रवर्षी मे महीन्यात माझा वाढदिवस असतो (आता त्याला काय करणार?) .

मी शाळेत असताना , ज्यांचे वाढदिवस असायचे त्यांची नावे शाळेत सुचना फलका वर लिहली जायची , वर्गशिक्षक त्याचे अभिनंदन करायचे, शाळे कडून एक भेट कार्ड मिळायचे , वाढदिवस असलेला मुलगा/मुलगी त्या दिवशी शाळेच्या युनिफॉर्म ऐवजी , वाढदिवसा साठी खास घेतलेले नवे चकाचक कपडे घालून यायचा/ यायची, कोणी वर्गातल्या मुलांना गोळ्या वाटायचे , त्या काळात आजच्या सारखे वाढदिवस साजरा करणे  , केक कापणे, फुगे, खेळणी , रंगीबेरंगी त्रिकोणी टोप्या , शिट्टी , मेणबत्त्या फुंकून विझवणे ,  ‘हेप्पी बर्थडे टू यू ‘ असे  फारसे होत नसे पण जवळचा मित्र असेल तर तो त्याच्या घरी बोलवायचा , त्याची आई आम्हाला शिरा , बटाटे वडा , सरबत / कैरीचे पन्हे असे काहीतरी खायला द्यायची, आम्ही मित्र ही मग चार चार आणे गोळा करुन त्या मित्राला एखादे गोष्टीचे पुस्तक / ‘हिरो’ चे फौटन पेन भेट म्हणून द्यायचो ( हे पैसे जमवणे , कोणते पुस्तक द्यायचे यावर वादळी , धमासान चर्चा इ आठवले की फार हसायला येते!). त्या काळातही माझा वाढदिवस ‘मे’ महीन्यातच यायचा आणि त्याचा मला फार राग असायचा कारण माझा वाढदिवस यायचा त्या वेळी नेमकी शाळेला उन्हाळ्याची सुट्टी !  मी , माझे मित्र सगळेच आपापल्या  मामा च्या गावाला सुट्टी साजरी करत असायचो. सुट्टी असल्याने शाळेतले कौतुक कधी लाभलेच नाही आणि इतरां सारखा वाढदिवसही कधी साजरा झाला नाही. बहुदा माझा वाढदिवस येऊन गेल्या नंतर कधी तरी दोन चार दिवसां नंतर कोणाला तरी आठवण यायची ‘अरेच्च्या परवा तुझा वाढदिवस होता नै का!”

पुढे वय वाढल्यानंतर त्या वाढ्दिवसातली सारी गंमतच निघून गेली. नोकरीत असताना एक दोनदा कंपनीच्या मोठ्या सायबांनी  वाढदिवसाच्या दिवशी पाठवलेली  ईमेल इतकेच काय ते कौतुक.

अगदी अलीकडच्या काळात माझा वाढदिवस साजरा होत नसला तरी माझी पत्नी आणि मुलगा वाढदिवसाची म्हणून एक छोटीसी गिफ्ट आवर्जुन देतात.

या मे महीन्यात ही माझा वाढदिवस येऊन गेला, आणि त्या आधी मला कोणती भेट वस्तु द्यायची यावर माझ्या पत्नीची  आणि मुलाची खलबतें चालू झाली , त्या दिवशी म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या जरासे आधी , गेट वाजले म्हणून मी कोण आहे ते बघायला उठलो इतक्यात माझा मुलगा धावत आला आणि म्हणाला

“बाबा, तुम्ही वरच्या मजल्यावर जा आणि मी सांगे पर्यंत खाली येऊ नका”

“पण का?”

“ते नंतर सांगतो, पण प्लिज वरच्या मजल्यावर जा”

“ठीक आहे”

मी वरच्या मजल्यावरच्या  खोलीत गेलो.

जरा वेळाने पुन्हा गेट चा अवाज आला, हा आवाज गेट बंद केल्याचा होता म्हणजे मघाशी आलेली व्यक्ती आता गेली असावी. पाठोपाठ मुलाने हाक मारली..

“ऑल क्लियर डॅड , आता आपण खाली येऊ शकता”

मी खाली आलो, आणि प्रश्नार्थक मुद्रेने मुला कडे पाहीले .
“काही नाही कुरीयर वाला होता”

“पण आपण तर काही ऑर्डर केलेले नाही गेल्या आठ – पंधरा दिवसांत”

“तुम्ही नसेल काही ऑर्डर केले पण आम्ही केले होते ते आज आले कुरीयर ने “

“ठीक आहे पण मग मला वरती पिटाळायचे काय कारण , असे काय शिक्रेट आहे?”

“ आम्ही तुमच्या साठी बर्थ डे गिफ्ट मागवली आहे , ते पार्सल  तुम्हाला दिसू नये म्हणून प्री कॉशन होती ती”

“अरे पण भेट वस्तु सरप्राईज असू शकते पण त्याचे पार्सल मला दिसले तर काय बिघडले असते”

“तुम्ही पार्सल च्या साईज वरुनही  भेट वस्तु काय आहे याचा अंदाज बांधणार म्हणून तुम्हाला ते पार्सल दिसूच नये याची दक्षता घेतली”

“ठीक आहे , ती वस्तु  काय आहे याची मला उत्सुकता आहे , पण असू दे जरा सरप्राईज, मला गिफ्ट दिल्या नंतर कळेलच म्हणा”

“पण त्या आधीच ती वस्तु काय आहे ते हुडकून दाखवा”

“अरे हे कसे शक्य आहे”

“का नाही? तुम्ही लोकांच्या हरवलेल्या वस्तु कोठे असतील ते पत्रिका मांडून सांगता मग तसेच काहीतरी करुन ओळखा पाहू, या पार्सल मध्ये नेमकी कोणती वस्तु आहे ?”

“चक्क चॅलेंज च केले जाते आहे मला!”

“येस्स सार्र .. ओळखा “

“कोई बात नहीं , हम ढुँढ निकालेंगे , कम से कम कोसीस तो जुरुर करेंगे”

“इर्शाद”

मी त्या क्षणी सॉफ्टवेअर लाँच केले आणि त्या क्षणाचा एक ‘टाइम चार्ट ‘ यार केला तो शेजारी छापला आहे. ( हा वेस्टर्न पद्धतीचा म्हणजेच ‘सायन’ चार्ट आहे हे लक्षात ठेवा)

 

चार्ट चा डेटा:

 दिनांक: ३० एप्रिल २०१८ , वेळ १३: २०:३८ , स्थळ : गंगापूर रोड , नाशिक 

जीओ सेंट्रीक, टृऑपीक्ल, प्लॅसिडस,  मीन नोड्स  

 

 

 

 

हरवलेल्या वस्तु बद्दल मी बरेच वाचले आहे काही केसस्ट्डीज पण प्रसिद्ध केल्या आहेत पण आजची केस ही वेगळीच आहे कारण मुळात इथे वस्तु हरवलेलीच नाही , वस्तु समोर आहेच पण ती काय आहे हे नक्की माहीती नाही

आता हे त्रांगडे कसे सोडवायचे हाच मोठा प्रश्न होता. मी विचार सुरु केला,

 • प्रश्न एका वस्तु संदर्भात आहे
 • वस्तु मुव्हेबल म्हणजेच ‘जंगम’ या सदरात मोडते.
 • ही भेट वस्तु अ‍ॅनलाईन विकत घेतली आहे. ही खरेदी माझ्या मुलाने किंवा माझ्या पत्नीने केलेली आहे
 • म्हणजे आत्ता या क्षणाला ही भेट वस्तु माझ्या मुलाच्या किंवा पत्नीच्या मालकीची आहे.

( ही भेट वस्तु मला दिली जाईल तेव्हाच ती माझ्या मालकीची झाली असे म्हणता येईल.)

आपल्या मालकीच्या ‘जंगम’ (मुव्हेबल) वस्त्तु आपण द्वितीय (२) स्थानावरुन पाहतो (अपवाद फक्त कागदपत्रे , मोटार वाहन इ.) इथे वस्तु माझ्या मालकीची नाही, म्हणजे या टाईम चार्ट मधले द्वितीय (२) स्थान घेता येणार नाही. वस्तु जर माझ्या मुलाने विकत घेतली असेल तर त्यासाठी मुलाचे स्थान पंचम (५) त्याचे द्वितिय म्हणजे षष्ठ्म स्थान (६) विचारात  घ्यावे लागेल आणि जर वस्तु जर माझ्या पत्नीने विकत घेतली असेल तर त्यासाठी पत्नीचे स्थान सप्तम (७)  त्याचे द्वितिय म्हणजे अष्टम स्थान (८) विचारात घ्यावे लागेल .

आता वस्तु नेमकी कोणी विकत घेतली हे या पत्रिकेच्या माध्यमातुन हुडकणे अशक्य कोटीतली बाब तेव्हा हा एक खुलासा मला करुन घ्यावा लागला. ती भेट वस्तु माझ्या पत्नीने स्वत:च्या कमाईतुन विकत घेतली होती

म्हणजे वस्तु सध्या माझ्या पत्नीच्या मालकीची आहे , म्हणजे ही वस्तु काय आहे हे आपल्याला माझ्या पत्नीचे जे सप्तम (७) स्थान त्याचे द्वीतीय स्थान म्हणजेच अष्टम ( ८) स्थानावरुन कळेल.

अष्टम स्थानावर गुरु ची मीन रास आहे आणि बुध पण अष्टम स्थानातच आहे. म्हणजे हा गुरु  आणि बुध आपल्याला त्या भेट वस्तु बद्दल माहीती देणार. भेट वस्तु चे प्रतिनिधी गुरु आणि बुध  पाहताच प्रश्नाचे निम्मे उत्तर मला इथेच सापडले!

गुरु हा विद्येचा , ज्ञानाचा कारक, बुध हा देखिल साधारण तोच रोख दाखवत आहे म्हणजे ही भेट वस्तु एखादे पुस्तक असावे !

आता हा गुरु कोठे आहे हे तपासायचे . पत्रिकेत गुरु चतुर्थ (४) भावात आहे पण आपण सप्तम स्थान (माझी पत्नी) हे लग्न मानले असल्याने गुरु प्रत्यक्षात नवम (९) स्थानात येतो. (सप्तमाचे नवम स्थान) ,

नवम स्थान हे ज्ञानाचे , उच्च शिक्षणाचे स्थान म्हणजे ही भेट वस्तु एखादे पुस्तक असावे हा आपला प्राथमिक तर्क अधिक बळकट होतो आहे.

चंद्र देखील गुरु सोबत आहे आणि अगदी लौकर ( ७ अंशात) गुरु शी युती करणार आहे , हे स्वाभाविकच आहे कारण ही भेट वस्तु मला अगदी थोड्याच वेळात म्हणजे आज – उद्याच मिळणार आहे. वस्तु चा दुसरा प्रतिनिधी बुध देखील चंद्राच्या अगदी अंशात्मक अशा क्विनकक्स (१५० अंश) योगात आहेच.

गुरु वक्री आहे म्हणजे ही वस्तु काहीशी डॅमेज्ड किंवा युज्ड असु शकते , गुरु वृश्चिकेत आहे म्हणजे अत्यंत बंदिस्त जागेत वस्तु आहे , इथे याचा अर्थ भरभक्कम पॅकिंग मध्ये / सिल्ड अवस्थेत आहे.

चार्ट ने स्वच्छ उत्तर दिले आहे!

मी सांगीतले:

 • हे एक पुस्तक आहे.
 • पुस्तक ज्ञान संवर्धनात्मक आहे , अभ्यासाचे आहे (म्हणजे कथा कादंबरी असे करमणूकीचे नाही)
 • पुस्तक एक तर वापरलेले , युज्ड असावे किंवा नवे असल्यास थोडेसे डॅमेज्ड (कोपरे दुमडले जाणे इ, ) असेल.
 • पुस्तक भक्कम पॅकिंग मध्ये आहे म्हणजे ते परदेशातून आले असावे.

 

आणि हे अगदी बरोबर आले , तंतोतंत !

मी अ‍ॅमेझॉन इंडिया आणि अ‍ॅमेझॉन युएस या दोन्ही साईटस वर माझी विश लिस्ट (बकेट लिस्ट म्हणा हवे तर !) तयार ठेवली आहे,  या माझ्या विश लिस्ट्स पब्लिक (कोणालाही पाहता येतील अशा) असल्याने माझ्या  मुलाला ह्या विश लिस्ट पाहता येतात. ह्या विशलिस्ट मध्ये ज्योतिषशास्त्रावरची काही पुस्तके होती , त्यातलेच एक पुस्तक त्याने मला भेट द्यायचे ठरवले. पण अ‍ॅमेझॉन वर ते पुस्तक नेमके त्यावेळी आऊट ऑफ स्टॉक असल्याने त्याने ते दुसर्‍या युज्ड बुक स्टोअर मधून मागवले.

प्रश्न शास्त्र म्हणजेच होरारी हे एक अजब शास्त्र आहे , काळ वेळ जमली तर अगदी तोंडात बोट घालावे अशा अचुकतेने उत्तर मिळते पण असे दर वेळेला होईलच असे नाही हे मात्र लक्षात ठेवा ,
म्हणतात ना , ‘Everyday is not Sunday’ !

असो , हे  पुस्तक आहे :

Title: Angles and Predictions

Author: Martha Lang-Wescott 

Publisher: Treehouse Mountain,

551 pages.

$49.95

हे पुस्तक अचाट , बेफाट आहे , अशा प्रकारची फार कमी पुस्तके लिहली जातात, वाचक वर्ग मर्यादीत असल्याने एखादी लहानशी आवृत्ती निघते आणि मग हा अमोल ठेवा  काळाच्या ओघात कधी गडप झाला ते कळतही नाही. मी नशीबवान ठरलो, गडप होण्या आधीच हा ग्रंथ राज माझ्या संग्रहात दाखल झाला. हा असला ग्रंथराज  संग्रहात असणे ही अभिमानाने सांगण्याची बाब आहे!

या पुस्तका बद्दल काय ‘अ‍ॅस्ट्रो अमेरिका’ चा कै. डेव्हिड रोएल काय लिहतो हे पहा.. ( http://www.astroamerica.com/

 

Contents:

Factors included in this book:
Admetus, Aesculapia, Amor, Apollo, Apollon, Arachne, Aries Point, Astraea, Atlantis, Atropos, Bacchus, Ceres, Child, Chiron, Circe, Cupido, Cupido-A, Daedalus, Demeter, Diana, Eos, Eros, Eurydike, Hades, Hebe, Hekate, Hephaistos, Hera, Hildago,

Hopi, House, Hybris, Hygiea, Industria, Icarus, Isis, Juno, Jupiter, Kassandra, Klotho, Kronos, Lachesis, Lilith, Mars, Memoria, Mercury, Minerva, Mnemosyne, Moon, Nemesis, Neptune, Niobe, Node, Nostalgia, Odysseus, Ophelia, Ornamentia, Orpheus,

Pallas, Panacea, Pandora, Persephone, Phaethom, Photographia, Pluto, Poseidon, Prosperina, Psyche, Pythia, Requiem, Sappho, Saturn, Sisyphus, Siva, Siwa, Sphinx, Sun, Tantalus, Terpsichore, Tisiphone, Toro, Urania, Uranus, Venus, Vesta, Vulcanus, Zeus

(87 factors in all!)

 

Comment: There are a few people who write better than I do. Martha is one of them. Here are her opening words:

The delineations of Angles and Predictions are written to address the angular manifestations of factors on a solar return. They arise in part from an important tenant: energies will manifest in every way they can even within a brief period of time. A combination of energies then won’t exhibit only once or in just one way; each has a range of meanings, and this complexity compounds with the addition of the scripts of another factor. Some combinations are singularly important, others but components of a larger tale. This awareness necessitates these notes. It’s much too much to keep in mind, and too useful and fascinating to ignore.

Previous texts (notably Architects of Time) contained many exammples of return chart delineations, so here will be but brief description of methods. It begins with the assumption that both the Tropical and Sidereal (or precessed) returns are calculated to the current locale. After an assessment of the solar return Moons, and what is to be expected based on their phase, sign and aspects to both radix and return points, the charts are then stripped to include only those factors, radix and return, which occur within ten degrees, either side, of the return chart angles; see examples to follow. (Page i)

Martha includes a card with the book listing all 87 factors, in three colums, with the relevant page numbers from the book. At the bottom of the card, and again on pg. ii, she writes:

Aspects are listed alphabetically, regardless of whether it’s a planet, asteroid or transneptunian. For example, it’s Aesculapia\Uranus, and that interpretation is not repeated in the Uranus section.

Which means the sections get shorter as they progress through the alphabet, as one would expect. (Repetition would make the book five times as big.)

So, to repeat Martha’s rules, this is a book of delineations of hard aspects in solar returns, or between return & natal, when one or both planets are within 10 degrees of an angle (return or natal). How well does she do? Let’s take two examples. The first, as prosaic as you can get: Moon/Sun:

Moon\Sun This is a time when what you need and how you react may feel uncharacteristic; it’s not quite like having that “evil twin,” but it is often a case of contradicting factions! One part of you is This, but there are those urges and drives that are clearly That. One of your jobs this year is to assume Middle Man duties and find ways to keep both sides of yourself happy – and in ways that don’t let one part undermine or drive the other one crazy! Let’s take an example. Suppose you see yourself as a very intense, take-no-prisoners person. Now imagine that a year comes along when you find yourself enjoying security. Part of you is more mellow; it doesn’t want to rock the boat. How can you balance the seesaw (or do you invite others to take a role in the struggle?). Use the contradictions to see and understand yourself more clearly now that you realize the costs of digging into that Intensity (or however you identify yourself.) (pg. 426)

For the second, Chiron/Eros. (I could have given you Kassandra/Niobe, but chances are you’ve never heard of either one of them.) From pgs 157-8:

Chiron\Eros Sex and “unconventional” or “just this time” are – forgive the pun – in bed together. This may, at one point, mean there are references to unconventional sex or to unusual sexual turn-ons or practices. At another point in time, people can feel “different” because of their sexual orientation or libido…and, let a few weeks pass, and someone will “make exceptions” in connection with sex. There may be a time or two when you see that, for someone, the perception of “being extra – out of the – ordinary” is their way to keep excitement in their life; in a sense, it keeps them alive! And this may turn out to be literal a time or two – a person may need special treatment or have to get around the rules because of a heart condition. What’s “different” about them can be found in their cardiac system! Too, a sexual relationship, a cardiac event, or reproductive problems can be the basis for a major change in life.

Depending on your version, Solar Fire includes most if not all of these factors, though you will have to hunt the program to find where the calculated positions are displayed. Typically there are a dozen for every solar return, enough to keep anyone busy. A friend reminds me that with a little imagination Martha’s delineations can also be used in natal charts.

I have been in awe of this book ever since it arrived in December 2007. It is a lifetime’s work. The amount of sheer toil between the covers is staggering. There are no comparable books, it is impossible even to imagine one. Everyone who is serious about astrology should have a copy. If this speaks to you, I would get one sooner rather than later. The book is privately printed and in limited distribution. If past experience is a guide, it will appear for a few years in a few places, and thereafter disappear without a trace, to pass on into the world of myth and legend.

 

 

शुभं भवतु 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////
 1. Anand Kodgire

  Suhasji aapla latest lekh khup aavadla
  Aaplya jyotish classes baddal mi intrest dakhavala aahe. Aaplya class chya pratikshet aahe
  Dhanyavad

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.