आजच श्री क्ष यांनी ईमेल द्वारा पाठवलेला हा फिडबॅक, जातकाचे नाव गोपनिय राखण्यासाठी जातकाची ईमेल आयडी व नाव खोड्ले आहे..

जातकाचा फिडबॅक त्यांच्याच शब्दात…….

 नमस्ते!
कळविण्यास आनंद होतो की तुम्ही मार्गदर्शन केल्याप्रमाणे काम झाले.
मला नव्या कामाची सुरुवात साधारणतः कधी होईल हे समजून घेऊन थोडी आर्थिक तजवीज करायची होती.
तेव्हा तुम्ही वर्तवलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला.
दोन कंपन्यांमध्ये मनासारखे पॅकेज मिळाले, त्यातून एक निवडली.
एप्रिल च्या शेवटच्या आठवड्यात मुलाखती होऊनही हजर होण्याची तारीख २ जून सांगितली गेली. तु्म्ही अक्षरशः हीच तारीख सांगितली होती!

त्याप्रमाणे २ तारखेपासून कामकाज सुरू झाले.

तुमच्या मार्गदर्शनामुळे आणि इतर टिप्स मुळे
मध्यंतरीचा काळ तणावरहित झाला.
मनापासून आभार!

ही केस ब्लॉगवर लिहिण्यासारखी असल्यास माझे नाव न जाहीर करता जरूर लिहावी.

श्री क्ष,

सर्वप्रथम आपले अभिनंदन !

आपण आवर्जून, वेळातवेळ काढून फिडबॅक दिल्या त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे, असे फिडबॅक मला अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे असतात.  माझे भविष्य  इतके अचूक बरोबर आल्याचा आनंद तर होणारच पण त्याहूनही महत्वाचे म्हणजे अशा फिडबॅक मुळे या शास्त्रावरचा माझा विश्वास वाढतो, मी वापरत असलेल्या कृष्णमुर्ती व इतर अनेक पद्धतींच्या अचूकतेचा व उपयुक्ततेचा एक चांगला पडताळा मिळाल्याने केलेल्या अभ्यासाचे व मेहेनतीचे समाधान मिळते.

ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शपर शास्त्र आहे, अडचणीत सापडलेल्यांना क्षणभर का होईना दिलासा देणारे शास्त्र आहे, भविष्य बरोबर आले तर दुधात साखरच पण तसे दर वेळेस होईलच असे नाही, पण गेला बाजार या शास्त्राच्या आधाराने जातकाच्या मनाला उभारी देता आली तरी ती एक मोलाची मदत ठरते. कारण बर्‍याच वेळा जातकापाशी तेव्हढाच एक आधार शिल्लक राहीलेला असतो.

पुन्हा एकदा फिडबॅक दिल्या त्याबद्दल मी आपले आभार मानतो व आपल्या पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा देतो.

कळावे  लोभ  असावा ही  विनंती.
आपला,
सुहास गोखले


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.