या  जातकाला गेल्या एप्रिल महिन्यात त्याच्या एका Export Order बद्दल मार्गदर्शन केले  होते. या एक्स्पोर्ट ऑर्डर साठी जातकाने अथक परिश्रम घेतले होते, सॅम्पल्स, सरकारी परवानग्या, बेंगलोर च्या मानक संस्थे कडून सर्टीफिकेशन , ग्राहकाला भेटण्यासाठी चार-पाच वेळा परदेश दौरे असा बराच खर्च ही झाला होता पण नंतर गाडे कुठे रुतले हेच कळले नाही. त्या  (संभाव्य) ग्राहकाने नंतर टाळाटाळ सुरु केली. “We are evaluating..” ह्या पलीकडे  काही नवे उत्तर मिळत नव्हते. इकडे  जातकाची मोठी कुचंबणा खाली होती,  ‘धरले तर चावतय आणि सोडले तर पळतय’ अशी काहीशी  अवस्था झाली होती. तेव्हा या बाबतीत काय करावे असा प्रश्न त्याने मला विचारला होता.

(जातक अमराठी  असल्याने सर्व  पत्रव्यवहार इंग्रजी मध्ये झाला आहे. गोपनियतेच्या संकेतामुळे जातकाची ओळख पटू  शकेल असा भाग खोडला आहे)

जातकाचा प्रश्न आणि त्याला मी केलेले  मार्गदर्शन असे  होते:

Queries

Business contract (overseas order) –almost dead end !

My Findings

Don’t give up. The chart suggests that you need to wait a little longer .
According to chart factors and calculations, some very positive / promising developments are quite likely by first / second week of Oct – 2015 .

जातका कडून आजच मिळालेली ही ईमेल …

(गोपनियतेच्या संकेतामुळे जातकाची ओळख पटू  शकेल असा भाग खोडला आहे) ….

हा सुर्य हा जयद्रथ !

Dear Suhas,

First of all let me congratulate you for your wonderful and highly accurate prediction!

If you recall, way back in the month of April, 2015, I approached you for some guidance. I , that time, was facing lots of problems, delays with one of my business deals (export order). It was almost a dead end situation for me and I was about to give up all the efforts and write –off all expenditure made in that connection. But you then candidly said that the deal will come through by October / November 2015 and advised me to pursue it without giving up.

To be frank, the situation was so hopeless then that I didn’t bother your advice and finally gave up all the efforts.

As a stroke of luck or whatever, out of the blue moon , the same overseas client, contacted me, in the last week of Sep, things then moved at a lightning speed and client placed his first order just today the 26th Oct 2015. This is exactly what you told me some 6 months back!

Thanks a lot once again for your guidance. I will meet you in person during my next visit to Nasik,

Yours sincerely,

XXXXXXXX

जातकाला मन:पूर्वक शुभेच्छा !

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

3 प्रतिक्रिया

///////////////
 1. Himanshu

  साष्टांग नमस्कार….केवळ लग्न, संतती यासारख्या comman प्रश्नांपेक्षा वेगळे प्रश्न तुम्हीं ज्या लीलयतेने हाताळता त्याला तोड़ नाहीं

  0
  1. सुहास गोखले

   श्री. हिमांशुजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   एखाद्या घटनेचा कालनिर्णय करणे (Event Prediction) हा तसा पाहीला तर ज्योतिषशास्त्राचा फक्त एक लहान हिस्सा आहे, किंबहुना केवळ ‘कालनिर्णय’ म्हणजेच ज्योतिष असे समजणे , केवळ कालनिर्णया साठीच ज्योतिष वापरणे (उदा: के.पी ) चुकीचे आहे , कालनिर्णय हे काहीसे ‘फायर फायटिंग’ सारखे आहे किंवा अ‍ॅन्टीबायोटिक्स ची प्रखर मात्रा. त्यापेक्षा आग लागू नये , आजार होऊ नयेत याकडे लक्ष देणे जास्त चांगले नाही का? ज्योतिषाचा खरा आणि प्रभावी वापर वेगळाच आहे , ज्याला इंग्रजीत SWOT Analysis म्हणतात त्या प्रकारे ज्योतिष वापरता येते , ते खरे मार्गदर्शन ठरेल. पण त्याची कोणाला गरज वाटत नाही हे दुर्दैव , विवाह सुखी संपन्न होईल का (किंवा विवाह सुखी , संपन्न कसा करता येईल ) ह्या पेक्षा विवाह कधी यातच लोकांना उत्सुकता जास्त असते. Protracted Vision असा काही प्रकार असतो पण लक्षात कोणा घेतो. ज्योतिषाचा त्याहुनही विनाशकारी वापर म्हणजे ‘उपाय आणि तोडगे’! कालनिर्णय (Event Prediction) मी जरा तरी समजू शकतो पण ‘डोक्यावर कर्ज साठलेय ते दूर करण्यासाठी उपाय / तोडगे सुचवा ‘ ही मागणी होणे आणि ज्योतिषांनी ती पुरवणे या सारखे मोठे अध:पतन दुसरे कोणते नाही.

   असो.

   मी माझ्या ब्लॉग वर सतत काही तरी नविन (जे ईतर ज्योतिष ब्लॉग्ज , पुस्तके यांत सहसा वाचावयास मिळत नाही) द्यायचा प्रयत्न करत असतो. तसा माझ्या ब्लॉग ला अपेक्षे पेक्षा फारच कमी प्रतिसाद (Response) आहे , शेवटी हे सगळे लिहतो कशाला हा प्रश्न माझा मलाच रोज पडत असतो पण जेव्हा आपल्या सारख्या जाणकार वाचकांचे प्रतिसाद येतात तेव्हा मी लिहलेले कोणी तरी वाचते आहे याचे मोठे समाधान वाटते आणि निदान त्या काही मूठभर वाचकांसाठी का होईना मी लेखन चालू ठेवत आहे.

   आपला

   सुहास गोखले

   0
   1. Himanshu

    Unfortunately this is how astrology will continue to be looked at. Only a tool to predict events for material gains. It has become westernized where everything has a market and a price. A lot of bad name is given to astrology in our movies despite a lot of these people must be going to celebrity astrologers. But we live in kali yug.
    I understand that you have a very few dedicated followers. I can think of a couple of reasons. Language and medium. If you do a few videos on YouTube in english see how many followers you’ll have. You’ll surprise to see how many KP wale have set up their shops there.
    May be you have some unfulfilled agenda from previous life (your D60 chart; he he he).

    0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.