जन्मवेळ !

time 123

जन्मपत्रिका व तदनुषंगीक गणित, तक्ते तयार झाले की सगळ्यात महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे ‘ही दिलेली जन्मवेळ बरोबर आहे का?’

जे ज्योतिषी पारंपरिक पद्धतीने ज्योतिष पाहतात आणि कोणतीही वर्ग कुंडली (उदा: नवमांश कुंडली) अभ्यासत नाहीत , त्यांना याबाबत फारशी काळजी करायची गरज पडत नाही. कारण एक जन्मलग्न साधारण पणे दोन तास चालू असल्याने, जन्मवेळ जरी १०-२० मिनीटें जरी चुकलेली असेल किंवा काही वेळा चक्क तासा-दीड तासाने चुकलेली असेल तरी त्यांना काही फरक पडत नाही, कारण जो पर्यंत जन्मलग्न बदलत नाही तोपर्यंत केलेली जन्मकुंडली एकच राहते, सगळे ग्रह त्याच राशीत, त्याच भावात राहतात, दोन ग्रहां मधले योग बदलत नाहीत.

उदाहरणार्थ या दोन पत्रिका पहा, या अशाच पत्रिका बहुतांश ज्योतिषी वापरतात, लग्न जुळवताना अशाच पद्धतीच्या पत्रिकांची देवाणघेवाण होत असते.

 

 

 

०१ ऑक्टोबर १९७३ सकाळी ०९: ४५ : ३०, पुणे

 

 

 

 

 

 

०१ ऑक्टोबर १९७३ सकाळी ११: ५८: ३० , पुणे

 

 

 

दोन्ही पत्रिका पहा बरे, काही फरक दिसतोय का? नाही , दोन्ही पत्रिका तंतोतंत सारख्या आहेत, पण जन्मवेळां पाहील्यात तर त्यात तब्बल २ तास १३ मिनीटांचा फरक आहे!

म्हणजेच – ०१ ऑक्टोबर १९७३  रोजी , सकाळी ०९: ४५ : ३० वाजल्या पासुन ते सकाळी ११: ५८: ३० पर्यंतच्या या कालावधीत पुण्यात जन्मलेल्या सर्व बालक – बालिकांच्या पत्रिका एक सारख्याच असणार, पुण्यातल्याच नव्हे तर त्या दिवशी ,  ह्या कालाधीत जवळपास आख्ख्या भारतवर्षात जन्मलेल्या सर्वांच्या पत्रिका  सारख्या असणार, आता पत्रिका  एकच म्हणजे  ह्या सगळ्यांचे भविष्य एकच असायला हवे ना?  प्रत्यक्षात तसे आढळते का? नाही ना ? कोणत्याही  दिवशी ,  मेष  ते मीन अशा बारा जन्मलग्नाच्या बारा पत्रिका  बनू  शकतात, म्हणजे त्या दिवशी  जन्मलेल्या सगळ्या व्यक्तिंची विभागणी 12 गटात  होते. प्रत्येक गटात (जन्मलग्नात) जन्मलेल्या शेकडो – हजारों जणांची पत्रिका एक , भविष्य एक !  असे  हे सध्या वापरात असलेले  पवित्र, दैदीप्यमान, हजारो वर्षांची परंपरा असलेले महान भारतीय पारंपरीक ज्योतिषशास्त्र !

एकाच आई-बापाच्या पोटी जन्माला येणारी जुळी मुले अवघ्या पाच-दहा मिनीटांच्या अंतराने जन्माला येतात, त्यांच्याही पत्रिका सारख्याच येणार पण प्रत्यक्षात जुळ्यांच्या बाबतीत दिसणे-बोलणे सारखे असले तरी त्यांचे आयुष्य मात्र भिन्न प्रकारचे असते हे तर आपण पाहतोच.

मग या ठोकळा पद्धतीच्या जन्मपत्रिकां आणि त्यावरुन सांगण्यात आलेल्या भविष्यकथना वर कसा काय विश्वास ठेवता येईल.

काही ज्योतिषी म्हणतील की आम्ही वर्ग कुंडल्या वापरतो त्यामुळे जन्मवेळेतल्या लहानसा बदल देखील पत्रिकेत काय फरक घडवून आणू शकतो ते आम्ही दाखवू शकतो. मान्य. आपल्या पारंपरीक ज्योतिष शास्त्रात  जन्मवेळेतला काही सेकंदाच्या फरकाला  सुद्धा  संपूर्ण वेगळी कुंडली बनवता येते.  पण असे किती ज्योतिषी प्रत्यक्षात असल्या वर्ग कुंडल्या मांड्तात? जास्तीतजास्त नवमांश कुंडली पर्यंत मजल जाते त्यांची, त्याच्याही पलीकडे जाणारे, D-30 , D-60 वर्ग कुंडल्या वापरणारे हाताच्या बोटावर मोजता येतील इतके कमी आहेत.

आता नवमांश कुंडली चा विचार करायचा तर एक नवमांश ३:२० अंशाचा, जन्मलग्न साधारण पणे ४ घड्याळी मिनीटांत १ अंश पुढे सरकते म्हणजे १ नवमांश ओलांडायला साधारण पणे १३ घड्याळी मिनीटें लागतील. मग या १३ मिनिटांत जन्मलेल्यांच्या नवमांश कुंडल्या पण एकच येणार त्याचे काय?  जुळी मुले तर या पेक्षाही  कमी मिनीटांच्या अंतराने जन्माला येतात त्यांचे काय?

जगात अनेक ज्योतिष पद्धतीं प्रचलित आहेत, पण जी पद्धती जन्मवेळेतल्या काही मिनिटांच्या फरकाने जन्मपत्रिकेतला होणारा बदल टिपू शकते व त्याचा प्रभावी वापर करु शकते तीच पद्धती अचूक भविष्य वर्तवू शकणार (किमान तशी शक्यता तरी असते !) बाकीच्या पद्धतीं फक्त स्थूल मानाने आढावा घेत पोपटपंची करण्या पलीकडे काहीही करु शकणार नाहीत.

पारंपरीक पद्धतीने ज्योतिष बघणारे (आणि के.पी. वर टिका करायची  एकही संधी  न सोडणारे) मराठी  भाषेत डझनाच्या घरात ग्रंथ लिहलेले महान ज्योतिषी  आहेत , पण ह्या डझन भर ग्रथांत एक ही  केस स्ट्डी सापडणार नाही , अगदी औषधाला सुद्धा सापडणार  नाही. याचे  कारण काय असावे बरे ?  याच ज्योतिषी महाशयांनी लिहलेल्या ‘विवाह’ या एकाच विषयावरच्या ग्रंथात विवाहाचा कालनिर्णय (विवाह केव्हा होणार ?) कसा करावयाचा यावर फक्त दीड पाने लिहली  आहेत , हो , पुन्हा लिहतो  फक्त दीड पाने ! आणि त्या दीड पानात ही जे  काही  लिहले  आहे तेही अगदी त्रोटक, तोंडाला पाने पुसल्या सारखे ! १२५+  पृष्ठांच्या ग्रंथात कालनिर्णय कसा करायचा या  महत्वाच्या मुद्द्याला दीड पाने इतकी थातु मातुर जागा? हे असे का?

 “के.पी. अचूक  आहे असे फक्त के.पी. वालेच  म्हणतात (म्हणजे बाकीचे कोणी मानत नाहीत)” हा त्यांनीच मारलेला कुत्सीत ताशेरा, हरकत  नाही , पण मग तुमच्या पद्धतीने  इतका अचुक  कालनिर्णय करता येतो  का ?  येत असल्यास कधी केला आहे का? केला असल्यास त्याबद्दल आजातागायत  ‘हा सूर्य – हा जयद्र्थ ‘ असे रोख ठोक का लिहीले नाही? याचे ही  उत्तर द्या ना !

आजमितीला प्रचारात असलेल्या ज्योतिष पद्धतीत फक्त दोनच पद्धती ह्या कसोटीस उत्तीर्ण होऊ शकतात:

 1.  कृष्णमुर्ती पद्धती
 2. युरेनियन अ‍ॅस्ट्रॉलॉजी (अल्फ्रेड विट्टे यांनी विकसीत केलेली पद्धती)

(काही जण नाडी ज्योतिषाचे नाव घेतील पण ते एका वेगळे प्रकरण आहे , त्याबद्दल नंतर कधी तरी सविस्तर पणे लिहीन. सध्या तरी एव्हढे एकच लक्षात ठेवा , नाडी ज्योतीषाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात फसवणुक होत आहे, सावधान !!!)

भविष्य अचूक हवे असेल तर जन्मवेळ ही अचूक असायलाच हवी. त्याच बरोबर जन्मवेळेतल्या काही मिनिटांच्या फरकाने जन्मपत्रिकेतला होणारा बदल विचारात घेणारी ज्योतिष पद्दती पण वापरली गेली असली पाहीजे.

अवघ्या एका – दोन मिनिटांच्या फरकाने जन्मपत्रिकेत बदल  पडु शकतो आणि पर्यायाने त्या आधारे सांगीतलेल्या भविष्यातही  मोठा फरक  पडु शकतो. त्यासाठीच कोणत्याही जन्मपत्रिकेचा अभ्यास सुरु करण्या आधी जन्मवेळ बरोबर आहे का याची खात्री करुन घेणे अत्यंत आवश्यक आहे. जे ज्योतिषी हे करत नाहीत ते फार मोठी चूक करत आहेत किंबहुना ते आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक नाहीत असेच म्हणावे लागेल.

पण जन्मवेळ अचूक आहे हे ठरवायचे कसे?

हा एक अत्यंत जटिल मामला आहे. जन्मवेळेतली अचूकता तपासण्या साठी अनेक पद्धतीं वापरल्या जातात, काही गणितावर आधारित आहेत तर काही इंट्यूईशन च्या माध्यमातून काम करतात. पण कोणतीही पद्धत भरवशाची नाही हे विदारक सत्य आहे. अगदी के.पी. मधली  ‘रुलिंग प्लॅनेट’ वर आधारीत असलेली पद्धतही भरवशाची  नाही, कारण  ती इंट्यूईशन च्या आधारावर  चालते. जाणकार ज्योतिषी मग दोन तीन पद्धतींचा वापर करुन , जन्मवेळेतील चूक (असल्यास) काही प्रमाणात तरी कमी करु शकतो.

पण हे करायला देखील फार मोठा व्यासंग लागतो, हजारों पत्रिकांच्या अभ्यासातून आलेला अनुभव गाठीशी लागतो. आणि इंट्युईशन च्या माध्यमातून काही दैवी मदत ही मिळवावी लागते. या कसोट्यांना फार थोडे ज्योतिषी उतरु शकतात. एका दोन चोपड्या वाचून , गल्ली बोळातला एखादा टिनपाट ज्योतीष क्लास  लावून ‘ज्योतिष अलंकार / नक्षत्र शिरोमणी’  बनलेल्या बुजगावण्यांची ही कामें नव्हेत. त्यांनी गुरु पाचवा, शनी बारावा, मंगळ वक्री असली पोपटपंची करत लोकांना उपाय तोडगे सुचवत बसावे.

जन्मवेळ बरोबर आहे की नाही हे ठरवणे व चूक असल्यास ती सुधारुन घेणे हे एक फार मोठे शास्त्र आहे . मला यावर बरेच काही  सांगता येईल पण हे काहीसे तांत्रीक आणि बरेचसे गुप्त ज्ञान असल्याने ब्लॉगच्या माध्यामातून ते समजाऊन सांगणे शक्य होणार नाही.

सबब , सध्या इतकेच !

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

9 प्रतिक्रिया

///////////////
 1. Himanshu Joshi

  Thank you for one more excellent post. How about palmistry? Do you know if it holds any value?

  0
  1. सुहास गोखले

   श्री. हिमांशुजी,

   धन्यवाद,

   पामिष्ट्री (हस्तरेषा) याबाबतीतच माझा काहिच अभ्यास नाही. मात्र काही हस्तरेषा तज्ञांचा अनुभा मात्र घेतला आहे. माझा या बाबतीतला अनुभव काही उत्साहवर्धक नव्हता पण काही जणांना चांगले अनुभव आलेले आहेत.

   अभिप्राया बद्दल पुन्हा एकदा आपले आभार मानतो.

   आपला
   सुहास गोखले

   0
   1. माधुरी लेले

    सर ,आपण क्लास कधी पासून सुरु करणार?. मी आपल्या ब्लॉगची नियमीत वाचक आहे.. आपण इतक्या तपशिलवार विवेचन करता..खूप शिकावसं वाटतं..

    0
    1. सुहास गोखले

     माधुरीजी,

     अभिप्राया बद्दल धन्यवाद.

     क्लास चालू करायचे तर आहेतच पण अजुन तयारी चालू आहे. इंटरनेट च्या माध्यमातून क्लास चालणार असल्याने योग्य त्या delivery माध्यमाची छाननी चालू आहे , एकदा ते माध्यम ठरले की मग फार वेळ लागणार नाही. मी तशी माझ्या ब्लॉग वर घोषणा करेनच आणि आपल्याही व्यक्तीश: कळवेन.

     कळावे
     आपला
     सुहास गोखले

     0
  1. सुहास गोखले

   श्री. प्रफुल्लजी ,

   आपल्या ही माझ्या कडून दीपावली शुभेच्छा !

   क्लास जेव्हा चालू करेन तेव्हा आपल्याला आवर्जुन आधी कळवेन

   आपला

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.