ज्योतिष हे शास्त्र आहे त्याच बरोबर एक कला पण आहे. ४८ अक्षरांची आपली मराठी भाषा , आपण सगळ्यांनी बालवाडीत असताना ही ४८ अक्षरें गिरवली आहेत. पण त्याच ४८ अक्षरांच्या माध्यमातून कुसुमाग्रज, पु.लं, खांडेकर, दळवी , जी.ए. यांनी जे साहीत्य निर्माण केले तसे आपल्या पैकी किती जणांना जमले आहे ? कला म्हणतात ती हीच.
ज्योतिषात असेच आहे, ग्रहाच्या स्थानगत , राशीगत , नक्षत्रगत इ. फलितांचे आख्खे भांडार मुखोदगत असलेले ‘ज्योतिष पोपट ‘बरेच आढळतील. पण या सार्यांचा अचुक अन्वयार्थ लावून फलित वर्तवणे ही एक कलाच आहे.
मी प्रत्येक पत्रिका कसोशीने तपासतो त्यासाठी लागेल तेव्हढा वेळ देतो, उगाच थातुर मातुर , चटावरचे श्राद्द्ध उरकत नाही. एव्हढे सगळे करुनही सगळीच भाकिते बरोबर येतात असे नाही, पण त्यामुळे नाऊमेद न होता अभ्यास चालू ठेवायचा. म्हणूनच मी फार मोठे दावे करत नाही, शास्त्राची आणि माझी स्वत:ची मर्यादा मी ओळखून आहे.
“तुम्ही सांगीतल्या प्रमाणे घडले / नाही घडले ‘ असे कळवणार्या अनेक ईमेल्स , फोन कॉल येत असतात , सगळेच प्रतिसाद इथे या ब्लॉग च्या माध्यमातून देता येणार नाहीत ,आज असाच एक उत्साह वाढवणारा प्रतिसाद आपल्या समोर ठेवतो.
जातकाचा प्रश्न आणि त्याला मी दिलेले उत्तर
आणि आज जातकाने पाठवलेला प्रतिसाद.
जे आहे ते आपल्या समोरच आहे आणि ते पुरेसे बोलके आहे.
जातकाला त्याच्या आगामी वाटचाली करता अनेक शुभेच्छा !
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
बर्याच दिवसांनी लेख वाचला जोतिष बद्दलचा. बाबाजींचे पुढे काय झाले वाचायला उत्सुक आहोत . आणि डायमेशंस बद्दल . इतर जोतीशांच्या कडू आठवणी पण …बाकी आपला पी.सी . विकला गेला याबद्दल आणि पुन्हा नवीन install झाला पण याबद्दल अभिनंदन .
श्री स्वप्नीलजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद .
पी.सी. तर अगदी ताजा होता, तयार करुन फक्त एकच दिवस झाला होता, माझ्या एका क्लायंटला अशाच कॉन्फीग्युरेशनचा पी.सी. हवा होता, त्याला दुसरी कडून बरीच महागडी कोटेशन मिळाली होती, मी बांधलेला पी.सी. स्वत: पार्ट्स आणून असेंबल केलेला असलयाने बराच स्वस्त पड्ला होता, क्लायंटला आवडला , त्याने जागीच पेमेंट करुन पी.सी. गाडीच्या डिकीत टाकून उचलून नेला. काय करणार !
मी आणलेला मॉनीटर मोट्या आकाराचा होता व किबोर्ड लहान , दोन्ही माझ्या क्लायंटला गैरसोयीचे होते, पण अॅामेझॉन ने विना तक्रार दोन्ही वस्तू परत घेतल्या, त्या बदली मी दुसरा मॉनीटर आणि किबोर्ड घेतला , हाय काय आन नाय काय !
आता दुसरा पी.सी. बांधतोय ,त्याच्या व्हीड्यो तयार करणार आहे , तो ब्लॉगवर पाहता येईल.
असो.
माझ्या पुढच्या लेखांसाठी आपल्या सगळ्यांना बरीच वाट पाहावी लागत आहे पण माझे जे काही असंख्य व्याप आहेत त्यातून वेळ मिळणे खरेच मुश्कील आहे.
बाकी इतर लेख बरेचसे लिहून तयार आहेत , थोडे संपादकीय संस्करण करुन लौकरच प्रकाशित करत आहे.
सुहास गोखले
ok ! Thank you …!!!