आज मी आपल्याला ‘राहू केतू’ या खास विषयावर लिहलेल्या  इंग्रजी भाषेतल्या ग्रंथाची ओळख करुन देणार आहे.

सर्वप्रथम मी इथे नमूद करतो की ‘राहू व केतू’ हे वस्तुत: ग्रह नाहीत तर च्रंद्र आणि पृथ्वीच्या भ्रमणकक्षांचे छेदनबिंदू आहेत, त्यांना वस्तुमान ,आकारमान नाही, तरीही लिखाणाच्या सोयी साठी त्यांना ‘ग्रह’ असे संबोधले आहे.

मी हाच ग्रंथ परीक्षणा साठी निवडला कारण सध्या उपलब्ध असलेल्या अगदी ‘पराशरी’ पासुन ते ‘वसंतराव भटां पर्यंतच्या ग्रंथसंपदेत रवी, चंद्र , बुध, शुक्र, शनी मंगळादी ग्रहांवर भरभरुन लिहले गेले आहे . पण हे ‘राहू केतू ‘ नामक जे दोन ‘बेचारे बुरे आदमीं’ आहेत , त्या बद्दल अगदीच त्रोटक उल्लेख आहेत. मला वाटते या दोन्ही ग्रहांचा आवाकाच बर्‍याच जणाना आलेला नाही आणि भाषांतर करावे तर पुरेसा मालमसाला असलेले कोणतेच संस्कृत भाषेतले चोपडे सहजासहजी उपलब्ध नाही.

अनुवंशिकता,पुनर्जन्म, ग्रहणें व त्यांचे परिणाम, विष, विखारी वृत्ती, क्षुद्र विचार, खोटेपणा, तंत्रमंत्र, जारण मारण, स्मशाने, मृतात्मे व त्यांचे शाप, पूर्वजन्म व त्याचे भोग, एकांतवास, बंधनयोग, पिशाच्च्य योनी, वाईट स्वप्ने, अघोरी विद्या, चेटूक, लांडया लबाडया, आक्रस्ताळी वृत्ती, विरक्ती, योगसाधना, वैराग्य, तीव्र कठोर तपश्चर्या, संतति, संततितले दोष, घराण्यातले दोष, सर्पशाप, पितृ मातृशाप, संन्याशाचा शाप, गर्भपात, गूढता, विचित्रपणा, अशा अनेक आपल्या आकलना बाहेरच्या गोष्टींशी या दोन ग्रहांचा अत्यंत जवळचा संबंध आहे,

आपल्या जीवनातल्या प्रत्येक त्रासाला, समस्येला या ‘राहू केतू’ ना जबाबदार धरता येईल इतके ‘फायर पॉवर’ पोटेंशियल यांच्याकडे आहे, असे काहीसे विनोदाने म्हणता येइल ! फक्त या ग्रहांचे ‘मार्केटिंग’ शनी / मंगळा एव्हढे झालेले नाही!

या विषयावरची ग्रंथसंपदा अत्यंत मर्यादित आहे,   ‘Rahu Ketu Experience’ हा श्री प्राश त्रिवेदी यांनी लिहलेला ग्रंथ अशा मोजकया ग्रथां पैकी एक.

हा ग्रंथ अत्यंत अभ्यासपूर्वक लिहला आहे यात शंकाच नाही. लेखक स्वत: I.I.T graduate Engineer असल्याने त्याचा प्रभाव ग्रंथाच्या पाना पाना वर दिसून येतो. साधारण ज्योतिष विषयांवरच्या ग्रंथात आढळणारा ‘भोंगळपणा’, ‘विस्कळितपणा’, ‘पाल्हाळ’, ‘परस्पर विरोधी विधाने’, ‘तर्कशुन्यता’, ‘बाबा वाक्यं प्रमाणं’ , ‘विषयाचा आवाका लक्षात न घेता केलेली पोपटपंची’, ‘लिखाणातला ,कोणत्याही प्रकारची सुसुत्रता नसणे’, ‘स्वत:चा अभ्यास नसणे’, ‘क्षुल्लक , कमी महत्वाच्या बाबींवर पानेच्या पाने लिहणे व महत्चाच्या पण लेखकाला गैरसोयीच्या (म्हणजे लेखकाला स्वत:लाच न समजलेल्या) बाबींच्या तोंडाला पाने पुसणे’, ‘केलेल्या विधांनाच्या पुष्टयर्थ पुरेशी उदाहरणें न देणे’, ‘विषय समजावून सांगण्यापेक्षा पाने भरवण्याकडे जास्त कल’ या अशा गोष्टीं या ग्रंथात जवळजवळ नाहीत.

राहू केतू च्या परिणामांच्या अभ्यासासाठी लेखकाने निवडलेल्या केस स्टडीज सुध्दा अत्यंत समर्पक आहेत. ही नावेच बघा , राहू केतूची कारकत्वाचे दाखले द्यायला याहून अधिक काही लागेल का?

J. Krishnamurthy
Sigmund Freud
B.V. Raman
Albert Einstein
Edgar Cayce
H.P. Blavatsky
Adolph Hitler
Jimi Hendrix
Jim Morrison
Ramakrishna Paramahansa
Thomas A. Edison
Nostradamus
“Osho” Rajneesh
Queen Victoria
Bruce Lee
Indira Gandhi
Vivekananda
Jawaharlal Nehru

ग्रंथाची भाषा अत्यंत साधी, तरल प्रवाही आहे, , लेखकाने ठरवले असते तर त्याला अत्यंत जड , विद्वत्ताप्रचुर, जडजंबाल भाषा सहज वापरता आली असती पण हा मोह टाळून लेखकाने सोपी समजायला अत्यंत सोपी वाक्यरचना केली आहे, ज्यांचे इंग्रजीत फारसे वाचन नाही त्यांनाही सहज समजेल अशा ओघवत्या भाषेत ग्रंथ लिहला आहे. ग्रंथाची मांडणी व निर्मीती मूल्यें अर्थातच उच्च दर्जाची आहेत. (अर्थात परदेशी प्रकाशना बाबतीत, आता हा ग्रंथ भारतातल्या प्रकाशन संस्थेमार्फतही प्रकाशित झाला आहे ,तो पाहता न आल्यामुळे त्याच्या निर्मीती मूल्यांबद्दल मला माहीती नाही)

ग्रंथाची प्रस्तावनाच मोठी अर्थपूर्ण आहे, राहू केतू म्हणजे काय ते थोडक्यात सांगून इतर ग्रह व या दोन छेदन बिंदूं मधला नेमका फारक काय ते लेखकाने कमीत शब्दात पण समर्पकपणे सांगीतला आहे, लेखकाची विचारसरणी आधुनिक व जास्त शास्त्रीय वाटते.

ग्रंथाच्या पहिल्या प्रकरणात इजिप्शियन, ग्रीक, बाबिलेनियन, चीनी, मायन, नेटिव्ह अमेरिकन आणि अर्थातच भारतीय वैदीक संस्कृतींत ‘राहू व केतू ‘ या संकल्पना कशा रितीने व्यक्त झाल्या आहेत याचा एक संक्षिप्त , धावता आढावा घेतला आहे. बर्‍याच वेळा अशा ‘मायथॉलॉजीकल ‘ संकल्पनां मार्फत आपल्याला बरेच काही गवसत असते. ‘दशावतार, समुद्रमंथन, परशुरामाने समुद्र हटवून केलेली कोकणाभूमीची निर्मीती, अगस्ती ऋषींनी विंध्य पर्वताला वाकायला लावणे, भगीरथाने गंगा आणणे, जयद्रथाचा वध, ही आपल्या पुराणांमधली उदाहरणें अभ्यासली तर त्यामागचा खरा अर्थ किती वेगळा असू शकतो याची आपल्याला कल्पना येइल.

दुसर्‍या प्रकरणात राहू केतू चा विचार आजच्या पाश्चात्य व भारतीय ज्योतिषशस्त्रात कसा केला जातो आहे याचा आढावा घेतला आहे, कालमाना नुसार ज्योतिषांनी सुध्दा बदलले पाहिजे, जुन्या संकल्पनांचा मुळ गाभा कायम ठेवून आधुनिक काळातल्या बदललेल्या आचाराविचारां नुसार व बदललेल्या जीवन शैलींच्या अनुषंगाने काळात भविष्य कथनाचा रोख व बाज बदलता आला पाहिजे. काहीवेळा जुन्या कालबाहय संकल्पनांचा त्याग केला पाहीजे किंवा त्यात कालानुरूप सुसंगत बदल केले पाहिजेत. हयाच बरोबर वैदिक व पाश्चात्य संकल्पनांचा योग्य तो मेळ ही घातला पाहीजे . हया संदर्भातले लेखकाचे एक वाक्य वानगी दाखल देतो:

“One of the reasons for this is that nodes were seen to represent influences, which were not considered proper in the Middle Age’s society and culture. For example they are supposed to bring foreign influences into one’s life, which was seen as a sort of corruption of one’s soul, as all foreigners were looked down upon as Mlenchhas (out castes). This was in all probability done to maintain racial genetic purity. Nowadays, since things like foreign travel and foreign influences have become an accepted norm in urban India at least, the more progressive Vedic astrologers are beginning to see the nodes in a different light”

लेखक पुढे म्हणतो:

“Rahu is seen as a sort of Uranus and Neptune combined. It is supposed to carry the illusionary , imaginative, hallucinogenic, dissolving, and disintegrating influence of Neptune as it is the planet representing Maya (illusory quality of nature). It is also seen as an eccentric, creative, disruptive, individualizing and revolutionary force that Uranus embodies in the Western system.

Ketu is regarded as a psychic, willful, detaching, penetrating manipulative, and catastrophic force much in the same way as Pluto is seen in the Western system. The sign ruler-ship of Rahu and Ketu in the Vedic system confirms this identification.”

लेखकाचे खालील मत जरुर विचारात घेण्यासारखे आहे,

“The way Rahu and Ketu are perceived as karmic outlet and inlet points respectively in the Western system, is of much use in understanding what a soul has set out to achieve in its present incarnation. The transit results of the nodes as per the Western system also tabulate quite well with the observations. The area represented by the house transited by Rahu does receive the greatest attention and that by Ketu does require the greatest care. Applying the Western astrology principles in synastry also yields accurate results.”

ग्रंथातले तिसरे प्रकरण अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचे वाटले, याप्रकरणात या दोन्ही ग्रहांचा Appearance, Attributes and Significance या अंगाने संपूर्ण विचार केला आहे. ‘राहू केतू’ म्हणजे काय रे भाऊ? या प्रश्नाचे इतके चांगले उत्तर देणारा दुसरा ग्रंथ नाही असे मी म्हणालो तर ते चुकीचे ठरणार नाही,

चौथ्या प्रकरणात लेखकाने ‘राहू व केतू’च्या नक्षत्रांवर खूप चांगले लिहले आहे, याच प्रकरणात राहू केतू व नवमांश कुंडलीवर भाष्य आहे जे इतर कोणत्याच ग्रथांत तुम्हाला सापडणार नाही. नवमांशा कुंडलीत राहू केतु चा कसा विचार करायचा या बाबत लेखक एक यादीच देतो , कसे ते बघा:

The association of the nodes with the Aatmakaraka
The association of the nodes with the luminaries
The association of the nodes with planets in own or exalted signs.
The association of the nodes with the lord of the Ascendant of the navamsha chart or the lord of the asterism in which Moon is placed in the main chart.
The placement of the nodes in important houses like the first and tenth.
The Vargottama position of the nodes and their placement in
own, moola-trikon or exaltation sign

राहू केतू चा नवमांशाचा एव्हढा सखोल विचार आपल्याला इतरत्र कोठेच पहावयास मिळणार नाही.

पाचवे प्रकरण न्यूमरोलॉजी साठी आहे, माझा पूर्वी न्यूमरोलॉजीचा अभ्यास नव्हता किंबुहना न्यूमरोलॉजी कडे नेहमीच साशंक नजरेने बघत आलेलो आहे, पण या ग्रंथातले हे न्यूमरोलॉजी वरचे प्रकरण वाचताना मला बर्‍याच गोष्टिंचा खुलासा तर झालाच या विषयाबददलची उत्सुकता ही वाढली हे मान्यच करावे लागेल. ज्यांचा न्यूमरोलॉजी चा अभ्यास आहे अथवा या विषयांत रुची आहे त्यांच्या साठी लेखकाने बरेच वैचारीक खादय पुरवले आहे यात शंकाच नाही.

सहाव्या प्रकरणात लेखकाने Esoteric and Cosmological Significance हा भाग विस्ताराने हाताळला आहे, राहू केतु आणि सागर मंथन आपल्या परिचयाचे आहे, सागर घुसळला व त्यातून चौदा रत्ने मिळाली आजच्या काळातही हे सागरमंथन चालूच आहेफक्त त्याचे माध्यम व साधन बदलले आहे. या बाबतीत लेखक म्हणतो:

“We can see that the churning of the ocean story repeats itself again and again. Even in the modern times we can experience churning of the ocean through the industrial revolution and the scientific and technological progress. A lot of material goods and luxuries have come out of this churning but not without the deadly poison called pollution.”

पुढच्या सातव्या प्रकरणात लेखकने राहू (केतू) चे इतर ग्रहांशी होणार योग स्पष्ट केले आहेत.हे प्रकरण अभ्यासाच्या दृष्टिने अत्यंत महत्वाचे आहे, राहू – रवी , राहू – चंद्र , राहू –प्लूटो .. केतू –रवी , केतू –चंद्र , केतू-प्लूटो अशा क्रमानेप्रत्येक युतीयोगंचा विचार झाला आहे, विवेचन फार विस्तृत नसले तरी चपखल आहे, तर्कशुध्द आहे, जे लिहले आहे ते पटणारे आहे. उदा:केतु व बुधाच्या युती बददल लेखक लिहीतो:

“Ketu is a planet of deep insight, which when combining with Mercury’s adaptability and dexterity can give great intellectual and philosophical acumen This is the reason why it is a boon in the chart of astrologers. This combination can function well in any sign, provided there are other supporting factors like aspect and association of benefic. This combination usually gives a keen insight into the affairs of the house it is placed in. As usual the trinal aspect gives similar but diluted results.”

आठव्या प्रकरणात राहूकेतू संदर्भातल्या काही खास योगांचा विचार केला आहे त्यात शकट योग, गुरु चांडल योग , ग्रहणें व कालसर्प योग या प्रमुख चार महत्वाच्या योगांबद्दल विस्तृत चर्चा केली आहे.

नवव्या प्रकरणात दशा व ग्रहगोचरीच्या अंगाने राहू (केतू) चा विचार केला आहे. यात राहू (केतू) ची दशा ,त्यातल्या वेगवेगळया अंतर्दशा विदशांचा फारच विस्ताराने व सखोल असा विचार केला गेला आहे, हे प्रकरण वाचल्या नंतर अभ्यासकाला इतर ग्रहांच्या दशां बद्दलही असाच विचार करायची प्रेरणा मिळेल आणि असा विचार झाला तरच हे शास्त्र आपल्याला चांगले अवगत होइल असा मला विश्वास वाटतो.

दहाव्या प्रकरणात राहू (केतु) व व्यक्तीसंबंधा (SYNASTRY ) वर चर्चा केली आहे,विवाहासाठी पत्रिका अ‍भ्यासताना या प्रकरणातल्या संकल्पनांचा वापर केल्या शिवाय असा अभ्यास परिपूर्ण होणार नाही ईतके हे महत्वाचे आहे.

अकराव्या आणि बाराव्या प्रकरणात राहू –केतू यांच्या पत्रिकेतल्या स्थीती नुसार तयार होणार्‍या नोड्ल अ‍ॅक्सीस वर चर्चा आहे.राहू –केतू हे एकमेकांपासून 180 अंशात असल्याने ते कायमच प्रतियोगात असतात, त्यामुळे राहू लग्नात असेल तर केतू सप्तमात असतो किंवा राहू चतुर्थात असेल तर केतू दशमात येणार, या राहू –केतू च्या स्थितीचा पत्रिकेतल्या बर्‍याच घटकांवर प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष प्रभाव पडत असतो तो कसा याचे सुंदर विष्लेषण लेखकाने केले आहे.

अकराव्या प्रकरणात राशीगत स्थीतीमुळे होणार्‍या कॉम्बीनेशन्स चा विचार आहे

KETU in Aries / RAHU in Libra
KETU in Taurus / RAHU in Scorpio
KETU in Gemini / RAHU in Sagittarius
KETU in Aquarius / /RAHU in Leo
KETU in Pisces /RAHU in Virgo

बाराव्या प्रकरणात स्थान गत स्थीतीमुळे होणार्‍या कॉम्बीनेशन्स चा विचार आहे

IN THE FIRST/SEVENTH HOUSE AXIS

Rahu in the First/Ketu in the Seventh

Ketu in the First/Rahu in the Seventh

IN THE SECOND/EIGHTH HOUSE AXIS

Rahu in the Second/Ketu in the Eighth

Ketu in the Second/Rahu in the Eighth

IN THE SIXTH/TWELFTH HOUSE AXIS

Rahu in the Sixth/Ketu in the Twelfth
Ketu in the Sixth/Rahu in the Twelfth

तेराव्या प्रकरणात एक खास विषय हाताळला आहे तो म्हणजे:

Genetics and Reincarnation (अनुवंशिकता आणि पुनर्जन्म), राहू आणि केतू यांचा या दोन्हींशी अत्यंत जवळचा संबंध आहे , व्ययातल्या केतूची फळें जी आपल्या जुन्या ग्रथांमध्ये दिली आहेत ती पाहता याची खात्रीच पटते, या बाबतीत लेखकाने मांडलेली मते विचारार्ह असून त्याचा भविष्य कथनात अचूकता आणण्यासाठी निश्चीत उपयोग होईल.

चौदाव्या प्रकरणात लेखकाने आजच्या आधुनिक काळात राहू – केतू चा अन्वयार्थ कसा लावायचा यासाठी काही प्रातिनिधीक उदाहरणें देऊन संकल्पना सुस्पष्ट केली आहे.

Relevance in the present day and Age

WW-I
WW-II
Atomic bobing on Japan
USA chart
Solar Eclipse on 21 June 2001

शेवटच्या पंधराव्या प्रकरणात राहू – केतू च्या संदर्भातली तत्सम माहीती पुरवली आहे  ती अशी:

 • Deity
 • Mantra
 • Yantra
 • Cems
 • Herbs, Foods, Scents & Oils
 • Symbols
 • Colours & Clothing
 • The’Red Book’ Remedial Measures
 • Miscellaneous

एकंदर पाहता राहू – केतू या दोन छाया ग्रहांचा ईतका सांगोपांग विचार केलेला दुसरा कोणताही ग्रंथ माझ्यातरी पाहण्यात नाही. या ग्रथाच्या अभ्यासातून या दोन छाया ग्रहां बद्दल संपूर्ण माहीती तर मिळतेच पण त्याहूनही मह्त्वाचे म्हणजे वाचकाची स्वत:ची विचार करण्याची क्षमता विकसित होते, कोणत्याही शास्त्राच्या अभ्यासकाला अशी क्षमता असणे व ती उत्तरोत्तर विकसित होत राहणे आवश्यक असते. अशी क्षमता एकदा का प्राप्त झाली की मग गुरु वा ग्रथांच्या कुबड्या न वापरता अभ्यासक आत्मविश्वासाने या शास्त्रात निश्चीत प्रगती करु शकतो.

लेखकाने राहू-केतू वरील ग्रथांचा अभाव भरुन तर काढलाच आहे शिवाय वर लिहलेली क्षमता निर्माण करण्याच्या हेतू ने लिखाण व मांडणी केली आहे , यातच या लेखकाचे व या ग्रथाचे यश सामावले आहे.

The Rahu Ketu Experience : Everything you wanted to know about Rahu & Ketu

by Prash Trivedi

ISBN (Paperback):  0081950049, 9780081950049

Price(Hardbound): 325.00 INR

Price (Paperback): 225.00 INR

Pages: xxii, 392

Language: English

Year of Pub.: 2012

हा ग्रंथ इथे उपलब्ध होऊ शकेल:

http://www.mlbd.com/BookDecription.aspx?id=15603

The Rahu & Ketu Experience

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////
 1. swapnil kodolikar

  सर राहू केतू किवा वाईट ग्रह योग या बद्दल उपाय असतात त्याबद्दल आपले मत काय आहे ? त्यांचा उपयोग होतो काय ? कारण श्री .ह मो .गांधी यांचे फालाजोतीश शात्स्त्र वास्तविकता या अशा काहीशा पुस्तकाचे नाव आहे त्या पुस्तकात त्या त्या ग्रहाची रत्ने कशी वापरावीत याचा वाज्ञानिक पद्धतीने विवेचन दिले आहे . अनुभव दिले आहेत अगदी आपल्या सारखे . मग या रत्नाचा काही उपयोग होतो काय ?

  आपला अभ्यास व्यासंग एकूण म्हणजे परस्पर विरोधी मते एकूण आमचे Confuesion वाढले आहे . कृपया मार्गदर्शन कराल काय ?

  0
  1. सुहास गोखले

   स्वप्नीलजी,
   धन्यवाद,

   या बाबतीत मी माझ्या ब्लॉग वर बर्‍याच वेळा लिहले आहे. ग्रह घटना घडवून आणत नाहीत तर ग्रह कोणत्या घटना घडणार व त्या केव्हा घडणार यांचे संकेत आहेत, ग्रह हे दगड – माती आणी विषारी वायुंचे गोळे आहेत, तुमची पूजा . जप, दान त्यांना कळत नाही, ते खूष होत नाहीत की रागवात नाहीत, सुर्या भोवती फिरण्या पलीकडे ते काहीही करु शकत नाही . ग्रहांची पूजा करुन , जप करुन, स्त्रोत्रे म्हणून , खडे वापरुन काहीही लाभ होणार नाही. हे उपाय भाकड आहेत , जातका कडून पैसे उकळण्याचा तो एक मार्ग आहे, जातकावर घातलेला शास्त्र शुद्ध दरोडा आहे. चांगली कर्मे करणे हा एकमेव उपाय आहे. (खरे बोलणे, चोरि न करणे, सत्पात्री दान देणे , सेवा करणे, सगळ्यांशी चांगले वागणे, क्षमा करणे- विसरुन जाणे इ.)

   शुभेच्छा .
   सुहास

   +1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.