नुकताच एका जातकाने कळवलेला भविष्याचा पडताळा.
जातकाचा प्रश्न होता ‘पेन्शन / अॅरिअर्स चे रखडलेले काम कधी पूर्ण होईल ?’ .
हे त्याचे स्क्रिन शॉटस , जातकाने विचारलेला प्रश्न आणि मी त्याला दिलेले उत्तर: (जातकाची ओळख लपवण्यासाठी , काही भाग खोडला आहे)
०३ मार्च २०१८ रोजी जातकाने हा प्रश्न विचारला होता.
जातकाची पत्रिका अभ्यासून मी उत्तर दिले होते:
जातकाने कळवले आहे:
“सर नमस्कार , मी xxxxxxxx, आपल्याला काही महिन्यांपूर्वी माझ्या पेन्शनच्या कामासाठी कॉन्टॅक्ट केला होता. आपण सांगितल्या प्रमाणे एप्रिल आणि नंतर ऑगष्ट मध्ये खरोखरच माझी महत्त्वाची कामें झाली. तुम्ही सांगीतल्या प्रमाणे ते झाले. तुम्हाला खूप खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीमुळे वाट बघण्याचे बळ आले. थॅक्स वन्स अगेन.
तुमचा नंबर मी माझ्या मावशीला दिला आहे, कदाचित येत्या काही दिवसात ती तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल
आणि परत एकदा धन्यवाद . मी जेव्हा नाशिकला येईन तेव्हा तुम्हाला वेळ असेल तर मला तुम्हाला भेटायला नक्की आवडेल. “
या प्रश्ना साठी मी जन्मकुंडली + प्रश्न कुंडली (जी नक्षत्र पद्धती नुसार अभ्यासली होती) + युरेनियन प्लॅनेटरी पिक्चर्स चा वापर केला होता. उत्तरातली अचूकता युरेनियन प्लॅनेटरी पिक्चर्स ने साधली आहे . जन्मकुंडली चा संबंध असल्याने याची केस स्ट्डी मात्र करता येणार नाही, कारण तसे केले तर जातकाची माहिती उघड केल्या सारखे होईल.
जातकाला शुभेच्छा
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020