वसुधाताईंचे एक किंमती (जास्त रकमेचे) ‘गिफ्ट कार्ड’ हरवले!

“पंधरा दिवसापूर्वी मी ‘शॉपर्स स्टॉप’ मध्ये बरीच शॉपिंग केले तेव्हा एक गिफ्ट कार्ड मिळाले होते, पण घरी परत आल्यावर ते कार्ड नेमके कोठे ठेवले ते आता आठवत नाही. माझी पर्स, क्रेडिट कार्ड वॉलेट, टेबलाचा ड्रावर, कपाट सगळ्या ठिकाणी चार चार वेळा बघून झाले पण कार्ड कोठे सापडत नाही…”

“मग बहुदा तांदळाच्या किंवा रव्याच्या डब्यात असेल, तुम्हा बायकांची बँक असते असल्या डब्ब्यात!”

“नाही हो, तिथेही नाही, वेड्या सारखे सगळे डबे पण उघडून पाहिले, पण कार्ड तिथेही नाही”

“घरातल्या इतर लोकांना विचारले का?”

“अहो घरात आहेत किती माणसे? रोहन नोकरीला दिल्लीला गेल्या पासून मी आणि विश्वासराव (वसुधाताईंचा नवरा) दोघेच तर घरी असतो. यांना विचारले तर काही माहिती नाही म्हणाले”

“कामवाली बाई?”

“काशीबाई? त्या आमच्या कडे गेल्या दहा वर्षांं पासून काम करत आहेत, एकदम विश्वासू,  शिवाय त्यांना हे गिफ्ट कार्ड’ म्हणजे काय हेच माहिती नसणार, कॅश, दागिना असता तर गोष्ट वेगळी”

“हो ते ही खरेच, मग घरात बाहेरचे दुसरे कोणी आले होते का?”

“नाही, गेल्या आठवड्यात तसे कोणी नाही, आणि कोणी परकी व्यक्ती आली तरी आमच्या वरच्या मजल्यावरच्या खोल्यां पर्यंत नक्कीच नाही”

हरवलेल्या वस्तू च्या बाबतीत ती वस्तु हरवली का चोरी झाली हे तपासण्या साठी असे प्रश्न विचारून खुलासा करून घेणे आवश्यक असते!

“म्हणजे कार्ड घरातच आहे फक्त इकडे तिकडे, कोठेतरी डाव्या हाताने ठेवले गेल्याने गळबटले आहे असे समजायचे”

“हो, तसेच म्हणावे लागेल, जरा बघा ना तुमच्या शास्त्राच्या साह्याने काही तपास लागतो का?”

“ठीक आहे, मी एक प्रयत्न करून पाहतो”

…..

वसुधाताईंनी विचारलेला प्रश्न मला जेव्हा पूर्णपणे समजला ती वेळ, तो दिनांक आणि नाशिक शहर हा तपशील वापरून केलेली प्रश्नकुंडली शेजारी दिली आहे.

 

22 Apr 2018 19:25:58 Nasik 73e48’00 19n59’00 Geocentric Tropical Regiomontanus

प्रश्नकुंडली सायन पद्धतीची आणि रेजिओमोनटॅनस हाऊस सिस्टिम प्रकाराची आहे याची नोंद घ्या!

 

 

 

चला तर शोधून काढू या हे गिफ्ट कार्ड…

प्रथम पत्रिकेचा प्राथमिक अभ्यास. या टप्प्यावर पत्रिकेत सर्वमान्य अशी ‘Strictures against Judgment ( Considerations)‘ आहेत का याचा त्पास करावयाचा असतो.
(Strictures = A restriction on a person or activity)

ह्या संदर्भात:

“When a baby cries, or a cat meows, we stop to listen, since something could be wrong…

Medical doctors understand that experiencing pain is a ‘good’ warning sign, if we can diagnose ailments or illness early enough, we can eventually heal patients and they become healthier.

In an automobile, if an engine or body part breaks down, a warning light comes on in the dashboard.
By observing the warning light, you also avoid serious injury or death.

In Horary Astrology, we are also fortunate in that the universe provides for warning signs to let us know that something is wrong…and therefore, the chart cannot be judged.

These warnings are called the Strictures against Judgement and they are unique to Horary Astrology, alone, in that no other type of astrology has them (as far as I am aware) ?

One of the precepts of Horary astrology is that, unlike a personal natal chart, a horary chart gives no exclusive ‘rights’ to the querent to ask for an opinion, so it is very much a privilege.

In other words, Horary astrology is similar to the Supreme Court, in that good reasons should be obtained prior to hearing your case. The application might get approved or rejected and they don’t have to give you a reason, either. The horary astrologer is supposed to be ( in theory) a ‘judge’ from the higher bench…and therefore, an astrologer of higher skill than a mere ‘general’ natal astrologer…

Meanwhile, if you are a persistent, annoying questioner or ask the same question more than once, a stricture against judgement often appears, primarily to deter people from abusing the system. If you are trying to test the validity of horary astrology, another warning bell often goes off.

These strictures will also appear if you, the querent, haven’t understood the question properly, are mentally incapacitated or are too negative, in nature ?”

१) पत्रिकेत वृश्चिक लग्न १० अंशावर उदित होत आहे म्हणजे हा ‘अर्ली’ किंवा ‘लेट’ असेंडंट नाही.
२) शनी तृतीय स्थानात आहे म्हणजे लग्न अथवा सप्तम स्थानात नाही.
३) चंद्र कर्केत २८ अंशावर आहे! चंद्र ही कर्क रास ओलांडे पर्यंत अन्य कोणत्याही ग्रहाशी कसलाही योग करणार नाही त्यामुळे चंद्र ‘व्हॉईड ऑफ कोर्स’ आहे!

चंद्र जेव्हा असा ‘व्हॉईड ऑफ कोर्स’ असतो तेव्हा प्रश्ना संदर्भात जातकाला काहीही करता येत नाहीम, जे जे होईल ते पाहाणे इतकेच काय ते जताकाच्या हातात राहिलेले असते! पण असे असले तरी चंद्र ‘व्हॉईड ऑफ कोर्स’ या कारणास्तव पत्रिका ‘रॅडीकल’ नाही म्हणून अ‍ॅनालायसिस करायचे नाही असे अजिबात नाही, चंद्र ‘व्हॉईड ऑफ कोर्स’ असताना जातकाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी मिळण्याची शक्यता जास्त असते इतकेच.

इथे चंद्र कर्केत असताना २८ मेष ४२ वरच्या ‘युरेनस’ शी ‘केंद्र योग’ करणार आहे पण सामान्यत: वेस्टर्न होरारीत या युरेनस, नेपच्युन आणि प्लुटो (आणि राहू / केतू) यांना फार विचारात घेतले जात नाही. त्यामुळे आपल्या दृष्टीने चंद्र युरेन्स शी योग करत असला तरी तो ‘व्हॉईड ऑफ कोर्स’ आहे.

या खेळात कोण कोण खेळाडू आहेत?

१) वसुधा ताई

२) गिफ्ट कार्ड

मामला हरवलेल्या वस्तूचा ‘गिफ्ट कार्ड’ चा आहे त्यामुळे ‘वसुधा ताई’ आणि ‘गिफ्ट कार्ड’ या व्यतिरिक्त आणखी कोणी घटक / खेळाडू विचारात घ्यायची आवश्यकता नाही.

आता ह्या खेळाडूंचे प्रतिनिधित्व कोणते ग्रह करणार आहेत ते ठरवू.

वसुधाताई:

वृश्चिक लग्न १० अंशावर उदित आहे, म्हणजे वृश्चिकेचा स्वामी ‘मंगळ’ वसुधाताईंचे प्रतिनिधित्व करेल. गुरू पण लग्नातच आहे त्यामुळे तो ही वसुधाताईंचा आणखी एक प्रतिनिधी म्हणून काम बघेल. चंद्र हा सामान्यत: प्रश्नकर्त्याचे प्रतिनिधित्व करतो पण ही घटना ‘हरवले – सापडले’ प्रकारातली असल्याने इथे चंद्र हा हरवलेल्या वस्तूचा नैसर्गिक प्रतिनिधी असेल, त्याला वसुधाताईंचे प्रतिनिधित्व मिळणार नाही.

गिफ्ट कार्ड:

‘गिफ्ट कार्ड’ हरवले आहे, आता ही एक प्रकाराची रोख रक्कमच असते फक्त ती एका ठरावीक ठिकाणी स्वीकारली जाते इतकेच. रोख रक्कम, मौल्यवान वस्तू, दागिने, वैयक्तिक वापराच्या वस्तू, जंगम मालमत्ता इत्यादी आपण द्वितीय (२) स्थानावरून बघतो.  त्यामुळे द्वितीयेश आणि द्वितीय स्थानातले ग्रह हे या हरवलेल्या ‘गिफ्ट कार्ड’ चे प्रतिनिधित्व करतील.

द्वितीय (२) स्थानावर गुरूची धनू रास ७ अंशावर आहे, द्वितीय स्थानात एकही ग्रह नाही. म्हणजे धनेचा स्वामी गुरू हरवलेल्या ‘गिफ्ट कार्ड’ चे प्रतिनिधित्व करेल. चंद्र हा हरवलेल्या वस्तू चा नैसर्गिक प्रतिनिधी म्हणून गृहीत धरलाच आहे.

रोख रक्कम, मौल्यवान वस्तू, दागिने, वैयक्तिक वापराच्या वस्तू, जंगम मालमत्ता इत्यादी साठीं ‘शुक्र’ हा नैसर्गीक प्रतिनिधी मानला जातो, इथे याचा आत्ता लगेच विचार करायची आवश्यकता नाही, जर तशी वेळ आलीच तर या ‘शुक्रा’ चा पण ‘गिफ्ट कार्डा’चा प्रतिनिधी म्हणुन विचार करू.

गुरू गिफ्ट कार्डचा प्रतिनिधी झाल्यामुळे या आधी त्याला दिलेले प्रश्नकर्त्याचे प्रतिनिधित्व काढून घेऊ.

खेळाडू आणि त्यांचे प्रतिनिधी निश्चित झाले आता पुढचा टप्पा…

हे गिफ्ट कार्ड आहे कोठे?

गुरु (गिफ्ट कार्ड) लग्न स्थानात आहे पण वक्री अवस्थेत आहे. हरवलेल्या वस्तूचा प्रतिनिधी जेव्हा वक्री असतो तेव्हा अशी वस्तू सापडण्याची शक्यता अगदी कमी असते आणि वस्तू सापडली तरी ती धड अवस्थेत सापडत नाही, त्या वस्तूचे काही ना काही नुकसान झालेलेच असते.
आता प्रश्न येतो कार्डाचे असे काय नुकसान होणार? कार्ड फाटणे, पाणी किंवा आगी मुळे अर्धवट स्वरूपात नष्ट होणे असे काही घडू शकते!

हे बघत असतानाच आणखी काही महत्त्वाच्या ग्रहयोगांनी माझे लक्ष वेधून घेतले.

२० वृश्चिक २३ वरचा गुरू (गिफ्ट कार्ड) अगदी नुकताच २१ मकर १७ वरच्या प्लुटो च्या लाभ योगातून बाहेर पडला आहे किंबहुना दीप्तांशाचा विचार करता हे दोघेही अजूनही त्या लाभ योगातच आहे असे म्हणता येईल. इतकेच नव्हे तर गिफ्ट कार्डाचा दुसरा प्रतिनिधी चंद्र जो सध्या २८ कर्क ६ वर आहे तो देखील या २१ मकर १७ वरच्या प्लुटोच्या प्रतियोगातून बाहेर पडला आहे!

गिफ्ट कार्डाच्या दोन्ही प्रतिनिधींचा प्लुटो शी असा संबंध येणे हे वाईट लक्षण आहे कार्ड नष्ट झाले असण्याची शक्यता आहे!

पण प्रश्न हा की कार्ड नष्ट होणार म्हणजे नेमके काय होणार आहे?

कार्ड चोरीस जाणे, कार्ड चुकून रद्दीत टाकले जाणे, कार्ड असे कोठेतरी सांदी-कोपर्‍यात जाऊन बसले असेल की लगेच सापडणार नाही आणि जेव्हा सापडेल तेव्हा ते मुदत संपून गेलेले (एक्स्पायर) झालेले असेल. कार्ड दुसर्‍या कोणाच्या तरी हातात सापडले आणि त्या व्यक्तीने ते वापरले (इनकॅश) केले … अशा अनेक शक्यता आहेत.

गुरू (गिफ्ट कार्ड) प्रथम स्थानात, वृश्चिकेत आहे. वृश्चिकेवरून सांडपाण्याची जागा, गटारें, मोरी, संडास आदीचा बोध होतो Near muddy or stagnant water, gutters, sinks, the kitchen & bathroom, ruins, compost heaps, dark or secret places.. कार्ड इथे असेल? एक तर्क असाही करता येतो की कार्ड कोठे तरी गाडले गेले आहे. कदाचित वार्डरोब मध्ये, कपड्यांच्या ढिगार्‍यात, सॅनीटरी नॅपकीन्स च्या पॅकेटच्या खाली? ही शक्यता असू शकेल पण तसे असते तर कार्ड सापडायला हवे आज नाहीतर उद्या, त्याला फार वेळ लागणार नाही. आणि उशीराने सापडले तरी उपयोगात आणता येण्यासारखे असेल, नष्ट झालेले नसेल कारण साधारणत: अशा गिफ्ट कार्डाची मुदत सहा महिने ते एक वर्ष अशी असतेच.

आणि वसुधाताई तर म्हणाल्या होत्या की त्यांनी वार्डरोब, टेबलाचे ड्रावर्स आदी भाग पिंजून काढला होता तरी कार्ड सापडले नाही.

म्हणजे कार्ड वर अंदाज केलेल्या ठिकाणी नसावेच. आता काय?

पुढच्या शक्यता तपासू.

चोरी?
हे शक्य वाटत नाही कारण घरात दोन माणसे फक्त, कामवाली बाई व्यतिरिक्त बाहेरचे फारसे कोणी आलेले नसताना कार्ड चोरी कसे होईल? आणि चोर येऊन चोरी करण्याचे धाडस करणारच असेल तर तो गिफ्ट कार्ड कशाला चोरत बसेल त्यापेक्षा चोरण्या साठी कितीतरी मौल्यवान वस्तू वसुधाताईंच्या घरी आहेत!

कार्ड चुकून रद्दीत टाकले जाणे?
शॉपिंग केल्या वेळी कार्ड मिळाले होते, घरी परतल्या नंतर, शॉपिंग बॅग्ज , रॅपर्स रद्दीत, कचर्‍याच्या पेटीत टाकले जातात, तसे हे कार्ड अनावधाने कचर्‍याच्या पेटीत टाकले गेले असावे, त्यावर नवा नवा कचरा साठत गेल्यामुळे एव्हाना ते कचर्‍याच्या ढिगात तळात गाडले गेले असावे आणि नंतर घंटागाडी मार्फत दुर्गंधियुक्त कचराडेपोत!
मला ही शक्यता जास्त वाटली,

गिफ्ट कार्ड सापडणार का?

आता जर गिफ्ट कार्ड सापडणार असेल तर वसुधाताईंचे प्रतिनिधी ग्रह आणि गिफ्ट कार्डचे प्रतिनिधी ग्रह यांच्यात कोणता ना कोणता तरी ग्रहयोग व्हावयास हवा.

वसुधाताई (मंगळ) आणि गिफ्ट कार्ड (गुरू) यांच्यात कोणता योग होतो आहे का?

गुरु (गिफ्ट कार्ड) लग्नात २० वृश्चिक २३ वर आहे तर मंगळ (वसुधाताई) १९ मकर २३ वर आहे. म्हणजे मंगळ अवघा एक अंश पुढे सरकला की या दोघांत लाभ योग (६० अंश) होणार आहे, याचा अर्थ गिफ्ट कार्ड सापडणार! आणि तेही अगदी लगेच, कारण मंगळाला अवघा १ अंश पुढे जायचे आहे! म्हणजे १ तास / १ दिवस / १ आठवडा जास्तीतजास्त!

आपला प्राथमिक अंदाज:  ‘गिफ्ट कार्ड’ वसुधाताईंना सापडणार आहे पण ते नुकसान झालेल्या स्थितीत!

हा असा दिलासा मिळाला, केस इतक्या चटकन सुटली याचा मला आनंद झाला खरा पण दुसर्‍याच क्षणी शंकेची पाल मनात चुकचुकायला लागली! याचे कारण म्हणजे गुरु (गिफ्ट कार्ड) ची अवस्था!

गुंता!

आता एक शक्यता असे सांगते की कार्ड नष्ट झाले आणि दुसर्‍या शक्यते नुसार कार्ड वसुधाताईंना मिळणार आहे,  याचा अर्थ असाही असू शकतो की वसुधाताईंना गिफ्ट कार्ड मिळेलही पण ते वापरण्याच्या लायकीचे राहिलेले नसेल किंवा ‘कार्ड नष्ट झाले’ ही फक्त एक बातमी म्हणून वसुधाताईंना कळेल, कारण वसुधाताई (मंगळ) आणि गिफ्ट कार्ड (गुरु) यांच्यातला १ आणि ३ (बातमी)  स्थानांतून होणारा काहीस कमकुवत समजला जाणारा लाभयोग!

 ‘कार्ड मिळणार नाही, ते बहुदा नजरचुकीचे कचर्‍यात गेले असून एव्हाना ते कचरा डेपो मध्ये घाणीच्या ढिगार्‍याखाली गाडले गेले आहे, सापडायची सुतराम शक्यता नाही. विसरून जा (पुढच्या वेळी काळजी घ्या!) ’

मी हे असे उत्तर वसुधाताईंना देणारच होतो पण थबकलो!

त्याचे काय आहे ‘जासुसी कहाण्या’ वाचायची माझी लहानपणा पासूनची सवय (त्या पायी शाळेत असताना बराच मार पण खाल्ला आहे!) अशी सहजासहजी स्वस्थ बसू देणार्‍यातली नाही. काहीतरी डोक्याला भुंगा देणारे हवेच ना?

हे कोडे उकलायचा आणखी एक मार्ग मला दिसला आणि तो म्हणजे या गुरूने (गिफ्ट कार्ड) तो त्याच्या सध्याच्या वृश्चिक राशीत आल्या पासून कोणत्या ग्रहांशी, कोणते योग केले आहेत ते तपासायचे आणि तसेच गुरू त्याच्या सध्याच्या वृश्चिक राशीतल्या अंश-कला पासून प्रवास करत वृश्चिक रास ओलांडे पर्यंत त्याचे इतर ग्रहां बरोबर होणारे योग पण तपासायचे. कदाचित यातून काही सुगावा लागू शकेल.

चंद्र: तपासायची आवश्यकता नाही कारण चंद्र आणि गुरु दोघेही गिफ्ट कार्डाचेच प्रतिनिधी आहेत.

रवी: रवी नुकताच मेषेतून वृषभेत आला आहे त्यामुळे रवीचे आधीचे सारे योग निरुपयोगी. आणि तसेही रवी मेषेत असताना त्याचे गुरूशी कोणतेही योग झालेले नव्हतेच.

बुध:  बुध सुद्धा अगदी नुकताच मेषेत आला आहे. त्या आधी तो मीनेत असताना त्याने गुरूशी नवपंचम केला होता पण बुधाने राशी बदलल्याने तो योग आता निरुपयोगी आहे. बुध पत्रिकेत अष्टमेश (८) आणि लाभेश (११) आहे, म्हणजे बिनकष्टाच्या (८) पैशाचा लाभ (११)!

शुक्र: शुक्र २७ वृषभेवर आहे, याचा अर्थ तो २० वृषभेवर असताना त्याने गुरूशी प्रतियोग केला होता! हा एक महत्त्वाचा योग आहे आणि ह्यातून नक्कीच काही सुगावा लागू शकेल.

शनी: गुरु आणि शनीत एक लाभ योग झाला होता! पण दोघे ग्रह इतके मंद गतीचे आहेत की तो फार फार जुना झाला आहे. कदाचित अशी एखादी फार जुनी घटना दाखवत असेल जिचा सध्याच्या परिस्थितीशी कोणताच संदर्भ राहिलेला नाही.

यावरून आपल्याला असे दिसते की शुक्राचा गुरुशी झालेला प्रतीयोग हा एकच योग आपल्याला विचारात घेता येईल.

आता हा शुक्र आहे तरी कोण?

२७ वृषभ २५ वरचा हा शुक्र सप्तमेश आहे! स्वराशीत आहे, स्वगृही पण आहे! म्हणजे हा शुक्र जो कोणी असेल त्याचा या गिफ्ट कार्डाशी संबंध आला आहे, शुक्राचा गुरुशी झालेला प्रतीयोग स्पष्ट पणे सांगतो आहे कार्ड त्या व्यक्तीने हाताळले आहे! याला आणखी एक दुजोरा मिळत आहे , चंद्र (गिफ्ट कार्ड) आणि शुक्र (वसुधाताईंचा पती) अगदी नुकतेच लाभयोगातून बाहेर पडले आहेत!

सप्तमस्थाना वरून आपण पती (पत्नी), चोर, परकी व्यक्ती बघतो.

वसुधाबाईंनी जे काही सांगितले त्यावरून ‘चोर’ आणि ‘परकी व्यक्ती’ ह्या शक्यता नाहीत. मग राहिले कोण?

‘वसुधाताईंचा पती’!

या नव्या ट्विस्ट च्या अंगाने सर्व परिस्थितीचा आढावा घेताच सगळे खुलासे आपोआप झाले!

गुंता सुटला, कसा?

वसुधाताईंना मिळालेले हे गिफ्ट कार्ड त्यांच्या पतिराजांना मिळाले असावे. कशा वरून?

शुक्राचा गुरुशी झालेला प्रतीयोग आणि चंद्र (गिफ्ट कार्ड) आणि शुक्र (वसुधाताईंचा पती) अगदी नुकतेच लाभयोगातून बाहेर पडले आहेत! हा योगच सांगतो आहे की गिफ्ट कार्ड वसुधाबाईंच्या पतीना मिळाले आहे.

हे ठीक पण कार्ड त्यांच्या कडेच आहे किंवा कसे?

कार्ड वसुधाताईंच्या पतींनी घेतले असले तरी सध्या ते त्यांच्या कडेही नाही ! कारण ग्रहांचे संकेत स्पष्टपणे सांगत आहेत की हे कार्ड नष्ट झाले आहे (गुरू व चंद्राचे प्लुटो शी झालेले योग) , म्हणजे हे गिफ्ट कार्ड चक्क ‘इनकॅश’ केले गेले आहे म्हणजे वसुधाताईंच्या पतींनी हे कार्ड वापरून टाकले आहे! (कार्ड इनकॅश होणे म्हणजे कार्ड नष्टच झाले म्हणायचे!).

बहुदा या कार्डा बद्दल वसुधाताईंच्या पतीचा गोंधळ झाला असावा, कारण शुक्राचा (पती) आणि नेपच्युन मधला केंद्र योग तेच तर सुचवत आहे. कदाचित अशी आणखी काही कार्डस घरात असतील आणि त्यात नेमके कोणते कार्ड कोणाचे हा घोळ होऊन नजरचुकीने वसुधाताईंचे कार्ड वापरले गेले असावे.

हा मानसिक गोंधळ झाला असल्यानेच जेव्हा वसुधाताईंनी त्यांच्या पतीला हरवलेल्या गिफ्ट कार्डा बद्दल विचारले तेव्हा ‘मला माहिती नाही’ असे उत्तर मिळाले असावे.

आता माझ्या कडून हे भाकीत कळल्या नंतर वसुधाताई आपल्या पतिराजांना पुन्हा एकदा कार्डा बद्दल विचारतील तेव्हा गोंधळ दूर होईल आणि कार्ड  नजरचुकीने म्हणा वा अन्य गोंधळात हे कार्ड वापरले गेल्याची कबुली त्यांच्या कडून मिळेल. वसुधाताई (मंगळ) आणि गिफ्ट कार्ड (गुरु) यांच्यातला १ आणि ३ (बातमी)  स्थानांतून होणारा योग!

हा सर्व विचार करून मी माझा निष्कर्ष वसुधाताईंना सांगितला तो असा:

“वसुधाताई, हे गिफ्ट कार्ड काही परत मिळणार नाही, ते गेले, नष्ट झाले म्हणजेच कोणीतरी ते इनकॅश केले असावे. आणि हे ‘कोणीतरी’ म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपले पतिराज, विश्वासराव असण्याची शक्यता जास्त आहे, त्यांच्या कडे पुन्हा एकदा चौकशी करा खुलासा होईल”

पडताळा:

अगदी असेच घडले होते, वसुधाताईंच्या पती कडे पण असेच दुसरे एक गिफ्ट कार्ड होते, नजरचुकीने त्यांनी वसुधाताईंचे कार्ड इनकॅश केले होते. अर्थात वसुधाताईंची समजूत काढण्यासाठी त्यांच्या पतींनी आपल्या कडचे ते दुसरे गिफ्ट कार्ड वसुधाताईंना देऊन टाकले! मंगळ (वसुधाताई) आणि गुरु (गिफ्ट कार्ड) लाभ योग असा वाया गेला नाही, त्याने आपले काम चोख बजावले!

वसुधाताईंना कार्ड मिळाले पण ते मूळचे कार्ड नव्हतेच, मूळचे कार्ड केव्हाच वापरले गेले होते (नष्ट झाले होते) !

 

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+5

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.