काल एका जातकाने फोन करुन हा फिडबॅक दिला.  माझे भविष्य बरोबर आले याच्या आनंदापेक्षा जातकाची एक फार मोठी समस्या दूर झाली याचाच मला जास्त आनंद झाला.

जातकाने हा प्रश्न फेब्रुवारी 2014 मध्ये विचारला होता, समस्या बरीच जटील होती (समस्या जरा जास्तच खासगी असल्याने ती काय होती इ. तपशील देणे शक्य होणार नाही)  , सर्व मार्गाने प्रयत्न चालू होते, मी ही केस सोडवायला घेतली ती केवळ जातक स्वत: प्रश्न सोडवण्यासाठी लढाईत उतरुन सर्वकष प्रयत्न करत आहे म्हणून !”

नाहीतर एरव्ही होते काय “नोकरीत बदल होणार आहे का?” असा प्रश्न विचारताना जातकाने गेल्या सहा महिन्यात एकही नोकरीचा अर्ज केलेला नसतो की कुठे इंटरव्हू दिलेले नसतो. बर्‍याच वेळा ,  कशात काही नसताना ‘नोकरीत बदल आहे का असे विचारुन तर बघू , जर बदल आहे असे दिसले तरच मग अर्ज इ करायचे बघता येईल ”   असे कज्युअल , ‘गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ल्ली ‘ या सारखे  असते.

या जातकाच्या बाबतीत असे काही नव्हते. या जातकाचा प्रश्न सोडवताना एक लक्षात आले की ‘टाइम फ्रेम ‘ मोठी आहे त्यामुळे नेहमीच्या (रुटीन) कालनिर्णय पद्धती काहीशा कुचकामी ठरल्या असत्या. म्हणून सरळ ‘ युरेनियन प्लॅनेटरी’ पिक्चर्स’ चा मार्ग अवलंबला , फार किचकट आणि वेळ काढू प्रक्रिया आहे ही पण रिझल्ट नेहमीच ‘अस्टोनिशींग’ मिळाले आहेत !!

‘ युरेनियन प्लॅनेटरी’ पिक्चर्स’ च्या अभ्यासातून माझ्या असे लक्षात आले की आक्टोबर 2014 पर्यंत काहीच होणार नाही , पण नंतर झपाट्याने प्रकरणाची सोडवणूक होऊ लागेल व चार पाच महिन्याच्या आत बाहेर, सर्व काही जातकाच्या मनाप्रमाणे होईल. प्रकरण न्याय्यप्रविष्ट असल्याने उत्तर देताना  ‘भाषा’ खूप जपून वापरावी लागली (नाहीतर न्यायालयाचा अवमान झाला असता! ). नविन (आणि जुन्या देखिल) ज्योतिर्विद बंधू – भगिनिंनी ही बाब लक्षात ठेवावी. शक्यतो न्याय्यप्रविष्ट बाबींवर (त्यातही निकाल काय लागेल या बाबतीत) भाष्य करायचे टाळा , पण ते तसे करायचे असेलच तर काहीशी ‘मोघम’ भाषा वापरा. फोन कॉल रेकॉर्ड होऊ शकतात किंवा वेळ पडली तर काय संभाषण झाले होते ते फोन कंपन्या कडून मिळवता येते (पोलिसांना)  हे लक्षात असू द्या.

जातकाने आक्टोबर 2014 अखेर प्रश्न सोडवायचे आटोकाट प्रयत्न केले पण यश मिळाले नाही, नोव्हेंवर उजाडला आणि अक्षरश: ‘पंधरा मिनिटात’  हो पुन्हा एकदा लिहतो ‘पंधरा मिनिटांत’ प्रश्न सूटला ,तोही अनपेक्षित , आश्चर्यकारक रित्या !

आपण म्हणतो ना ” प्रत्येक गोष्टीची वेळ यायला लागते ” त्याचा असा पडताळा मिळतो. आता बाकी सर्व सोपस्कार उरकायला मार्च 2015 उजाडणार आहे असे जातक म्हणाले.

आत्मप्रौढी नाही, पण मी माझ्या ‘रिपोर्ट’ मध्ये अगदी शब्दश: हेच लिहले होते !!

हा सुर्य हा जयद्रथ !!

जातकाला शुभेच्छा!

शुभं भवतु

सुहास


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.