माझी जातकांना नेहमीच आग्रहाची विनंती असते “जे काही घडले ते कळवा, अगदी मी वर्तवलेले भविष्य चुकले तरीही कळवा, कारण अशा चुकलेल्या भविष्यातूनच खूप काही शिकता येते”
काही जातक आवर्जुन कळवतात , काही नाही. कधी अन्य मार्गाने कळते कधी एखादा जुना जातक नव्या कंसलटेशन साठी येतो तेव्हा त्याच्या साठी मागे वर्तवलेल्या भाकितांचे काय झाले ते कळते.
आज अगदी असेच झाले , माझे एक जातक, ऑगष्ट २०१४ च्या मध्यावर माझ्याकडे ‘नविन नोकरी कधी मिळेल?” या बाबतीत मार्गदर्शन घेण्यासाठी आले होते ..
तेव्हा जातकाने विचारलेला प्रश्न :
हे मी जातकाला दिलेले उत्तर:
अर्थात याचे पुढे काय झाले ते मात्र कळले नव्हते. नुकतेच त्या जातकाने ‘नोकरीत बद्ल ‘ होण्याबाबतचा प्रश्न विचारला, या वेळी मी विचारले , सध्याची नोकरी केव्हा सुरु झाली होती? तेव्हा जातकाचे उत्तर आले.. १० नोव्हेंबर २०१४ ! माझा अंदाज ऑक्टोबर -२०१४ चा होता , नोकरी निमित्त स्थानबदल ही झाला आहे म्हणजे मी वर्तवलेली दोन्हीं भाकितें बरोबर आली आहेत !
….जातकाने पाठवलेली माहीती
जे आहे ते आपल्या समोरच आहे आणि ते पुरेसे बोलके आहे.
जातकाला त्याच्या आगामी वाटचाली करता अनेक शुभेच्छा !
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
chaan…….apla पुन्हा ज्योतिषाची तर्हा-3 kadhi yenar????/
श्री. प्रमोदजी,
धन्यवाद.
पुढचा भाग लौकरच पोष्ट करत आहे.
सुहास गोखले
आपण असे प्रश्न आले की कोणती मेथड वापरता ? के .पी . का पारंपरिक ? का दोन्ही ? पाश्चिमात्य पद्धत पण वापरता असे तुमच्या लेखांवरून समजले !!
श्री. स्वप्निलजी,
धन्यवाद.
प्रश्न कसा आहे यावर मेथड वलंबून असते.
मी पाश्चात्य होरारी त्यातही कन्सलटेशन चार्ट मोठ्या प्रमाणात वापरतो, प्रश्ना मागचा प्रश्न , बॅक्ग्राऊंड माहीती, प्रश्न कसा डेव्हलप झाला आहे, जातक सध्या नेमक्या कोणत्या परिस्थितीत आहे, आगामी काळात जातकाच्या आयुष्यात काय काय घडणार आहे याचा बर्यानपैकी अंदाज मिळतो. त्यानंतर के.पी. वापरुन घटना (घडणार असल्यास) केव्हा घडेल याचा अंदाज बांधायचा, शेवटच्या टप्प्यात ट्रांसीट्स वापरुन कन्फर्मेशन मिळवायचे .
थोडक्यात टायमिंग ऑफ इव्हेंट साठी के.पी. + ट्रांसिट्स , डिटेल्स साठी पाश्चात्य होरारी असे मिश्रण वापरावे लागते.
प्रश्नकुंडली साठी पारंपरिक चा फारसा उपयोग होत नाही असा माझा अनुभव आहे.
सुहास गोखले
बरोबर प्रत्येक पद्धतीची स्वतः ची खास शैली असल्याने प्रश्नाप्रमाणे त्या त्या पद्धती वापरणेच योग्य ! थोडक्यात सुयोग्य मिश्र पद्धती .
श्री. स्वप्निलजी ,
धन्यवाद.
जसा आजार तसा ईलाज ! एकच एक पद्धत घरुन बसू नये कारण कोणतीच पद्धती परिपूर्ण नाही. एखाद्याला त्याच्या नशिबत कय दडले आहे हे कळावे की नाही ही सुद्धा नियतीची ईच्छा असते असे काही वेळा वाटते. प्रश्नकुंडली साठी प्रश्नकर्त्याची प्रश्ना बाबतची कमालीची तळमळ हा अत्यंत महत्वाचा आणि निर्णायक घटक आहे, प्रश्न विचारलेली वेळ हा दुसरा तितकाच महत्वाचा घटक , हे दोन्ही योग जमून येतात तेव्हा पद्धती कोणतीही वापरली तरी उत्तर बरोबर येते!
सुहास गोखले
ok! ok!!
श्री. सुहासजी,
गोष्ट घडली किंवा नाही या बद्दल फीडबॅक नेहमी द्यावा हे माझे मत – त्यातून तुम्ही म्हणता तसे technique improvements ला वाव मिळतो.
या संदर्भात मला एक खुलासा विचारायचा आहे. तुम्ही जातकाची पत्रिका बघिताना हा जातक तत्परतेने फीडबॅक देईल किंवा देणार नाही असे कधी संकेत मिळतात का ?
वेळ मिळाला की शीर्षकात दुरुस्ती ( “जून” ) कराल का ?
धन्यवाद ,
अनंत
श्री. अनंतजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद.
आपण दाखवून दिलेली शुद्धलेखनातली चूक दुरुस्त केली आहे , त्यासाठीही धन्यवाद.
जातक फिडबॅक देईल का नाही त्या हे त्या जातकाच्या जन्मपत्रिकेवरुन कळणे अशक्य आहे. जी पत्रिका संपूर्ण आयुष्यावर ( ७०-८० वर्षे) भाष्य करणारी असते त्यातून इतकी बारीक घटना घडेल का नाही हे तपासणे केवळ अशक्य आहे.
आता मी पाठवलेल्या रिपोर्ट ला जातक उत्तर देईल का? असा प्रश्न स्वत:शीच धरुन प्रश्नकुंडली मांडल्यास कदचित काही उत्तर मिळू शकेल पण ते उत्तर म्हणजे जातकाचा फिड्बॅक असेलच असे नाही ती कदाचित जातकाने दिलेली पोच (रीड रिसीट / अॅकनॉलेजमेंट) असू शकते , ज्याची टाइमफ्रेम एक आठवड्याच्या आत बाहेर असू शकेल.
शक्यतो अशा बाबीं साठी हे शास्त्र (त्यातही प्रश्नकुंडली) वापरु नये. अॅचन्टीबायोटिक्स सारखे आहे हे, योग्य वेळी , योग्य त्या प्रमाणात वापरले तर त्याचा लाभ होतो , पण अतिरेकी आणि चुकीचा वापर केल्यास हेच औषध (कायमचे) कुचकामी ठरते. आज अनेक अॅभन्टीबायोटीक्स अशाच गैरवापरा मुळे लागू पडत नाहीत, निकामी झाली आहेत.
सुहास गोखले
बरोबर !! हे पण पटते सुहासजी ! की एखाद्याला त्याच्या नशिबत कय दडले आहे हे कळावे की नाही ही सुद्धा नियतीची ईच्छा असते आणि दिलेला सल्ला सुद्धा पाळणे किंवा न पाळणे याची बुद्धी होणे हे पण नशिबातच असावे लागते असे मला वाटते .