गेल्याच आठवड्यात मी एक नवा पी.सी. असेंबल केला , साला सगळी भट्टी मस्त जमून आली होती, दणाणा अॅप्लिकेशन धावत होती, काल माझ्या कडे आलेल्या एका जातकाला तो इतका आवडला की त्याने जागीच ऑफर देऊन तो पी.सी. मागीतला , मी आनंदाने देऊन टाकला , हा, पण जेव्हढा खर्च आला तेव्हढेच पैसे घेतले , ह्यात काय पैसे कमवायचे ? पी.सी. असेंबल करणे हा काय आपला बिजनेस नाssssय !
असो , आता पर्यायी येवेस्था करायला नको ? दुसरा पी.सी. बांधायला घ्यायचा दुसरे काय?
चला मग पुन:श्च हरी ओम !
या टायमाला जरा वायले काम्बीनेशन ट्राय करायचे ठरवले …
ते असे:
शि.पी.यु.
या टायमाला AMD FX 6-Core Black Edition FX-6300 ऐवजी इंटेल वाला शि.पी.यु. निवडला …
Intel i3- 6100 Skylake 3.7 GHz
लेटेस्ट आहे , फ्युचर फ्रुफ आहे, कामाला तगडा आहे , नवे तंत्रज्ञान , कमी पॉवर लागते.
मदरबोर्ड:
या शि.पी.यु. ला साजेसा MSI H110 Pro VD हा मदरबोर्ड निवडला , तसा हा यंट्री लेव्हलचाच आहे पण आपले काम भागते ना, झाले तर मग , काय समजलीव ?
रॅम:
या टायमाला रॅम साठी दुसरा ब्रॅन्ड घ्यावा असा विचार करुन Kingston Fury Black 2133 Mhz DDR 4 , ही १६ . जी.बी. रॅम घेतली.
हार्ड ड्राईव्ह:
WD Blue 1 Tb
वेस्टर्न डीजीटल पुन्हा एकदा , याला पर्याय नाsssय !
सॉल्लीड्ड स्टेट ड्राईव्ह:
sandisk ssd plus1Sandisk SSD Plus 120 GB
या टायमाला हे जरा नवीन, ऑप्रेटिंग शिस्ट्म आणि अप्लीकेशन्स यावर ठिवायची , पि.शी. आता लय दणक्यात ,अबाबा धावणार बघा ! हौदे खर्च !
पॉवर सप्लाय:
Cooler-Master-Thunder-500-Watt-SDL488583272-3-24dceCooler Master 500 W .
पुन्हा एकदा हौदे खर्च ! कुलरमास्टर लाच हात घातला !
ड्ब्बा:
Deepcool TESSERACT BF Mid Tower Computer Case (Black)
ह्यो येक भारी डब्बा घावला ! लगेच उचलला ! एकदम चकाचक ! झालेच तर , पॉवर सप्लाय बुडात बशिवत्यात म्हणजे डब्बा एकदम स्टेबल रहाणार आणि मायंदाळ व्हेनटीलेशन !
कि बोर्ड:
HP 3500 वायरलेस
इथेही बजेट वाढीवलं , त्ये चिकलेट कीज का काय म्हंतात त्ये हाये म्हणे , आवाज कमी , स्ट्रोक छोटा ( त्ये हौदे खर्च लक्षात हाये ना?)
माऊस:
Rapoo 1620 Mouse
जरा मोठ्ठा साईजवाला बघितला, बरा अस्तो हाताळायला , नै का?
मॉनिटर:
HP 22vw IPS Monitor
मागच्या बिल्ड चा BenQ २४ इंचाचा मॉनिटर चांगला होता पण साईज जरा मोठा होता , मूवी बगायाला झ्याक होता पण हाफिस वर्क ला जरा मोठ्ठाच ! त्याचा डोल्याला त्रास होईल असे वाटले म्हणून , या टायमाला २१.५ इंचाचा मॉनिटर घेतला, आणि पाव्हनं पुढे मागे माझा येका ऐवजी दोन मॉनिटर ( Dual Monitor) चा जंक्षण प्लान हायेच तेव्हा साईज छोटाच बरा , टेबलावर जागा पायजे ना दोन दोन मोठी धुडे ठेवायला . या खेपेला जरा हटके म्हणून HP चा मॉनिटर घेतला ! पाईटाचा मुद्दा म्हणजे हे आय.पी. एस पॅनेल आहे , खरतनाम कलर रेंडरिंग आहे , कातील स्टायलिंग आहे … अप्सरा आली जणू !
…
पार्टं वेगवेगळ्या ठिकाणावरुन घेतले / घेत आहे , पुढच्या आठवड्यात असेंब्ली करणार , माझा मुलगा त्याचा व्हीड्यो काढूंशान युट्यूब , विमिओ वर टाकतो म्हणतोय, नवा नायकॉन क्यॅमेरा हातात आहे , तेव्हा सुरसुरी हि येणारच, म्हणलं कर काय करायचे , तेव्ह्ढीच प्रॅक्टिस होईल…
तर अशी ही नव्या नव्या गड्याची स्टुरी !!
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
सर, सगळी रेशिपीच सांगितलीत जणू कँप्युटरची.. लै भारी..
धन्यवाद माधुरीताई.
कधी एके काळी इलेक्ट्रीकल इंजिनियरिंग ची पदवी मिळवली होती, त्याचा आज असा लाभ होतो, बाजारातून तयार पी.सी. घेण्यापेक्षा हा असा असेंबल केलेला पी.सी. स्वस्त पडतो आणि सगळे पार्ट्स पारखुन घेतेले गेल्याने दर्जेदार असतो.
सुहास गोखले
Namaskar Suhasji,
Intel ?
I thought you are AMD fan, but this one has good power, excellent choices.
Gokhale Computers – future venture is calling you, this one also will go very quickly, get ready to setup next one.
Awaiting for photo and video for it.
Best Wishes,
Anant
श्री. अनंतजी,
AMD प्रोसेसर वाला पी.सी. तसा उत्तमच होता पण Adobe Premier सारख्या व्हीडिओ एडिटींग अॅप्लीकेशंला i3 6100 Skylake ची रॉ पॉवर आणि हायपर थ्रेडिंग चा जास्त उपयोग होईल असे वाटल्याने दुसरी संधी मिळताच मी i3 6100 Skylake निवडला. बाकी AMD प्रोसेसर मस्तच आहे.
मी जोडलेल्या या पी.सी वर पण काहीजणांचा डोला आहे असा संशय आहे पण हे मशीन देणार नाही , दुसरे नविन बांधून देईन वाटल्यास ! व्होड्यो अपलोड करतोय, ब्लॉग वर देता येणार नाही पण युट्यूप किंवा व्हिमिओ वर.
सुहास गोखले