नशीबात योग असला की गोष्टी घडणारच मग आत्ता तुम्हाला त्या कितीही अशक्य कोटीतल्या वाटल्या तरीही.
किशोरला अगदि असाच अनुभव आला , ही त्याची अगदि आजच मिळालेली ईमेल आहे, जातकाला ज्योतिषशास्त्राचा असा छान अनुभव आला की मला मोठे समाधान वाटते, माझे भविष्य बरोबर आल्याचा आनंद तर होतोच पण त्याहुनही मी वापरत असलेली ‘कृष्णमूर्ती पद्धती’ किती अचूक आहे त्याचा आणखी एक पडताळा आल्याने हया शास्त्रा वरचा विश्वास अधिकच दृढ होतो.
हा पहा किशोरचा अनुभव , अगदी त्याच्याच शब्दात वाचा.
(किशोरची ईमेल आयडि गोपनिय ठेवण्या साठी खोडली आहे)
आदरणीय सुहासजी,
मी ऑगष्ट 2013 मध्ये आपल्याला ‘माझे स्वत:चे घर होईल का?’ असा प्रश्न विचारला होता,खरे तर प्रश्न विचारते वेळीच मला माहीती होते की मी जमवू शकत असलेले पैसे बघता, झोपडपट्टीत सुद्धा जागा घेणे शक्य दिसत नव्हते, तरी देखिल माझ्या बायकोने फारच आग्रह धरल्याने आपल्याला प्रश्न विचारायचे धाडस केले.
आपण त्यावेळी मार्च 2014 च्या अखेरिस जागेची खरेदि होईल असे अगदि खात्रीने सांगीतले होते. मला आठवतेय ,त्यावेळी मी तुमच्याशी वाद घातला होता , ‘उगाच काही तरि बंडला मारु नका..” असे रागाच्या भरात बोलून गेलो होतो. त्या दिवशी मी माझ्या बायकोला ही मला निष्कारण भरीस पाडून, त्या फालतू ज्योतिषा कडे जायला लावून,पैसे पाण्यात घालवायला लावल्या बद्दल रागावलो सुद्धा.
सुहासजी, आज मी तुमची माफी मागतो, मी त्या वेळी बोललेले माझे शब्द मागे घेतो, कारण आज दिनांक 2 एप्रिल 2014 रोजी ही मेल मी माझ्या स्वत:च्या घरा मध्ये बसून लिहीत आहे. 31 मार्च 2014 गुढीपाडव्याला मला माझ्या छोट्याश्या का होईना पण स्वत:च्या अपार्टमेंट चा ताबा मिळाला , एक दोन दिवस सामान हलवण्यात गेले, म्हणून आपल्याला कळवायला थोडा उशीर झाला त्याबद्दल माफी असावी. केवळ चमत्कार म्हणावा लागेल अशा अतर्क्य घटनांची एक मालीकाच साधारण जानेवारि 2014 पासून सुरु झाली आणी ध्यानीमनीस्वप्नी सुद्धा नसताना माझे स्वत:चे घर झाले. माझा आजही यावर विश्वास बसत नाही.
मी खरे तर आपल्याला फोन करुन हे सर्व सांगणार होतो, पण मी जे काही वेडे वाकडे आपल्याला बोललो होतो त्याची मला ईतकी लाज वाटते की फोन करायचे धाडसच होत नाही,आपण मला माफ कराल.
पुढच्या महिन्यात कामा निमित्त नाशीकला येणार आहे त्यावेळी आपली समक्ष भेट घेऊन पेढे देणार आहे.
आपला
किशोर
किशोर, तुझे अभिनंदन! तुझे हे नवे घर तुझ्यासाठी सुखा समाधानाचे, उत्कर्षाचे, वैभवाचे ठरो अशा शुभकामना!
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
जातकांचा अभिप्राय दिल्याबद्दल आभारी आहे. असेच अजून अभिप्राय वाचायला आवडतील.
धन्यवाद ,संदेशजी, जसा वेळ मिळेल तसे असेच काही निवड्क अभिप्राय इथे आपल्याला वाचावयास उपलब्ध करुन देईन,
सुहास