शेवटी ठरलं , हाटिल टाकायचं , एकदम मराठ मोळं नै नै एकदम पुणेरी !
म्येनु काय ठेवायचा यावर बराच विचार केला मग सुचले कोंथिबीर वडी पासुन सुरवात करायची मग एक एक आयटम अॅड करायचे.
तर ह्या कोथिंबीर वड्या…
आता पुणेरी इस्टाइलचे हाटील म्हणल्यावर पुणेरी पाट्या पण पाहीजेत ना..
चला तर त्याही एकदा वाचून बघा आमच्या ह्या नविन हॉटेलातल्या काही नमुनेदार पाट्या !
- ट्माटु केचप साठी जादाचा आकार पडेल.
- प्लेट मध्ये हात धुवु नयेत , वॉश बेसिन शोभेला बसवलेली नाहीत.
- कोथिंबीर वड्या आवडल्यास पुन्हा मागवा पण पाककृती विचारु नये.
- कोथिंबीर वड्या नाही आवडल्यास पुण्याच्या बाहेर चालते व्हा , स्वारगेट हून बसेस आहेत.
- कोथिंबीर वड्या शाकाहारी आहेत दुसरा काही संशय आल्यास डोळे आणि जीभ तपासून घ्या , डॉक्टर शेजारच्या बोळात राहतात , ते पैसे घेतात.
- पेपर नॅपकीन ही आपली संस्कृती नाही, मागू नका , मागीतल्यास अपमान केला जाईल.
- कोथिंबीर वड्या खाताना वचावचा आवाज करु नये , केल्यास कायमचा ईलाज केला जाईल.
- ह्या वड्या आहेत , वडा नाही, पाव मिळणार नाही.
- कोथिंबीर वड्या पार्सल घे्ण्या साठी आलेल्यांनी बाकड्यांवर बसू नये, वड्या मिळे पर्यंत उभे राहावे.
- कोथिंबीर वड्या जरी आम्ही बनवत असलो तरी कोथिंबीर आम्ही पिकवत नाही, कोंथिबिरी बद्दल च्या शंका मंडईत जाऊन फेडुन घ्या.
- मंडई कोठे आहे हे आम्ही सांगत नाही.
- कोथिंबीर वड्या खाऊन संपल्या नंतर प्लेट चाटु नका , आमच्या खंड्या कुत्र्याला राग येतो.
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
लई भारी
असल्या पाट्या पुण्यात बघायला मिळतात म्हणुन गंमतीने लिहलेय हो, मी जर खरेच हॉटेल सुरु केले आणि असल्या पाट्या लावाल्या तर पाप नाही का लागणार ? शिवाय पुण्याचे लोक रागावतील ना माझ्यावर !
सुहास