मोर शिल्पा बसली होती, शेजारी तिचे आई-वडील!

शिल्पाची आई शिल्पाला परोपरीने समजावत होती पण या शिल्पाचे रडणे काही थांबत नव्हते. मला ही काय करावे ते कळेना. शेवटी एकदाची शिल्पा सावरली आणि आमचे बोलणे सुरु झाले ….

मोठ्या हौसेने , वाजत गाजत झालेला शिल्पाचा विवाह अवघे दोन महीने सुद्धा टिकला नाही. विवाहा नंतर दोन महीन्यांनी शिल्पा माहेरपणा साठी म्हणून जी आली ती पुन्हा सासरी  गेलीच नाही. या ‘घरवापसीचे’ कारण ही असे सबळ होते की समझोत्याचे कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत कारण तशा ‘कारणाला’ फक्त ‘घटस्फोट’ हेच उत्तर असू शकते.

म्हणजे इथे ‘घटस्फोट होईल का ?‘ असा प्रश्नच नव्हता तर ‘घटस्फोट केव्हा मिळेल ?’ हा प्रश्न होता. घटस्फोट घ्यायचा हे नक्की फक्त तो विनासायास , काही अडथळे न येता बिनबोभाट मिळावा आणि शिल्पाची या विवाह बंधनातून लौकरात लौकर सुटका व्हावी अशीच सार्‍यांची ईच्छा होती.

शिल्पाने घटस्फोटा साठी अद्याप अर्ज  दाखल केलेला नसला तरी त्याची सर्व तयारी होत आली होती. तसे पाहीले तर केस इतकी साफ होती की घटस्फोट मिळायला कोणतीच अडचण येऊ नये , ज्योतिषाला प्रश्न विचारण्या इतकी गंभीर किंवा अडचणीची परिस्थिती तर अजिबात दिसत नव्हती. पण शिल्पाच्या सासरचे लोक याला मोडता घालून शिल्पाला त्रास देण्यासाठी लटकवत ठेवायचा प्रयत्न करु शकतील अशी भिती  शिल्पाच्या आई – वडीलांना होती, म्हणून ज्योतिषी !

सर्वप्रथम मी शिल्पाची जन्मपत्रिका तयार केली, खरे तर घटस्फोटाच्या मामल्यात  पती -पत्नी दोघांच्याही पत्रिका तपासाव्या लागतात पण शिल्पाच्या नवर्‍याचे जन्म तपशील उपलब्ध नव्हते.  शिल्पाची पत्रिका पाहताच लक्षात येत होते की विवाह / वैवाहीक जीवन ह्या दृष्टीकोनातुन ही पत्रिका कमालीची बिघडलेली आहे आणि शिल्पाच्या पत्रिकेनुसार सध्या चालू असलेली महादशा – अंतर्दशा – विदशा ही साखळी त्याला दुजोरा देत होतीच,  पण शिल्पाच्या नवर्‍याची पत्रिका मिळाली असती तर अनुमान काढणे खूप सोपे गेले असते , कालनिर्णय करणे ही सोपे झाले असते पण ते शक्य नसल्याने मी  शिल्पाच्या जन्मकुंडलीच्या जोडीला प्रश्न कुंडली पण वापरायचे ठरवले.

घटस्फोट केव्हा मिळेल ?’  हाा शिल्पाचा नेमका प्रश्न मला समजला ती वेळ घेऊनच मी एक प्रश्न कुंडली तयार केली, ती सोबत छापली आहे.

 


 

प्रश्नकुंडली चा तपशील:

दिनांक: ९ मार्च २०१७

वेळ: १३:३१:०४

स्थळ: गंगापूर रोड, नाशिक


 

 

कृष्णमुर्ती पद्धती मध्ये जातका कडून ‘नंबर’ घेऊन प्रश्नकुंडली बनवायचा प्रघात आहे, सुरवातीला मी ह्याच पद्धतीने प्रश्नकुंडली मांडत असे पण कालांतराने, अनुभवातुन मी नंबर घेऊन पत्रिका मांडण्यापेक्षा जातक प्रश्न विचारतो ती वेळ घेऊनच एक ‘समय पत्रिका – टाईम चार्ट’ मांडणे अधिक पसंत करतो. कारण बर्‍याच वेळा जातकाने दिलेला नंबर उत्स्फुर्त नसतो , जातका कडून नंबर घेतो तेव्हा जातक हमखास त्याचा काही खास , जवळजवळ आधीच ठरवलेला असा एखादा लक्की नंबर  देतो असा माझा अनुभव आहे. कितीही समजावले तरी हे लक्की नंबर यायचे काही थांबत नाही. बर्‍याच वेळा हे ‘नंबर’ प्रकरण काय आहे हे समजवण्या साठी जातकाला लेक्चर द्यावे लागते त्यात बराच वेळ जातो इतकेच नव्हे तर या लेक्चरबाजी मुळे आधीच गोंधळलेल्या जातकाचा अधिकच गोंधळ होतो. काही के.पी. वाले  पुस्तकातले एखादे पान उलटून त्या पाना वर असलेला पृष्ठ क्रमांक हाच के.पी. म्हणुन नंबर घेतात, काहींनी तर १ ते २४९ क्रमांकाचे बिल्ले तयार करुन ते एका थैलीत भरुन ठेवलेले असतात आणि मग जातक त्यातून (डोळे मिटून) एक बिल्ला काढतो हाच के.पी. नंबर ! काही जण कॉम्प्युटर अथवा कॅलक्युलेटर वरचे ‘रॅन्डम नंबर’ हे फिचर वापरुन नंबर घेतात, माझ्या सॉफ़्टवेअर मध्येच हा असा के.पी. नंबर काढण्याची सुविधा दिली आहे ! मला ही असली ‘मटका’ सिस्टीम कधीच पटली नाही. त्या पेक्षा सरळ सरळ जातकाचा प्रश्न मला समजला ती वेळ घेऊन तयार केलेली प्रश्नकुंडलीच जास्त नैसर्गिक आणि प्रश्नशास्त्राच्या मुलतत्वांशी सुसंगत वाटते. बाकीच्यांची मते वेगळी असू शकतात.

असो.

 

सर्वप्रथम आपण ‘वैवाहीक सौख्य’ ,’घटस्फोट’ यां साठी कोणते नियम – आडाखे तपासावे लागतात त्याचा एक धावता आढावा घेऊ.

विवाह असो वा घटस्फोट , या साठी पत्रिकेतले प्रमुख स्थान म्हणजे सप्तम (७) स्थान. या सप्तम (७) स्थानाचा ‘सब’ आपल्याला या घटने बद्दलचा होकार किंवा नकार सांगतो.

विवाहासाठी आपण:

द्वीतीय (२) स्थान: कुटुंबात वृद्धी

सप्तम (७) स्थान : वैवाहीक जोडीदार

लाभ (११) स्थान: ईच्छापुर्ती

अशा तीन प्रमुख भावांचा विचार करतो. आता ‘घटस्फोट’ म्हणजे विवाहाच्या विरुद्ध घटना  म्हणजेच ‘अन डू’ ! तेव्हा घटस्फोटा साठी आपल्याला २ ,७ आणि ११ ची व्ययस्थाने म्हणजेच लग्न (१) स्थान,  षष्ठम (६) स्थान आणि दशम (१०) स्थान यांचा विचार करावा लागतो.

विवाह हा जसा एक करार असतो तसाच ‘घटस्फोट’ हा देखील एक मोठा करार असतो आणि तोही न्यायालयीन प्रक्रियेचा वापर करुन केलेला करार , त्याच वेळेला ह्या करारावर न्यायदेवतेची मोहोर असणे   आवश्यक असते , त्यामुळे :

त्रितिय (३) स्थान : करार मदार

नवम (९) स्थान : न्यायनिवाडा

या सार्‍यांच्या जोडीला

पंचम (५) आणि अष्टम (८) या स्थानांचा विचार मानसिक त्रास / छळ या अंगाने करावा लागतो. हे  पंचम (५)  स्थान  ‘संततीची कस्ट्डी’ विषयक मुद्दा असल्यास महत्वाचे ठरते . आणि अष्टम (८) स्थान ‘पोटगी / मालमत्तेतला हिस्सा’ असे दावे असल्यास महत्वपूर्ण ठरते.

व्यय, हानी, अपकिर्ती, लोकापवाद, शिक्षा, भांडण , विवाहातुन उद्भवणारा त्रास, न्यायालयीन प्रक्रिया, हितशत्रु  या अंगाने व्यय (१२‌) स्थानाचा विचार आवश्यक असतो.

 

सप्तमाचा (७) सब आणि आगामी दशा-अंतर्दशा –विदशा ह्या  १, ६, ८ , १० किंवा १२ या स्थानांशी संबंधीत असतील आणि त्याच वेळी त्रितिय (३) आणि नवम (९) भावांचाही संबंध येत असेल तर त्या कालावधीत  वैवाहीक जीवनात मोठे अडथळे येण्याची मोठी शक्यता असते घटस्फोट देखील होऊ शकतो.

 

चला , आता या एव्हढ्या पार्श्वभूमीवर आपण ही प्रश्नकुंडली सोडवायला घेऊ.

 

प्रश्नकुंडलीच्या बाबतीत चंद्राची साक्ष घ्यायचा प्रघात आहे , चंद्र मनाचे प्रतिबिंब असते असे बरेच वेळा अनुभवास येते , म्हणजे प्रश्न वेळेला असलेली चंद्राची रास ,  नक्षत्र व त्यावरुन सिद्ध होणारे चंद्राचे कार्येशत्व हे  प्रश्नाच्या संदर्भात असते. म्हणजे प्रश्न विवाहाचा असेल तर चंद्र विवाहा संदर्भातल्या २ , ७ , ११ भावां पैकी काहींचा कार्येश असतो. नोकरीचा प्रश्न असल्यास २,६,१०, ११ ही स्थाने किंवा नोकरी जाण्या बद्दल प्रश्न असल्यास नोकरीच्या विरोधातली ३,५,९, ८, १२ अशी स्थाने , घरा संदर्भात प्रश्न असला तर ४, ११, १२ परदेशगमना संदर्भात प्रश्न असला तर ३,९,१२, अशी स्थाने .

अर्थात असे असायलाच हवे असे बंधन नाही पण एक सुरवातीचा तपास म्हणून याचा उपयोग करुन घ्यायला काहीच हरकत नाही. काही वेळा जातकाच्या मनात असते एक आणि प्रश्न दुसराच विचारला असतो, हा गोंधळ या चंद्रा वरुन चांगला समजतो. मात्र प्रश्ना संदर्भातले प्रमुख भाव आणि चंद्राने निर्देशीत केलेले भाव यात फारच तफावत असली  तर तीन शक्यता असू शकतात:

१) जातकाच्या मनात एक आहे आणि प्रश्न भलताच विचारला आहे. अशा परिस्थितीत जातकाला बोलते करुन खुलासा करुन घेणे आवश्यक आहे.

२) जातकाने प्रश्न विचारण्यास चुकीची वेळ निवडली आहे, सध्या या प्रश्नाला उत्तर मिळू नये अशी नियतीचीच ईच्छा आहे असे समजावे , या प्रश्ना संदर्भात आणखी काही घटनां अगदी नजिकच्या काळात घडणार आहेत, त्या घडून  गेल्यावरच हा प्रश्न विचारणे योग्य ठरेल. अशा वेळी जातकाला दुसर्‍या कोणत्या वेळी तोच प्रश्न विचारण्यास सुचवावे.

३) जातक प्रश्ना बाबतीत पुरेसा गंभीर नाही, कदाचित जातक ज्योतिषाची परीक्षा घेण्याच्या अथवा ज्योतिषाची चेष्टा करण्याच्या हेतुने आला आहे . अशा वेळी योग्य ती खातरजमा करुन घ्यावी.

अर्थात चंद्राची अशी साक्ष काढण्यासाठी  प्रश्न विचारता क्षणी प्रश्नकुंडली मांडली जाणे आवश्यक आहे.  काही के.पी. ज्योतिषी प्रश्न ऐकून घेतात / नंबर घेऊन ठेवतात पण प्रश्नकुंडली सवडीने नंतर केव्हातरी मांडून सोडवतात, अशा वेळी प्रश्न वेळेची चंद्राची स्थिती आणि कुंडली मांडतानाच्या वेळेच्या चंद्राची स्थिती बदललेली असल्याने , चंद्राची साक्ष निरुपयोगी ठरते.

इथे शिल्पा साठी केलेली प्रश्नकुंडली प्रश्न विचारता क्षणाचीच असल्याने चंद्राची साक्ष घ्यायला काहीच हरकत नाही.

चला तर,  शिल्पाच्या प्रश्नकुंडलीतला चंद्र काय म्हणतो ते पाहूयात…

या पत्रिकेतला चंद्र , धन (२) स्थानात आहे , चंद्राची कर्क राशी पण धन (२) स्थानावर आहे, चंद्र शनीच्या नक्षत्रात , शनी षष्ठम (६)  स्थानात ,  शनीच्या मकर आणि कुंभ या राशीं अष्टम (८) आणि नवम (९) स्थानांवर म्हणजे चंद्राचे कार्येशत्व असे आहे:

चंद्र:  ६ / २ / ८,९ / २

चंद्राने शिल्पा चा प्रश्न अगदी बरोबर दाखवला आहे. षष्ठम (६) स्थान विवाहाचे प्रमुख विरोधी स्थान आहे , नवम (९) स्थान हे न्यायनिवाडा दर्शवते. कदाचित शिल्पाच्या मनात घटस्फोट घेऊन दुसरे लग्न करण्याचे विचारही असू शकेल. नवम (९) आणि द्वीतीय (२) स्थानांची उपस्थिती त्यामुळेच असावी. 

प्रश्न ‘घटस्फोट’ हा असल्याने आपल्याला  विवाहाचे प्रमुख स्थान मानले जाणार्‍या सप्तम (७) स्थानाचा सब काय  म्हणतो ते बघायला हवे.

सप्तमाचा सब शुक्र आहे.  शुक्र वक्री अवस्थेत आहे . सब वक्री असला तर तो सब मार्गी होई पर्यंत अपेक्षीत घटना घडणार नाही. शुक्र हा बुधाच्या नक्षत्रात आहे. बुध मार्गी आहे. हा नक्षत्रस्वामी स्वत:  वक्री असेल तर मात्र प्रश्नात अपेक्षीत असलेली घटना घडत नाही.

हा प्रश्नकुंडलीतला महत्वाचा तपास! प्रश्ना संदर्भातल्या  प्रमुख भावाचा सब वक्री ग्रहाच्या नक्षत्रात असता कामा नये , तसा तो असेल तर प्रश्नात अपेक्षित असलेली घटना घडत नाही.  हा सब स्वत: वक्री असला तरी चालेल (तो मार्गी झाला की परिणाम मिळतील) .

आता या सप्तमाच्या सबचे म्हणजे शुक्राचे कार्येशत्व तपासले पाहीजे.

शुक्र दशम (१०) स्थानी आणि शुक्राच्या वृषभ आणि तुळ या राशीं  व्यय  (१२) आणि पंचम (५) स्थानीं , शुक्र हा बुधाच्या नक्षत्रात आहे, बुध  भाग्यात  (९) , बुधाच्या मिथुन आणि कन्या या राशींं लग्न (१) आणि चतुर्थ (४) स्थानांवर ; म्हणजे शुक्राचे कार्येशत्व असे आहे:

शुक्र : ९ / १०  /  १ , ४ / १२, ५

सप्तम (७) स्थानाचा सब शुक्र दशम  (१०) , लग्न  (१) आणि व्यय (१२) स्थानांच्या माध्यमातुन विवाहाच्या बाबतीत प्रतिकूल संकेत देत आहे.

यातुन काय प्राथमिक निष्कर्ष निघतो ?  शिल्पाचा विवाह धोक्यात आहे, घटस्फोट होण्याची मोठी शक्यता आहे!

 

मग खरेच का शिल्पाचा घटस्फोट होणार ?  ते आपण या केस स्ट्डीच्या पुढच्या भागात पाहू..

 

 

या लेखाचा दुसरा भाग लिहून तयार आहे पण तो अजुन तीन दिवसांनी प्रकाशीत करेन दरम्यानच्या काळात वाचकां पैकी कोणाला ही केस स्ट्डी सोडवायची असेल तर जरुर प्रयत्न करा , अशा प्रयत्नांतूनच अभ्यासाची प्रगती होते. उत्तर चुकेल का काय याची पर्वा न करता प्रयत्न करा , आपले उत्तर मला कळवा. 

 

क्रमश:

 

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

10 प्रतिक्रिया

///////////////
 1. दर्शन जोशी

  आपल्या सर्व लेखांच्या नोट्स माझ्या वहीत काढत आहे. सराव करीत आहे.

  0
  1. सुहास गोखले

   श्री दर्शनजी

   अभिप्राया बद्दल धन्यवाद .

   घटस्फोट होणार का आणि असल्यास केव्हा याचे उत्तर लेखाच्या पुढच्या भागात मिळणार आहेच पण त्यापूर्वी आपण आपल्या परीने हे उत्तर देण्याचा प्रयत्न करावा, उत्तर चुकले तरी हरकत नाही प्रयत्न करायला हवा. उत्तर मला कळवा.

   सुहास गोखले

   0
 2. प्राणेश

  सर, घटस्फोटासाठी षष्ठ स्थान हे principle house होणार नाही का?

  0
  1. सुहास गोखले

   श्री प्राणेशजी,

   तसे नाही विवाह आणि घटस्फोट या दोन्ही साठी सप्तमाचा स्बबच बघायचा.
   ६ वे स्थान हे सप्तमाचे व्यय स्थान म्हणून विवाह विरोधी आहे पण घटस्फोट असला तरीही सप्तम स्थानच प्रिंसिपल हाऊस , नोकरीच्या बाबतीत ही नोकरी जाणे आणि नोकरी मिळणे या विरोधी बाबीं साठी दशम स्थानच प्रमुख स्थान आहे.

   सुहास गोखले

   +1
 3. Rakesh

  Namaskar Suhas ji,
  7th cha csl shukra ahe to budh chya nakshtrat ani ketuchya upnkastrat ahe.
  Shukra – 9/10/1/4/5/12 chya barobarach 6 cha pan significator hoto pan khup strong hot nahi tyamule divorce awghad watto.
  Ani ithe kuthech 7 or 11 yet nahiyet. 1/12 clear ahet mhanje mulila pan he strongly nakoch ahe.Ra
  Dasha – Sa – Ra chi June end 17 paryant ahe mhanje hya antardashet tar milnar nahi(Divorce process purn vayla 1 varsh lagel)
  Sa – 6/8/9
  Ke – 9(6/8/9/3)
  Su – 9/3
  Shani 12 det nahiye pan 6/9/3 dile. (Rahu chi baghaychi mhanla tari to – Ra – 9/3/6/8)
  Guru chi antardasha january 20 paryant ahe.
  Ju – 4/7/10
  Ma – 10/11/6
  Ju- 4/7/10.
  Guru madhe 7/11 ahe ani 4 pan ahe.Dasha antardashet 12 nahiye ani nusta 6 katkat deil, ani 9/3 he pan milat nahiye. Tyamule 20 paryant tari divorce disat nahi.
  Tari pan ek guess karaycha zala tar december end 17 or jan 18 madhe guru mangalala ani shani ketu la activate kelya mule teva yog banla asel pan ajun divorce zala nasel.

  0
  1. सुहास गोखले

   श्री राकेशजी,

   धन्यवाद, आपण चांगला प्रयत्न केला आहे पण ट्रांसीट बघावे लागते . मी या लेखाचा दुसरा भाग प्रकाशीत केला आहे. तो पहावा. काही शंका असल्यास विचारावे.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.