्रतिनिधी) असे एकंदर चार ग्रह हरवलेल्या वस्तुचे , म्हणजेच ‘हिर्‍या’ चे प्रतिनिधित्व करतील.

हा शनी धनेत ३:५० वर आहे, वक्री आहे आणि त्याने अगदी नुकतेच  द्वितीय भावात (३ धुन ३८) प्रवेश केला आहे. हरवलेल्या वस्तुचा प्रतिनिधी द्वितीय भावात असणे हे एका परीने चांगले असले, वस्तु सापडण्याची शक्यता दाखवणारे असले, असे जरी असले तरी हरवलेल्या वस्तुचा प्रतिनिधी म्हणून शनी ची दुसर्‍या स्थानातली उपस्थिती जरा काळजीचीच असते, वस्तु सापडण्याच्या बाबतीत अनेक अडथळे येतात , विलंब होतो.

याबाबत अनेक ग्रंथांचे वाचन करुन मी काही नोट्स तयार केल्या आहेत , त्या आपल्या समोर सादर करतो.. ही ‘खास’ नोट मुळात जन्मपत्रिकेत शनी द्वितीय भावात आहे या मुद्द्याला धरुन असली तरी होरारी ला पण उपयोगी पडते …

माझे बरेचसे वाचन इंग्रजीत असते आणि स्वाभाविकच नोट्स पण इंग्रजीत तयार केल्या जातात, आता त्याचे सुलभ मराठी भाषांतर करण्या इतपत वेळ नाही म्हणून त्या नोट्स जशा आहेत तश्या म्हणजे इंग्रजीत सादर करतो.

 

Saturn in 2nd house

Usually, wherever Saturn is located in a chart signifies a problematic life area, as the ringed planet is considered a malefic. Does this general rule apply, though, when Saturn is placed in the house of material possessions and wealth? The truth is somewhere in the middle.

When Saturn is located in the second house, its behaviour is strongly connected to the aspects he forms with other planets, while also to the sign in which it resides. Even though it is considered a rather restrictive planet, if it is placed in Libra, Scorpio, Capricorn or Aquarius he tends to reveal his positive traits. The same applies when he forms good natal aspects to planets; a supportive Jupiter or Venus might even turn him into a benefic. Nevertheless, the whole picture is more than complicate to understand.

Saturn in the second house gives a person who has been born to a poor family, or who has quickly and easily learns to be able to live on minimal resources. This creates a survivor, someone who will start his/her finances from zero. Saturn is a slow moving and limiting planet, adoring hard work, serious approach and slow steps. When it is located in the house of finances, the individual will dedicate a lot of time and effort to build his income and establish his security net. The native needs to heal the traumas of his/her financial difficulties, so the second house issues are a very important area of his/her life where he/she shows extreme seriousness. This aspect can create workaholics, while in some situations when Saturn is very well-aspected even millionaires. In any case, success comes slowly and usually late in life. Nevertheless, when it comes there is no turning back; Saturn is the most stable planet and also protector of the old age. This placement signifies very wealthy old years.

When Saturn is located in the 2nd, the chart owner will not gamble or otherwise risk losses of wealth. The planet’s gloomy character may make the native forget about enjoying the money he/she earns, and keep too much aside for a rainy day. In extreme situations, it can create a very stingy person, which many times is not at all visible to himself/ herself. In addition, Saturn can bring melancholic thoughts and depression over material matters, even if things are not going so bad.

Of course, if Saturn is adversely aspected by malefics, the situation will be quite more difficult. The difficulties will be mostly internal, because the native will not be able to evaluate wealth correctly. He/She might be working too hard or too long, and just achieve some medium level income, feeling depressive of not reaching his goals of establishing an empire. His/Her pessimism will evolve to a quite bigger problem than lack of money.

People with such a placement are advised to treat themselves well, and celebrate the little things in life. If you have Saturn located in the 2nd house, you must understand that even though you need to cooperate with him and work hard, it is wrong to over-emphasize one planet and allow it take control of your life. By empowering some radically opposite planet in your chart, like Venus or Jupiter, you will give a lot more joy to your everyday moments and in the end receive even more pleasure while building your financial security. Search which pleasure houses are prominent in your natal chart, and don’t be afraid to indulge in activities that they rule. As a Greek proverb says, “too much work devours the boss”, so put a smile on your face and don’t forget to live!

 

हा शनी वक्री आहे, म्हणजे हरवलेली वस्तू जरी सापडली तरी ती मूळ स्वरुपात सापडणार नाही, त्या वस्तूची काहीतरी मोडतोड झालेली असणार, पण इथे हिरा आहे, याची काय मोडतोड होणार!

हरवलेल्या हिर्‍याचा दुसरा सिग्निफिकेटर, द्वितीयेश गुरु आपल्याला हरवलेली वस्तू साधारण पणे कोठे असू शकेल याचा एक प्राथमिक का होईना अंदाज देईल. गुरु दशमात , सिंहेत. सिंह रास म्हणजे “Of buildings, it rules those that are eminent: castles, palaces and theaters. Within a house, it rules the area in the vicinity of the fireplace….” आणि दशमस्थान म्हणजे “It rules such abstract values as honor, authority, dignity of office, and victory. …” याचा मेळ घातला तर लक्षात येते ते म्हणजे ‘कामाचे/ नोकरी – व्यवसायाचे  ठिकाण’ !  हिरा अरुणा च्या ऑफिस मध्येच हरवला होता हा जो अंदाज होता त्याला पुष्टीच मिळाली!

सिंह रास आहे म्हणजे हरवलेली वस्तु,  उष्ण , उबदार, आणि महत्वाच्या (प्रोमिनंट) जागी असू शकते. टिपीकल ऑफीसचा सेट अप विचारात घेता, ऑफिसातली बॉस ची केबिन, कॉन्फरन्स रुम किंवा चहा-कॉफीची व्हेडिंग मशीन्स, मायक्रोवेव्ह ओव्हन , हॉट प्लेट्स , गॅस बर्नर , हिटर्स याच्या सान्निध्यात!

आता बाकीचे घटक पाहूयात.

पार्ट ऑफ फॉर्च्युन १० तुळ २० म्हणजे व्यय स्थानात ! पार्ट ऑफ फॉर्चुन चा भावाधिपती शुक्र  जो मिथुनेत १०:२१ वर म्हणजे अष्टमात ! हिरा सापडण्याची शक्यता आता धुसर वाटायला लागली!

आता आपण पंचम (५) भाव पाहु या कारण पंचम हे द्वितीयेचे (वस्तु) चतुर्थ (अखेर / शेवट) स्थान आहे . पंचम (५) स्थान हे त्या हरवलेल्या वस्तुचा किंवा ती हुडकण्यासाठी चालू असलेल्या शोधकार्याचा शेवट काय असेल ते सांगते.

गुरु पंचमेश आहे, पंचमात नेपच्युन आहे ,  आता पंचमात नेपच्युन सारखा ‘फसवाफसवी / गोंधळ / भूल – भुरळ / संभ्रम’  वाला ग्रह म्हणजे वस्तु च्या बाबतीत किंवा वस्तु सापडण्याच्या बाबतीत काहीतरी घोट्टाळा होण्याची शक्यता आहे, वस्तु सापडणे काहीचे अवघडच आहे असे दिसते.

आत्ता पर्यंत समोर आलेल्या फॅक्टर्स वरुन हिरा सापडणे काहीसे अवघड आहे हे जरी खरे असले तरी आपल्याला एकदम या निष्कर्षा वर येता येणार नाही कारण  हिरा सापडण्याचे काही योग आहेत का ते आपण अजून तपासलेले नाहीत!

या पायरीवर आपण हिरा सापडेल का ते पाहु या.

त्यासाठी प्रश्न कुंडली मध्ये द्वितीय (२) स्थानाचा भावाधिपती किंवा द्वितीय स्थानातले ग्रह यांचे पंचमस्थाना (५) चा भावाधिपती व पंचमातले ग्रह यांच्याशी चांगले ग्रह योग (म्हणजेच युती, लाभ, नवपंचम) होत असतील तर किंवा लग्नस्थान (जे जातक स्वत: किंवा  हरवलेल्या वस्तुचा मालक दाखवते) याचा अधिपती किंवा लग्नातले  ग्रह  यांचे द्वितीय स्थानाचा भावाधिपती किंवा द्वितीय स्थानातले ग्रह यांच्याशी चांगले ग्रह योग (म्हणजेच युती, लाभ, नवपंचम) होत असतील तर. अर्थात इथे एक लक्षात ठेवायचे की हे योग (Aspect) होणारे (Applying) असावेत होऊन गेलेले (Separating) नसावेत.

अरुणाचा सिग्निफिकेटर आहे मंगळ आणि हरवलेल्या  वस्तुचे सिग्निफिकेटर्स  आहेत , गुरु (द्वितीयेश) , शनी (द्वितिय स्थाना तला ग्रह) , शुक्र (द्वितीय स्थानाचा नैसर्गिक कारक, मौल्यवान / दागिने / आभुषणांचा कारक ) आणि चंद्र (हरवलेल्या वस्तुचा नैसर्गिक कारक) !

मंगळ ( १४ वृषभ ३४) , गुरु (१२ सिंह ४८) शी झालेल्या केंद्र योगातून नुकताच बाहेर पडला आहे, म्हणजेच हिरा मालका पासुन नुकताच (आजच!) दूर झाला आहे, म्हणजे या दोघांत कोणताही योग होत नाही.

मंगळ ( १४ वृषभ ३४) , शनी (द्वितीय स्थानातला ग्रह) (०३ धनु  ५०) शी कोणताही योग करत नाही !

मंगळ ( १४ वृषभ ३४)  आणि चंद्र (२४ वृषभ १३, हरवलेल्या वस्तुचा नैसर्गिक कारक) यांच्यात ही कोणता योग नाही!

मंगळ ( १४ वृषभ ३४)  आणि शुक्र  (१० वृषभ २१, दुसर्‍या स्थानाचा नैसर्गिक कारक) यांच्यात ही कोणता योग नाही.

द्वितीयेश गुरु हाच पंचमेश आहे म्हणजे मार्गच खुंटला. गुरु (१२ सिंह ४८) आणि पंचमातला नेपच्युन  (०९ मीन ०५) यांच्यातही  सध्या कोणताही योग नाही आणि होणार ही नाहीत.

म्हणजे सगळ्या बाजुनी विचार केला असता असा निष्कर्ष काढता येतो की म्हणजे ‘अरुणाचा हिरा कायमचा हरवला , तो आता परत मिळणार नाही’.

हिरा चोरी झालेला नाही, हरवला आहे, अरुणाच्या ऑफिसातच कोठेतरी पडला आहे, तो अरुणाला सापडणार नाही पण दुसर्‍या कोणाला तरी सापडू शकेल!

अशी शक्यता आहे का? चला ही शक्यता पण पडताळून घेऊ….

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.