मी माझ्या ब्लॉग च्या माध्यमातून ‘डेस्टीनी  आणि फ्रि विल’ या संकल्पने बद्दल बरेच लिहले आहे , दाखले दिले आहे. आपल्या आयुष्यात सगळे काही आधी पासुन ठरलेले असते हे अर्धसत्य आहे. फक्त  ‘काही’ बाबीच अटळ असतात पण बर्‍याच बाबतीत,  मिळणार्‍या फळांची फक्त एक चौकट / आऊटलाईन निश्चित ठरलेली असते त्या मर्यादेत राहून आपल्याला अनुकूल तेच घडवून  आणण्याचे किंवा अशुभ काळाचा त्रास कमी करण्याचे स्वातंत्र आपल्याला दिलेले असतेच . इथे मी उपाय तोडग्यां बद्दल बोलत नाही तर  ग्रहमान जाणून घेऊन योग्य त्या दिशेने केलेल्या प्रयत्नां बद्दल बोलत आहे.

माझ्या मते ज्योतिषशास्त्राचा असलाच तर हाच एक उपयोग आहे , नळाला पाणी कधी येईल, खंडीत झालेला विजपुरवठा केव्हा सुरु होईल,गॅस सिलिंडर कधी घरपोच मिळेल, कुरियर कधी येईल अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे हे शास्त्र नाही पण काहीजण यातच फुशारकी (केपी वाले !) मारत बसतात , तर काही ‘तुमच्या मामाच्या पाठीवर काळा डाग आहे ‘ किंवा ‘तुमचे आजोबा अमुक तमुक होते’ अशा थाटाची भाकिते किती अचूक आली यात मग्न असतात. अभ्यासाचा एक भाग म्हणून अशी भाकिते करणे ठीक असले तरी या प्रकाराची भाकिते जातकाला किती उपयोगी पडू शकतील ?

 

असो, जातकाच्या या प्रतिसादा तुन ‘डेस्टीनी  आणि फ्रि विल’ ही संकल्पना काहीशी स्पष्ट होईल.

नुकताच एका जातकाने कळवलेला भविष्याचा पडताळा.

जातकाचा प्रश्न होता ‘नोकरी / करीयर ‘ बाबत.

हे  त्याचे  स्क्रिन शॉटस , जातकाने विचारलेला प्रश्न आणि मी त्याला दिलेले उत्तर: (जातकाची ओळख लपवण्यासाठी , काही भाग खोडला आहे)

 

१५ सप्टेंबर २०१७ रोजी  जातकाने विचारले होते: 

 

 

२१ सप्टेंबर २०१७ रोजी मी जातकाला लिहले होते:

 

आपण विचारलेल्या प्रश्नांच्या अनुरोधाने आपल्या जन्मपत्रिकेचा अभ्यास केल्या नंतर समोर आलेले निष्कर्ष असे आहेत:

 • १> तसे पाहीले तर नोकरीत बदल होण्यासारखे प्रबळ ग्रहमान नजिकच्या काळात (२०१७-२०१८) नाहीत , असे ग्रहमान २०१९ मध्येच आहेत.
 • २> नोकरीत बदल व्हावा अशी आपली अगदी तळमळ असेल आणि तसे जोरात प्रयत्न केलेत तर एप्रिक- मे २०१८ मध्ये असा बदल होऊ शकतो , जन्मवेळेतली एखाद्या मिनिटाची संभाव्य चूक लक्षात घेता हा कालवधी एक-दोन महीने अलिकडे पलिकडे होऊ शकतो.
 • ३>   आपल्या साठी चांगला काळ  २०२५ नंतर आहे , २०२५ नंतर बरीच वर्षे म्हणजे सेवा निवृत्ती पर्यंत आपल्याला चांगला पगार , अधिकार पद अशा प्राप्ती होत राहतील तेव्हा काही वर्षे वाट पहाण्यात / झगडण्यात गेली तरी अंतिम फल चांगले व समाधानाचे असेल.

.

 

 

 

जातकाने काल  ( १८ मे २०१८) प्राप्त झालेला प्रतिसाद :

 

माननीय सुहासजी,

सर्वप्रथम आपल्याला मेल करायला उशीर झाल्याबद्दल मनापासून माफी मागतो.
आपण लिहिले होते की ‘नोकरीत बदल व्हावा अशी माझी तळमळ असेल तर एप्रिल-मे मध्ये असा बदल होऊ शकतो’. 
आपले हे म्हणणे तंतोतंत खरे ठरून माझ्या नोकरीत सदल झाला आहे आणि १६ एप्रिल रोजी मी माझ्या आधीच्या कंपनीत (आणि जिथे join करण्याची मला मनापासून इच्छा होती) ……………मध्ये join केले आहे. 
पण, माझ्या दुर्दैवी नशीबामुळे मला काही तडजोडी कराव्या आहेत. जसे की १) पगार वाढवून मिळाला नाही. आणि २) काहीसे low profile वर काम करावे लागत आहे.
कंपनी अतिशय चांगली आहे, मला खूप आशा आणि अपेक्षा आहे की इथे माझी चांगली growth व्हावी. माझी ही अपेक्षित growth होईल का? की २०२५ पर्यंत मला केवळ अडचणींचाच सामना करायचा आहे? २०२५ पर्यंतचे माझे career in detail तुम्ही सांगू शकाल का? 
तुमची फी रु……………. कधी transfer करू? खरं सांगू का, २०१५ पासून तुम्ही मला guide करताय आणि प्रत्येक वेळी आपण सांगितलेले भविष्य अचूक आलेले आहे. त्यामुळे तुमच्यावर माझा प्रचंड विश्वास आहे.
आपला कृपाभिलाषी,

 

 

पत्रव्यवहार पुरेसा बोलका आहे. हे केवळ बोलाफुलाला गाठ पडली अशा सदरात मोडणारे नक्कीच नाही , नोकरीत बदल होईल  हे सांगणे  वेगळे पण असा बदल नेमक्या कोणत्या महिन्यात  होईल हे सांगणे वेगळे !

 

 

 

जातकाला शुभेच्छा

 

शुभं भवतु 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

8 प्रतिक्रिया

///////////////
 1. sandip

  सुहासजी

  लवकर ठणठणीत व्हा. उत्तम आरोग्या लाभो

  लेखन चालु करा

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री संदीपजी

   प्रकृती आता चांगली आहे , सगळे पुर्ववत होण्यास अजूण एखादा महीना तरी लागेल पण कामें थोड्या प्रमाणात का होईना सुरु केली आहेत.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.