माझ्या फेसबुक ग्रुप वर मी एक क्वीझ दिला होता, एका व्यक्तीची जन्मकुंड्ली देऊन त्यावर आधारीत काही प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांची उत्तरें म्हणून ही संपुर्ण केस स्ट्डी इथे देत आहे .
जातकाची माहिती
[ ही पत्रिका इंटरनेट च्या माध्यमातुन मिळालेली आहे , जातकाने स्वत: च आपली माहीती / समस्या खुले आम सार्वजनिक ठिकाणी उघड केली आहे , गोपनियतेचा कोणताही भंग होत नाही याची खात्री करुन घेतली आहे , आणि अर्थातच ही व्यक्ती माझ्या कडे आलेली जातक नाही ]
ह्या जातकाचा विवाह झाला आणि घटस्फोट पण , सध्या दुसरा विवाह करण्याच्या प्रयत्नात आहे आणि प्रश्न आहे दुसरा विवाह कधी होईल ?
(प्रश्न विचारला आहे जुन 2018 , मध्ये)
जन्मतपशील:
केस 011
जातक: पुरुष
जन्मदिनांक: 19 जुन 1980
जन्मवेळ: 14:57
जन्मस्थळ: दादर, मुंबई
आपल्याला जातकाचा दुसरा विवाह होणार का? आणि होणार असल्यास केव्हा? याबद्दलचे अनुमान करायचे आहे.
ज्यांना जादा आव्हानात्मक काम हवे त्यांनी :
जातकाचा विवाह केव्हा झाला होता?
जातकाचा घटस्फोट केव्हा झाला आहे?
याची अनुमाने करावीत.
आणि मुळात घटस्फोट का झाला असावा याचे ज्योतिषशास्त्रा नुसारची कारणमीमांसा करावी.
जातकाने दिलेल्या जन्मतपशीला नुसार केलेली ‘क्षेत्र कुंडली आणि केपी अयनांश वापरून केलेली (प्लॅसीडस ) भावचलित कुंडली ‘
या लेखमालेच्या आधीच्या भागात आपण जातकाच्या विवाह आणि घटस्फोट या घटनांची ज्योतिषशास्त्रीय कारणमीमांसा केली , लेखमालेच्या या तिसर्या भागात आपण जातकाचा जो प्रश्न विचारला आहे त्या त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जातकाचा प्रश्न आहे: दुसरा विवाह कधी होईल ?
या पत्रिकेत चटकन नजरेत भरते ते:
- धन- अष्टम स्थानांतून होणारा अंशात्मक (वक्री) शुक्र – (वक्री ) नेपच्युन प्रतियोग
- (वक्री) शुक्र – शनी अंशात्मक केंद्र योग
- (वक्री) शुक्र – मंगळ अंशात्मक केंद्र योग
- मंगळ – (वक्री) नेपच्यून यांचा अंशात्मक केंद्र योग
- शनी – (वक्री) नेपच्यून यांचा अंशात्मक केंद्र योग
- लाभात सिंहेतले मंगळ , चंद्र, गुरु आणि शनी यांचे स्टेलियम!
- शुक्र – गुरु आणि चंद्र – शुक्र केंद्र राश्यात्मक केंद्र योग
या योगांची अगदी ठणठणीत फळें जातकाला मिळाली आहेत.
वैवाहिक जीवनात बाधा आणायला यातला अंशात्मक (वक्री) शुक्र – (वक्री ) नेपच्युन प्रतियोग आणि शुक्र – शनी अंशात्मक केंद्र योग पुरेसे आहेत, त्या बद्दल थोडेसे !
धन- अष्टम स्थानांतून होणारा अंशात्मक (वक्री) शुक्र – (वक्री ) नेपच्युन प्रतियोग:
विवाहा बाबतीत अत्यंत महत्त्वाच्या अशा द्वितीय आणि अष्टम या स्थानां मधून हा प्रतियोग होत आहे हे महत्त्वाचे! या योगाची ठळक फळे अशी आहेत:
“वैवाहिक, सांसारिक वा कौटुंबिक सुखाच्या दृष्टीने अशुभ फळे, पत्नीचे अनारोग्य, पतिपत्नीत वैचारिक संघर्ष , काहीं काळ मोठे गैरसमज, या योगातला शुक्र वक्री असल्याने द्विभार्या योग, स्त्री संबंधी नाट्यमय घटना, भावनांच्या संघर्षाचे मोठे दु:ख, प्रेमभंग / जवळच्या व्यक्तीचे निधन अशा घटनांचे दु:ख वाटून घेत अनेक वर्षे काढणे, अनेक वर्षांची मेहेनत वाया जाणे, प्रेमात / आर्थिक बाबतीत फसवणूक, व्यसनाधिनता, गुप्त शत्रुत्व, मानसिक अथवा लैगिक विकृती , स्त्री / पैसा यांच्या नादात नाव-लौकिक गमावणे —- संदर्भ: श्री. व.दा.भट “
(वक्री) शुक्र – शनी अंशात्मक केंद्र योग:
या योगाची ठळक फळे अशी आहेत:
“सर्वसाधारण ‘सुखाचा अभाव’ हे सुत्र असणार्या या योगात स्वभाव वा अन्य परिस्थिजन्य सुख दूरावलेले असते. परिस्थितीशी झगडत राहावे लागते किंवा यश ऐन वेळी दूर गेल्याचे दु:ख भोगावे लागते, भावनांचा कोंडमारा, गंभीर , निराश , एकलकोंडी मनोवृत्ती, काही बाबतीत मनोविकृती. कलत्रकारक शुक्र या योगात अत्यंत बिघडतो, विवाह उशीरा होतो, विवाहा संदर्भात काही चिंता असते, सप्तमस्थान / सप्तमेश बिघडला असल्यास , अगर , या योगात युरेनस, मंगळ, नेपच्यून सारख्या ग्रहांचा शुक्राशी अशुभ योग होत असल्यास वैवाहिक / सांसारिक जीवनात मोठी संकटे येतात. —- संदर्भ: श्री. व.दा.भट”
या सार्या पार्श्वभूमी वर आपण जातकाच्या “दुसरा विवाह कधी होईल ?” या प्रश्नाचे उत्तर मिळवायचा प्रयत्न करू
प्रथम नक्षत्र पद्धती नुसार ग्रहांचे कार्येशत्व
आता या जातकाची दुसरा विवाह करण्याची इच्छा आहे , ही इच्छा पूर्ण होईल का?
दुसर्या विवाहाच्या बाबतीत 2, 7, 11 बरोबरच नवम (9) हे स्थान महत्त्वाचे आहे.
जातकाने हा प्रश्न जून 2018 मध्ये विचारला आहे आणि आपण त्याचे उत्तर ऑगष्ट 2018 मध्ये शोधत आहोत, जातकाचे लग्न जून- जुलै 2018 या दोन महिन्यात झाले नसावे हे गृहीत धरून!
जातकाला नोव्हेंबर 2009 ते नोव्हेंबर 2027 या कालावधीत ‘राहू ’ महादशा चालू आहे. जातकाचा दुसरा विवाह होणार असेल तर तो या राहू च्या दशेतच, ही दशा संपेल तेव्हा जातक 47 वर्षाचा असेल तेव्हा ह्या दशेत विवाह झाला नाही तर तो पुढच्या गुरु च्या दशेत होईल का या पाहण्याला फारसा अर्थ नाही.
महादशा ‘राहू ’ चे नक्षत्र पद्धती प्रमाणे कार्येशत्व पाहीले तर ते असे दिसेल:
राहू दशमात (10) आहे , राहू ला राशी स्वामित्व नाही, राहू बुधाच्या नक्षत्रात , बुध भाग्यात (9) , बुधाच्या राशी भाग्य (9) आणि व्यय (12) स्थानांवर .
राहू : 9 / 10 / 9, 12 / –
राहू कोणाच्या युतीत वा दृष्टीत नाही , राहू चंद्राच्या राशीत असल्याने चंद्राचे कार्येशत्व पण राहू ला मिळेल ते असे: 8 / 11 / 1 , 8 / 10
राहू शनीच्या सब मध्ये आहे , शनी चे कार्येशत्व 8/ 11 / 1, 8 / 4, 5
दुसर्या विवाहाला आवश्यक असलेले कार्येशत्व : 9, 2, 7, 11 , या पैकी 9, 11 चे कार्येशत्व राहू ला आहे. राहू चा सब शनी फार अनुकूल नसला तरी प्रतिकूल ही नाही.
म्हणजे राहू ची महादशा जातकाला दुसरा विवाह देऊ शकेल असे सध्या तरी गृहीत धरू आणि पुढे तपास करू.
आपण पत्रिका अभ्यासतो आहे ऑगष्ट 2018 मध्ये, या वेळी जातकाची राहू महादशा- बुध अंतर्दशा चालू आहे, ती मे 2020 पर्यंत चालणार आहे बुध अंतर्दशेतली जवळपास पावणे दोन वर्षे आपल्या हातात आहेत.
बुधाचे कार्येशत्व : 11 / 9 / 3, 6 / 9 , 12. बुधाचा सब शुक्र 11 / 8 / 2, 7 /1 , 8
बुध आणि राहू दोघेही नवम (9) भावाचे प्रथम दर्जाचे कार्येश आहेत. लाभाचे (11) कार्येशत्व पण चांगले आहे , बुधाचा सब शुक्र विवाहाला अनुकूल आहे. पण दशा स्वामी 2,7 चा कार्येश नाही, अंतर्दशा पण 2,7 ला अनुकूल नाही. जातकाची पत्रिका विवाह, वैवाहिक जीवनाला कठीण अशी असे असताना बुधाची अंतर्दशा दुसर्या विवाहाला कितपत अनुकूल राहील याबद्दल शंका वाटते.
जर या बुधाच्या अंतर्दशेत जातकाचा विवाह होणार असेल तर तो द्वितीय (2) किंवा सप्तम (7) स्थानाच्या प्रथम दर्जाच्या कार्येश ग्रहाच्या विदशेत.
द्वितीय (2) किंवा सप्तम (7) स्थानाचे प्रथम दर्जाचे कार्येश ग्रह आहेत, शुक्र , रवी आणि केतु. मंगळ ह्या दोन्ही स्थानांचा ‘ब’ दर्जाचा कार्येश आहे त्याचा ही विचार करता येईल.
बुधाच्या अंतर्दशेतली केतू विदशा येऊन गेली आहे , 2,7 चा बलदंड कार्येश असलेला केतू सारखा छाया ग्रह विवाह देऊ शकलेला नाही हा मुद्दा नोंद करण्या सारखा आहे.
पुढच्या अनुकूल विदशा अशा आहेत.
- शुक्र विदशा: 26 सप्टेंबर 2018 पर्यंत
- रवी विदशा: 26 सप्टेंबर 2018 ते 12 नोव्हेंबर 2018
- मंगळ विदशा: 28 जानेवारी 2019 ते 24 मार्च 2019.
आपण या कालावधींतले ट्रांसिट्स तपासुन , तेच आपल्याला नेमकी विदशा कोणती हे दाखवतील.
शुक्र विदशा: 26 सप्टेंबर 2018 पर्यंत या कालावधीत:
गुरु तूळेत असेल आणि जातकाची 1, 5, 7, 9 ही स्थाने प्रभावीत करेल.
शनी धनू राशीत असेल आणि जातकाची 3, 5, 9, 12 ही स्थाने प्रभावित करत आहे .
गुरु – शनी एकत्रित 5,9 ही स्थाने प्रभावित करत आहेत हे ट्रांसिट खास करून 9 स्थान चा करता विवाहास अनुकूल ठरेल , पण शुक्र विदशा आजपासून अवघा दोन महीने इतकी सुद्धा शिल्लक राहिलेली नाही, इतक्या कमी वेळेत विवाह होऊ शकेल?
त्यामुळे ही शुक्र विदशा काहीशी अनुकूल दिसली तरी सध्या जरा बाजूला ठेवू.
पुढची रवी विदशा: 26 सप्टेंबर 2018 ते 12 नोव्हेंबर 2018.
रवी 11, 8, 2, 7 या भावांचा कार्येश आहे , रवी शुक्राच्या सब मध्ये आहे . म्हणजे रवी विवाहास अनुकूल आहे.
या कालावधीत 26 सप्टेंबर 2018 ते 10 ऑक्टोबर 2018 या कालावधीत गुरु तूळेत असेल आणि जातकाची 1, 5, 7, 9 ही स्थाने प्रभावीत करेल. शनी धनू राशीत असेल आणि जातकाची 3, 5, 9, 12 ही स्थाने प्रभावित करत आहे .
गुरु – शनी एकत्रित 5,9 ही स्थाने प्रभावित करत आहेत हे ट्रांसिट खास करून 9 स्थान चा करता हा कालावधी देखील विवाहास अनुकूल ठरेल.
11 ऑक्टोबर 2018 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत गुरु वृश्चिकेत असेल आणि जातकाची 2, 6, 8, 10 ही स्थाने प्रभावीत करेल. शनी धनू राशीत असेल आणि जातकाची 3, 5, 9, 12 ही स्थाने प्रभावित करत आहे .
गुरु ने प्रभावित केलेली स्थाने पाहता या कालावधीत जातकाचा विवाह कसा काय होऊ शकेल ? त्यामुळे रवी विदशेतला हा कालावधी जातकाला विवाह देणार नाही.
बुधाच्या अंतर्दशेतल्या पुढच्या चंद्र , राहू , गुरु या विदशा शिल्लक आहेत पण त्यांचे कार्येशत्व 2, 7 असे प्रभावी नाही.
पुढचा विदशा स्वामी मंगळ, 2,7 चा ‘ब’ दर्जाचा कार्येश असल्याने कदाचित तो घटना घडवू शकतो.
मंगळ विदशा: 28 जानेवारी 2019 ते 24 मार्च 2019. या कालावधीत :
गुरु वृश्चिकेत असेल आणि जातकाची 2, 6, 8, 10 ही स्थाने प्रभावीत करेल.
शनी धनू राशीत असेल आणि जातकाची 3, 5, 9, 12 ही स्थाने प्रभावित करत आहे .
गुरु ने प्रभावित केलेली स्थाने पाहता या कालावधीत जातकाचा विवाह कसा काय होऊ शकेल ?
म्हणजे काय बुध अंतर्दशा कोरडी जाणार? असेच म्हणावे लागेल.
नाही म्हणायला आपल्या पाशी :
शुक्र विदशेतला 26 सप्टेंबर 2018 पर्यंतचा कालावधी आणि रवी विदशेतला 26 सप्टेंबर 2018 ते 10 ऑक्टोबर 2018 हा कालावधी , या 15 दिवसांच्या कालावधीत विवाह होऊ शकतो. त्यातही 06 ऑक्टोबर 2018 रोजी गोचरीने जातकाच्या लग्नस्थानी असलेला शुक्र वक्री होणार आहे , त्यामुळे का कालावधी आणखी कमी होणार आहे. ह्या अवघ्या दहा दिवसांच्या कालावधीत सप्तमेश मंगळ चतुर्थ स्थानात असून तो लग्न आणि लग्नातल्या शुक्राशी तसेच सप्तम स्थानाशी केंद्र योग करत आहे.
या कालावधीत विवाह होणे फारच अवघड आहे. राहू महादशेतली बुधाची अंतर्दशा विवाह देऊ शकणार नाही.
आता पुढची केतू अंतर्दशा पाहावयास पाहिजे.
केतू अंतर्दशा 8 मे 2020 ते 26 मे 2021 अशी आहे.
या कालावधीत
8 मे 2020 ते 29 जून 2020 पर्यंत गुरु मकरेत असल्याने जातकाची 10, 8, 10, 12 ही स्थाने प्रभावीत करेल आणि शनी मकरेत असल्ययाने तो जातकाची 10,6, 10, 1 ही स्थाने प्रभावीत करेल.
हे पाहता या कालावधीत विवाह होण्याची शक्यता फार कमी आहे.
वक्री गुरु जुलै 2020 ते 19 नोव्हेंबर 2020 पर्यंत धनू राशीत असेल
या काळात गुरु जातकाची 3, 7, 9, 11 ही स्थाने प्रभावीत करेल. या काळात शनी मकरेत असल्याने , तो जातकाची 10,6, 10, 1 ही स्थाने प्रभावीत करेल.
हे पाहता या कालावधीत विवाह होण्याची शक्यता फार कमी आहे.
19 नोव्हेंबर 2020 ते 5 एप्रिल 2021 या कालावधीत
गुरु मकरेत असल्याने जातकाची 10, 8, 10, 12 ही स्थाने प्रभावीत करेल. शनी पण मकरेत आहे , तो जातकाची 10,6, 10, 1 ही स्थाने प्रभावीत करेल.
हे पाहता या कालावधीत विवाह होण्याची शक्यता फार कमी आहे.
5 एप्रिल 2021 ते 26 मे 2021 (केतू अंतर्दशा संपते) या कालावधीत
गुरु कुंभेत असल्याने जातकाची 5, 7, 9, 11 ही स्थाने प्रभावीत करेल. शनी मकरेत असल्याने , तो जातकाची 10,6, 10, 1 ही स्थाने प्रभावीत करेल.
या कालावधीत गुरु चे भ्रमण चांगले आहे. पण शनी भ्रमण चांगले नाही , हे पाहता या कालावधीत विवाह होण्याची शक्यता फार कमी आहे.
केतू अंतर्दशा संपली , या पुढची शुक्र अंतर्दशा तितकीच आश्वासक (promising) आहे.
या अंतर्दशेचा कालावधी आहे 26 मे 2021 ते 20 मे 2024 असा आहे.
ही अंतर्दशा सुरु होते तेव्हा जातकाचे वय 41 आणि ही अंतर्दशा संपेल तेव्हा जातक 44 वर्षाचा असेल.
या अंतर्दशेत सर्व ग्रहांच्या विदशा येतील त्या पैकी शुक्राची स्वत:ची विदशा सगळ्यात प्रबळ दावेदार त्यानंतर रवी , केतू आणि मंगळ, तसेच चंद्र (या चंद्रानेच जातकाचा पहिला विवाह घडवून आणला आहे)
आता या एक एक करत या विदशा तपासण्या पेक्षा आपण या 31 मे 2021 ते मे 2024 कालखंडातले गुरु – शनी ची ट्रांसिट्स तपासूया , जिथे ट्रान्सिट जुळेल त्या कालावधीतली विदशा योग्य आहे ते तपासणे जास्त सोपे .
गुरु या काळातले ट्रांसिट असे असेल :
26 मे 2021 ते 14 सप्टेंबर 2021 – कुंभ
14 सप्टेंबर 2021 ते 20 नोव्हेंबर 2021 – मकर
20 नोव्हेंबर 2021 ते 13 एप्रिल 2022 – कुंभ
13 एप्रिल 2023 ते 21 एप्रिल 2023 – मीन
21 एप्रिल 2023 ते 01 मे 2024 – मेष
या कालावधीतले शनी चे भ्रमण
28 एप्रिल 2022 पर्यंत मकर
28 एप्रिल 2022 ते 14 जुलै 2022 कुंभ
14 जुलै 2022 ते 17 जानेवारी 2023 मकर
17 जानेवारी 2023 ते 29 मार्च 20245 कुंभ
26 मे 2021 ते 14 सप्टेंबर 2021 या काळात गुरु कुंभेत आणि शनी मकरेत असणार आहे.
गुरु कुंभेत असल्याने जातकाची 5, 9, 11, 1 ही स्थाने प्रभावीत करेल.
शनी मकरेत असल्याने , तो जातकाची 10,6, 10, 1 ही स्थाने प्रभावीत करेल.
गुरु चे भ्रमण चांगले आहे. शनी भ्रमण लग्न स्थान प्रभावित करत आहे , म्हणजे गुरु आणि दोघेही एकत्रित रित्या लग्न स्थान प्रभावित करत आहेत.
26 मे 2021 ते 14 सप्टेंबर 2021 हा कालावधी विवाह देऊ शकेल.
14 सप्टेंबर 2021 ते 20 नोव्हेंबर 2021 या काळात गुरु मकरेत असेल तर शनी मकरेत असणार आहे. या काळात गुरु जातकाची 4, 8, 10, 12 ही स्थाने प्रभावीत करेल आणि शनी 4, 6, 10, 1.
हे गोचर विवाहास अनुकूल नाही .
20 नोव्हेंबर 2021 ते 13 एप्रिल 2022 या काळात गुरु कुंभेत असेल आणि शनी मकरेत असणार आहे.
गुरु कुंभेत असल्याने जातकाची 5, 9, 11, 1 ही स्थाने प्रभावीत करेल.
शनी मकरेत असल्याने , तो जातकाची 10,6, 10, 1 ही स्थाने प्रभावीत करेल.
गुरु चे भ्रमण चांगले आहे. शनी भ्रमण लग्न स्थान प्रभावित करत आहे , म्हणजे गुरु आणि दोघेही एकत्रित रित्या लग्न स्थान प्रभावित करत आहेत.
20 नोव्हेंबर 2021 ते 13 एप्रिल 2022 हा कालावधी विवाह देऊ शकेल.
13 एप्रिल 2023 ते 21 एप्रिल 2023 या काळात गुरु मीनेत असेल आणि शनी सुरवातीला मकरेत आणि नंतर कुंभेत असेल
या काळात गुरु जातकाची 6, 10, 12, 2 ही स्थाने प्रभावीत करेल आणि शनी 4, 6, 10, 1 / 5, 7, 11, 2
हे गोचर विवाहास अनुकूल नाही .
21 एप्रिल 2023 ते 01 मे 2024 या काळात गुरु मेषेत असेल आणि शनी कुंभेत असेल.
या काळात गुरु जातकाची 7, 11, 1, 3 ही स्थाने प्रभावीत करेल आणि शनी 5, 7, 11, 2.
21 एप्रिल 2023 ते 01 मे 2024 हा कालावधी आश्वासक दिसत आहे पण यात लग्न स्थान प्रभावित होत नाही.
01 मे 2024 ते 26 मे 2024 (शुक्र अंतर्दशा संपते) या कालावधीत
या काळात गुरु वृषभेतून जातकाची 8, 12, 2, 4 ही स्थाने प्रभावीत करेल आणि शनी कुंभेतून 5, 7, 11, 2.
हे गोचर विवाहास अनुकूल नाही .
अशा रितीने आपल्याला एकंदर दोन आश्वासक कालखंड मिळाले आहेत.
26 मे 2021 ते 14 सप्टेंबर 2021
20 नोव्हेंबर 2021 ते 13 एप्रिल 2022
या काळात येणार्या विदशा कोणत्या?
26 मे 2021 ते 14 सप्टेंबर 2021 या कालावधीत
राहू महादशा – शुक्र अंतर्दशा – शुक्र विदशा – शुक्र / रवी / चंद्र / मंगळ/ राहू / गुरु सुक्ष्म दशा
20 नोव्हेंबर 2021 ते 13 एप्रिल 2022 या कालावधीत
राहू महादशा – शुक्र अंतर्दशा – शुक्र विदशा – केतू सुक्ष्मदशा
राहू महादशा – शुक्र अंतर्दशा – रवी विदशा
राहू महादशा – शुक्र अंतर्दशा – चंद्र विदशा
या बाबत ज्या ग्रहाची अंतर्दशा त्याच ग्रहाची विदशा हे नेहमीच अनुभवास येणारे सूत्र वापरले तर
26 मे 2021 ते 14 सप्टेंबर 2021 या कालावधीत
राहू महादशा – शुक्र अंतर्दशा – शुक्र विदशा – शुक्र / रवी / चंद्र / मंगळ/ राहू / गुरु सुक्ष्मदशा
हा कालावधी विवाहा साठी योग्य वाटतो.
ह्या सुमारे साडे तीन महीन्यांच्या कालावधीत मंगळ सुक्ष्मदशेत जातकाचा दुसरा विवाह होण्याची मोठी शक्यता आहे , याचे कारण मंगळ हा 2, 7 चा ‘ब’ दर्जाचा कार्येश तर आहेच शिवाय मंगळ हा सप्तमेश पण आहे.
राहू महादशा – शुक्र अंतर्दशा – शुक्र विदशा – मंगळ सुक्ष्मदशा हा कालावधी येतो 20 जुलै 2021 ते 31 जुलै 2021
आत या काळातली ट्रांसिट्स तपासू
गुरु : कुंभेत असून जातकाची 5, 9, 11, 1 ही स्थाने प्रभावीत करेल.
शनी: मकरेत असल्याने , तो जातकाची 10,6, 10, 1 ही स्थाने प्रभावीत करेल
मंगळ: 20 जुलै 2021 ला कर्केत आहे , तो लौकरच सिंंहेत दाखल होईल तेव्हा कुंभेतला गुरु या मंगळाशी योग करेल.
9 ऑगष्ट 2021 रोजी गोचरीचा चंद्र आणि बुध देखील सिंहेत असल्याने एकंदर चार ग्रह (मंगळ, शुक्र, चंद्र, बुध) जातकाच्या लाभात असल्याने ते सर्व गोचरीच्या कुंभेतल्या गुरु शी योग करत आहेत.
जातकाच्या जन्मपत्रिकेत चंद्र , मंगळ गुरु, शनी असे चार ग्रह सिहेंत , लाभस्थानात आहेत ही बाब नोंद घेण्या सारखी आहे.
थोडक्यात ऑगष्ट 2021 च्या पहिल्या दहा दिवसात जातकाचा विवाह होऊ शकतो.
पण आपण निवडलेली मंगळ सुक्ष्मदशा तर 31 जुलै 2021 ला संपत आहे.
इथे ही 31 जुलै 2021 तारीख जातकाची जन्मवेळ 14:57 प्रमाणे आली आहे.
आपण जातकाचा प्रथम विवाह आणि घटस्फोटाच्या तारखां वरून जातकाची जन्मवेळ 14;57 नसून ती 14:55 किंवा 14:56 असावी असा तर्क केला होता त्यानुसार मंगळ सुक्षदशेची तारीख काय असेल?
- 14:57 नुसार मंगळ सुक्ष्मदशा 20 जुलै 2021 ते 31 जुलै 2021
- 14:56 नुसार मंगळ सुक्ष्मदशा 25 जुलै 2021 ते 04 ऑगष्ट 2021
- 14:56 नुसार मंगळ सुक्ष्मदशा 29 जुलै 2021 ते 09 ऑगष्ट 2021
मंगळ सुक्ष्मदशा योग्य आहे आणि 9 ऑगष्ट 2021 चे ट्रान्सिट पाहता जातकाची जन्मवेळ 14:56 अशीच असावयास पाहिजे आणि हा तर्क आपण आधीच केला होता !
कालनिर्णय झाला.
जातकाला मात्र सांगायचे: जुलै – ऑगष्ट 2021 मध्ये दुसरा विवाह होणार .
समाप्त
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
सुहासजी, मला वाटतं ही आजवरची सर्वात किचकट केस स्टडी असेल! तीन भाग व्यापणारी व अनेक गणिते करायला लावणारी ही केस खूप काही शिकवून गेली. धन्यवाद!
धन्यवाद श्री प्राणेशजी,
इतकी यातायात करावीच लागेत . पण सरावाने या गोष्टी सहजतेने जमून जातात काही पूर्व तयारी म्हणजे गुरु आणि शनीच्या गोचर भ्रमणाचे तक्ते तयार करुन ठेवले तर वेळ वाचतो. ज्योतिषशास्त्रात झटपट काहीही नसते किंवा त्याचा साचा/ रबर स्टँप बनवता येत नाही प्रत्येक पत्रिका हे एक नवीन आव्हानच असते .
सुहास गोखले