मी प्रत्येक पत्रिका कसोशीने तपासतो त्यासाठी लागेल तेव्हढा वेळ देतो, उगाच थातुर मातुर , चटावरचे श्राद्ध उरकत नाही. एव्हढे सगळे करुनही सगळीच भाकिते बरोबर येतात असे नाही, पण त्यामुळे नाऊमेद न होता अभ्यास चालू ठेवायचा. म्हणूनच मी फार मोठे दावे करत नाही, शास्त्राची आणि माझी स्वत:ची मर्यादा मी ओळखून आहे. “तुम्ही सांगीतल्या प्रमाणे घडले / नाही घडले ‘ असे कळवणार्या अनेक ईमेल्स , फोन कॉल येत असतात , सगळेच प्रतिसाद इथे या ब्लॉग च्या माध्यमातून देता येणार नाहीत ,आज असाच एक उत्साह वाढवणारा प्रतिसाद आपल्या समोर ठेवतो.
जातकाने एक वर्षापूर्वी प्रश्न विचारला होता…
प्रश्न जातकाचा प्रश्न आणि त्याला मी दिलेले उत्तर
या भाकिताचा पहीला भाग मे २०१६ मध्येच पडताळा मिळाला , तेव्हा जातकाने पाठवलेल्या ईमेल चा हा स्क्रीन शॉट
या भाकिताचा दुसर्या भागाचा पडताळा आज पडताळा मिळाला , आजच जातकाने पाठवलेल्या ईमेल चा हा स्क्रीन शॉट .
बोला फुलाला गाठ पडली , आले असेल एखादे भाकित बरोबर , असे म्हणणार्यांसाठी:
एकाच व्यक्तीसाठी, एक वर्षा पूर्वी केलेली . एकाच वेळी केलेली तीनही भाकिते ,अगदी ओळीने बरोबर आली आहेत ! हा काही योगायोग असू शकत नाही , हे काही कावळा बसायला ठांपी मोडायला गाठ पडली अशातले नक्कीच नाही. आणि हा काही छापाकाटा करुन दिलेला कौल नाही… मग काय आहे हे ?
जे आहे ते आपल्या समोरच आहे आणि ते पुरेसे बोलके आहे.
जातकाला त्याच्या आगामी वाटचाली करता अनेक शुभेच्छा !
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
सुरेख! ज्योतिषशास्त्र न मानणा-या लोकांनी विचार करावा, की इतकी भाकिते बरोबर कशी येतात? सुहासजी, भावी वाटचालीस शुभेच्छा!
धन्यवाद श्री. प्राणेशजी,
मी जी भाकिते वर्तवली ती अशी हवेतून काढलेली नाहीत, त्यामागे काही गणित , तर्क शास्त्र आहे , थोडक्यात आपल्या जन्माच्या वेळेचे ग्रहमान (आणि सध्या आकाशात असलेले ग्रहमान) यांचा आपल्या आयुष्यात घडणारा घटना यात काहीतरी समन्वय आहे हे नक्की, फक्त यां समन्वयाचा अर्थ दरवेळी , लगातार , हमखास लागेलच (लावता येईलच) असे नाही कारण हे शास्त्र काहीसे अपूर्ण आहे आणि काहीवेळा भाकीत वर्तवताना शास्त्राचा अभ्यास कमी पडल्याने / अनुभव कमी असल्याने चुका / गफलती हौऊ शकतात.
सगळीच भाकिते बरोबर येतात असे नाही (किंवा आलीच पाहिजेत असेही नाही) पण मी लिहिले आहे तसे ‘ अंदाजपंचे, बोलाफुलाला गाठ पडली, कावळा बसायला आणि .. ‘ अशाताला हा प्रकार नक्कीच नाही,
सुहास गोखले