जातका कडून नुकताच प्राप्त झालेला हा एक उत्साहवर्धक प्रतिसाद !

28 नोव्हेंबर 2018 मध्ये जातकाने ‘नोकरी’ विषयक प्रश्ना बाबत मार्गदर्शन घेतले होते. जातकाने तेव्हा प्रश्न विचारला होता:

नमस्कार सुहासजी, hope u r doing well ! U might remember i have taken your consultation 2-3 times before..I have a horary question related to job i am hoping to get.. ..Let me know if I can share more details on whatsapp or mail and what will be your fees ! Regards, XXXXXXX 

जातकाने विचारलेल्या या प्रश्नाच्या अनुरोधाने जातकाची जन्मपत्रिका आणि प्रश्नकुंडली यांचा एकत्रित अभ्यास केल्या नंतर मी काढलेले निष्कर्ष असे होते:

 

श्री XXXXXXX
सप्रेम नमस्कार,
आपण विचारलेल्या प्रश्नाच्या अनुरोधाने आपली जन्मपत्रिका आणि प्रश्न विचारते वेळीची प्रश्नकुंडली यांचा एकत्रित अभ्यास करता असा निष्कर्ष निघतो:

नजिकच्या काळात नोकरीत बदल होण्याची शक्यता बरीच कमी आहे.

एक पुसटसा योग या डिसेंबर महीन्यातच आहे पण योग अत्यंत कमकुवत आहे म्हणजे या काळात एखादे आश्वासन मिळेल पण पुढे प्रगती होणार नाही.

त्या नंतर फेब्रुवारी २०१९ मध्ये अशाच काही आश्वासक हालचाली होतील, एखादी जॉब ऑफर हातात पडण्याची मोठी शक्यता.

नोकरीत बदल होण्याची मोठी शक्यता मे – जून २०१९ या कालखंडात आहे.

शुभेच्छा

आपला

सुहास गोखले 

दोनच दिवसां पूर्वी जातकाने कळवले आहे, त्यानुसार मी जसे भाकित केले होते अगदी तस्सेच जातकाच्या बाबतीत घडले आहे !

जातकाने कळवले आहे :

 

Namaskar Suhasji,

I had consulted you in Dec regarding my job change , my interview was done , i knew from internal sources that i was selected but still i was not getting actual offer. Your prediction was as below . you had told me that i will only get some faint promise in Dec which i did get. But again in January they asked me to go for few more rounds of interview which is very very unusual but i went through it . By the mid-jan it looked as if i will get offer any moment now..but nothing happened . I was getting really nervous . The matter dragged on and on ..even the big boss who had referred my resume was surprised , he was saying i don’t know why HR is not releasing your offer . Ultimately after lots of heart ache and frustration I got an offer which was of lower band but almost same salary . I went for it as it was in native town of Pune and my other offer was in Bangalore. I got offer on 13th Feb and my joining date is 29th Apr.

Your prediction was on the dot… Respect your knowledge and guidance .i am pasting your original message for your reference

 


 


 

मी जातकाला सांगीतले होते:  “एक पुसटसा योग या डिसेंबर महीन्यातच आहे पण योग अत्यंत कमकुवत आहे म्हणजे या काळात एखादे आश्वासन मिळेल पण पुढे प्रगती होणार नाही.” 

अगदी तसेच झाले आहे.  डिसेंबर २०१८ मध्ये जातकाची नव्या नोकरी साठी मुलाखत झाली , त्या नंतर नोकरी देऊ असे आश्वासन मिळाले पण नेमणूक पत्र काही दिले गेले नाही.

मी जातकाला सांगीतले होते: त्या नंतर फेब्रुवारी २०१९ मध्ये अशाच काही आश्वासक हालचाली होतील, एखादी जॉब ऑफर हातात पडण्याची मोठी शक्यता.
हे पण बरोबर आले जानेवारी २०१९ मध्ये पुन्हा तिथेच मुलाखतीचे पुढचे राऊंड पार पाडले गेले.जातकाला १३ फेब्रुवारील २०१९ ला नोकरीचे नेमणूक पत्र मिळाले आहे.

मी जातकाला सांगीतले होते : नोकरीत बदल होण्याची मोठी शक्यता मे – जून २०१९ या कालखंडात आहे

त्याप्रमाणे झाले आहे , जातक आपल्या नव्या नोकरीत २९ एप्रिल २०१९ ला रुजु होत आहे !

जातकाच्या या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मी ,

पारंपरीक ज्योतिष पद्धती
युरेनियन प्लॅनेटरी पिक्चर्स

या दोन ज्योतिष प्रणालींचा एकत्रित वापर केला होता

जातकाचे अभिनंदन आणि आगामी वाटचाली करता मन:पूर्वक शुभेच्छा !!

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+2

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////
 1. sandip

  काय झाल गोखलेजी टाका की पुढचे लेख. उदासिनता सर्वच क्षेत्रात आली आहे. क्रियाशीलता घटली आहे पण आपल्या सारख्या सजग धुरिणांनी समाज हित सो़डून कस चालेल.
  धन्यवाद

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री संदीपजी,

   बरेच काही लिहायचे मनात आहे पण वेळे अभावी जमत नाही , बघुया येत्या एप्रिल महीन्यात काही लेख पूर्ण करता येतात का.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.