यातुन काय प्राथमिक निष्कर्ष निघतो ?  शिल्पाचा विवाह धोक्यात आहे, घटस्फोट होण्याची मोठी शक्यता आहे! मग खरेच का शिल्पाचा घटस्फोट होणार ?  

 

घटस्फोट केव्हा मिळेल ?’  हाा शिल्पाचा नेमका प्रश्न मला समजला ती वेळ घेऊनच मी एक प्रश्न कुंडली तयार केली, ती सोबत छापली आहे.

 


 

प्रश्नकुंडली चा तपशील:

दिनांक: ९ मार्च २०१७

वेळ: १३:३१:०४

स्थळ: गंगापूर रोड, नाशिक

 


 

ग्रहांचे कार्येशत्व आणि भावांच्या कार्येश ग्रहांचे टेबल

 

चंद्र , सप्तम (७) स्थानाचा सब यांनी धोक्याचा ईशारा दिला असला तरी हा फक्त एक प्राथमिक कयास आहे, दशा विदशांचा कौल आणि ट्रान्सीट तपासल्या शिवाय आपल्याला ठोस काही सांगता येणार नाही

आता आपण महादशा- अंतर्दशा- विदशा तपासु म्हणजे नक्की काय घडणार आहे याचा खुलासा होईल.

 

या प्रश्नकुंडली प्रमाणे चालू असलेल्या दशा- अंतर्दशा- विदशा यांचे टेबल शेजारी छापले आहे.

 

 

प्रश्न विचारते वेळी शनीची महादशा चालू आहे ती ११ जानेवारी २०२० पर्यंत चालणार आहे.

या महादशा स्वामी शनी चे कार्येशत्व पाहूयात:

शनी षष्टम (६) स्थानी आहे , शनीच्या मकर आणि कुंभ या राशीं अष्टम (८) आणि नवम (९) स्थानांवर, शनी हा केतु च्या नक्षत्रात , केतु नवम (९) स्थानात , म्हणजे महादशा स्वामी शनी चे कार्येशत्व असे असेल:

शनी:  ९ /  ६ /  ८, ९ /  —

महादशा स्वामी शनी षष्टम (६ ) आणि अष्टम (८) स्थानां च्या माध्यमातून विवाहा साठी साठी प्रतिकूल आहे. नवम (९) स्थानाची उपस्थिती न्यायालयीन निवाडा तसेच (कदाचित) दुसरा विवाह दर्शवते.

दशा स्वामी बरोबर त्याचा सब पण तपासावा लागतो.  दशा स्वामी शनी चा सब आहे रवी  , या रवीचे कार्येशत्व असे असेल:

रवी भाग्यात (९) आहे , रवी ची सिंह रास त्रितीय (३) स्थानी ,  रवी हा गुरुच्या नक्षत्रात , गुरु चतुर्थात (४) आणि गुरुच्या धनु आणि मीन राशी , सप्तम (७) आणि दशम (१०) स्थानांवर , म्हणजे रवीचे कार्येशत्व असे असेल:

रवी :  ४ / ९ / ७, १०/ ३

दशा स्वामीचा सब रवी देखील दशम (१० )  स्थानाच्या माध्यमातून विवाहा विरोधी पवित्रा घेत आहे शिवाय त्रितीय (३) व नवम (९) स्थानांच्या माध्यमातून  करार , न्यायालयीन निवाडा असे पूरक भाव पण दाखवत आहे.

म्हणजे दशा स्वामी शनी आणि त्याचा सब रवी दोघेही विवाहा साठी विरोधी आहेत.  शिल्पाचा घटस्फोट होण्याची शक्यता वाढते आहे .

पण शनीची ही महादशा जानेवारी २०२० पर्यंत चालणार आहे म्हणजे प्रश्न विचारल्या वेळे पासुन पावणे तीन वर्ष चालणार आहे हा कालावधी तसा मोठा आहे तेव्हा आपल्याला या शनीच्या दशेतल्या अंतर्दशा तपासल्या पाहीजेत.

प्रश्न विचारते वेळी शनीच्या महादशेत राहुची अंतर्दशा चालू आहे ती ३० जुन २०१७ पर्यंत चालणार आहे. हा कालावधी साधारण चार महीन्याचा आहे. आज रोजी शिल्पा ने घट्स्फोटा साठी अर्जही केलेला नसल्याने या चार महीन्यात तिला घटस्फोट मिळणे तांत्रीक दृष्ट्या शक्यच नाही त्यामुळे या राहु च्या अंतर्दशेचा विचार करण्यात काहीच अर्थ नाही.

मात्र या राहु च्या अंतर्दशेत शिल्पाच्या विवाहा संदर्भात काही घडणार आहे का हे तपासणे औत्युक्याचे ठरेल.

अंतर्दशा स्वामी राहु चे कार्येशत्व असे आहे:

राहु त्रितिय (३) स्थानात आहे , राहुला स्वत:ची राशी नसल्याने त्याला कोणत्याही भावाचे भावेशत्व मिळणार नाही. राहु केतु च्या नक्षत्रात आहे , केतु भाग्यात (९) आहे. राहु वर बुधाची आणि रवीची दृष्टी आहे आणि राहु रवीच्या सिंह राशीत आहे . म्हणजे राहुचे एकंदर कार्येशत्व असे आहे-

राहु: ९ /  ३ / — / —

दृष्टी: 

रवी :  ४ / ९ / ७, १०/ ३

राहु वर बुधाची पण दृष्टी आहे. या बुधाचे कार्येशत्व असे आहे:

बुध भाग्यात (९) आहे, बुधाच्या मिथुन आणि कन्या या राशीं लग्न (१) आणि चतुर्थ (४) भावांवर आहेत, बुध गुरु च्या नक्षत्रात आहे, गुरु चतुर्थ (४) स्थानी असून गुरुच्या धनु आणि मीन राशी सप्तम (७) दशम (१०) स्थानांवर आहेत.

बुध: ४ / ९ / ७ , १० / १ , ४

राशी स्वामी रविचे कार्येशत्व पण राहूला मिळणार.

रवी :  ४ / ९ / ७, १०/ ३

या अंतर्दशा स्वामी राहुचा सब आहे गुरु. या गुरुचे कार्येशत्व

गुरु:  १० / ४ / ११ , ६ / ७ , १०

हा सब विवाहच्या विरोधी म्हणजे षष्ठम  (६) आणि दशम (१०) भावांचा कार्येश असल्याने विवाहा साठी अगदी प्रतिकूल आहे.

म्हणजे राहुची ही अंतर्दशा दशम (१०) आणि लग्न (१) स्थानांच्या माध्यमातुन विवाहाच्या विरोधी तर आहेच शिवाय नवम (९) आणि त्रितीय (३) भावांची उपस्थिती करार, न्यायालयीन निवाडा/ आदेश दाखवत आहे. म्हणजे जर शिल्पाचा खरोखरच घटस्फोट होणार असेल तर या राहुच्या अंतर्दशेत शिल्पा कोर्टात अर्ज दाखल करेल आणि अंतीम निवाड्याची तारीख मिळवेल.

घट्स्फोट मग तो अगदी परस्पर सहमतीने घेतला जात असला तरी काही प्रक्रिया पूर्ण होण्यास वर्ष भराचा कालावधी लागू शकतो. राहुची अंतर्दशा अवघ्या चार महीन्यात संपत असल्याने आपल्याला त्याच्या पुढची म्हणजे गुरुची अंतर्दशा तपासायला हवी.

राहू नंतरची गुरुची अंतर्दशा ३० जुन २०१७ ला चालू होईल आणि ११ जानेवारी २०२० ला संपेल. गुरुची अंतर्दशा ही शनी महादशेतली शेवटची अंतर्दशा असल्याने गुरु च्या अंतर्दशे बरोबरच शनी ची महादशा पण संपते.

या गुरुचे कार्येशत्व आपण पाहीले आहेच:

गुरु:  १० / ४ / ११ , ६ / ७ , १०

गुरु विवाहच्या विरोधी म्हणजे षष्ठम  (६) आणि दशम (१०) भावांचा कार्येश असल्याने विवाहा साठी अगदी प्रतिकूल आहे.

गुरु स्वत:च्याच  सब मध्ये आहे.

गुरुची ही अंतर्दशा शिल्पाला घटस्फोटा पर्यंत घेऊन जाणार असे दिसते.

आता गुरुची ही अंतर्दशा  ३० जुन २०१७  ते ११ जानेवारी २०२० अशी अडीच वर्षे चालणार आहे. या काळात घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया नक्कीच पूर्ण होऊ शकते. अर्थात संततीची कस्ट्डी, मालमत्तेतला वाटा, पोटगी , गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप (क्रिमीनल चार्जेस) अशी गुंतागुंत नसेल तरच ! पण यातले काहीच नाही असा खुलासा  शिल्पाने केला होता.

आता ३० जुन २०१७  ते ११ जानेवारी २०२० या अडीच वर्षात तुझा घटस्फोट होईल असे सांगणे म्हणजे फारच स्थूल मानाचे ठरेल. तेव्हा आपण या अडीच वर्षातला नेमका कालावधी सांगता येतो का ते पाहू.

आता या गुरुच्या अंतर्दशेत सगळ्याच ग्रहांच्या विदशा येणार आहेत , यातली नेमकी कोणती विदशा घटस्फोट देईल हे तपासायला हवे.

आज तारीख ९ मार्च २०१७, शिल्पाने  घटस्फोटा साठी अर्जही केला नाही, इथुन सुरवात केली तर :
अर्ज दाखल करणे त्यानंतर सहा महीन्यांचा बंधन कारक अस्स किमान कालावधी याचा विचार केला तर असे दिसते की अगदी सगळे झटपट झाले म्हणले तरी कमीतकमी सात-आठ महीने तरी लागणारच. म्हणजे या मार्च महीन्यात कोर्टात अर्ज दाखल केला तरी घट्स्फोटाचा निकाल हातात पडायला कमीतकमी सप्टेंबर – ऑक्टोबर २०१७ तरी उजाडणारच. त्यात शिल्पा करत असलेल्या आरोपांना समोरची पार्टी आव्हान देऊ शकते ( शिल्पाच्या आई – वडीलांना नेमकी हीच भिती होती ) हे पण लक्षात घेतले पाहीजे , त्यामुळे मी साधारण २०१७ अखेर ते २०१८ चे पहीले काही महीने हा कालावधी विचारात घ्यायचे ठरवले . या अपेक्षित कालावधीत नेमकी कोणती विदशा चालू असेल ते पाहू.

 

गुरु च्या अंतर्द्शेतली पहीली विदशा गुरुची असते ती ३१ ऑक्टोबर २०१७ ला संपणार आहे या कालावधीत काही घटस्फोट होऊ शकत नाही.

पुढची विदशा येणार ती शनी ची ती  ३१ ऑक्टोबर २०१७ ते २७ मार्च २०१८ अशी असेल.

त्याच्या पुढची विदशा बुधाची असणार ती २७ मार्च २०१८ ते ५ ऑगष्ट २०१८ अशी असेल.

या दोन्ही विदशांचा कालवधी आपण आधी जो अंदाज केला आहे (घटस्फोटाला वर्षभर लागेल ) त्याच्याशी सुसंगत आहे.

याच्या पुढच्या केतु , शुक्र इ च्या विदशा तपासण्यात काही अर्थ नाही कारण त्या विदशा प्रश्न विचारल्याच्या तारखे पासुन सुमारे दीड वर्षाने येणार आहेत आणि इतक्या दूरच्या कालनिर्णया साठी प्रश्नकुंडली वापरु नये.

तेव्हा आपण शनी आणि बुधाच्या विदशां वर लक्ष केंद्रीत करु.

पहीली विदशा शनीची. या शनीचे कार्येशत्व आपण तपासले आहेच:

शनी:  ९ /  ६ /  ८, ९ /  —

महादशा स्वामी शनी षष्टम (६ ) आणि अष्टम (८) स्थानां च्या माध्यमातून विवाहा साठी साठी प्रतिकूल आहे. नवम (९) स्थानाची उपस्थिती न्यायालयीन निवाडा दर्शवते.

विदशा स्वामी बरोबर त्याचा सब पण तपासावा लागतो.

विदशा स्वामी शनी चा सब आहे रवी  , या रवीचे कार्येशत्व आपण पाहीले आहे:

रवी :  ४ / ९ / ७, १०/ ३

विदशा स्वामीचा सब रवी देखील दशम (१० )  स्थानाच्या माध्यमातून विवाहा विरोधी पवित्रा घेत आहे शिवाय त्रितीय (३) व नवम (९) स्थानांच्या माध्यमातून  करार , न्यायालयीन निवाडा असे पूरक भाव पण दाखवत आहे.

म्हणजे विदशा स्वामी शनी आणि त्याचा सब रवी दोघेही विवाहा साठी विरोधी आहेत.  या शनी विदशेत शिल्पाचा घटस्फोट होण्याची शक्यता जास्त आहे .

शनी विदशेच्या पुढची बुधाची विदशा काय म्हणते?

बुध: ४ / ९ / ७ , १० / १ , ४

बुधाचा सब शुक्र आहे.

शुक्र : ९ / १०  /  १ , ४ / १२, ५

आता या दोन विदशा स्वामींच्या कार्येशत्वा कडे पाहीले तर लक्षात येत की ,  शनी चे  ९ /  ६ /  ८, ९ /  —  असे कार्येशत्व घटस्फोटा साठी जास्त अनुकूल आहे तुलनेत बुध: ४ / ९ / ७ , १० / १ , ४  हे कार्येशत्व तितकेसे प्रभावी नाही.

मग या शनीच्या विदशेत शिल्पाचा घटस्फोट होणार का?

सगळे ग्रहमान तर तोच रोख दाखवत आहे पण गोचर ( ट्रांसिट ) अनुकूल असल्या खेरीज घटना घडणार नाही.

आता हे  ट्रांसिट बघायचे म्हणजे या विदशेच्या काळातले रवी चे भ्रमण तपासायचे , हा रवी त्या काळात महादशा – अंतर्दशा किंवा अंतर्दशा – विदशा स्वामींच्या राशी – नक्षत्रां मधुन जात असला पाहीजे.

राशी – नक्षत्रां ची कोणती साख़ळी आपल्याला अपेक्षीत आहे ?

महादशा – अंतर्दशा यांचा विचार केला तर

शनीची रास आणि गुरु चे नक्षत्र

किंवा

शनीचे नक्षत्र आणि गुरुची रास

अंतर्दशा – विदशा यांचा विचार केला तरीही

शनीची रास आणि गुरु चे नक्षत्र

किंवा

शनीचे नक्षत्र आणि गुरुची रास

अशीच साखळी जुळायला हवी.

आपला अपेक्षीत कालावधी ३१ ऑक्टॉबर २०१७ ते २७ मार्च २०१८ असा आहे.

या कालावधीत रवी :

शुक्राच्या तुळेत

मंगळाच्या वृश्चिकेत

गुरुच्या धनेत

शनीच्या मकरेत

शनीच्या कुंभेत

असा भ्रमण करेल.

या पैकी तुळ , वृश्चीक या राशींतले रवी भ्रमण आपल्या कामाचे नाही कारण शुक्र आणि  मंगळ आपल्या साखळीत नाहीत.

गुरुच्या धनु राशीत शनीचे नक्षत्र नाही त्यामुळे धनेतले रवी भ्रमण पण उपयोगाचे नाही.

शनीच्या मकर आणि कुंभ राशी पैकी फक्त कुंभेतच गुरुचे  नक्षत्र आहे.

त्यामुळे शनीची रास आणि गुरुचे नक्षत्र अशी साखळी जुळू शकते.

कुंभेत रवी प्रवेश साधारण पणे १३ फेब्रुवारी ला होतो आणि हा कुंभेतला रवी गुरुच्या पुर्वा भाद्रपदा नक्षत्रात साधारण पणे ५ मार्च ते १४ मार्च असा असेल.

हा कालावधी म्हणजेच आपली शनी महादशा – गुरु अंतर्दशा – शनी विदशा अशी आहे. ५ मार्च ते १४ मार्च २०१८ या कालावधीत शिल्पाचा घटस्फोट होणार !

या कालावधीतल्या सुक्ष्मदशा पाहायच्या तर त्या:

राहु सुक्ष्मदशा : १३ फेब्रुवारी २०१८ ते ७ मार्च २०१८

गुरु सुक्ष्मदशा: ७ मार्च २०१८ ते २७ मार्च २०१८

या दोन्ही मध्ये राहु जास्त दणकेबाज वाटतो कारण  तो ९,३ चा अत्यंत प्रबळ कार्येश आहे.

त्यामुळे शिल्पाचा घटस्फोट मार्च च्या पहील्या आठवड्यात होणार.

 

—- ६ मार्च २०१८ शिल्पाच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झाले.

 

समाप्त 

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+2

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

12 प्रतिक्रिया

///////////////
 1. प्राणेश

  सर, तुम्ही शंकानिरसन छान करता. आणखी थोडा त्रास देतो.

  रवी, बुध व गुरू हे सप्तमस्थानाचे सुद्धा कार्येश आहेत. असे पूरक व विरोधी भाव एकत्र आल्यावर काय करायचे?

  0
  1. सुहास गोखले

   श्री. प्राणेशजी,

   एखादा ग्रह एखाद्या घटने साठीच्या अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही भावां चा कार्येश असतो तेव्हा तो त्या सर्व भावांची (अनुकुल / प्रतिकूल ) फळे देण्याचा प्रयत्न करतो.

   ग्र्ह जरी अनेक भावांचा कार्येश होत असला तरी हे कार्येशत्व एक सारखे नसते , या कार्येशत्वा मध्ये अ – ब – क – ड – ई – फ – ग अशा अनेक पातळ्या असतात त्यानुसार ग्र्हाची फळे देण्याची क्षमता ठरत असते.

   एखादा ग्रह सप्तमाचा प्रबळ कार्येश असला तरी त्या ग्रहाची दशा योग्य काळात आली तर त्याचा उपयोग होतो. ग्रह सप्तमाचा कार्येश या नात्याने विवाह घडवूण आणेल पण त्याच वेळी त्या ग्रहाचा सब जर विवाहाला प्रतिकूल असेल तर मात्र ह्या ग्रहाने घडवूण आणलेला विवाह सुखाचा होणार नाही.

   हा भाग जरासा किचकट आहे, समजाऊन सांगण्यासाठी अनेक उदाहरणें द्यावी लागतील ते या ब्लॉग (कॉमेंट्स) च्या माध्यमातून शक्य होणार नाही.

   सुहास गोखले

   0
  1. सुहास गोखले

   श्री राकेशजी

   काही वेळा सर्व्हर च्या तांत्रीक अडचणी मुळे थोडावेळ कॉमेंट पोष्ट होत नाहीत, याला सध्यातरी काही उपाय नाही, जरा वेळाने पुन्हा प्रयत्न करावा असे सुचवतो.

   आपली ईमेल पण मिळाली पण मला मराठी रोमन लिपीत लिहलेले वाचयाला फार त्रास होतो , वेळ जातो, आपण देवनागरीत मेसेज लिहला तर त्याच्या कडे लक्ष देणे मला शक्य होईल

   सुहास गोखले

   0
 2. Rakesh

  सुहास जी , माझा उत्तर चुकला पण विदशा बरोबर निघाली योग्य व्हायला, मी ट्रान्सीट गुरु आणि शनी ची चेक केला पण रवीचा नाही कारण बऱ्याचदा रवीच्या ट्रान्सीट ची साखळी मिळाली तरी घटना घडत नाही किंवा नाही मिळाली तरी घटना घडताना दिसते असा माझा अनुभव आहे .
  माझे उत्तर चुकण्याची करणे –
  १ – ७ च उपस्वामी ७ आणि ६ कुठेच देत नाही एक्ससेप्ट केतू सब लेवल ला जे तुम्ही दिलेल्या सॉफ्टवेअर माहिती मध्ये दिसला नाही . विवाह तुटायला ६ imp आहे असा मला वाटतं. ६ जसा ७ पासून १२ व आहे तास १ हे ७ व आहे (प्रत्येक घटना लग्नाशी रेलटेड असते )१० हे ७ पासून ४थ आहे आणि ११ पासून १२ व आहे.त्यामुळे १ आणि १० आहे म्हणून विवाह विव्च्छेद मला झेपला नाही. १२ वभाव आहे जो ७ पासून ६ व आहे पण आपण विवाह साठी २ भाव पण बघतो जो ८वा आहे ७ पासून .

  २. महादशा शनी ची आहे त्याने सगळे भाव दिले म्हणून त्याचीच विदशा ठीक आहे तरी पण त्यांनी १२ नाही दिला जसा ७थ सब शुक्रनि दिले. गुरु अंतर्दशा १० आणि ६ जरी देत असली तरी ७,४,११ पण देते .त्यांनी ३ आणि ९ पण दिले नाही म्हणजे त्या दशेत कायदा आणि करार काहीच दिसत नाही . ६ आहे म्हंणून married life मधे अडचणी देणाराच . गुरूच सब पण गुरूच म्णजे तो पण ४/७/१० देत आहे.
  ह्यावरून मला डिवोर्स मिळणार नाही असा वाटलं पण उत्तर चुकला 🙂

  0
  1. सुहास गोखले

   श्री राकेशजी,
   विवाह असो किंवा घटस्फोट सप्तम स्थानाचा ‘सब’ बघायचा. या प्रश्न कुंडलीत सप्तमाचा ‘सब’ हा शुक्र आहे. त्याचे कार्येशत्व ९ / १० / १ , ४ / १२, ५ असे आहे. प्रश्न घटस्फोटाचा असल्याने हा सब विवाहाच्या विरोधी भावांचा कार्येश असेल घट्स्फोट होण्याची शक्यता आणि हा सब जर 7,2,11 पैकी कोणाचा प्रबळ कार्येश होत असेल तर घटस्फोटाची शक्यता फार कमी. इथे शुक्र हा 10, 1, 12 या विवाहाच्या विरोधी भावांचा कार्येश होतो आहे , तसेच न्यायनिवाडाचे 9 वे स्थान पण दाखवत आहे. शुक्र 7,2,11 पैकी कोणाचाही कार्येश नाही म्हणून इथे घटस्फोट होण्याची मोठी शक्यता निर्माण होते.

   इथे लक्षात घ्यायचे की हा सप्तमाचा सब सगळ्याच विवाहा विरोधी स्थानांचा कार्येश असलाच पाहीजे असे नाही त्यामुळे शुक्र 6 चा कार्येश नाही म्हणून काही बिघडत नाही , तो इतर भावांचा कार्येश असला तरी पुरेसे असते.

   महादशा स्वामी शनी चे कार्येशत्व ९ / ६ / ८, ९ / , महादशा स्वामी शनी षष्टम (६ ) आणि अष्टम (८) स्थानां च्या माध्यमातून विवाहा साठी साठी प्रतिकूल आहे. नवम (९) स्थानाची उपस्थिती न्यायालयीन निवाडा तसेच (कदाचित) दुसरा विवाह दर्शवते. दशा स्वामी शनी चा सब रवी दशम (१० ) स्थानाच्या माध्यमातून विवाहा विरोधी पवित्रा घेत आहे शिवाय त्रितीय (३) व नवम (९) स्थानांच्या माध्यमातून करार , न्यायालयीन निवाडा असे पूरक भाव पण दाखवत आहे.
   म्हणजे दशा स्वामी शनी आणि त्याचा सब रवी दोघेही विवाहा साठी विरोधी आहेत. या शनी महादशेत घटस्फोट होण्याची शक्यता वाढली आहे .

   शनीच्या दशेतली चालू असलेली राहु अंतर्दशा आपण विचारात घेऊ शकत नाही कारण ही अंतर्दशा प्रश्न विचारलेल्या वेळे पासुन चार महीने इतकीच आहे , इतक्या कमी कालावधीत घटस्फोटा चा निकाल लागू शकत नाही. जातकाने प्रश्न विचारते वेळी कोर्टात घटस्फोटा साठी अर्ज दाखल केलेला नव्हता ही बाब महत्वाची आहे.

   पुढची गुरु अंतर्दशा बराच काळ चालणार असल्याने घटस्फोटाचा निर्णय व्हायला हा कालावधी पुरेसा आहे. गुरुचे कार्येशत्व १० / ४ / ११ , ६ / ७ , १० असे आहे. इथे गुरु विवाहाच्या विरोधी अशी 10, 6 अशी दोन्ही स्थाने देत आहे तसेच विवाहास पुरक अशी 7, 11 अशी स्थाने पण दाखवत आहे. इथे थोडा गोंधळ होणे स्वाभाविक आहे , पण 10 चे कार्येशत्व ‘अ’ दर्जाचे आहे त्यामुळे घटस्फोटाच्या घटनेला दुजोरा मिळतो, 7, 11 चे कार्येशत्व कदाचित जातकाचा घटस्फोटा नंतरचा दुसरा विवाह दाखवत असेल. ( गुरु ची अंतर्दशा 2020 पर्यंत असल्याने , या अंतर्दशेत घटस्फोट होणे आणि नंतर काही कालांतराने दुसरा विवाह होणे शक्य आहे)

   कोर्टात अर्ज दाखल करणे व त्याच्या सर्व प्रक्रिया पार पडयला जो आटः महीनमहीने – एक वर्ष कालावधी लागतो त्याचा विचार करुन आपण त्या कालवधीत येणार्‍या विदशांचाच विचार केला आहे. त्या अलिकडच्या विदशा फार लओकर म्हणून नाही आणि नंतरच्या विदशा प्रश्नकुंडलीच्या टाईम स्पॅन मध्ये बसत नाही म्हणून नाही. (प्रश्न कुंडली साधारणपणे एक सहा महीने ते एक वर्षा इतक्याच कालावधी साठी उपयुक्त असते त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी प्रश्न कुंडली वापरु नये)

   आपण रवी चे ट्रॅन्सिट वापरले आहे, शनी- गुरु किंवा गुरु – शनी अशी साखळी जुळते का बघितले आहे.
   शुभेच्छा
   सुहास गोखले

   0
 3. Rakesh

  तुमचा म्हणणं बरोअबर असेल कारण तुमचा अनुभव खूप आहे त्यामुळे कि ७ च सब ६ चा कार्येश नसला तरी पण विवाह विरोधी स्थानांचा कार्येश आहे म्हणून घटस्फोट झाला असेल . मला, १० हे ७ पासून ४थ आहे आणि ११ पासून १२ व आहे आणि १ हा लग्न आहे .त्यामुळे १ आणि १० आहे म्हणून विवाह विव्च्छेद he मला झेपला नाही.
  आपण एवढे चांगले डिटेल मध्ये समजावून सांगितले त्याबद्दल धन्यवाद.

  0
 4. jyoti

  Tumacha KP la Virod disato Bharpur lekhat..pan hi kundali tar KP varunch sodavaleli aahe v Uttar ki barobar aale…

  0
  1. सुहास गोखले

   सुश्री ज्योतीजी,

   मी केपी चा अनेक वर्षे अभ्यास केला आहे आणि माझ्या कामात मी बर्‍याच वेळा केपी वापरतो.

   माझा विरोध केपी ला नाही तर केपी मधल्या त्रुटीं, केपी मध्ये वाढत चालेला भाकड नियम / संशोधांचा बाजार, तथाकथित केपी गुरुं कडून केपी नियमांची केलेली सोयिस्कर तोडमोड, संशोधनाच्या नावाखाली खपवलेले गेलेले अर्धे कच्चे / कोणतीही सिद्धता नसलेले ज्ञान , रुलिंग प्लॅनेट्स चा स्वैर आणि चुकीचा वापर , पारंपरीक ज्योतिषातल्या अत्यंत उपयुक्त गोष्टींचा अस्विकार / दुर्लक्ष या अशा अनेक गोष्टीना माझा विरोध आहे.

   एखादा चांगला ज्योतिषी होण्यासाठी अनेक वर्षाचा अभ्यास , व्यासंग , तपश्चर्या लागते अशी कोणतीही मेहेनत न घेता एखादे केपी बुक वाचून किंवा एखादा तीन – चार महीन्याचा क्लास करुन केपी ज्योतीषी बनलेल्यांच्या वर मी नेहमीच टीका करत असतो , केपी या ज्योतिष पद्दती वर ही टीका नसते हे लक्षात घ्या.

   मी स्वत: केपी वापरतो पण ती अगदी शुद्ध स्वरुपात म्हणजे श्री के एस कृष्णमूर्ती यांनी जशी सांगीतली तशी.

   आपला गैरसमज दूर झाला असावा अशी अपेक्षा करतो.

   शुभेच्छा

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.