जेव्हा आहुजा अंकल माझ्या समोर येऊन उभे राहिले तोच क्षण नेमका पकडून मी एक त्या वेळेची, देवळाली कॅम्प या स्थळाची कुंडली केली , हाच आपला आहुजा अंकल साठी केलेला कन्सलटेशन चार्ट !

 

 

 

 

कन्सलटेशन चार्ट चा तपशील:

 

दिनांक: 12 जानेवारी 2014 , रवीवार

वेळ: 11:56:32

स्थळ: देवळाली कॅंप, नाशीक

अयनांश: 0 सॉफ्टवेअर: ऑन लाईन सर्व्हीसेस 

बर्‍याच वेळा या कन्सलटेशन चार्ट मध्ये चंद्र व रवी कोणत्या स्थानीं आहेत आणि त्यांच्या राशी (कर्क व सिंह) कोणत्या भावारंभी आहेत यावरुन जातकाच्या मनात असलेल्या प्रश्नां बाबत चांगली कल्पना येते. असे दर वेळेलाच होईल असे नाही पण कन्सलटेशन चार्ट रॅडीकल असल्याचे ते मह्त्वाचे लक्षण जरुर मानता येईल.

या चार्ट मध्ये चंद्र दुसर्‍या भावात व चंद्राची कर्क रास चतुर्थ भावारंभी, रवी दशमात आणि रवीची सिंह रास पंचम भावारंभी. म्हणजे पैसा, गुंतवणूक, व्यवसाय, आणि प्रॉपर्टी ! आहुजा अंकल काल हेच तर बोलत होते ना? चार्ट जबरदस्त रॅडीकल आहे यात शंकाच नाही!

कन्सलटेशन चार्ट जर असा रॅडिकल असेल तर बर्‍याच वेळा त्यावरुन जातकाची सध्याची परिस्थिति, जातकाच्या आयुष्यात नुकत्याच कोणत्या घटनां घडल्या आहेत आणि कोणत्या घटनां नजिकच्या काळात घडणार आहेत याबद्दलही चांगला अंदाज बांधता येतो.

जे ग्रह अगदी भावारंभी असतात किंवा एखाद्या भावात प्रवेश करण्याच्या बेतात असतात त्या ग्रहां कडे विषेष लक्ष द्यावे . जातकाच्या आयुष्यात अगदी नजिकच्या काळात घडू शकणार्‍या किंवा सध्या चालू असलेल्या घटनांबद्दल असे ग्रह उत्तम भाष्य करतात.या कन्सलटेशन चार्ट मध्ये सगळ्यात पहिल्यांदा माझे लक्ष वेधून घेतले ते प्लुटो ने. प्लुटो सारखा ‘डेथ आणि रि-बर्थ’ वाला ग्रह दशमा भावारंभी अगदी दशमबिंदू पासून अवघ्या 29 आर्क मिनीटांत , याचा अर्थ अंकलजींच्या व्यवसायात अगदी लवकारच मोठे बदल होणार असल्याची चिन्हें! [Changes of vocation or new direction in career. A tenacious striving toward power and independence. Professional and occupational matters are full of struggles. taking unusual courses. hindered by crisis and situational changes. Important changes with far reaching consequences in the career and status.]

या पत्रिकेत युरेनस लग्न भावारंभाच्या अगदी सात अंश मागे आहे. म्हणजे लौकरच युरेनसच्या कृपेने आहुजा अंकल स्थलांतर करण्याची शक्यता आहे . [The desire for freedom of expression and a free life style, the individual is willing to sacrifice security for the sake of personal freedom, many unexpected incidences, change of residence or position. Strange and unusual or unconventional people enter into life. ] युरेनस व Ascendant यांच्यातले अंतर सात अंशाचे असल्याने व युरेनस व्ययात असल्याने साधारण पणे हे स्थलांतर सात महिन्याच्या कालावधीत होण्याची शक्यता आहे.

चंद्र हा जातकाचा निसर्गदत्त प्रतिनिधि असतो, लग्नेश व लग्नातले ग्रह पण जातकाचे प्रतिनिधित्व करतात. या पत्रिकेत मेष लग्न उदीत आहे म्हणजे मेषेचा स्वामी ‘मंगळ’ अंकलचे प्रतिनिधित्व करेल. लग्नात इतर कोणताही ग्रह नसल्याने , मंगळ व चंद्र हे दोघे अंकलजींचे प्रतिनिधी म्हणून काम बघतील.

चंद्र महत्वाचा , या चंद्राने नुकतेच केलेले (म्हणजे चंद्र सध्या ज्या राशीत आहे त्या राशीत तो आल्या पासून) केलेल ग्रहयोग , जातकाच्या आयुष्यात नुकत्याच घडून गेलेल्या घटनां बद्दल बरीच माहीती मिळते आणि चंद्र पुढे करणार असलेल्या ( तो त्या राशीत असे तोपर्यंतच) ग्रहयोगांवरुन आगामी काळातल्या घटनांबद्दल काही सुगावा लागतो.

चंद्र नुकताच नेपच्युनच्या केंद्र योगातून बाहेर पडलेला आहे . चंद 9 अंश मिथुन – नेपच्युन 3 अंश मीन. म्हणजे अंकलजींच्या बाबतीत नुकतेच असे काही प्रसंग घदले असतील ज्यात त्यांना काहीशा फसवणूकीला / गैरसमजाला / चोरी –दगाफटक्याला तोंड द्यावे लागले असणार. चंद्र आत्ता ह्या घटकेला युरेनसच्या अंशात्मक लाभ योगात आहे, वादळी , अनपेक्षित , चमत्कृतीजन्य घटना अंकलजींच्या आयुष्यात घडत आहेत.

अंकलजींचा दुसरा सिग्नीफिकेटर मंगळ गुरु च्या केंद्र योगातून अगदी नुकताच बाहेर पडत आहे, गुरु नवमेश आहे म्हणजे बायकोचा भाऊ (सप्तमाचे त्रितिय) ,  काहीतरी म्हणजे घात , अपघात , अतिआत्मविश्वासाने (किंवा गर्विष्ठपणाने ) वागून स्वत:च स्वत:चे करुन घेतलेले नुकसान आणि त्यात भरीला मेव्हणा !

माझ्या जुन्या नोटस मध्ये या योगा बदल अगदी असेच लिहले आहे आणि त्यात असलेला ‘मेव्हण्या’ चा उल्लेख (brother in Law) पाहून माझा मीच थक्क झालो! ह्या नोट्स मला ज्या गुरुंनी दिल्या  त्या मादाम आयव्ही जेकबसन यांना माझे मनोभावे वंदन!!

 

[ A tendency to be overconfident and possibly overextend oneself in career or business. Danger of a financial loss or one’s professional reputation. On occasion the native may act impulsively and aggressively, creating conflicts with employees, police or other authority figures. Injuries / accidents possible, serous conflicts with foreigners , persons of different race or color, learned and educated people. Someone close to native (brother in law especially) may undergo a surgery or meet with an accident]

दशमातला (सप्तमेश) शुक्र वक्री शुक्र पण नुकताच अष्टमातल्या शनी च्या केंद्र योगातून बाहेर पडला आहे. दशम स्थान नोकरी व्यवसायाचे स्थान, अष्ट्म स्थान त्रासाचे, बिनाकष्टाच्या कमाईचे, विमा किंवा तत्सम प्रकारच्या नुकसान भरपाईचे , शुक्र सप्तमेश म्हणजे पत्नी, भागीदार इ.

हे तीन जबरदस्त (convincing) योग बघून मी अंदाज बांधला की अंकलजींच्या उद्योग व्यवसाय, पत्नी व पत्नी कडचे नातेवाईक या सार्‍या संबंधात काही विलक्षण गुंतागुंतीच्या घटना घडून अंकलजींना मोठा आर्थिक फटका फसला असणार (दशम भावारंभीचा प्लुटो खास करुन विचारात घेतला पाहीजे!)

मी अंकलजींना तसे विचारले.

” क्या सचमुच ये पर्ची ये सब बता रहीं है..”

“….”

“करीबन तीन महीने पहेले की तो बात है, कहीं ऐसाही कुछ हुवा था “

इथे अंकलींनी काय घडले ते सांगीतले, जातकाची माहीती गुप्त ठेवायची असल्याने तो प्रसंग ईथे लिहणे उचित होणार नाही पण या तीनही योगांनी दाखवलेल्या घटना अंकलजींच्या आयुष्यात अगदी नुकत्याच घडल्या होत्या, अगदी हुबेहुब!

अंकलजींच्या चेहर्‍यावर काहीतरी भुताटकी बघितल्या सारखे भाव होते , पण माझ्या साठी हे नेहमीचे होते म्हणा!

आहुजा अंकलचा प्रश्न ‘वास्तु खरेदी ‘होता हे आधीपासुन माहीती होतेच तेव्हा त्याबद्दल हा कन्सलटेशन चार्ट काय सांगतो हे पाहणे मोठे उत्कंठावर्धक होते.

वास्तु खरेदी विक्री साठी वेस्टर्न होरारीत खालील भावांचा विचार करतात:

1: जातक , जो खरेदी किंवा विक्री करणार असतो.

7: जातक ज्याच्याशी व्यवहार करेल ती व्यक्ती (खरेदीदार किंवा विक्रेता) 4: प्रश्नाचा विषय असलेली वास्तू (विकायला काढलेली किंवा विकत घ्यायची )

2: जातकाची आर्थिक स्थिती

8: विरुद्ध पक्षाची आर्थीक स्थिती तसेच जातकाला मिळू शकणारे कर्ज व कर्ज देणारी संस्था 3: प्रश्नाचा विषय असलेली वास्तू ज्या परिसरात आहे तो भाग (नेबरहुड), वास्तू संदर्भातली कागदपत्रे व करार मदार.

10: प्रश्नाचा विषय असलेल्या वास्तूची बाजारातली किंमत

5: प्रश्नाचा विषय असलेली वास्तूची भविष्यकाळातली किंमत (अप्रेसिएशन) किंवा त्या वास्तू पासून मिळू शकणारे उत्पन्न

6: प्रश्नाचा विषय असलेलेल्या वास्तूत असलेले किंवा येऊ शकणारे भाडेकरु

या कन्सलटेशन चार्ट मध्ये लग्नारंभी मेष रास असल्याने,मेषेचा स्वामी मंगळ हा आहुजा अंकल यांचे प्रतिनिधीत्व करणार , लग्नात इतर कोणताही ग्रह नाही म्हणजे मंगळ आणि जातकाचा निसर्गदत्त (डिफॉल्ट) सिग्नीफिकेटर चंद्र हे दोघेही आहुजा अंकलचे प्रतिनिधित्व करतील.अंकल ज्यांच्याशी खरेदीचा व्यवहार करतील ती व्यक्ती सप्तम (7) स्थानावरुन पाहायची. सप्तम स्थानारंभी तूळ रास आहे म्हणजे तुळेचा स्वामी शुक्र विक्रेत्याचे प्रतिनिधित्व करेल. सप्तमात राहु ही आहे पण पाश्चात्य होरारीत राहुचा फारसा वापर केला जात नाही त्यामुळे त्याचा विक्रेत्याचे प्रतिनिधी म्हणून विचार केलेला नाही.

एकदा का या खरेदी-विक्री च्या व्यवाहारातल्या दोन्ही बाजुंचे प्रतिनिधी निश्चीत झाले की सर्व प्रथम बघायचे ते या दोन बाजुंच्या पत्रिनिधी मध्ये काही ग्रहयोग होतो आहे का. जर त्या दोघांमध्ये कोणताही ग्रहयोग होत नसेल तर त्यांच्यात व्यवहार होणार नाही असा स्पष्ट कौल आहे असे समजावे. मग पुढचे अ‍ॅनॅलायसीस करत बसायची आवश्यकता नाही.अर्थात होरारी चार्ट्ची काल मर्यादा (अटेंन्शन स्पॅन) काही महीन्यांचाच (3 ते 6 महिने) या ‘नाही’ चा अर्थ ‘कधीच नाही’ असा मात्र घ्यायचा नसतो, सध्या योग नाही म्हणजे नजिकच्या काळात (3 ते 6 महिने) व्यवहार होण्याची शक्यता नाही. पुढे कदाचित व्यवहार होऊही शकेल पण त्याबद्दल आत्ता काहीच सांगता येणार नाही.

आपण पाहीले आहे की आहुजा अंकल चे दोन प्रतिनिधी आहेत, चंद्र आणि मंगळ तर विक्रेत्याचा एकमेव प्रतिनिधी ‘शुक्र’. आता आपल्याला मंगळ –शुक्र किंवा चंद्र – शुक्र असे कोणते योग होतात का हे पहायचे आहे. हे योग पाहताना हे लक्षात घ्या:

योग ‘युती, लाभ, केंद्र, नव-पंचम, प्रतियोग’ या पाच पैकी कोणताही चालेल.
योग दोन्ही ग्रह ते सध्या ज्या राशीं मध्ये आहेत त्या राशीत असतानाच झाला पाहीजे.

काही वेळा असे योग होताना दिसतात पण प्रत्यक्षात आकाशात योग होतो तेव्हा त्यातल्या एखाद्या ग्रहाने राशी बदललेली असते किंवा ऐन वेळी दोघांपैकी एखादा ग्रह वक्री होऊन दिशा बदलतो आणि योग होत नाही. हा घोटाळा होऊ नये म्हणुन ‘एफेमेरीज’ मध्ये बघून खात्री करुन घ्यावी.

काही वेळा योग होतो असे दिसते , योग होतो ही पण तो योग होण्यापूर्वीच दुसरा जलद गतीचा ग्रह एखाद पहिल्या दोघांपैकी एकाशी योग करुन जातो, हे ही चालत नाही. या प्रकाराला ‘प्रोहीबिशन’ असे म्हणतात, यातल्याच एका विषीष्ठ ग्रहस्थितीला ‘फसट्रेशन’ म्हणतात.

या ‘प्रोहीबिशन’ आणि ‘फसट्रेशन’ बद्दल नंतर सविस्तर लिहेन.

काही वेळा असा योग होताना दिसत नाही ! पण म्हणुन पटकन ‘योग नाही- घटना नाही’ असा निर्णय घेऊन मोकळे होऊ नका. कारण काहीवेळा प्रत्यक्ष योग होत नसला तरी अप्रत्यक्ष मार्गाने योग होऊ शकतो. हे अप्रत्यक्ष मार्ग म्हणजे:

ट्रांसलेशन ऑफ लाईट्स
    कलेक्शन ऑफ लाईट्स

या दोन मार्गांवर मी नंतर एका स्वतंत्र लेखात लिहेन.

सध्या या चार्ट मध्ये आपण मंगळ व शुक्रात काही योग होतात का ते पाहू.मंगळ आहे 16 तूळ 23 आणि शुक्र आहे 20 मकर 44 , शुक्र 16 मकरे वर असताना दोघांत केंद्र योग झाला असणार , पण शुक्र मंगळा पेक्षा जलद गतीचा ग्रह असल्याने शुक्र मकरेत आणि त्याच वेळी मंगळ तुळेत असताना आता कोणताही दुसरा नवा योग होणार नाही असे वाटेल, पण थांबा, शुक्र वक्री आहे ! तो मागे मागे सरकत आहे म्हणजे 20..19..18 असा मागे येतो आहे , मंगळ पुढे जात आहे, म्हणजे दोघांत केंद्र योग होऊ शकतो , पण तसा तो होईल का? त्यासाठी ‘एफेमेरिज’ चा सल्ला घेणे जरुरीचे आहे. तो तसा घेतला असता हे लक्षात येते की शुक्र 18 मकर आणि मंगळ 18 तुळ अशी ग्रहस्थिती असता दोघांत केंद्र योग होईल.

दोघांच्या प्रतिनिधीं मध्ये योग होत आहे म्हणजे व्यवहार होण्याची मोठी शक्यता आहे.

प्रॉपर्टी चतुर्थ स्थाना वरुन बघतात , चतुर्थावर कर्क रास, चतुर्थात वक्री गुरु आहे, म्हणजे , कर्कचा स्वामी चंद्र आणि गुरु हे दोघेही त्या प्रॉपर्टीचे प्रतिनिधीत्व करतील. जर ही प्रॉपर्टी अंकलना मिळणार असेल तर प्रॉपर्टीचा प्रतिनिधी आणि अंकलचा प्रतिनिधी यांच्यात कोणतातरी अस्पेक्ट व्हावयास हवा. अंकल चे प्रतिनिधी आहेत मंगळ आणि चंद्र, आता चंद्र दोन्ही कडचा प्रतिनिधी होतो आहे, प्रॉपर्टीचा पण आणि अंकलजींचा पण, अशा स्थितीत हा डिस्पुटेड ग्रह जातका पेक्षा प्रश्न ज्याच्याशी संबधीत आहे त्या विषय वस्तूला बहाल करावा, तेव्हा आपण मंगळ (अंकल) आणि चंद्र (प्रॉपर्टी) यांच्यात काही योग होतात ते पाहू. मंगळ 16 तुळ 23 वर आहे , चंद्र 9 मिथुन 4 वर, म्हणजे चंर जेव्हा 16 मिथुनेत येईल तेव्हा त्याचा 16 तुळेतल्या मंगळा बरोबर नव-पंचम योग होत आहे. खरेदी करणारा आणि विक्रेता यांच्यात ग्रह योग आहे, खरेदी करणारा आणि प्रश्नाचा विषय असलेली वास्तु यांच्यात ही ग्रहयोग आहे म्हणजे व्यवहार होण्याची शक्यता दुपटीने वाढलेली आहे म्हणायचे. मंगळ (अंकल) तुळेत दाखल झाल्यापासुन त्याने:

गुरु केंद्र योग: या बद्दल (मेव्हणा) आधी लिहलेल आहेच.
प्लुटो केंद्रयोग: अंकलच्या व्यवसायात बदल (म्हणजे शेवट्च!)
रवी केंद्रयोग: व्यवसाय , गुतवणूक या क्षेत्रात काही प्रतिकूल घटना (घडल्या आहेत्‍!)
युरेनस प्रतियोग: अनपेक्षित , वादळी, चमत्कारीक घटनां (घडल्या आहेत , मेव्हणा)

या पुढील काळात मंगळ (अंकल) कोणते योग करणार आहे (तो तुळेत असे पर्यंतच‌)

शुक्र केंद्र योग : विक्रेत्याशी भेट , सौदा, व्यवहार (होणार आहे)
दशम बिंदू केंद्र योग : व्यवसायात बदल , अडथळे , कटौती (होणार आहे!)
चंद्र केंद्र योग: जागा ताब्यात मिळणार (चंद्र जागेचे प्रतिनिधित्व करतो) पण अडथळे येऊन.

शुक्र (विक्रेता) मकरेत दाखल झाल्यापासुन त्याने:

शनी लाभ योग: घराची किंमत, आर्थिक स्थिती
रवी युती योग: घराची किंमत, लाभ

या पुढील काळात शुक्र (विक्रेता) कोणते योग करणार आहे (तो मकरेत असे पर्यंतच‌)

मंगळ केंद्र योग: जागा खरेदी करणारा भेटणार, बोलणी होणार
लग्न बिंदू केंद्र योग: जागेचा विक्री व्यवहार पक्का होणार.
गुरु प्रतियोग: जागेचा ताबा जाणे , म्हणजेच जागा खरेदीदाराच्या ताब्यात देणे.

ठीक आहे , आता बाकीच्या बाबीं तपासून घेऊयात.

मंगळ नुकताच सप्तमस्थानात दाखल झाला आहे याचा अर्थ आहुजा अंकल व संभाव्य विक्रेत्याशी त्यांची गाठभेट अगदी नजिकच्या काळात झाली असावी आणि दोन्ही पार्टी मध्ये समजूतीची बोलणीं ही झाली असावीत. हे खरे होतेच कारण गेल्या सहा महिन्यात आहुजा अंकल त्या विक्रेत्याशी या ना त्या मार्गाने संपर्कात होतेच. शुक्र मकरेत आहे, बरा आहे पण वक्री आहे हे ही काही चांगले लक्षण नाही मंगळ तुळेत आहे म्हणजे काही चांगल्या स्थितीत नाही, मंगळ (अंकल) , सप्तमाच्या आरंभ बिंदू वर आहे, खरेतर ही एक अतिशय पोटंट सिच्युएशन आहे ज्याच्यामुळे अंकल ना एक जबरद्स्त अॅडव्हांटेज मिळाला असता, पण मंगळ तुळेत कमकुवत होत असल्याने मंगळाला आता हा फायदा मिळू शकणार नाही, थोडक्यात मंगळ आता सप्तमातच असल्याने विक्रेत्याच्या घरात असल्याने आता अंकल ना जर प्रॉपर्टी हवी असेल तर विक्रेत्याच्या अटीं नुसारच घ्यावी लागेल, अंकलजीची घासाघीस करण्याची (bargaining power) अगदी कमी झाली आहे.

“अंकलजी , जिस प्रॉपर्टी की बात हो रहीं है वो एक औरत के नाम पे है और वो खुद इसके बारे में बातचित चलाती होगी. काफी जादा किंमत की मांग हो रही होगी., हर मिटींग में कोई नयी किंमत बोली गयी होगी.”

“जी सचमुच वैसा ही हो रहा है”

“कोठी करिबन 30 साल पुरानी होगी, लोड बेअ‍ॅरिंग वाला कंस्ट्रक्शन होगा,और जगह किसी तालाब , नदी या बडे कुऐ के आसपास होगी, जगह जहां पे वह शहर का नया डिव्हलमेंट होने वाला एरिया रहेगा , वो एरिया पहेले शहर से दुर लगता होगा लेकिन अब धिरे घिरे आबादी वहॉ तक पहुंची होगी”

“बिल्कूल वैसा ही है बेटा , जो जगह हमने देखी थी वो तो एक फार्म हाऊस है, पुराना कंस्ट्र्कशन है, तू बताया वैसाही लोड बेअरिंग वाला. और पास मै एक नैचरल तालाब भी है , लेकिन मैं तो हैरान हो गया हूं की ये सब तू उस पर्ची को देखके कैसे बताता पुत्तर ?”

मी नुसताच हसलो आणि पुन्हा पत्रिकेत डोके खुपसले..

आहुजा अंकलना जरी खुलासेवार सांगीतले नसले तरी तुम्हाला सांगायला हरकत नाही.

शुक्र विक्रेत्याचे प्रतिनिधित्व करतो आहे, म्हणजे विक्रेता ही एक स्त्री असायची शक्यता जास्त असते किंवा विक्रेता जरी पुरुष असला तरी निर्णयप्रक्रियेत एखाद्या स्त्रीचा मोठा हात असतोच.

जागा चतुर्थ (4) स्थाना वरुन पाहतात. पत्रिकेत चतुर्था स्थानारंभी कर्क रास आहे. चतुर्थात वक्री गुरु ही आहे. चंद्र आणि गुरु दोघेही जागेबदल सांगतील . गुरु चंद्रा मुळे जागा चांगली असणार यात शंकाच नाही, गुरु मुळे असा निष्कर्ष काढ्ता यईल की जागेचे बांधकाम नविन नाही, मध्यम वयाचे , 30 ते 40 वर्षापूर्वीचे जुने बांधकाम असावे पण बांधकाम सुस्थितीत असेल, जागा किरकोळ डागडुजी, रंगरंगोटी करुन वापरण्या योग्य होइल.

कर्क रास आणि खुद्द चंद्रा या वरुन असा अंदाज बांधता येईल की जागा पाणवठ्या च्या शेजारी असेल. पण वक्री गुरु मुळे जागेच्या बाबतीत काही माहीती दडवली गेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गुरु हा प्रसरण दाखवतो, पण तो वक्री असल्याने तो जागेत वाढ (आकार , क्षेत्रफळ) करु देणार नाही , एकतर FSI ची बंधने असू शकतील किंवा जागेचे बांधकाम असे असेल की त्यात काही मोठे स्ट्र्क्चरल बदल करणे शक्य होणार नाही. साधारण पणे लोड बेअरिंग पद्धतीची बांधकामे या कॅटेगरी मध्ये मोडतात.

जागेची किंमत दशम स्थाना वरुन बधितली जाते, दशमा भावारंभी मकर रास आहे, मकरेचा स्वामी शनी स्वत: अष्टमात आहे , दशामात प्लुटो, रवी, शुक्र (वक्री) आणि बुध आहेत. रवी ची उपस्थिती सांगते की जागेची किंमत बाजार भावा पेक्षा जराशी जास्त आहे, विक्रेत्याचा सिग्नीफिकेटर शुक्र स्वत: दशमात असल्याने आणि तोही वक्री आणि कंबस्ट अवस्थेत असल्याने विक्रेता जागेच्या किंमती बद्दल ठाम आहे आणि किंमतीत एखादा मह्त्वाचा खर्चाचे कलम समाविष्ट नाही (वक्री ग्रह काहीतरी महत्वाची गोष्ट दडवून ठेवतात) याचा अर्थ सांगीतलेल्या किंमती पेक्षा जास्त खर्च करावा लागेल. वक्री शुक्र असेही सुचित करतो आहे की घराच्या किंमती बाबतीत तसेच एकंदर व्यवहारा बद्दल विक्रेता घूमजाव करणार्‍यातला आहे,दिलेला शब्द फिरवला जाण्याची शक्यता आहे.

प्लुटो नुकताच दशमात दाखल झाला आहे याचा अर्थ जागेच्या किंमतीत मोठा बदल एकतर झालेला आहे किंवा लवकरच होण्याची शक्यता आहे. दशमाचा स्वामी अष्ट्मात आहे, अष्टम स्थान हे विक्रेत्याचा पैसा दाखवते , अष्ट्मात शनी आहे , शनी अजूनही विक्रेत्याचा प्रतिनिधी शुक्राशी लाभयोगात आहे , याचा अर्थ विक्रेत्याची आर्थिक बाजू भक्कम आहे, तो ह्या घराच्या विक्री साठी घायकुतीला (Desperate) आलेला नाही. घराच्या किंमतीत कोणत्याही वाटाघाटीला वाव नाही!

जातकाचा पैसा दुसर्‍या स्थानावरुन बघतात. इथे दुसर्‍या स्थानारंभी वृषभ रास आहे म्हणजे वृषभेचा स्वामी शुक्र जातकाच्या पैशाचे प्रतिनिधित्व करणार, चंद्र द्वितिय स्थानातच असल्याने तो ही जातकाच्या पैशाचे प्रतिनिधित्व करेल. शुक्र पैशाचाच ग्रह असल्याने जातकाला हा व्यवहार करताना पैशाची कोणतीही अडचण येणार नाही किंबहुना पैसा जातका कडे आधीपासूनच आहे. आहुजा अंकल म्हणाले होतेच ना “भगवान की कृपा से थोडा पैसा बचाया है’ , बघा पत्रिकेने त्याला कसा दुजोरा दिला आहे ते!

समजा काही कारणास्तव जातकाला गृहकर्ज घ्यावे लागले, (किंबहुना , स्वत:चा पैसा असताना सुद्धा, गृहकर्ज घेणे हे इन्कमटॅक्स प्लॅनिंगला चांगले ही असते म्हणा) तर जातकाला कर्ज देणारी वित्तसंस्था अष्टम स्थाना वरुन बघता येते. अष्ट्मा वर वृश्चीक राशी आहे , तिचा स्वामी मंगळ व अष्ट्मातला शनी हे दोघे वित्तसंस्थेचे प्रतिनिधित्व करतील. मंगळ हा मूळात आपल्या जातकाचा प्रतिनिधी आहे म्हणून चंद्र हा जातकाचा नैसर्गिक प्रतिनिधी वापरु. या चद्राचा वित्तसंस्थेच्या प्रतिनिधी शी म्हणजेच शनीशी फक्त एकच 150 अंशाचा क्विनकक्स योग होतो, हा योग होरारीत वापरला जात नाही, म्हणजेच जातकाला कर्ज मिळू शकणार नाही. कदाचित जातकाने पैशाची तरतूद करुनच ठेवलेली असल्याने जातक कर्ज मागायला जाणारही नाही. जर मंगळ हा वित्तसंस्थेच्या प्रतिनिधी मानला तर मंगळ आणि चंद्र (जो जातकाचा निसर्गदत्त प्रतिनिधी असतोच) एकमेकांशी नवपंचम योग करणार आहेत साधारण सात अंशात म्हणजे जातक कदाचित जागा ताब्यात आल्यानंतर त्याच्या नूतनिकरणा साठी किंवा दुस्र्स्ती साठी कर्ज मागू शकेल आणि ते त्याला मिळेल ही!

जागेची कागदपत्रे व जागेच्या व्यवहाराचा करार त्रितिय स्थाना वरुन पाहतात. पत्रिकेत त्रितिय स्थानावर मिथुन ही बुधाची रास आहे त्रितिय स्थानात इतर ग्रह नाहीत म्हणजे बुध हा जागेची कागदपत्रे व जागेच्या व्यवहाराचा करार याबद्दल सांगेल. बुध हा एरव्हीही कागदपत्रे , करार , वाटाघाटीचा नैसर्गिक कारक आहेच. बुध दशमात आहे , जागेच्या किंमतिच्या स्थानात. बुधाचे कोणत्याही ग्रहांशी (एक राहू सोडला तर) योग होत नाहीत म्हणजे दोन निष्कर्ष काढता येतात , जागेची कागदपत्रे चोख आहेत , काहीही घोटाळा नाही, व्यवहारात कोणतीही फसवणूक होणार नाही.

जागेचा परिसर (नेबर हुड) कसे असेल याचा अंदाज त्रितिय स्थाना वरुन घेता येतो, त्रितिय स्थानी बुधाची मिथुन रास आहे, त्रितियात ईतर कोणतेही ग्रह नाहीत, बुध दशमात आहे पण अगदी नुकताच मकरेतुन कंभेत दाखल झाला आहे (0 अंश कुंभ) आणि अगदी थोड्याच कालावधीत तो दशमातून लाभात पदार्पण करणार आहे. बुध हा मुळातच तरुण , युवराज ग्रह मानला जातो, बुधाचा राशी बदल आणि लौकरच होऊ घातलेला स्थान बदल पाहता, ती जागा शहराच्या अगदी नव्या वस्तीत असेल किंवा शहरा बाहेरच पण लौकरच शहराच्या हद्दीत येण्या सारख्या अंतरावर असेल.

जागेची भविष्यातली किंमत (प्राइस अप्रेसिएअशन्‌) पंचमस्थाना वरुन बघता येते. पंचमस्थानी रवीची सिंह रास आहे आणि रवी दशमात आहे , पार्ट ऑफ फॉरचुन पंचमात आहे, मग काय विचारता, ही प्रॉपर्टी चांगली अप्रेसिएट होईल. जातकाला चांगला फायदा करुन देईल, एव्हढेच नव्हे तर जातकाचा भाग्योदय करणारी ठरेल.

शुक्र (विक्रेता) आणि मंगळ (जातक) यांच्यात केंद्रयोग होते आहे, म्हणजे व्यवहार नक्की होणार पण केंद्र योग असल्याने काही अडथळे येऊन मगच तो पूर्ण होईल. शुक्र आणि मंगळ यातले अंतर आहे 4 डिग्री 21 मिनीट्स.साधारण स्केल काय असू शकेल?

दिवस –आठवडे- महिने

आठवडे –महिने –वर्षे

महिने –वर्षे – अनिश्चीत

प्रश्ना व प्रश्ना मागची पार्श्वभूमी लक्षात घेता ‘महिने –वर्षे – अनिश्चीत हे स्केल’ योग्य वाटते, दोन्ही ग्रह अ‍ॅन्गुलर हाऊसेस मध्ये म्हणजे स्केल मधले पहिले युनिट वापरायचे , त्यानुसार 4-21 म्हणजे 5 महीन्यात म्हणजेच जून 2014 च्या सुमारास व्यवहार व्हायला हवा.

शुक्र – गुरु ऑपोझिशन: विक्रेता जागेचा ताबा सोडणार, गुरु- शुक्रातले अंतर आहे 6 डिग्री 8 मीनिट्स , दोन्ही ग्रह अ‍ॅन्गुलर हाऊसेस मध्ये म्हणजे साधारण स्केल काय असू शकेल?

दिवस –आठवडे- महिने

आठवडे –महिने –वर्षे

महिने –वर्षे – अनिश्चीत

प्रश्न आणि प्रश्ना मागची पार्श्वभूमी लक्षात घेता महिने –वर्षे – अनिश्चीत हे स्केल योग्य वाटते, दोन्ही ग्रह अ‍ॅन्गुलर हाऊसेस मध्ये म्हणजे स्केल मधले पहिले युनिट वापरायचे त्यानुसार 6-08 म्हणजे 6 महिन्यात म्हणजेच जुलै 2014 च्या अखेरिस विक्रता जागेचा ताबा सोडेल व जातकाला वास्तु ताब्यात मिळेल.

वेस्टर्न होरारी (कन्सलटेशन चार्ट) ने आपले काम चोख बजावले होतेच , आता के.पी. चार्ट बघायचा !अंकलना जन्मवेळच काय पण जन्मतारीख ही माहीती नव्हती! तेव्हा प्रश्न कुंडलीचाच आधार घ्यावा लागणार होता शिवाय प्रश्न वास्तु खरेदीचा असल्याने एरव्ही सुद्धा मी जन्मकुंडली पेक्षा प्रश्नकुंडलीच वापरली असती. मी आहुजा अंकल ना प्रश्नकुंडली बाबत थोडक्यात सांगुन त्यांना एक होरारी नंबर द्यायला सुचवले. आहुजा अंकलनी जरासा विचार करुन नंबर दिला ‘70’, ह्या होरारी क्रमांका वरुन बनवलेली प्रश्न कुंडली व त्यावरुन केलेले अ‍ॅनॅलायसीस व कालनिर्णय आपण पुढच्या भागात पाहू.

भाग 3 खालच्या अंगालाच आहे , जरुर वाचा..

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////
  1. सुहास गोखले

   सौ. ललीताजी,

   अभिप्रया बद्दल धन्यवाद.

   प्रश्न शास्त्र किंवा प्रश्नकुंडली मुळातच काही दैवी संकेतांवर आधारित आहे. जातकाला प्रश्नाचे उत्तर मिळावे अशी नियतीचीच जर इच्छा असेल तर जातकाला प्रश्न पडणे, त्या प्रश्नाचे ऊतर देऊ शकेल अशी योग्य व्यक्ती भेटणे ही साखळी जुळून येते. दर वेळेला हे अगदी असेच जमेल असे नाही. कधी जातकाचा प्रश्न तितकासा तळमळीचा नसतो (कॅज्युअल असतो) , जातकाकडे प्रश्नाचे उत्तर जाणुन घ्यायची म्हणावी तशी तळमळ नसते (दाढ दुखत असताना ती काहीही करुन थांबली पाहीजे अशी जी तळमळ असते तशी तळमळ साधारण पणे लागते) आणि प्रश्नाचे उत्तर देणार्‍या ज्योतिषाकडे ही काही पात्रता असावी लागते. उगाच एक दोन पुस्तके वाचून कोणालाही ज्योतिषी होता येत नाही , ग्रथांच्या अभ्यासा बरोबरच काही साधनाही करावी लागते, आचरण शुद्ध ठेवावे लागते.

   शुभेच्छा

   सुहास गोखले

   0
 1. bhagwat kumbhar

  आदरणीय सुहासजी. नमस्कार
  तुमचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास पाहून मन थक्क होते. असे वाटते की ईश्वरच तुमच्या रूपाने काम करतो आहे.
  तुमच्या कार्याला लाख लाख शुभेच्छा.

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.