“त्या घटनेला आज ‘दोन’ वर्षे झाली असतील, तो ‘जेनी’ अजुनही ‘बटाट्यांचे वर्गीकरण’ करत बसलाय. एका पेक्षा एक अशी अशक्यप्राय कामे चुटकी सरशी करुन टाकणार्‍या त्या ‘जेनी’ ला बटाट्यांचे ‘लहान’ . ‘मध्यम’ आणि मोठे’ असे वर्गीकरण का करता आले नाही?”


 

दिव्यातल्या त्या राक्षसा कडे, जेनी कडे अफाट, अमानवी ताकद होती पण माणसाची बुद्धी नव्हती !

आपण बटाट्यांच्या ढिगातला एखादा बटाटा नुसत्या नजरेच्या अंदाजाने ‘लहान, ‘मध्यम’ का ‘मोठा’ हे ठरवू शकतो, अगदी एखादा शाळकरी मुलगा सुद्धा हे काम सहजपणे करेल. आणि त्या साठी वजन काटा वापरावा लागणार नाही की कोणतेही मोजमाप करायची आवश्यकता भासत नाही.

पण ‘जेनी’ ची गोष्ट वेगळी आहे, त्याला असे काही करता येत नाही, कारण ‘लहान’ बटाटा , ‘मोठा बटाटा’ यात नेमका काय फरक असतो हेच त्याला माहीती नाही. जर जेनी कडून हे काम करवून घ्यायचे असेल तर त्याला आधी बटाटा ‘लहान’ / ‘मध्यम’/ मोठा’ कसा ठरवायचा हे अगदी स्पष्ट पणे सांगावे लागते जसे:

२५ ग्रॅम च्या आत वजन असलेला बटाटा ‘लहान’

२६ ते १०० ग्रॅम वजनाचा बटाटा ‘मध्यम’

१०१ ग्रॅम पेक्षा जास्त वजनाचा बटाटा ‘मोठा’.

किंवा

२ इंचा पर्यंतचा बटाटा ‘लहान’

२ इंच ते ४ इंच पर्यंतचा बटाटा ‘मध्यम’

४ इंचा पेक्षा मोठा बटाटा ‘मोठा’

ही माहीती जोपर्यंत त्या जेनी ला मिळत नाही तो पर्यंत त्याला बटाट्यांचे वर्गीकरण करता येणार नाही!

मानवी बुद्धी मध्ये केवळ नजरेच्या अंदाजाने कोणतेही मोजमाप न करता बटाट्यांचे वर्गीकरण करण्याचे तारतम्य आहे ते या यंत्रमानवा सारख्या ‘जेनी’ कडे नाही, जेनीला अशा कामासाठी नियमांचे पुस्तक उपलब्ध करुन द्यावे लागते त्या शिवाय तो हे काम करुच कणार नाही.

कॉलेजात असताना मी कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग शिकलो तेव्हा आमच्या गुरुजींनी अगदी पहील्याच लेक्चर ला ही जेनीची स्टोरी सांगीतली होती!

गुरुजी म्हणाले होते:

”कॉम्प्युटर गणित करतो पण स्वत:च्या बुद्धीने नाही तर ते गणित कसे करावयाचे हे त्याला आधी सांगीतले तर आणि तरच तो ते गणित करु शकतो. समजा कॉम्प्युटर कडून एखाद्या संख्येचे वर्गमुळ काढून घ्यायचे असेल तर प्रथम  त्याला हे वर्गमूळ कसे काढायचे हे सांगावे लागते,  म्हणजे तशा सुचनांचा / रितीचा एक संच (NewtonRaphson method!) लिहून काढून कॉम्प्युटर ला पुरवावा लागतो यालाच ‘कॉम्प्युटर प्रोग्रॅम’ असे म्हणतात. आता असा ‘वर्गमूळ’ काढायचा कॉम्प्युटर प्रोग्रॅम लिहायचा तर तो प्रोग्रॅम लिहणार्‍याला (याला सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणतात!) वर्गमूळ काढायचे गणित सोडवता आलेच पाहीजे मगच तो  हे गणित कसे सोडवायचे याबद्दलच्या स्टेप बाय स्टेप सुचना असलेला ‘प्रोग्रॅम’ लिहून कॉम्पुटर ला देऊ शकेल आणि जेव्हा असा प्रोग्रॅम मिळेल तेव्हा आणि तेव्हाच कॉम्पुटर वर्गमूळ काढू शकेल. आणि जर मला एखाद्या संखेचे वर्गमूळ काढण्याचे गणित अवगत नसेल तर मी त्याचा ‘प्रोग्रॅम’ लिहू शकणार नाही आणि असा प्रोग्रॅम नसल्याने माझा कॉम्प्युटर संखेचे वर्गमूळ काढू शकणार नाही!

कॉम्प्युटर एक मशीन असल्याने एकदा हे गणित कसे सोडवायचे हे कळले (प्रोग्रॅम मिळाला) की तो हे गणित सेकंदाच्या हजार भागा इतक्या कमी वेळात, अचुक पणे, न कंटाळता, दिवस-रात्र करेल, हे मान्य. पण इथेही एक गंमत असते, वर्गमूळ काढायचा प्रोग्रॅम उपलब्ध असल्याने तेच एक गणित हा कॉम्प्युटर करु शकेल दुसरे कोणतेही गणित त्याला येणार नाही, समजा आपण त्याला एखाद्या संख्येचे घनमूळ काढायला सांगीतले तर ते त्याला जमणार नाही, कारण घनमूळ काढण्याचे गणित वेगळे असते, त्याचा प्रोग्रॅम वेगळा असतो , तो या कॉम्प्युटर कडे नाही!

 ‘जेनी’ बटाट्यांचे वर्गीकरण  करु शकला नाही कारण त्याच्या कडे ‘बटाट्याचे वर्गीकरण’ करण्याचा प्रोग्रॅम नव्हता म्हणूनच!

मन्याचा आणि त्या जेनीचा किस्सा काल्पनिक आहे पण आज ज्योतिषात नेमके हेच होते आहे आणि हे मात्र काल्पनीक नाही! 

मी अमेरिकेत असताना ज्योतिष विषयक सॉफ्टवेअर लिहणार्‍या एका बलाढ्य कंपनी साठी ‘विषय तज्ञ – Domain Expert’ म्हणून काम पाहिले होते. कॉम्प्युटर च्या साह्याने भविष्य सांगणे हा प्रकल्प होता. मी आणि माझ्या सहकार्‍यांनी अनेक प्रयत्न केले,  न्युरल नेटवर्क्स, आर्टीफिशियल इंटेलिजन्स , पॅटर्न मॅचींग / पॅटर्न रेकक्झीशन, फजी लॉजीक अशी अनेक अत्याधुनिक तंत्रे वापरली गेली पण यश मिळाले नाही. दोन वर्षे काम केल्या नंतर आम्ही तो प्रकल्प बंद केला! कारण: एखाद्या पत्रिकेचे विश्लेषण मानवी बुद्धी ज्या पद्धतीने करते ते केवळ अनाकलनिय आहे आणि व्यक्ती – स्थळ-काळ- परिस्थिती सापेक्ष आहे . म्हणूनच कितिही प्रयत्न केले तरी या विश्लेषणााचे ‘मॉडेल’ कोणत्याही  ‘लॉजीक/ पॅटर्न’ च्या माध्यमातून बनवता येणार नाही !

आज पुस्तके , वेब-साईट्स, सेमिनार, क्लासेस, यु-ट्युब , फेसबुक / व्हॉटसअ‍ॅप ग्रुप अशा अनेक माध्यमांतून ज्योतिष विषयक माहीतीचा महापुर आला आहे. डोके गरगरुन टाकणारा माहीतीचा हा लोंढा बदाबदा माहीती देत आहे पण  अक्षरश: तुकड्या तुकड्यात देत आहे!  म्हणजे बघा… गुरु सहाव्या स्थानात असेल तर ही फळे, मंगळ कर्केत असेल तर ही फळे, चंद्र – शनी केंद्र योगाचे हे फळ, अमुक ग्रह तमुक नवमांशात / नक्षत्रात असेल तर हे फळ, याचा ‘सब’ यंव असेल तर त्यंव फळ (हे खास कृष्णमुर्ती पद्धती वाले!) … मारुतीच्या शेपटा सारखी लांबलचक यादी आहे ही!

पण इतकी सारी माहीती अगदी सहज उपलब्ध असताना देखील या माहीतीचा नेमका उपयोग कसा करायचा हेच बर्‍याच जणांना माहीती नसते आणि म्हणून त्यांची अवस्था त्या ‘जेनी’ सारखी होते. समोर प्रश्न आहे, माहीती उपलब्ध आहे पण त्याचा योग्य वापर करुन प्रश्न कसा सोडवायचा हेच कळत नाही आणि दुर्दैवाने माहीती देणारे पण ती माहीती कशी वापरायची हे सांगत नाहीत !

हे सगळे तुकडे जोडून त्यातून एकसंध असे फलित कसे निर्माण होते हे कोणी सांगत नाही. ज्योतिषाशास्त्रातले नियम एका पाठोपाठ तोंडावर फेकले जातात, पण खरे पाहीले तर ठोस असा, सदा सर्वदा लागू पडेल असा कोणताच नियम या शास्त्रात नाही, तेव्हा एखादा नियम केव्हा लागू होतो आणि केव्हा लागू होत नाही याची कारणमिमांसा नियम देणारा पुरवत नाही. समोर आलेली प्रत्येक पत्रिका हे एक नवे आव्हान असते, तिचा वेगळा विचार करावा लागतो, नुसती रबरी शिक्क्या सारखी ठाशीव नियमांची जंत्री इथे उपयोगी पडत नाही.

पुस्तकातले , वेब-साईट वरचे , यु-ट्युब व्हिडीओ मध्ये सांगीतलेले नियम जसेच्या तसे वापरले तर हमखास तोंडघशी पडायला होते आणि हे असे का होते ते कोणी सांगत नाही!

ग्रहगोल काही संकेत जरुर देतात पण त्याला ‘व्यक्ती – स्थल – काळ- परिस्थिती’ सापेक्षता असतेच, ती सापेक्षता कशी हेरायची आणि त्याचा भविष्यकथनात कसा वापर करायचा हे कोणीच सांगत नाही!

ग्रह गोलांच्या संकेताच्या पलीकडे जाऊन काही आहे, ज्यात ‘कर्म’ या संकल्पनेचा फार मोठा वाटा आहे, त्या बद्दल पण कोणी सांगत नाही!

शेवटी होते काय ?

सगळी माहीती उपलब्ध आहे पण त्याचा वापर कसा करायचा हेच माहीती नाही.
तिकडे तो जेनी अजूनही बटाटे निवडत बसलाय आणि आपले ज्योतिषशास्त्रातले ‘जेनी’ माहीतीच्या ढिगार्‍यात गुदमरले आहेत.

फेसबुक वर अभ्यासक असल्याचा मोठा आव आणून पोष्टचा रतीब घालणारे स्वयं घोषीत तज्ञ, भिंतीवर ज्योतिष शास्त्री /  नक्षत्र शिरोमणी अशा पदव्या टांगून दुकानें थाटून बसलेले तोडगे सम्राट आणि कृष्णमुर्ती पद्धती, नवमांश , अष्टकवर्ग, सर्वतोभद्रचक्र, सब-सब लॉर्ड, नाडी ज्योतिष, भृगु सरल पद्धती अशी नको इतकी माहीती अधाशी पणे गोळा करुन त्याचे शेवटी अजिर्ण होऊन बद्धकोष्ठ झालेले अभ्यासक … 

इतके सगळे करुन ही एक साधे भाकित आत्मविश्वासाने करता येत नाही असली ही बुजगावणी ! यांना बघितली की त्या जेनीची स्टोरी आठवते !

समाप्त

शुभं भवतु

(या लेखमालेतल्या सर्व भागांची एक पी.डी.एफ. फाईल देत आहे , ती  इथेच वाचा अथवा डाऊन लोड करुन  घेऊन नंतर निवांत सवडीने वाचा !)

पीडीएफ फाईल फुल्ल स्क्रिन वाचण्यासाठी / डाऊन लोड करण्या साठी उजव्या हाताच्या वरच्या कोपर्‍यातल्या या   चिन्हावर क्लिक कराAbout सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

12 प्रतिक्रिया

///////////////
 1. Sudhanva Gharpure

  Suhasji,

  Very truly written. Information and knowledge differs, as you have rightly explained.

  Warm regards,

  Sudhanva

  0
  1. सुहास गोखले

   श्री सुधन्वाजी ,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   भारतात ज्या पद्धतीचे शिक्षण दिले – घेतले जात आहे ते असेच आहे. सगळे पुस्तकी पंडीत निर्माण होत आहेत , पण अ‍ॅप्लीकेशन ऑफ नॉलेज हा भागच कोणाकडे नाही. थिअरी तोंडपाठ असते पण प्रोब्लेम सोल्व्ह कसा करायचा हे कोणीच शिकवत नाही. सगळेच स्पून फिडींग़ !

   सुहास गोखले

   0
 2. संतोष

  सुहासजी,

  अगदी बरोबर बोललात, माहितीचा महापूर आहे पण प्यायला पाणी नाही अशी परिस्थिती आहे.
  प्रत्येकजण माझ्याकडे Master Key आहे अश्या थाटात आहे आणि निव्वळ त्या जोरावर advertising चालू आहे.

  थोडक्यात खरा गुरु मिळणे फार दुरापास्त झाले आहे.

  संतोष सुसवीरकर

  +1
  1. सुहास गोखले

   श्री संतोषजी ,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद ! आजकाल सगळेच इन्स्टंट असते मग ज्योतिषशास्त्र त्याला अपवाद कसे असेल ? पूर्वीचा काळ वेगळा होता , माहीतीचा स्त्रोत मर्यादीत होता त्यामुळे स्वत: मेल्या शिवाय स्वर्ग दिसायचा नाही! पण आजच्या फेसबुक , व्हॉट्सअ‍ॅप च्या जमान्यात ‘मान खाली घालून शिकणे , मेहनत करणे (घासणे !) कोणाला नको आहे, पावडर लावून आंबे पिकवतात, केळी पिकवतात तशी ही फेसबुकी पावडर लावून ज्योतिषी पैदा केले जात आहे , ना अभ्यास , ना व्यासंग !

   सुहास गोखले

   0
 3. Rahul

  सुहासजी, गोष्टीरुपाने एखादा महत्त्वाचा संदर्भ देण्याची आपली हातोटी कमाल आहे. तुमच्या लेखन कौशल्याला मनापासून सलाम!
  खरं तर माझा ज्योतिषशास्त्राचा काहीच अभ्यास नाही पण तुमचे लेख वाचायला मला नेहमीच खुप आवडतात ( व त्यातले बरेच लेख काहीच समजत नसले तरीही हे शास्त्र तुमच्याकडुन (मला झेपेल तितके) शिकण्याचा (online or offline) योग यावा असा मानस व्यक्त करतो.)

  0
  1. सुहास गोखले

   श्री राहुलजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   माझा ऑन लाईन क्लास लौकरच सुरु होत आहे , त्या बद्दलची सर्व माहीती ब्लॉग / वेबसाईट मार्फत आपल्याला पोहोचवली जाईल .

   आपल स्वागत आहे.

   सुहास गोखले

   0
 4. Omkar Jamsandekar

  जबरदस्त… तुमच्या लेखमालिका वाचताना एखादी दर्जेदार इंग्रजी Series पाहण्याचा आनंद मिळतो. असणारी साखळी अन डोळे खाडकन उघडायला लावणारी conclusion, वापरलेला font, सुरेख चित्रे, शेवटी संग्रहासाठी सुंदर अश्या PDF ची सुबक जोड. सगळंच कसं उत्तम जमून आलेले.

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री ओमकारजी,

   मी अभिजात इंग्रजी (आणि मराठी ही) साहीत्य वाचत असतो त्याचा काहीसा प्रभाव माझ्या लेखनावर पडणे स्वाभावीक आहे. वेब-साईचे आर्ट डिपार्‍ट्मेंत (फाँटस, चित्रे , युटीलिटी फिचर्स इ.) माझा मुलगा चि. यश सांभाळतो (मी फक्त मला काय हवे आहे याचे ब्रिफिंग देतो, पुढचे सगळे तो म्यॅनेज करतो)

   सुहास गोखले

   0
 5. sandip

  ज्योतीषा वरच्या अभ्यासपूर्ण पण थोड्याशा पाल्हाळीक (प्रवचना कडे झुकणाऱ्या) मालिका वाचल्यावर जेनी…. मनात विचार अाला ह.भ.प. गोखलेबुवा मध्ये परिवर्तन का झाले.

  तरी ही धन्यवाद लिहीत रहा प्रत्येक चांगल्या गोष्टीचा नक्कीच उपयोग होतो.

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री संदीपजी,

   आपल्याला पाल्हाळीक पणा कोठे आढळला ते समजले नाही. त्याचा थोडा उल्लेख केला असता तर पुढच्या लेखनात त्याबद्दल आवश्यक ती सुधारणां करता आली असती.

   असो.

   पण मी जे काही लिहले आहे खास करुन माझ्या केस स्ट्डीज आणि ‘काप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी ‘ सारख्या मालिका मराठीच नव्हे तर हिंदी / इंग्रजीत देखील कोणी लिहलेल्या नसतील (निदान माझ्या माहीतीत तरी नाही). हां आता हे खरे आहे की असे लिखाण समजायची क्षमता बाळगुन असलेले वाचक फारसे नाहीत . हे माहीती असताना देखील मी जिद्दीने लिहत आहे , निदान आज नसेल पण उद्या कोणीतरी नक्की दखल घेईल या वेड्या आशेने.

   सुहास गोखले

   +1

Leave a Reply to Omkar Jamsandekar Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.