जिभेचे लाड पुरवायलाच पाहीजेत !
मैसुर पाक हा तसा सगळ्यात स्वस्त म्हणता येईल असा मिठाईचा प्रकार , गरीबांची ‘काजु कतली’ !
आपल्या कडच्या राजस्थानी मिठाई वाल्यां कडे (अपायकारक मेटॅनिल यल्लो) पिवळ्या मेणचट रंगाच्या डाळ साखर तुपाच्या कोरड्या वड्या चक्क ‘मैसुर पाक’ म्हणून विकल्या जातात तेव्हा हे असे मत बनणे अगदी स्वाभाविक आहे पण प्रत्यक्षात तसे नाही, आपण इथे म्हाराष्ट्रात मैसुर पाकच्या नावा खाली जे खातो तो असली मैसुर पाक नैच मुळी !
असली मैसुर पाक हवा असल्यास तडक बंगळूरु गाठावे लागेल…
चला तर मग … बंगलूरु च्या सुप्रसिद्ध ‘ श्री वेंकटेश्वरा स्वईट (मीट)’ वाल्या कडे , गेली साठ वर्षे भारतातला सर्वोत्कृष्ट ‘मैसुर पाक’ बनवतात हे लोक, पुण्याच्या पितळे कडे बाकरवडीला जेव्हढी लाईन असते त्याच्या दुप्पट लाईन यांच्या दुकानात मैसुर पाक घेण्यासाठी असते ! आणि ‘मैसुर पाक संपला ‘ अशी मग्रुर पाटी नाही लावणार हे लोक ! लोकांना मैसुर पाक हवा आहे , लोक्स त्या साठी लाईन मध्ये ताटकळत उभे आहेत ना मग आणखी मेहेनत करुन , चार माणसें जास्त कामाला लावून, मोठी जागा घेऊन तिथे कढई ठेऊन बनवतील पण मायबाप ग्राहकांना मैसुर पाक खिलवतीलच! आणि हो, दुकान दुपारी १ ते ४ इतकेच नव्हे रात्री दहा वाजे पर्यंत उघडे ठेवतील, खा लेको किती मैसुर पाक खाता ते !
आता कुठेशी आले म्हणायचे हे वेंकटेश्वरा … ह्ये काय ‘जया नगरात’ ९ वा मेंन रोड, ३४ वा ए क्रॉस , ४ था ब्लॉक, बनशंकरी त , पत्ता सोप्पा आहे सापडायला.. वेंकटेश्वरा मैसुर पाक म्हणले की कोणता पण रिक्षा वाला तिथे नेऊन सोडतोय बघा…मॅजेस्टीकच्या जवळच हाये
(आता मॅजेस्टीक म्हणजे काय ते विचारु नका,लोक अलिबागला नेऊन सोडतील असे काही विचारले तर!)
आता ह्या येकट्या मैसुर पाका साठी काय ब्यंगळूरास जायाला सांगता काय ? नाय ..ओ नाय .. आता घर बसल्या , ऑण लाईण मैसुर पाक मागवता येतो बर्का…
https://www.flavorsofmycity.com/
तर मंडळी मागावा पाव किलो आणि ह्या ‘अस्सल मैसुर पाका’ चा आस्वाद येक डाव घेऊन बघाच … याड लागलं!!!
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
सर,
हा कडक review वाचुण आत्ताच तडक ऑण लाईण मैसुर पाक मागीवलाय..
धण्यवाद्स..
– राहुल
मस्त राहुलजी, मैसुर खाउन झाला की रिपोर्ट द्या !
सुहास गोखले
Vaa sir,.
Lagech magavala
Thank you
मस्त आनंदजी, खाऊन झाला की कसा काय वाटला ते कळवा ..
सुहास गोखले
छान माहिती. खरेच तो महाराष्ट्रातील दुकानात मिळणार म्हैसूर पाक खाऊन, तो खाण्यासाठी नसून ज्याला थोडाफार दातदुखीचा प्रॉब्लेम आहे त्याला “प्रेमाने” खाऊ घालण्याची गोष्ट आहे असेच वाटत असे.
सध्या मु. पो. बंगलोर येथे असल्याकारणाने एक शेजाऱ्याच्या घरी हा खाल्ला (तेव्हा वाटले की आता माझीच विकेट जाणार, पण नाही…. ). खरेच अतिशय अप्रतिम चव. घरी जाताना चांगले २kg घेऊन गेलो. अर्थात माझ्या घरच्यांचे देखील म्हैसूरपाक बद्दलचे मत माझ्या सारखे (अत्यंत दुर्लभ योगायोग) असल्याने त्यांनी त्याची चव चाखे पर्यंत चांगलेच …… झाले माझे. पण नंतर मात्र ते देखील याचे फॅन झालेत.
मी घेतला तो इंदिरानगर मधील Sri Krishna sweets या दुकानातील होता. (https://www.zomato.com/bangalore/sri-krishna-sweets-indiranagar).
मोठ्ठे दुकान पण मोजून ४-५ गोष्टी विकायला, अर्थात म्हैसूरपाक हेच यांचे आकर्षण.
मंडळी फार गोड खात नाहीत पण हा मात्र अतीशय आवडीचा झालाय.
आता या साठी कधीतरी जयानगर जाणे भाग आहे ….
धन्यवाद अमितजी,
मी लिहले आहे तशी मैसुर पाक ही स्वस्त मिठाई मानली जाते आणि या राजस्थानी मिठाई वाल्यांच्या करामतीं मुळे मैसुर उगाचच बदनाम झाला आहे, श्री कृष्णाचा मैसुर पण उत्तमच आहे , वेंकटेश्वराचा पण बघा आवडेल तुम्हाला..
सुहास गोखले
नक्कीच. येत्याच वीकांताला फाडाश्या पाडण्यात येईल. धन्यवाद सुहाजी.
धन्यवाद श्री. अमितजी
सुहास गोखले
सर, अप्रतिम मैसुरपाक… मजा आली… मित्र मंडळी आणि कुटुंबिय एकदम खुश..
सुहासजी, आपण दिलेल्या माहितीचा उपयोग झाला. आपले सर्वांतर्फे आभार!!
– राहुल
श्री. राहुलजी अभिप्राया बद्दल धन्यवाद … मज्जा करा (मज्जा माडी!)
सुहास गोखले
Shri Suhasji,
Great Pictures and Article as well !!
Added in to do list for next trip.
Thanks,
Anant
श्री. अनंतजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद.
मैसुरपाक मस्तच असतो. जरुर चव घ्या. धारवाड च्या ठाकूर चे पेढे पण अप्रतिम असतात , अक्षरश: वेड लावणारे.
सुहास गोखले