चार्ल्स हार्वे चे हे पुस्तक माझ्या कडे अगदी  सुरवाती पासुन पासुन होते,  त्या काळात याची अक्षरश: पारायणें केली होती ! आता चार्ल्स हार्वे कोण हे विचारु नका, फार बडी असामी आहे ही!

पुढे इतकी पुस्तके संग्रहात आली पण हे पुस्तक माझे अत्यंत आवडीचे राहीले. मध्यंतरीच्या काळात कोणीतरी वाचायला म्हणुन नेले ते गायबच झाले. अर्थात हे पुस्तक साधारण पणे बिगिनर्स कॅटेगोरी मधले असल्याने ,  मीही  फारशी फिकिर केली केली. पण हे पुस्तक माझ्या संग्रहात असावे असे वाटत राहीले. आज खरेदि करु , उद्या करु असे म्हणत राहूनच गेले.

दरम्यानच्या काळात हे पुस्तक  ‘आऊट ऑफ प्रिंट’ झाले. आणि पुस्तकाची किंमत झपाट्याने वाढली.अ‍ॅमेझॉन इंडियावर आजची किंमत चक्क रुपये ७०००आहे!

शेवटी मागच्या महीन्यात जुन्या पुस्तकांच्या वेब साईट वर अचानक हे पुस्तक आढळले . अगदी स्वस्तात ! मग काय ताबडतोब ऑर्डर केले,  काल पुस्तक हातात पडले , समाधान वाटले.

फार सुंदर पुस्तक आहे हे. रवी अमुक राशीत आणि चंद्र तमुक राशीत असताना काय असते याप्रमाणे १४४ कॉम्बीनेशंस वर भाष्य केले आहे.  रवी – चंद्र यांच्या पत्रिकेतल्या स्थिती वरुन केलेले इतके चांग़ले  भाष्य मी इतरत्र: कोठेही पाहीले नाही.

आवर्जुन वाचण्या सारखे , अगदी संग्रही ठेवण्या सारखे पुस्तक !

सध्या अ‍ॅमेझॉन किंडल फॉरमॅट मध्ये अगदी स्वस्तात ( ३७५)  मध्ये उपलब्ध आहे , त्याचा लाभ घ्या. प्रिंन्य एडीशन फार महाग आहे,  हजाराच्या घरात किंमत जाते

हे पुस्तक येथे मिळेल

अ‍ॅमेझॉन युएसे

अ‍ॅमेझॉन इंडीया

 

Sun Sign, Moon Sign: Discover the personality secrets of the 144 sun-moon combinations

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////
 1. Santosh

  सुहासजी,

  कृपया जुन्या पुस्तकांच्या वेब साईट चा पत्ता दिलात तर आम्हालाही त्याचा लाभ घेता येईल.

  कारण बरीचशी पुस्तके अ‍ॅमेझॉन वर फार महाग असतात.

  संतोष सुसवीरकर

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री. संतोषजी,

   जुनी पुस्तके आपल्याला :

   थ्रिफ्ट बुक्स : http://www.thriftbooks.com/

   बेटर वर्ल्ड बुक्स : http://www.betterworldbooks.com/

   अ‍ॅबे बुक्स : https://www.abebooks.com/

   या वेब साईट्स वरुन मागवता येतील.

   ह्या तीनही साईट्स डेबीट / केर्डीट कार्ड द्वारा पेमेंत स्विकारतात. किंमती डॉलर मध्ये असतात. आपली बँक त्यांना डॉलर मध्ये पेमेंट करते. सध्या एका डॉलर ला ७१ रुपये पडतात (प्रत्यक्षात १ रुपया = ६९ डोलर असा दर आहे पण बँक वाले सर्व्हस चार्ज, करंसी कन्हरशन चार्ज असे काही बाही जादाचे आकार लावतात) . पुस्तके साध्या पोष्टने पाठवतत , आपल्याला साधारण पणे २०- २५ दिवसात मिळतात, क्वचित ४० दिवस पण लागतात. जर दोन महीन्यात पुस्तक मिळाले नाही तर तसे कळवल्यास कोणताही प्रश्न न विचारता आपण भरलेले पैसे परत आपल्या खात्यात जमा करतात. पण सहसा असे होत नाही, आपल्या कडे येणार्‍या पोष्टमनला पूर्वकल्पना देणे, थोडी बक्षीसी (किती, अगदी १०/२० रुअप्ये सुद्धा बास होतात ! खुष!!) देऊन ठेवायची म्हणजे पुस्तक गॅरंटी आपल्या हातात पडते.

   मी बर्‍याच वेळा माझ्या दारात येणार्‍या पोष्ट्मनला / कुरीयत बॉय ला पैसे देण्यापेक्षा फिज मधले थंडगार असे मँगो फ्रुटी , अ‍ॅपी , अमूल मस्ती ताक असे टेट्राप्यॅक देतो. खूप खूष होतात ही लोक या अशा समयोचित गिफ्ट मुळे, आपलेही काम होते. जय हो!

   सुहास गोखले

   0
 2. Santosh

  सुहासजी,

  ह्या वेबसाईटचे कुरीयर चार्जेस परवडणारे असतात का?
  कधी कधी असे होते कि पुस्तकापेक्षा कुरीयर चार्जेस फार महाग जातात 🙂

  संतोष सुसवीरकर

  0
  1. सुहास गोखले

   श्री. संतोषजी ,

   आपण म्हणता तसेच असते, पुस्तकाच्या किंमती पेक्षा कुरियर चार्जेस जास्त असतात !

   आपण फायनल किंमत बघायची, शिंपल !

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.