हा एक ताजा ताजा प्रतिसाद.
जातक मुळचा पुण्याचा पण गेल्या वर्षी त्यांची दुसर्या राज्यातल्या प्रोजेक्ट साईट वर बदली झाली. बदलीच्या ठिकाणी जातक रूजू झाला खरा पण त्याला परत पुण्यातच यायचे होते, तेव्हा प्रश्न होता: बद्ली होऊन परत पुण्याला येता येईल का?
प्रश्नकुंडली तयार केली पण ती बरीच हॅझी ( Hazy) होती. vague – unclear by virtue of being poorly expressed or not coherent in meaning;
तरीही नेटाने पत्रिकेचा अभ्यास केला , बदली होणार हे दिसत होते पण ‘बदलीचा इव्हेंंट गाठताना बरच घोळ होणार , खो-खो चा खेळ होणार हे पण दिसत होते. अशा हॅझी पत्रिकेच्या बाबतीतला कालनिर्णय करताना दमछाक होते , इथेही झाली. एकच एक कालवधी पकडता आला नाही, शेवटी दोन कालवधी दिसले मार्च 2018 किंवा ऑगष्ट – सप्टेंबर 2018.
मार्च 2018 मध्ये काम झाले नाही , जातकाची कंपनी जातकाची पुण्यात बदली करायला तयार होती पण अडचण अशी होती की जातकाच्या जागी काम करायला दुसरी व्यक्ती उपलब्ध होत नव्हती आणि नेमका इथेच खो-खो चा खेळ सुरु झाला , बदली व्यक्ती साठी मुलाखती व्हायच्या, उमदेवार जॉईन होतो म्हणायचा पण ऐनवेळी जॉईन व्हायचाच नाही.
शेवटी एकदाचे हे दुष्टचक्र संपले, एक उमेदवार मिळाला, ठरल्या वेळेच्या आधीच जॉईन पण झाला (घटना घडण्याची वेळ जवळ आली की सगळे असे झटपट होते), अडथळा दूर झाला , जातकाची पुण्यात बदली झाली आणि जातक आता 01 ऑक्टॉबर 2018 पासुन पुण्यात कामावर रूजू होत आहे
सोबत आमचे फेसबुक मेसेंजर वर झालेली संदेशाची देवाण घेवाण ………. हा सूर्य हा जयद्रथ !
मार्च २०१८
ऑगष्ट २०१८
सप्टेंबर २०१८
जातकाला शुभेच्छा
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020