दोन वर्षापूर्वी मी एक मोठ्या प्रतिष्ठित ज्योतिष (चर्चा) फोरम मध्ये सक्रिय होतो.

तेव्हा मी ज्योतिष विषयक मोफत सल्ला देत असे. असे करताना माझे दोन हेतु होते, आपल्या ज्ञानाची चाचणी घेणे, आपला अभ्यास योग्य दिशेने चालू आहे का याची खातरजमा करुन घेणे आणि त्याच बरोबर कोणा संकटातल्या, अडचणीतल्यांना थोडीफार मदत करुन दिलासा देणे.

त्यावेळी मी बरीच मोफत भाकितें केली होती पण त्याचे काय झाले हे मात्र कळू शकले नाही कारण ज्यांच्यासाठी ही भाकितें होती ते महाभाग मोफत भविष्य पदरात पडले रे पडले की अदृश्य होत होते . अगदि हाताच्या बोटावर मोजण्या इतपत व्यक्तिंनी मात्र आवर्जुन प्रतिसाद दिला. काही वेळा मी स्वत:च या व्यक्तींशी संपर्क साधून ‘मी केलेल्या भाकितांचे काय झाले ?” असे विचारले, त्यालासुद्धा काहींनी मोजक्या व्यक्तींनीच प्रतिसाद दिला.

एकंदर पाहता ज्यांचा फिडबॅक मिळाला त्यातल्या 70% जणांच्या बाबतीतली भाकितें 100% बरोबर आली आहेत, सुमारे 20% जणांच्या बाबतीत अंशत: बरोबर ठरली आहेत, फक्त 10% जणांच्या बाबतीत मात्र माझी भाकितें साफ चुकली आहेत.

असो. असाच एका फिड्बॅक जो मी त्या व्यक्तीशी स्वत: संपर्क साधून मिळवला आहे:

जातकाचा प्रश्न असा होता:

    “Kindly advice me…Pls…Pls
by ……..j » Thu Apr 19, 2012 3:41 pm
HI all,

Kindly please please advice me on below:

I am looking for change . my current project has gone to other company. Hence not able to understand should I still stay in this company or should i change other company. if I change to other company how will be my future….Please guide me..

मी जातकाची पत्रिका जेव्हा अभ्यासली होती तेव्हा :

नोकरीत / कामाच्या स्वरुपात बदल
एकंदर करियर व आर्थिक स्थैर्य
कौटुंबिक जीवनात सुख समाधान

असे चांगले आश्वासक भविष्यकाळ स्पष्ट दिसला होता. मोफत आणि ते सुद्धा सार्वजनिक ठिकाणी भविष्य कथन करताना काही पथ्ये पाळावी लागतात, काही स्वाभाविक मर्यादां असतात त्या विचारात घेता मी ह्या जातकाला असे उत्तर दिले होते:

माझे भाकित असे होते:

Re: Kindly advice me…Pls…Pls
by ……… » Wed May 09, 2012 6:56 am
Assuming that your birth time is reasonably accurate.

I could see some changes in the job/profession in between the period from 19 Sep 2012 to 07 Nov 2012 , new changes happening in Oct/Nov 2012 will prove beneficial for stability and money .

God bless you.

अर्थातच जातकाचा फिड्बॅक आला नाही. सुमारे दोन वर्षानंतर मीच या जातकाशी संपर्क साधला:

“Long back I answered one of your query posted on this forum. Since there was no feedback posted from you neither there is any PM / email communication from you . I am a bit curious to know what happened to my prediction? Your feedback is going to help me in a long way to improve my skills and in turn in proving better service in future.
I know it an old case (about two years back) , but not too old to tax your memory, so please provide me your valuable feedback.

Here is a quick recall to those posts:

Your original query:

……

……

And this was my prediction:

…….

……

जातकाने याला मात्र प्रतिसाद दिला तो असा:

 

  feedback 11Dear …….. ,

pls accept my Apologies for not sending you the feedback.

Yes , As you predicted there was a change in sept 2012. I am in same company but I was allocated to different project in sept. I am still in the same project from then.

in June 2013 , I have transferred( relocated) to my Home town ( Hyderabad) from this same project.

I went to abroad for two months during Jan, Feb in 2012 ( this was from the project which went to other company)

actually my birth time is 1:05 pm , But one astrologer has changed the birth time as 12 :20 pm. for changing the lagna ( confused whether this is correct r not)

if it is 1:05 pm will the above holds true?

I am very happy to see your email after two years and still inquiring the feedback.

I am also very interested in astrology.
I recently joined in MA astrology distance in Hyderabad as I have desire to learn it 🙂
Thanks a lot
…..

पहा:

जातकाच्या कामाच्या स्वरुपातला बदल मी सांगीतलेल्या तारखेला झाला  आहे.

जातकाची बदली त्याच्या होम टाऊन ला झाली आहे: कौटुंबिक स्वास्थ्य

जातका त्याच कंपनीत त्याच प्रोजेक्ट्वर काम करत आहे :स्थैर्य

जातकाला अल्पकालावधी साठी का होईना परदेशगमनाची संधी मिळाली.

स्वत्:हून नसला तरी विचारणा करताच ताबडतोब फिड्बॅक दिला आहे म्हणजे जातक खुषीत आहे (जातकाने ज्योतिष शिकण्याची सुरवातही केली आहे , ज्योतिषशास्त्राचा असा सुंदर पडताळा आला तर कोणालाही अशीच ईच्छा होणे  साहजीकच आहे .)

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.