“जिंदगी से ज्यादा और क्या किंमती हो सकता है पुत्तर?”
आहुजा अंकलच्या ह्या बिनतोड सवाला आता मी काय जबाब देणार ?
मी आहुजा अंकलच्या दुकानात गेलो होतो ते माझ्या ‘स्कूटी’ साठी टायर विकत घेण्यासाठी पण टायर च्या किंमती ऐकून टायर ऐवजी मीच पंक्चर झालो होतो!
“इससे भी सस्ते वाला कोई व्हरायटी है आपके पास?”
“सस्ते वाला ? बेटा , टायर में सस्तें मेहेंगी की बात नहीं करनी चाहीये , जिंदगी में कई चिजें ऐसी होती है की जिसका मोल नहीं हो सकता , तेरी गड्डी का टायर इसमेसे एक है समझ, जिंदगी से ज्यादा और क्या किंमती हो सकता है पुत्तर?”
“फिर भी”
“देख पुत्तर, मेरा पास सस्ते वाला माल भी है, वो भी तो बेचने के लिए ही है, लेकिन मेरी बात मान, अभी ये जो टायर दिखाया ना, वो मेहेंगा है जरुर लेकीन चीज है बढीया, उपर तीन साल की कंपनी गारंटी भी तो है, अरे वो कंपनी वाली गारंटी की बात छोड, तू मेरी दुकान की गारंटी पर लेके जा, अगर जरासी भी खराबी आ गयी तो मेरा गला पकड ले …”
आहुजा अंकल एव्हढे बोलले आणि क्षणात जीभ चावून म्हणाले …
“बेटा गलती हुई, मै तो तबतक नहीं रहुंगा लेकिन मेरे बाद मेरा जमाई ये दुकान चलाता होगा ..”
“कैसी बातें करते हो अंकल, भगवान आपको बहोत लंबी उमर दे, मरें आपले दुश्मन”
“पुत्तर, मै मरने की बात थोडीही कर रहा हू. बस अभी ये सब कारोबार जमाई के हात छोडके मुलुक जाने का मन कर रहा है”
“मुलुक ? अंकल , आप देवळाली छोड के कैसे जा सकते हो? हम आपको नहीं जाने देंगें”
“हां बेटा, मुझे भी क्या खाक अच्छा लगेगा? चालीस साल से यहा देवळाली में बसां हू. ऐसी खूबसुरत जगह छोडनेको दिल नहीं करता पुत्तर, पर मुलुक तो जाना ही है. भगवान की कृपा से थोडा पैसा बचाया है , वहां एक छोटा प्रोपर्टी खरीदूंगा , जो भी बचे हुए दिन है, मैं वही बिताना चाहता हूं , अपना मुलुक – अपनी मिट्टी”
नंतर एक खोल उसासा टाकून अंकल म्हणाले.
“लेकिन प्रोपर्टी की बात कुछ नहीं जम रहीं है. पता नहीं क्यू , पुत्तर, पिछ्ले दो साल से लगातार कोशीस चल रही है मेरी, बात अभीतक जमीं नहीं… अभी अभी देखो , छे महिनेसे एक पार्टी से बात चल रहीं है, बढीया प्रोपर्टी है, लेकिन बात न जाने कहां अटक गयी..”
“आप जैसे बुजुर्ग तो देवळाली की शान है, इसलिये शायद भगवान भी यही चाहता होगा के आप यहांसे ना जाये”
“हा, सो तो है, भगवान की ईच्छा! आखिरकार ये सब नसीब में भी होना चाहीये ना”
“अंकल , भला आप नसीब की बात कर रहे हो तो वो बात मुझ पे छोड दिजीये, मैं बता सकता हूं , आपले नसिब मै वो मुलुक वाली प्रॉपर्टी है या नहीं और अगर है तो वो कब मिलने वाला है”
“पुत्तर , कही तुम वो ज्योतिष वगैरा तो जानते नहीं ?”
”जी अंकल, थोडा थोडा”
“तो क्या, वो प्रोपर्टी के बारे में बता सकता है कुछ?”
“क्यू नहीं?”
दुसरे दिवशी ठरल्यावेळी आहुजा अंकल माझ्या घरी हजर झाले.
कन्सलटेशन चार्ट !
माझ्या कोणत्याही ‘आमने-सामने’ कन्सलटेशन ची सुरवातच मुळी कन्सलटेशन चार्ट च्या अभ्यासातून होते. या कन्सलटेशन चार्ट मधून मिळणारे बारीक सारीक तपशील केवळ थक्क करुन टाकणारे असतात !
कन्सलटेशन चार्ट बद्दल भारतात फारशी माहीती नाही, पण पाश्चात्य ज्योतिर्विद याचा फार खुबीने वापर करुन घेतात. कन्सलटेशन चार्ट म्हणजे एक रितसर कुंडली, तीची वेळ जातक ज्योतिर्विदाच्या समोर येतो ती असते , स्थळ अर्थातच ज्योतिर्विद व जातक एकत्र भेटतात ते.
या कन्सलटेशन चार्ट च्या अभ्यासातुन आपल्याला जातका बद्दल, जातकाच्या संभाव्य प्रश्नांबद्दल, जातकाचे व्यक्तीमत्व, त्याचे नातेसंबंध, त्याचे आरोग्य, आर्थिक स्थिती, जातकाच्या आयुष्यात नुकत्याच होऊन गेलेल्या घटनां आणि आगामी काळात होऊ घातलेल्या घटना या अशा अनेक गोष्टी बद्दल चांगला अंदाज बांधता येतो.
या कन्सलटेशन चार्ट च्या जोरावरच तर मी जातकाने सांगायच्या आधीच मी त्याचे प्रश्न , त्याच्या समस्या काय आहेत हे ओळखू शकतो, याचा जातकावर चांगला प्रभाव पडतो, समोरच्या ज्योतिष्यावर, त्याच्या ज्ञानावर, तो वापरत असलेल्या पद्धतीवर त्याचा विश्वास बसतो. एक प्रकारची सकारात्मक , आश्वासक वातावरण निर्मिती होते. कोणत्याही कन्सलटेशन साठी मग ते डॉक्टर व रोगी यांच्यातले असो किंवा एखादा वकील आणि त्याचा अशील यांच्यातले असो, हे असे वातावरण निर्माण होणे अत्यंत गरजेचे असते. मानसोपचारात तर हे असे वातवरण जर पहिल्याच मुलाखतीत निर्माण झाले नाही तर पुढची सारी ट्रीट्मेंटच अयशस्वी होण्याचा धोका असतो.
एक दुसरा मोठा फायदा हा की , जर कन्सलटेशन चार्ट ने पुरवलेली माहीती आणि प्रत्यक्षातली स्थिती यात बर्यापैकी ताळमेळ बसत असेल तर त्यातून सिद्ध होते की जातकाने प्रश्न विचारायला अगदी अचूक वेळ साधली आहे.हा असा ताळमेळ बसला की तोच कन्सलटेशन चार्ट मी जातकाच्या प्रश्नांची उत्तरें देण्यासाठीही वापरतो, वेगळी प्रश्न कुंडली मांडायला लागत नाही.
जरी मी जन्मकुंडली वरुन प्रश्नाचे उत्तर देणार असलो तरीही , कन्सलटेशन चार्ट ने पुरवलेली माहीती बहुमोल ठरतेच ठरते, कारण, ज्योतिष ही संकेताची भाषा असल्याने, ग्रह, राशी, भाव, योग या सार्या संकेताचा व्यक्ती, स्थळ, काळ , परिस्थिती सापेक्ष अर्थ लावायला कन्सलटेशन चार्टने पुरवलेली माहीती मला नेहमीच अत्यंत उपयुक्त ठरली आहे.
कन्सलटेशन चार्ट चा अभ्यास आपल्या नेहमीच्या प्रश्नकुंडली सारखाच करावयाचा असतो. म्हणजे:
लग्न बिंदू, लग्नराशी, लग्नेश , लग्नात असलेले ग्रह जातका बद्दल सांगतात.पत्रिकेतल्या इतर भावावरुन जसे द्वितिय भावावरुन पैसा, चतुर्थावरुन घर, पंचमावरुन गुंतवणूक, षष्ठावरुन आरोग्य, सप्तमा वरुन पत्नी, वैवाहीक सुख, व्यवसाय इ. या अशा प्रत्येक भावाचा अभ्यास करताना, भावेशाचा अभ्यास, भावातल्या ग्रहांचा अभ्यास, त्यांचे आपापसातले योग, वक्री ग्रह, लुप्त (इंटरसेप्टेड साईंन्स) राशी या सार्यांचा विचार करावा लागतो.
साधारणत: कन्सलटेशन चार्ट मधल्या चंद्र , रवी यांची स्थानगत स्थिती, रवी व चंद्र यांच्या राशी ज्या भावारंभी (किंवा लुप्त) आहेत असे भाव यावरुन जातकाचा प्रश्न कोणता आहे याचा अंदाज बांधता येतो.
सध्या चंद्र ज्या राशीत आहे त्या राशीत आल्यानंतर चंद्राने केलेले अस्पेक्ट्स व त्या राशीतून बाहेर पडेतो पर्यंत चंद्र करणार असणारे असपेक्ट्स याच्या अभ्यासावरुन जातकाच्या आयुष्यात नुकतेच काय प्रसंग घडले असतील व नजिकच्या काळात पुढ्यात काय वाढून ठेवलेय याचाही अंदाज घेता येतो.
वक्री ग्रह कोणते आहेत आणि ते कोणत्या भावात आहेत यावरुन कोणत्या बाबतीला जातकाला काहीशी माघार / नमते घ्यायला लागणार आहे याचा अंदाज येतो.
लुप्त राशी व त्यांचे स्वामी कोठे आहेत यावरुन बर्याचशा पडद्या आडच्या गोष्तींचा खुलासा होतो.
नेपच्युन , हर्षल , प्लुटो सारखे ग्रह फसवणूक, वादळी अकल्पीत घटना , मोठे बदल यासारख्या ठळक घटनांबद्दल सांगू शकतात.
एकदा का कन्सलटेशन चार्ट ने पुरवलेल्या माहीतीची खातरजमा करुन घेतली की मग जातकाला जादाचे प्रश्न न विचारता एकदम त्याच्या पुढयातल्या प्रश्नांना हात घालणे शक्य होते, त्यात माझा आणि जातकाचा दोघांचाही वेळ वाचतो.
चला तर मग आहुजा अंकल साठी तयार केलेला कन्सलटेशन चार्ट काय सांगतो ते बघूया..
पण हा ‘खोसला का घोसला’ लेख फारच मोठा होत असल्याने तो तीन भागात विभागला आहे.
भाग 1: जो आपण आत्ता या क्षणीं वाचत आहात. भाग 2: कन्सलटेशन चार्ट व त्याचे अॅनॅलायसिस भाग 3: के.पी. होरारी अॅनॅलायसिस , भविष्य कथन व आलेला पडताळा भाग 2 व भाग 3 खालच्या अंगालाच एका पाठोपाठ प्रकाशीत करत आहे , जरुर वाचा..
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020