खास लोकाग्रहास्तव आणखी एक केस स्ट्डी !
२० एप्रिल २०१५. संध्याकाळचे सहा – सव्वा सहा वाजले वाजले असतील, त्या दिवशीची संध्याकाळची एकच अपॉईंटमेंट नुकतीच संपली होती. मी आपली दुष्काळी कामें म्हणजेच डेटा बेस अपडेट करणे, हँड रिटन नोटस चे स्कॅनिंग करणे अशा कामात गुंतलो होतो आणि फोन वाजला. ‘अ‍रुणा xxxxx’ , मला आठवले गेल्याच वर्षी ती विवाहयोगा संदर्भात माझ्या कडे आली होती,  मी केलेले  तिच्या विवाहाचे भाकित बरोबर आले होते, आता पुन्हा कॉल कशा साठी … ‘संतती’ ,  ‘नोकरी बदल , परदेश गमन, किंवा देव न करो पण  काही वैवाहीक समस्या, असेही कारण असू शकते.

“बोल अरुणा, आज कशी काय आठवण काढलीस?”

“काका, मोठा प्रॉब्लेम झालाय”

“वाटलचं मला, त्या शिवाय का कोणी ज्योतिषाचा दरवाजा ठोठावते?”

“काय करु काका, वेळच तशी आलीय”

“काय काम ते सांग, बघुया मला काही करता येते का”

“काका, माझ्या एंगेजमेंट च्या रिंग मधला किंमती  हिरा हरवला”

“कोठे , कधी?”

“बहुदा आजच, आज ऑफीस मध्ये लंच टाइमाला श्रुती एकदम किंचाळली, “अरुणा , तुझ्या अंगठीतला हिरा कोठे गेला?” तेव्हा लक्षात आले”

“ही श्रुती कोण?”

“माझ्याच टीम मधली एक इंजिनियर “

“हिरा नक्की आजच हरवला का?”

“ते कसे सांगणार काका? पण अंगठीतला हिरा गायब आहे हे आजच दुपारी २ च्या सुमारास कळले. पण काका एक सांगते , तो हिरा चांगला घसघसीत मोठा होता, चमकदार होता, काल परवा हरवला असता तो आधीच लक्षात आले असते, हिरा आजच ऑफीस  मध्येच हरवला , म्हणजे अंगठीतून निखळून पडला असणार ”

“ऑफिस मध्ये नीट हुडकले का?”

“काका, ते केले , मी आणि माझ्या आख्ख्या टिमने ऑफीसचा कोपरा न कोपरा , अगदी इंच न इंच चाळून काढला, पण हिरा सापडला नाही”

“तु म्हणतेस तसा तो हिरा मोठा असेल तर सापडेल नक्की, आज नाही पण उद्या परवा कोणाच्या तरी नजरेत येईल”

“मला तेव्हढा धीर धरवणार नाही काका,  सुजय ने मोठ्या हौसेने , अगदी कर्ज काढून तो हिरा माझ्या साठी घेतला होता आणि मी तो मुर्खा सारखा हरवला..(एक हुंदका) … आता सुजयला काय सांगू”

“हे बघ, तु काही मुद्दाम म्हणून तो हिरा कोठे फेकून दिलेला नाही, हा केवळ एक अपघात आहे, उगाच स्वत:ला इतके अपराधी समजू नकोस”

“ते सर्व ठीक आहे काका , पण जिवाला घोर लागला आहे,  म्हणुनच तुम्हाला फोन केला , तुम्ही  काही अंदाज देऊ शकाल का?”

“ठीक आहे, बघुया , तो हिरा कोठे आहे , सापडु शकेल का ते”

“प्लिज”

“नक्की, तु मला शक्य झाले तर रात्री दहा पर्यंत फोन कर, तो पर्यंत मी बघून ठेवतो, आज  रात्री कॉल करणे शक्य झाले नाही तर उद्या सकाळी सात नंतर कधीही”

“छे , छे , उद्या कशाला मी आजच रात्री बरोबर दहाला कॉल करते, पण अंकल प्लीज मला मदत करा..”

“हो, अरुणा, काळजी करु नको, हिर्‍या सारखी मौल्यवान वस्तु आणि ती ही प्रेमाची भेट हरवलेली आहे , तेव्हा मी तुझे काम लगेचच हातात घेतो, बारकाईने तपास करतो, निश्चिंत राहा”

“थँक्यु काका, मी दहा वाजता फोन करते”

“ओक्के”

मी कॉम्प्युटर वरचा टाईम पाहीला , संध्याकाळचे सात वाजुन नऊ मिनिटें आणि अठरा सेकंद झाले होते. हीच वेळ अरुणाने प्रश्न विचारला आणि मला तो समजला याची होती.  या वेळेची पत्रिकाच मांडायला हवी.

हा प्रश्न ‘हरवले – सापडले’ या गटात मोडतो, असे बरेच प्रश्न मी पूर्वी तपासले आहेत. या बाबतीत मला पारंपरीक , के.पी. पेक्षा  वेस्टर्न होरारी पद्धतीचा जास्त उपयोग झाला असल्याने , या केस बाबतीतही मी वेस्टर्न होरारी चार्ट बनवला तो असा:

वेस्टर्न होरारी चार्ट चा तपशील:
दिनांक: २० एप्रिल २०१५ वेळ: १९:०९:१८ ठिकाण: देवळाली कँप , नाशिक
चार्ट टाईप: ट्रॉपीकल , प्लॅसीड्स

हरवलेल्या वस्तूंचा शोध घेण्यासाठी प्रश्न कुंडलीत काय बघायचे?

एकंदर पाच फॅक्टर्स.

  1. द्वीतीय स्थान (२): हे स्थान आपल्या मालकीच्या वस्तू दर्शवते. या स्थानाचा अधिपती विचारात घ्यायचा , ह्या स्थानात असलेले ग्रह पण को-सिग्नीफिकेटर म्हणून महत्वाचे असतात , त्यांचाही विचार करायचा.
  2. चंद्र: एरवी प्रश्नकुंडलीत चंद्र हा प्रश्नकर्त्याचा को-सिग्नीफिकेटर असतो, पण ‘हरवले –सापडले’ बाबतीतच्या प्रश्नांसाठी चंद्र हा हरवलेल्या वस्तु चा सिग्निफिकेटर असतो, त्यामुळे अशा पत्रिकेत चंद हा प्रश्नकर्त्या पेक्षा हरवललेया वस्तु चा सिग्निफिकेटर म्हणूनच वापरतात. चंद्राच्या स्थानावरुनही हरवलेल्या वस्तू बाबत, म्हणजे ती सापडेल का? इ. चा बोध होतो.
  3. शुक्र: हा दुसर्‍या स्थानाचा नैसर्गिक अधिपती म्हणून त्याचा विचार करणे अत्यावश्यक असते. हरवलेल्या वस्तुचा म्हणून काही कारक ग्रह असल्यास त्याचा ही विचार करावा लागतो. उदा: कागदपत्रे , पासपोर्ट असे काही हरवले असेल तर अशा वस्तुंचा कारक म्हणुन बुधा चा विचार आवश्यक असतो.
  4. पार्ट ऑफ फॉर्च्युन: नावातच सर्व काही आहे!
  5. पार्ट ऑफ फॉर्चुन चा भावाधिपती.

त्याच बरोबर, प्रश्नकुंडलीतले पंचम (५) स्थान ही महत्वाचे आहे, कारण पंचमस्थान हे द्वीतीय स्थानाचे चतुर्थ स्थान आहे, चतुर्थ स्थान हे शेवट , अखेर ,फलश्रुती दाखवते, द्वीतिय स्थान (२) हे हरवलेल्या वस्तुचे स्थान असल्याने त्याचे चतुर्थ म्हणजेच पंचम (५) स्थान हे त्या हरवलेल्या वस्तुचा किंवा ती हुडकण्यासाठी चालू असलेल्या शोधकार्याचा शेवट काय असेल ते सांगते.

हरवलेली वस्तु सापडेल का ?

त्यासाठी प्रश्न कुंडली मध्ये द्वीतीय (२) स्थानाचा भावाधिपती किंवा द्वीतीय स्थानातले ग्रह यांचे पंचमस्थानाचा (५) भावाधीपती व पंचमातले ग्रह यांच्याशी चांगले ग्रह योग (म्हणजेच युती, लाभ, नवपंचम) होत असतील तर किंवा लग्नस्थान (१) जे जातक स्वत: किंवा हरवलेल्या वस्तुचा मालक दाखवते, याचा अधिपती किंवा लग्नातले ग्रह यांचे द्वीतीय (२) स्थानाचा भावाधिपती किंवा द्वीतीय स्थानातले ग्रह यांच्याशी चांगले ग्रह योग (म्हणजेच युती, लाभ, नवपंचम) होत असतील तर.

अर्थात इथे एक लक्षात ठेवायचे की हे योग (Aspect) होणारे (Applying) असावेत होऊन गेलेले (Separating) नसावेत.
त्याच बरोबर रवी आणि चंद्र या दोन ल्युमिनरीज (लाईट्स) पैकी किमान एक तरी होरायझन च्या वर असावा, म्हणजे ७,  ८, ९ , १०, ११, १२ या स्थानात असावा. याच्या मागे तर्क असा आहे की जर एकही ल्युमिनरी होरायझन च्या वर नसेल तर ‘अंधार’ आणि अंधारात कसली सापडतेय ती वस्तू! अर्थात ल्युमिनरी होरायझन च्या वर असणे म्हणजे हरवलेली वस्तु सापडण्याची गॅरंटी असे मात्र नाही, फक्त वस्तु सापडण्याची शक्यता आहे असा एक ढोबळ अर्थ घ्यायचा. मात्र दोन्ही ल्युमिनरीज होरायझच्या खाली म्हणजे १ ते ६ या घरात असतील मात्र वस्तु सापडायची शक्यता कमी असते.

वस्तु हरवली का चोरीस गेली?

सप्तम स्थान (७) पाहायचे , सप्तमस्थान हे नेहमीच वैवाहिक जीवनातला जोडीदार, व्यवसायातला भागीदार, खुले आम शत्रु (Open enemies),स्पर्धक (Competitors), अनोळखी-तिर्‍हाईत व्यक्ती (Unknown third party person) दाखवते, जर सप्तम स्थानातले ग्रह किंवा सप्तमेश दुषित असेल तर वस्तू चोरीस गेली आहे असा अर्थ घ्यायचा, सप्तमेश आणि सप्तमातले ग्रह संभाव्य चोराबद्दल बरीच माहीती पुरवतात.

हरवलेली / चोरीस गेलेली वस्तू कोठे असेल?

चंद्र, शुक्र, द्वीतीय स्थानाचा अधिपती, द्वीतीयातले ग्रह, पार्ट ऑफ फॉरच्युन वा त्याचा राश्याधीपती हे सर्व हरवलेल्या वस्तुचे सिग्नीफीकेटर्स आहेत, जेव्हा बहुसंख्य सिग्नीफीकेटर्स अँगुलर हाऊसेस ( १, ४ , ७ , १०) मध्ये असतात तेव्हा वस्तु घरातच सापडते, आणि जेव्हा बहुसंख्य सिग्नीफीकेटर्स अँगुलर हाऊसेस मध्ये नसतात तेव्हा वस्तू खात्रीने घराच्या बाहेरच असते.

हरवलेली वस्तू कोणत्या दिशेला असू शकेल?

द्वीतीय स्थानाचा अधिपती आपल्याला दिशा दाखवतो, तो ज्या स्थानात असतो त्या स्थानाने दर्शवलेल्या दिशेला वस्तू सापड्ण्याची मोठी शक्यता असते. पत्रिकेत प्रथम स्थान ‘पूर्व’ दिशा , चतुर्थस्थान ‘उत्तर’, सप्तम स्थान ‘पश्चीम’ आणि दशम स्थान ‘दक्षिण’ दिशा दाखवते. दुसरे व तिसरे ही स्थाने पूर्व व उत्तर यांच्या मधला भाग, अकरा व बारा ही स्थाने दक्षिण व पूर्व या मधला भाग दाखवतात. या प्रमाणे बाकीच्या भावां वरुन दिशेचा अंदाज घेता येतो.

द्वीतीय (२) स्थानाधिपती ज्या राशीत असतो आणि ज्या स्थानात असतो , त्या राशी व स्थानाने ने दर्शवलेल्या जागी ती वस्तू सापडायची शक्यता असते. जेव्हा चंद्र द्वीतीय स्थानात आढळतो तेव्हा हरवलेली वस्तू सापडण्याची शक्यता फार मोठी असते आणि वस्तू जिथे असू शकेल असे आपल्याला जास्त प्रकर्षाने वाटत असते, वस्तू बहुदा त्याच ठिकाणी सापडते. हरवलेल्या वस्तुं साठी द्वितीयेश, द्वीतीयातले ग्रह, चंद्र, हरवलेल्या वस्तुंचा नैसर्गिक कारक असे बरेच सिगनिफिकेटर्स असले तरी वस्तु  कोठे आहे याचा अंदाज घेताना द्वितीयेशाला प्राधान्य द्यावे किंवा हरवलेल्या वस्तुच्या एकूण सिग्निफिकेटर्स पैकी जो हरवलेल्या वस्तुशी जास्त सुसंगत असेल तो ग्रह वापरावा. हा काहीसा तारतम्याचा आणि अनुभवाचा भाग आहे , असा शिकवून येणार नाही, त्यासाठी अशा प्रकारच्या अनेक पत्रिका सोडवून , पडताळा घेतला पाहीजे.

हरवलेली/चोरीस गेलेली वस्तु जर सापडलीच तर ती कशा अवस्थेत असेल याचाही अंदाज बांधता येतो, जेव्हा हरवलेल्या वस्तूच्या सिग्नीफिकेटर्स पैकी एखादा सिग्नीफिकेटर वक्री असतो तेव्हा हरवलेली वस्तू जरी सापडली तरी ती मूळ स्वरुपात सापडत नाही, त्या वस्तूची काहीतरी मोडतोड झालेली असतेच असते.

चला तर मग , पाहुयात , या प्रश्नकंडलीच्या मदतीने आपल्याला अरुणाचा हा हरवलेला हिरा सापडतो का!

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////
  1. अभिजित माने

    Khup chhan. tmche likhan aflatun aste. sarvat pahila tumcha blog vachala tenvhapasunch tumcha sachcha chahata zalo. Tumchya lekhanitun sory tumchya pc chya keyboard madhun ammmmm….. ammmm…. nahi tumchya darjedar ani abhyaspurn dokyatun nighalelya shabdancha nehmich asuslele. tumcha eklavya– Abhijit Mane

    0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.