र्मचंची ! म्हणजे चामड्याचे पाकीट ! जे आपण पैसे ठेवायला वापरतो.

मी कॉलेजात असताना एक ‘दस – बीस रुपीया’ वाले वॉलेट वापरत होतो. त्या वेळी पाकीटात ठेवण्या इतके पैसे असायचे कधी? एक सिटीबस चा पास, कॉलेजचे आयडी कार्ड , दोन – पाच रुपये आणि थोडी चिल्लर , बस्स , मामला खतम!  त्या ‘रस्ते का माल सस्तें में’ वाल्या वॉलेट ने माझ्या कॉलेजची चार वर्षे आपले काम चोख बजावले.

पुढे शिक्षण पूर्ण झाले, नोकरी पकडली आणि खिशात थोडे पैसे खुळखुळायला लागले ! मग नव्या वॉलेट ची खरेदी झाली, अर्थात हे वॉलेट पण काही खास नव्हते , साधे रेक्झीनचे पण जरा रंग रुप , शिलाई इ . बरी होती इतकेच. अगदी स्वस्तातल्या म्हणून घेतलेल्या या रेक्झीन च्या वॉलेट ने सुद्धा चार – पाच वर्षे उत्तम सेवा दिली. शेवटी त्याची फाटून लक्तरे झाल्यानंतर नवे वॉलेट घ्यावेच लागले. एव्हाना जरा बर्‍या पैकी पैसे हातात असल्याने बजेट वाढवून मस्त पैकी टॅन कलर मधले, ‘प्युमा लेदर वॉलेट’ घेतले.

१९९२ च्या सुमारास घेतलेले हे  ‘प्युमा लेदर वॉलेट ‘ मी तब्बल ८ वर्षे  वापरले ! तसे ते अजुनही वापरता आले असते पण शेवटी मलाच त्याचा कंटाळा आला!

पुढे २००१ मध्ये अमेरिकेत असताना , ‘क्लावा’ नामक अस्सल ‘काऊ हाईड लेदर’ चे सुबक , सुंदर वॉलेट घेतले (अव्वाच्या सवा डॉलर मोजून, हे वेगळे सांगायला नकोच!) , हे क्लावा वॉलेट त्याच्या नावाला, दर्जाला आणि किंमतील पुरेपुर जागले ! तेव्हा एका वॉलेट साठी इतके सारे पैसे मोजताना अगदी जीवावर आले होते,  पण आज इतक्या वर्षां नंतर मी म्हणू शकतो की माझ्या आयुष्यात खरेदी केलेल्या काही चांगल्या वस्तुं मध्ये हे वॉलेट मोडते !! आज ही हे वॉलेट माझ्या कडे आहे आणि सुमारे १७ वर्षे वापरल्याने ते इतके सुंदर ‘एज’ झाले आहे की बस्स ! त्यावर मनोहारी ‘पॅटीना’ चढला आहे आणि वापरुन वापरुन लेदर लोण्यासारखे मुलायम झाले आहे. हे वॉलेट अजुन १० -१५ वर्षेच काय पण चक्क  पुढच्या पिढी पर्यंत उत्तम सेवा देईल !

असे असले तरी, मधल्या काळात माझ्यात बरेच बदल झाले, नोकरी –व्यवसायात बदल झाले, लाइफ स्टाईल मध्ये बदल झाले आणि दिवसेंदिवस मी ‘लेस ईज मोअर’ या तत्वा नुसार ‘सिंपल आणि मिनिमलॅस्टीक’ गोष्टी जास्त पसंत करु लागलो आहे. ‘क्लावा वॉलेट’  सुबक , देखणे आणि डौलदार असले तरी , तेव्हाच्या माझ्या गरजां नुसार घेतलेले असल्याने जरासे मोठे (बल्की ) आहे, आता मला हे असले बल्की काही चालणार नव्हते. आज काल मी पाकीटात तसे फारसे काही ठेवतच नाही तेव्हा आता काहीतरी अधीक सोपे, सुटसुटीट , लहान असे वॉलेट घेणे गरजेचे झाले. ‘क्लाव्हा वॉलेट ला असे ‘गुड बाय’ करणे केवळ अशक्य आहे पण स्थळ , काळ, परिस्थीती शी केलेली ही एक अपरिहार्य तडजोड !

मग शोध सुरु झाला एका नव्या वॉलेट चा. नव्या वॉलेटचा दर्जा ‘क्लावा’ सारखा (च)  हवा होता , तिथे कोणतीही तडजोड करायची माझी तयारी नव्हती …. पण…. तेव्हा (म्हणजे खिशात डॉलर खुळखुळत असताना ) खर्च केले तितके पैसे आता एका वॉलेट साठी खर्च करायची मनाची तयारी होत नव्हती. तसे बरेच वॉलेट ब्रँडस तपासले, पण मला हवे असलेले डिझाईन, फीट – फिनिश, लेदर चा दर्जा , सिप्लीसिटी आणि महत्वाचे म्हणजे माझे बजेट यांचा मेळ बसत नव्हता. खूप शोधाधोध केल्या नंतर ‘कोरा’ वर काही पॉईंंटर्स मिळाले आणि माझे बहुतांश निकष पूर्ण करणारे , बहुतांश बॉक्सेस चेक करणारे एक वॉलेट मला सापडले!

‘अर्बी’ (Urby)  ! भारतातलीच ही एक कंपनी परदेशी लेदर गुड्स  ब्रँडस च्या तोडीसतोड अशी दर्जेदार उत्पादने , खास भारतीय (!) किंमतीत देऊ शकते यावर प्रथम विश्वासच बसला नाही पण अनेक कस्ट्मर रिव्हूज वाचल्या नंतर आणि ‘अर्बी’  च्या कस्टमर केअर शी बोलल्या नंतर माझी खात्री पटली  ,  माझ ‘वॉलेट’ ते हेच.

मग काय ताबडतोब ऑन लाइन ऑर्डर केले आणि फेडेक्स ओव्हरनाईट एक्स्प्रेस डिलीव्हरी ने वॉलेट अक्षरश: दुसर्‍या दिवशी हातात पडले !

वॉलेट बघताच , हाताळताच दिल खुष झाला, सिंप्लीसिटी, ब्युटी, इलेग्नस असे काही म्हणतात ना  हे हेच असावे!

या वॉलेट चा एक लहानसा  ‘अन बॉक्सिंग व्हीडीओ’  माझ्या मुलाने चि. यश ने शूट केला आहे तो माझ्या यु ट्युब चॅनेल वर अपलोड केला आहे.

 

 

शुभं भवतु

 

 

 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////
 1. संतोष

  धन्यवाद् सुहासजी, छान review आहे.

  हे कोणत्या website वरून घेतले त्याची लिंक कृपया द्याल का?

  संतोष सुसवीरकर

  0
  1. सुहास गोखले

   श्री संतोषजी .

   हे लेदर वॉलेट मी https://www.urby.in/ या वेबसाईट वरुन घेतले . ही वॉलेट बनवणार्‍या कंपनीची स्वत:ची वेबसाईट आहे. उर्बी वॉलेट फक्त इथेच मिळतात बाकी ऑन लाईन शॉप्स किंवा मॉल्स मधुन विकली जात नाहीत (हे असे डायरेक्ट उत्पादक ते ग्राहक अशी विक्री झाल्याने किंमत कमी ठेवण्यास मदत होते) . वॉलेट मध्ये बर्‍याच व्हाराटी आहेत साधारण रु १२५० ते रु १८०० अशा किंमती आहेत. अर्थात या दर्जाचे फिरंगी (इंपोर्टेड) वॉलेट घ्यायचे तर किंमत सहज रु ५००० च्या आसपास जाते त्या दृष्टीने हे स्वस्तच म्हणायचे ! साधारण अशीच वॉलेट आपले ‘टायटन’ पण बनवते त्याच्याही किंमती साधारण रु ९०० ते १३०० अशा आहेत, टायटन वॉलेट पण चांगलीच आहेत पण मला हवे तसे डीझाईन फक्त या उर्बी वाल्यां कडेच भेटले.

   शुभेच्छा

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.