सौ. क्ष

सप्रेम नमस्कार,

आपण विचारलेल्या प्रश्नां बाबतीत काही  खुलासा करावा असे मनापासून वाटले म्हणून लिहीत आहे.

ज्योतिषशास्त्र हे काहीसे दिशादर्शक शास्त्र आहे त्यामुळेच बर्‍याच वेळा हे मार्गदर्शन ज्याला आपण ईंग्रजीत ‘आऊटलाईन’ म्हणतो तशा स्थूल स्वरुपाचे असते.

फक्त ज्याला आपण ईंग्रजीत ‘क्लोज एंडेड’ म्हणतो अशा काही ठराविकच प्रश्नांची सुक्ष्म स्वरुपात उत्तरें देता येतात उदा: ‘माझे लग्न कधी होईल’, ‘संतती योग केव्हा’, ‘नोकरी लागेल का’. ‘मी परदेशी कधी जाईन’  इ. कारण या प्रश्नांची उत्तरे  बहुदा ‘हो / नाही’ स्वरुपातली व टाईम बाऊंड असतात किंवा त्यांचे उत्तर (आऊटकम) काही मोजक्या (सिमीत) पर्यायांपैकीच एखादे  असू शकते. त्यामुळे उत्तरे जास्त खात्रीने देता येतात (अर्थातच 100% बरोबर उत्तराची हमी देणे केव्हाही शक्य होणार नाही) .

काही प्रश्न ज्याला आपण ईंग्रजीत ‘सबजेक्टीव्ह’ म्हणतो तशा स्वरुपाचे असतात अशा प्रश्नाचे एखादेच असे  निश्चित ‘आऊटकम’ नसते किंवा ते कोणते असेल हे ठरवणे नेहमीच शक्य होते असे नाही. ‘मी सुखी /आनंदी कधी होईन?”  हा प्रश्न या प्रकारात मोडतो. सुख / आनंद / वैभव / चांगले / वाईट / त्रास / आराम / नफा / नुकसान या गोष्टी व्यक्ती , स्थळ , काळ , परिस्थिति सापेक्ष असतात. बर्‍याचवेळा अशा गोष्टीं व्यक्तीच्या मानसिक जडणघडण, शिक्षण, संस्कार, भोवतालचे वातावरण अशा अनेक बाबींवर आधारित असतात. त्यामुळे अशा काही पश्नांच्या बाबतीत फक्त स्थूल अंगानेच मार्गदर्शन करता येईल.

आपण विचारलेले प्रश्न  असे आहेत:

 “As per my horoscope whether there is any hope in coming future for me to get rid of all these stress ( mostly work related ). I would really like to enjoy my work and have sense of achievement.”

आपला हा पहिला प्रश्न साधारणपणे ‘सबजेक्टीव्ह’ या प्रकारात मोडतो, ‘

कोणत्या कारणांनी तणाव उत्पन्न होतो आहे किंवा काय झाले म्हणजे हा तणाव नाहीसा होईल या बद्दल अधिक खुलासा केल्यास आपल्या प्रश्नाचा रोख समजून त्याचे उत्तर चांगल्या प्रकारे देता येणे कदाचित शक्य होईल.

जन्मपत्रिकेतले ग्रहयोग, आगामी काळातल्या महादशा – अंतर्दशा , गोचर भ्रमणें,  प्रोग्रेशन्स , युरेनियन प्लॅनटरी पिक्चर्स’ यांचा विचार करुन काही अंदाज जरुर बांधता येईल.

“ I want to change my field of work, I would like to work in the area of ‘xxxxxx’ is there any possibility?

आपला दुसरा प्रश्न नोकरीतल्या बदला बाबत आणि त्यातही एका नेमक्या क्षेत्रा बद्दल संबधित आहे. नोकरीत बदल संभाव्य आहे का याचे उत्तर कदाचित देता येईल पण नवी नोकरी ‘xxxxxx’ या क्षेत्रातलीच असेल का हे नेमके पणाने सांगणे अशकय आहे.

ज्योतिषशास्त्रतले नोकरी-व्यवसायाचे बाबतीतले नियम / आडाखे /ठोकताळें अत्यंत स्थूल आहेत. सुमारे 2000 वर्षांपूर्वी जेव्हा हे शास्त्र लिहले गेले तेव्हा नोकरी व्यवसायाची क्षेत्रे अत्यंत मर्यादित होती त्यामुळे 9 ग्रहांच्या माध्यमातून नोकरी-व्यवसायाबद्दल मार्गदर्शन करणे तुलनात्मक दृष्ट्या खूप सोपे होते. तेव्हा संगणक नव्हता ,ईंटरनेट नव्हते ना ‘xxxxxx’. त्यामुळे आजच्या काळातली बायोटेक, जेनेटीक ईंजीनियरिंग, फॅशन / ज्वेलरी डिझायनिंग, मल्टीमिडीया- अ‍ॅनिमेशन, फोरेंसिक सायन्स, ईव्हेंट मॅनेजमेंट यासारखी अनेक क्षेत्रे वा त्यातलीही अनेक सुक्ष्म स्पेशलायझेशन्स याबाबतीत आजच्या काळात जे काही उत्तर द्यायचे म्हणजे ‘गवताच्या गंजीतून सुई’ हुडकून काढण्या सारखे आहे.

मात्र तरीही ज्योतिषशास्त्राच्या आधारे 9 ग्रहांच्या माध्यमातूनच, जन्मपत्रिकेतले ग्रहयोग, आगामी काळातल्या महादशा – अंतर्दशा , गोचर भ्रमणें,  प्रोग्रेशन्स यांचा विचार करुन नोकरी व्यवसायाची कोणती क्षेत्रे आपल्याला अनुकूल असतील या बाबत काही मार्गदर्शन करता येईल.  काही अंदाज बांधता येतो.

पण अशा मार्गदर्शनाला ही काही मर्यादा पडतात, उदाहरणार्थ जन्मपत्रिकेवरुन जातकाचा व्यवसाय ‘कायदा’ या क्षेत्राशी संबधीत असेल इतके कदाचित सांगता येईल पण तो संबंध ‘वकील’, ‘न्यायाधिश’,  ‘कोर्टातला क्लार्क / पट्टेवाला’ , ‘लॉ कॉलेजातला प्राध्यापक’,  ‘कायदे विषयक  पुस्तकांची विक्री करणारा’, ‘कायदा मंत्री’ ,’स्टॅंप व्हेंडर’, अशा अनेक  मार्गाने येऊ शकतो. वैद्यकिय क्षेत्राशी संबंध हा असाच  ‘डॉक्टर’, ‘कपौंडर’, ‘वैदू’, ‘औषध विक्रेता’, ‘औषधांची निर्मीती’, ‘सरकारी  आरोग्य विभागाला कर्मचारी’ , ‘मसाज – फिजिओ थेरपिष्ट’, ‘हॉस्पीटल मॅन्येजमेंट’ ‘अ‍ॅम्बुलन्स चालवणारा’ , ‘नर्स / वॉर्ड बॉय’  अशा अनेक  मार्गाने येऊ शकतो. काही वेळा  शिक्षण व प्रत्यक्षातला व्यवसाय  यांच्यात  काहीच  साम्य नसते. माझ्या परिचयातली एक व्यक्ती M.B.B.S. डॉक्टर असूनही एकही दिवस डॉक्टर म्हणून प्रॅक्टीस न करता, आयुष्यभर वैद्यकिय महाविद्यालयात प्राध्यापक (शिक्षण क्षेत्र) म्हणून काम करत आहे.

आपण जर काही विषिष्ठ प्रकारच्या मार्गदर्शनाची (एखादे  नेमेकेच क्षेत्र सांगावे व  त्यातही त्यातले स्पेशलायझेशन्स कोणते हे ही सांगावे) अपेक्षा ठेऊन प्रश्न विचारला असल्यास , मी केलेले मार्गदर्शन आपल्या अ‍पेक्षांना पुरेसा न्याय देऊ शकेलच असे नाही. एका मुंबई स्थित विवाहोत्सुक कन्येने तिचा भावी पती ‘सेंट्र्ल रेल्वे लाईन’ वरचा असेल का ‘वेस्टर्न  रेल्वे लाईन’ वरचा असा प्रश्न विचारला होता तर एकाने त्याच्या मुलाला ‘इन्फोसिस’  मध्येच नोकरी मिळेल का असा प्रश्न विचारला होता, असे अतिसूक्ष्म भविष्य ऐकायला मिळावे अशी त्यांची अपेक्षा होती  आणि तसे ते न सांगता आल्यामुळे (ते कसे शक्य आहे ?) “पैसे घेतले आणि काहीतरी थातुर मातुर उत्तर दिले”  असा गैरसमज करुन घेतला होता त्या प्रसंगाची इथे आठवण झाली.

आपला प्रश्न  ‘येत्या सहा महिन्यांच्या कालावधीत नोकरीत बदल करण्याची ईच्छा पूर्ण होईल का व तो सुखावह ठरेल का ?’ असा बदल्यास त्याचे उत्तर देता येणे शक्य होईल. ते सुद्धा आपण जर सध्या नोकरी बदलासाठी जोरदार प्रयत्न सध्या चालू असतील तरच. नोकरीतल्या बदला साठी कोणतेही प्रयत्न नजिकच्या काळात केले गेले नसतील आणि उगाचच खडा टाकून बघावा,   असा विचार करुन प्रश्न विचारला असेल तर मात्र उत्तर बरोबर मिळणार नाही, लॉटरी लागण्याची शक्यता आजमावताना प्रथम लॉटरीचे एखादे तरी तिकीट विकत घ्यायला हवे ना?

मार्गदर्शनपर रिपोर्ट केव्हा मिळेल याबाबत आपण विचारणा केली आहे. ज्योतिषविषयक काम काहिसे ‘कला-कौशल्य’ या क्षेत्रासारखे  असते (एकाग्रता, मूड, इंट्यूइशन, शकून, प्रतिभा, दैवी मदत) , म्हणजेच हे काम ‘कार वॉश’, ‘लॉन्ड्री’ ‘गवंडी काम’ अथवा ‘पापड लाटण्या’ ईतके यांत्रिकी पद्धतीचे नसल्याने एखाद्या पत्रिकेच्या अभ्यासाला किती वेळ लागेल हे आधीच ठरवणे खरोखर अवघड असते. पण मी स्वत:च अशी काही मुदत आखून घेतोच त्यामुळे कामाची म्हणून एक शिस्त निर्माण होते, एक वायदा केला असल्याने त्याच दबाव / अंकुश मनावर कायम राहतो व ‘बघू रे सावकाश, काय गडबड आहे’ अशी टंगळ्मंगळ होत नाही, तरीही काही वेळा जास्त वेळही लागू शकतो, पण ‘दिवसांचे’ आठवडे किंवा ‘आठवड्यां’ चे ‘महिने’ असा प्रकार सहसा होत नाही.

ज्योतिषशास्त्राच्या हया सर्व मर्यादा डोळ्यासमोर ठेऊन मी आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न जरुर करेन.

पुन्हा एकदा आपण माझ्या ‘ज्योतिष विषयक मार्गदर्शन सेवे’ मध्ये जी उत्सुकता दाखवलीत याबद्दल मी आपले आभार मानतो आणि आपली थोडी फार सेवा करण्याची संधी मला मिळेल अशी आशा बाळगतो.

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.