नुकताच मिळालेला जातकाचा प्रतिसाद.

जातकाने नोव्हेंबर २०१४ मध्ये ‘संतती योग कधी?’ असा प्रश्न विचारला होता, जातकाच्या आणि त्याच्या पत्नीच्या जन्मपत्रिकांच्या सखोल अभ्यासानंतर मी भाकित केले होते:

आम्ही अपत्य प्राप्ती साठी प्रयत्न करत आहोत. कृपया मार्गदर्शन कराल का?

अपत्यप्राप्ती होण्याचा एक चांगला योग :
०१ सप्टेंबर २०१६ ते  ११ ऑक्टोबर  २०१६ या दिड महीन्याच्या कालावधीत आहे.
त्यातही ७ सप्टेंबर २०१६ ते १९ सप्टेंबर २०१६ हा कालावधी विशेेष लाभदायक आहे.
हा लिहलेला कालावधी प्रत्यक्ष प्रसुतीचा आहे, तो लक्षात घेऊन आखणीं करावी.

 

नुकताच जातकाने मी वर्तवलेल्या भाकिताचा पडताळा कळवला आहे तो असा:

आदरणीय सुहासजी,
सप्रेम नमस्कार. 
सर्वप्रथम मी तुमची माफी मागतो कारण मी तुम्हाला फार उशिरा प्रतिसाद लिहीत आहे. 
आम्हाला अपत्य प्रतापी बद्दल काही प्रश्न होते आणि त्यासंदर्भात मी तुम्हाला सर्वप्रथम नोव्हेंबर २०१४ मध्ये संपर्क केला होता.
आणि तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केले होते. 
तुम्ही आमच्या पत्रिकेचा अभ्यास करून आम्हाला खालील प्रमाणे प्रतिसाद दिला होता. 
अपत्यप्राप्तीचा होण्याचा एक चांगलं योग:
१-सप्टेंबर-२०१६ ते ११ ऑक्टोबर २०१६ या दिड महिन्याच्या कालावधीत आहे. 
त्यातही ७ सप्टेंबर २०१६ ते १९ सप्टेंबर २०१६ हा कालावधी विशेष लाभदायक आहे. 
हा लिहिलेला कालावधी प्रत्यक्ष प्रसूतीचा आहे तो लक्षात घेऊन आखणी करावी. 
तुमचा प्रतिसाद पाहून खरेतर मी निराश झालो होतो कारण साधारणतः पुढची दोन वर्ष आम्हाला वाट पाहायला लागणार होती. 
या नंतर मी तुम्हाला केलेला ईमेल आणि तुमचा प्रतिसाद विसरून गेलो. 
यथावकाशाने माझी पत्नी गरोदर राहिली आणि ७-ऑक्टोबर-२०१६ रोजी आम्हास दुपारी ३:३८ वाजता कन्यारत्न प्राप्त झाले. 
जेव्हा ती गरोदर राहिली तेव्हाच आम्हाला कळाले की तुम्ही दिलेला प्रतिसाद खूप अचूक होता पण जोपर्यंत प्रसूती होत नाही तोपर्यंत आम्ही वाट पाहत होतो. 
त्यानंतर तुम्हाला प्रतिसाद देण्यासाठी बऱ्याचदा प्रयत्न केला पण काही कारणास्तव ते जमले नाही. 
म्हणून आज सवडीने तुम्हाला प्रतिसाद देत आहे. 
तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल आम्ही दोघेही तुमचे अत्यंत आभारी आहोत.       

 

 

माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवा नुसार ७०% जातकांच्या बाबतीत मी वर्तवलेले अंदाज सत्याच्या जवळपास जाणारे असतात, काही जातकांच्या बाबतीतले अंदाज अगदी अद्भुत म्हणावे असे अचूक येतात, अर्थात माझे सगळेच अंदाज इतके अचूक येतील असे नाही .

जातक जेव्हा असा पडताळा आल्याचे कळवतो तेव्हा ज्योतिषशास्त्य्रा वरचा विश्वास अधिक दृढ होतो.

जातकाचे आणि त्याच्या पत्नीचे अभिनंदन आणि नवजात बालकाला अनेक अनेक शुभेच्छा.

 

शुभं भवतु

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.