घागर में सागर!

ज्योतिषाचा अभ्यास चालू होतो आणि मग एक एक करत ग्रंथ जमवायला सुरवात होते, सुरवातीला काहीच माहीती नसते, हा ग्रंथ चांगला वाटतोय, हया लेखकाचे नाव ऐकलय, हा ग्रंथ जाडजूड आहे , तो स्वस्त आहे , हा यांनी सुचवलाय , असे करत ग्रंथांची ही गर्दी जमते. बाजारात सहजतेने उपलब्ध असलेल्या ग्रंथसंपदे कडे एक नजर टाकली असता हे लक्षात येते की केवळ ‘तोंड ओळख’ या पलिकडे जाणारे फारच थोडे ग्रंथ आहेत.

ह्या शुष्क बर्गर सारखे  हे ग्रंथ ही  ‘प्राथमिक स्तर’ या श्रेणीत मोडतात. यातल्या बर्‍याच ग्रंथात तोच तोच निरस मजकूर असतो. काय आहे ह्या बर्गर मध्ये सांगा बरे?  चीज नाय, सॅलड नाय, सॉस नाय , अरे, निदान त्या ‘बन’ वर तीळ लावून तो जरा खरपुस भाजून तरी द्यायचा ना?  चालेल हा असला बर्गर सुद्धा  एकवार चालवून घेऊ, पण बर्‍याचवेळा या अशा ग्रंथांतून दिलेल्या माहितीतही एक वाक्यता नसते. नुसता वैचारीक गोंधळ निर्माण करण्यापलीकडे यातून काही साध्य होत नाही.

समजा यातले काही बरे म्हणता येतील असे काही ग्रंथ निवडून घेतले तरी एक समस्या राहतेच ती अशी की हे सर्व ग्रंथ देत असलेली माहीती (ग्रह, त्यांची कारकत्वें, त्यांची स्थानगत / राशीगत फळे इ.) जरी बरोबर असली तरी ‘भविष्य कथना साठी एव्हढाच ‘मसाला’ पुरेसा ठरत नाही! मग अभ्यासकाला काही ‘मध्यम श्रेणी’ गटात मोडणारे ग्रंथ पहावे लागतात पण इथे अडचण ही की हे ग्रंथ बर्‍याच वेळा एखाद्या खास विषयाला वाहिलेले जसे ‘ग्रहयोग’ ,‘ग्रह गोचर’ , ‘नवमांश’, ‘दशा पद्धती’, ‘प्रश्नशास्त्र’, ‘प्रोग्रेशन’ इ. असे ‘खास’ विषयाला वाहीलेले ग्रंथ जरी अत्यावश्यक असले तरी असे ग्रंथ घेणे , वाचणे, मनन करणे इ व्यासंग करायला वेळ कमी पडतो. मग असा एखादा ग्रंथ आहे का जो या सर्व अंगाना निदान स्पर्श करुन तरी करुन जाईल आणि दर्जेदार ही असेल. उगाच आपले तोंडाला पाने पुसल्या सारखे करणारा किंवा झटपट रंगार्‍या सारखा रडीचा खेळ खेळणारा नसावा. असा एखादा ग्रंथ आहे का कोठे?

हे म्हणजे अतिच झाले हो!

पण ‘पसिने की बदबू’  ला ‘लाईफबॉय’ सारखा आसान उपाय जिथे असतो तिथे असा ग्रंथ का असणार नाही!!

आहे हो, अगदी असाच एक ग्रंथ बाजारात माफक किंमतीत उपलव्ध आहे , आणि अगदी केवळ याच कामासाठी लिहीला गेला आहे. ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासाच्या प्रत्येक टप्प्यावर हा ग्रंथ तुम्हाला साथ तर देईलच शिवाय नंतरही एखाद्या ‘टेलीफोन डिरेक्टरी ‘ ‘डिक्शनरी’ ‘रेडी रेकनर’ सारखा सदैव हाताशी येईल.

या ग्रंथा बद्दल जर मला आधीच माहिती असती तर माझ्या ग्रंथ संग्रहातले किमान 10 तरी ग्रंथ नक्कीच कमी झाले असते.

हे ‘कुक बुक’ आहे का? हो, हे ‘कुक बुक’ च आहे. मी व्यक्तीश: या ‘कुक बुक’ प्रकाराच्या अगदी विरुद्ध असून सुद्धा या ग्रंथाची शिफारस करत आहे, कारण मी या ग्रंथाकडे एक ‘टेलीफोन डिरेक्टरी ‘ ‘डिक्शनरी’ ‘रेडी रेकनर’ अशा दृष्टीनेच पाहतो आहे. इतकी सर्व माहीती एकाच ठिकाणी क्वचितच पाहावयास मिळेल.

 

 

या ग्रंथात काय आहे हे विचारण्यापेक्षा काय नाही हे विचारा! ही अनुक्रमणिकाच बघा , लगेच लक्षात येईल:

आहे ना , सगळे , का राहीलय काही? ‘घागर में सागर’ मी उगाच म्हणालो नाही!

 

हे सगळे ठीक आहे, सगळे आहे हे दिसतय तर खरे, पण नुसतीच खोगीरभरती तर नाही ना?  शंकासुरांनो, आपली शंका रास्त आहे, तेव्हा आता सोदाहरण स्पष्टीकरण देणे आलेच! म्हणतात ना ‘आलीया भोगासी असावे सादर!”

 

 

 

चला, सांगतोच मग , सगळे विस्कटून, आप भी क्या याद करोगे!!

अहो हा नुस्ता वडा-पाव नाही तर चक्क फुल्ल ‘गुजराथी थाळी’ आहे हो !

 

 

ग्रंथाच्या सुरवातीस लेखक अर्व ग्रहांची संपूर्ण माहीती देतो, ह्यात प्रत्येक ग्रहा बद्दल प्राथमिक माहिती : Friends ,  Enemies , Neutral , Lord of, Mooltrikona, Exaltation,Debilitation, sex , Direction, Lucky stone, Luck colors,  Lucky nos,  Deity , ग्रहाचा ‘बीज मंत्र, ग्रहाचे कारकत्व, ग्रहाने दर्शवलेले व्यवसाय , ग्रहाच्या अंमला खालचे शरीराचे अवयव , आजार, ग्रहाची प्रमुख लक्षणें, ग्रहाची नक्षत्र गत फळें, ग्रहाची राशीगत फळें, ग्रहाची स्थान गत फळें, ग्रहाची इतर ग्रहांशी झालेल्या ग्रहयोगांची फळे, ह्या ग्रहा बद्दल काही अनुभसिद्ध ठोकताळे अशी भरगच्च माहीती आहे आणि ती अगदी शिस्तबद्ध रित्या मांडलेली आहे. उदाहरण द्यायचे तर हे पहा: (मूळ ग्रंथातले पृष्ठ स्कॅन करुन इथे छापणे ‘प्रताधिकार’ कायद्यान्वये गुन्हा ठरेल म्हणून त्या पृष्ठाची मांडणी कशी आहे याचे हे चित्र मी तयार केले आहे)

‘कुक बुक असले तरी माहीत दर्जेदार आहे, निरीक्षणे चपखल आहेत, पडताळा येणारी आहेत, नियमांची कारण मिमांसा दिली नसली (आणि तशी ती इतर कोणत्या भारतीय लेखकाच्या पुस्तकात दिलेली असते?) तरी थोडसा तर्क लढवल्यास ते कसे तयार झाले असतील याचा लक्षात येणे सहज शक्य आहे.

उदा:

बुध त्रितीय स्थानात असल्यास मिळणारी फळें कोणती लिहली आहेत ते पहा:

“Fond of travels, fine voice, happy disposition, beautiful handwriting, timid.”

3 रे स्थान हे लहान अंतरावरचा प्रवास, वाचा(बोलणे), लिखाण यांचेच असल्याने ह्या स्थानात ह्या कारकत्वाचा बुध असल्याने ही फळे जास्त ठळकपणे मिळतात.

तसेच हा नियम बघा “Sun Moon in 2nd or 8th denies wealth” 2 आणि 8 ही पैशाची स्थाने आहेत , रवी आणि चंद्र एकत्र म्हणजे अमावस्या!

या प्रमाणे रवी , बुध, शुक्र, मंगळ … राहु, केतु असे नऊ ग्रह ( हर्षल, नेपच्युन, प्लुटो यांचा समावेश नाही हे दुर्दैव) या पद्धतीने समजावून सांगीतल्यानंतर लेखक बारा राशींकडे वळतो.

प्रत्येक राशी बाबत: राशी स्वामी, चिन्ह, या राशीत समाविष्ट असलेली नक्षत्रें, शुभ ग्रह, अशुभ ग्रह, तटस्थ ग्रह, मारक, बाधक, योगकारक, उच्चतम अंश, उच्च, निच व मूलत्रिकोण ग्रह, अनकूल राशी, अनूकूल चंद्राचे चे अंश, प्रतिकूल अंश, शुभ रंग, सुगंध, रत्ने/उपरत्ने, दिवस, राशीचे चांगले आणि वाईट गुणधर्म, या राशीच्या व्यक्तींचे गुण – अवगुण (हा भाग फार चांगला लिहला गेला आहे), या राशीने दर्शवलेले रोग व शरीराचे अवयव, या राशीच्या जन्मलग्ना साठीचे धनयोग, ही रास जन्मलग्नी असता ईतर ग्रहस्थिति वरुन अनुभवास आलेले काही ठोकताळे (हा पण भाग फार चांगला लिहला गेला आहे) असा भरगच्च मजकूर आहे. सर्व माहीती एकत्र  तक्त्याच्या (Tabular) स्वरुपात उपलब्ध असल्याने ज्योतिषाचे काम फार सोपे होते.

ग्रह आणि राशी झाल्यानंतर लेखक पत्रिकेतल्या बारा भावां बद्दल लिहतो. प्रत्येक भावा बाबत:

मुख्य कारकत्व, कारक ग्रहभावाने सुचित केलेला नाते संबंध (भाऊ, वडिल, आई , पत्नी इ), भावाने सुचित केलेले शरीराचे अवयव, भाव बलशालि / कमकुवत असताना मिळणारी फळें,

ह्या नंतरचा भाग जो काही अनुभवसिद्ध ठोकताळ्यांच्या स्वरुपात आहे , तो केवळ अप्रतिम आहे, केवळ ह्या साठी हा ग्रंथ विकत घ्यावा असे मी सुचवेन.

ग्रह, राशी , ग्रहयोग आणि भाव हे पत्रिकेचे चार आधारस्तंभ विस्ताराने सांगीतल्या नंतर लेखक प्रत्यक्ष ‘भविष्य कथना’ कडे वळतो.

पत्रिका हातात आली की नेमका त्याचा अभ्यास कसे सुरु करायचा हे ह्या भागात सांगीतले आहे, प्रत्रिकेची बलस्थाने आणि कमकुवत बाजू कशा हेरायच्या हे सांगीतले आहे. ग्रहाचा व भावाचा अभ्यास कसा करायचा हे सांगताना लेखक लिहितो:

Briefly, while judging a horoscope, following factors are considered to understand a planet:
1. His tenanting of a house
2. His lordship;
3. His natural karkatawas
4. His functional duties;
5. His strength
6. His major or sub periods
7. Transit of planets over his natal position
8. Aspects received
9. Depositor

Judgment of a house: Examine a horoscope in the following sequence :
First look to a house:
1. Its natural qualities (Karkatwa)
2. Planets posited there in;
3. Aspects which the house and planets in it receive
4. Whether lord of the house is well placed from lagna
5. Whether lord of house is we ll placed from his own house(s)

Next see who is the lord of house
6. Its location in sign and house
7. Aspects received by it, whether good or bad
8. Planet s in conjunction , whether good or bad
9. Qualities (Karkaltawa)
10. IN exaltation, debilitation, in a friendly house
11. Whether he is combust or defeated in war or is weak

याच भागात ‘भावात भावम’ ह्या महत्वाच्या तंत्राची ओळख करुन दिली आहे , हे महत्वाचे.

आपण  ज्योतिष विषयक लिखाणात नेहमी वाचतो  ‘शुक्र बिघडला’ किंवा ‘गुरु प्रबळ आहे’ किंवा ‘अमुक भाव बाधीत आहे’ इ. हे नेमके काय , ते कसे ठरवायचे ही शंका बर्‍याच जणांच्या डोक्यात असते, त्याचे उत्तर या भागात मिळेल.

या पुढचा भाग आहे ‘खास ग्रह योगांचा  ‘ उदा: ‘गजकेसरी’, ‘नाभस’ . ‘लक्ष्मी’. ‘शकट’ योग इ. पण हा भाग फारसा विस्ताराने लिहला गेला नाही , पण त्याची काही आवश्यकता नाही, कारण ह्या विषयावर इतरत्र चांगले लिखाण उपलब्ध आहेच शिवाय हे सर्व योग म्हणजे एक ‘बकवास’ आहे , यातले योग क्वचितच फळें देताना दिसतात हे विदारक सत्य आहे, तेव्हा या योगांच्या अभ्यासात व ते लक्षात ठेवण्यात फारसा वेळ घालवू नये, फारतर ह्या योगा मागची मूल तत्वे समजाऊन घेतली तरी पुरेसे आहे.

या पुढचे भाग खास विषयावरचे आहेत (Specialist Topics) आणि अतिशय विस्ताराने व सखोल माहीती ने परिपूर्ण आहेत.

खास विषय आहेत:

आयुर्दाय (आयुष्यमान व मृत्यू)
विवाह व वैवाहीक जीवन
संतती
सेक्स आणि अस्ट्रोलॉजी
स्त्री जातक
आरोग्य
व्यवसाय

हे सर्व विषय त्रोट्क रित्या का होईना पण उत्तम रित्या हाताळले यात शंकाच नाही. निदान ह्या विषयाचा अभ्यास नव्याने करणार्‍याला यातून बरेच वैचारीक खाद्य मिळेल याबाबत मला तिळमात्र ही संदेह नाही. अवश्य वाचा , मी ही अधूनमधून याचा आधार घेतो हे मान्य करतो.

या नंतर लेखक कालनिर्णया ह्या ज्योतिषातल्या महत्वाच्या विषयाकडे वळतो.

या विभागात:

दशा
गोचर भ्रमणे व त्याचा परिणाम
परदेश प्रवासाचा कालनिर्णय

पुढचा विभाग विवाहा संदर्भात पत्रिका जुळतात का ते कसे पहायचे या बाबतचा आहे.

ह्या नंतरच्या विभागात अष्टकवर्ग या काहीशा दुर्लक्षित पद्धतीची ओळख करुन दिली आहे. हा भाग तितकाचा चांगला लिहला गेला नाही. ज्यांना अष्टकवर्गा बद्दल जरा जास्त अध्ययन करायचे आहे त्यांनी या विषयावरची ज्याला अल्टीमेट म्हणता येतील अशी    श्री . विनय आदित्य यांची पुस्तके जरुर वाचावीत.

ह्या नंतरच्या विभागात मुहुर्त शास्त्राची ओळख करुन दिली आहे. हा भाग खुपच विस्ताराने लिहला आहे, मला आवडला , मुहूर्त शास्त्रा वर फारच थोडी पुस्तके उपलब्ध आहेत.  ज्यांना ‘मुहुर्त शास्त्रा ‘  बद्दल जरा जास्त अध्ययन करायचे आहे त्यांनी या विषयावरचा  ज्याला प्रमाणभूत मानला जातो तो श्री. बी.व्ही. रमण यांचा ग्रंथ जरुर वाचावा.

ह्या नंतरच्या विभागात होरारी म्हणजेच प्रश्न शास्त्राची ओळख करुन दिली आहे. पण हा विभाग पारंपारीक प्रश्नशास्त्रा वर आधारित आहे. ती पद्धत आजच्या काळात फारशी उपयोगी पडत नाही किंवा त्याचा पडताळाही येत नाही पण के.पी.  किंवा तत्सम पद्धतीचा अवलंबन करताना , ह्या ग्रथांत सांगीतलेल्या आडाख्यांचा खूबीने उपयोग करुन घेता येईल असा मला विश्वास वाटतो.

ह्या नंतरच्या विभागात ‘ खडे, रत्ने व तसम तोडग्यांबाबत’ काही त्रोट्क माहीती दिली आहे.

शेवटच्या काही पृष्ठांत उपयुक्त महत्वाचे तक्ते व सुचि दिल्या आहेत.

शेवटी काही झाले तरी हा ग्रंथ केवळ ‘टेलीफोन डिरेक्टरी ‘, ‘डिक्शनरी’ ‘रेडी रेकनर’ सारखाच वापरायचा आहे , ‘अभ्यास ग्रंथ म्हणून याच्या कडे पहाणे कदाचित बरोबर ठरणार नाही. पण जे काही आहे ते चांगले आहे, उपयुक्त आहे,

अच्छे वाला है , सस्ते वाला है , अमा ये तो सचमुच  विठ्ठल कामत है !

ग्रंथाचे तपशील:

PRACTICAL VEDIC ASTROLOGY – A COMPLETE SELF LEARNING TREATISE

(Fourth Revised and Enlarged Edition )

G.S. Agarwal. lAS (Retd.)

400 पृष्ठे , कागदी बांधणी

http://www.sagarpublications.com/author/g-s-agarwal/

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

0 प्रतिक्रिया

///////////////
 1. abhijit sagvekar

  पुस्तकाच्या माहीती बद्दल धन्यवाद
  आपल्या मराठी भाषेत अशी पुस्तके नाहीत का
  कुपया मराठी भाषेतील अशी पुस्तके सुचवा
  याआधीच्या कमेंटस ना प्रतिसाद दिल्याबद्दल आभार

  आभिजीत सागवेकर

  0
  1. सुहास गोखले

   अभिजीतजी,

   अभिप्रयाबद्दल धन्यवाद.
   ज्योतिषावर मराठीत पुस्तकें नाहीत असे नाही, अगदी भरपूर आहेत पण त्यात दर्जेदार म्हणता येतील अशी हाताच्या बोटावर मोजण्या ईतकी ही नाहीत. माझ्या आधीच्या (जुन्या) पोष्ट मध्ये मी मराठितल्या काही ग्रंथांची यादी दिली आहे ती नजरे घालून घालावी. चांगले काही वाचावताचे असल्यास आपल्याला नाईलाजाने इंग्रजी भाषेतल्या पुस्तकांचा त्यातही पाश्चात्यांनी लिहलेल्या ग्रथांचाच आधार घ्यावा लागतो. त्याला इलाज नाही, इंग्रजी वाचनाची सवय करुन घेणे भाग आहे.

   कळावे लोभ असावा ही विनंती
   सुहास

   0
 2. santosh

  NAMASKAR SIR
  TUMHICH HE GRANTH MARATHIT ANUVADIT KA KARIT NAHI,,,,,,
  PLEASE….APEKSHA AHE,
  THANK YOU.

  0
  1. सुहास गोखले

   श्री. संतोषजी,
   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   एखाद्या ग्रंथाचा अनुवाद करायचा असेल तर त्या ग्रंथाच्या लेखकाची / ग्रंथाच्या प्रकाशकाची लेखी परवानगी घ्यावी लागते. अनुवादाचे काम बरेच वेळ , पैसा आणि मेहेनत लागणारे असते.

   शुभेच्छा !

   सुहास

   0
 3. swapnil kodolikar

  सर एखादे मराठीतले पुस्तक सुचवलं काय कारण आमचे इंग्रजी एवढे fluent नाही हो .

  0
  1. सुहास गोखले

   स्वप्निलजी,
   धन्यवाद.
   दुर्दैवाने मराठीत असे एकही पुस्तक नाही. पण इंग्रजी तले ज्योतिष शास्त्रावरचे पुस्तक वाचणे तितकेसे अवधड नाही. नेहमीचीच भाषा असते, ठ्रावीक शे -दोनशे शब्द असतात, एकदा त्यांची सवय खाली की मग अवधड वाटत नाही. त्यातही भारतीय लेखकांची पुस्तकें फारच सोप्या इंग्रजीत लिहलेली असतात. आपण प्रयत्न करा , जमेल . ज्योतिषा वर चांगले असे काही इंग्रजीतच आहे, तेव्हा त्याचा सराव होणे , वळण पडणे गरजेचे आहे.

   शुभेच्छा .
   सुहास

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.