माझा प्रश्नशास्त्राचा अभ्यास ‘पाश्चात्य होरारी’ च्या अभ्यासाची जोड दिल्यानेच खर्‍या अर्थाने बहरु लागला. कृष्णमुर्ती पद्धती श्रेष्ठ आहेच पण ‘पाश्चात्य होरारी’ मधूनही बरेच काही शिकण्यासारखे आहे हे मान्यच करावे लागेल. स्वत: कृष्ण्मुर्तींनी सुद्धा ‘सिमोनाईट’ यांच्या ग्रथांचा भरपुर आधार घेतला आहेच ( आणी तो तसा घेतल्याचे त्यांनी मोकळ्या मनाने नमूद ही केले आहे!) .

माझ्या संग्रहात ‘पाश्चात्य होरारी’ वरचे अनेक उत्तमोत्तम ग्रंथ आहेत. त्यात मी सौ बार्बारा वॅटर्स यांना फार मानतो. त्यांच्याच एका ग्रंथात त्यांनी सोडवलेली एक होरारी केस मी आपल्या समोर मांडतो. मला माहीती आहे की हे करताना मी लेखिकेची (किंवा तिच्या वारसदारांची) कोणतीही परवानगी घेतलेली नाही. पण लेखिकेची, तिच्या कौशल्याची, ज्ञानाची ओळख व्हावी ह्या केवळ शुद्ध हेतुने मी हे करत आहे. यात चोरी नाही. मी कोणतेही श्रेय घेत नाही, पूर्ण श्रेय लेखिलेला देतोच आहे आणि त्याच बरोबर लेखिकेच्या या ग्रथा बाबतची लिंक ही देत आहे.

ही ती केस स्ट्डी स्वत: लेखिका सौ बार्बारा वॅटर्स यांच्याच शब्दात..

माझे एक जातक श्री. क्ष गेले कित्येक महिने जागा खरेदीच्या प्रयत्नात होते, बर्‍याच जागा बघितल्या नंतर शेवटी एक जागा त्यांना पसंत पडली. श्री. क्ष यांनी मला फोन करुन सांगीतले की त्यांना हवी होती तशी जागा सापडली असून , प्रारंभिक सर्व बोलणी, पैशाच्या वाटाघाटी ई. सर्व टप्पे पूर्ण झाले असून आता फक्त खरेदीखत करायचे बाकी आहे. पण एव्हढा मोठा जोखमीचा व्यवहार करण्यापुर्वी एकदा ज्योतिषशास्त्रा द्वारे हा व्यवहार करावा का म्हणजेच हि जागा, तिचा विक्रेता, जागेची ठरलेली किंमत, व्यवहार यात काही धोका तर नाही ना? याबाबत त्यांना जाणुन घ्यायचे होते.

जातकाने जेव्हा फोन करुन हा प्रश्न विचारला तेव्हा घड्याळात दुपारचे 2:40 वाजले होते, दिवस होता 2 फेब्रुवारी 1968 आणि स्थळ होते ‘वॉशिंग्ट्न डी.सी. – अमेरिका’. त्या क्षणाची जी प्रश्नकुंडली जी तयार केली गेली ती शेजारी दिली आहे.

 

 

‘जागा-जमीनजुमला खरेदी’ च्या संदर्भातल्या प्रश्नकुंड्लीतील कोणते घर काय दर्शवते हे पाहणे आवश्यक आहे:

 

(1) पहिले घर नेहमीच ‘खरेदी करणारा’ (म्हणजे आपला जातक) दाखवते. म्हणजेच पहिल्या घराचा स्वामी (भावेश) व पहिल्या घरातले ग्रह प्रश्नकर्त्या बद्दल बरेच काही सांगून जातात.

(7) सातवे घर हा व्यवहार ज्याच्या बरोबर होणार आहे ती व्यक्ती म्हणजेच ‘विक्रेता’ दाखवते. म्हणजेच सातव्या घराचा स्वामी (भावेश) व सातव्या घरातले ग्रह ज्याच्या बरोबर व्यवहार होणार आहे त्याच्या बद्दल बरेच काही सांगून जातात.

(4) चौथे घर (भावेश व घरातले ग्रह) व्यवहार होत असलेली जागा (प्रॉपर्टी) दाखवते.

(10) दहावे घर (भावेश व घरातले ग्रह) त्या जागेची किंमत (व्यवहाराची रक्कम) दाखवते.

प्रश्नकुंड्ली वर नजर टाकताच हे चटकन की , प्रथम स्थाना चा भावेश चंद्र आहे आणि सप्तम स्थाना चा स्वामी शनी आहे. आणि प्रश्नकुंडलीत हे दोन्ही दहाव्या घरात युतीत आहेत. याचा अगदी सरळ अर्थ निघतो की खरेदी करणारा व विक्रेता यांच्यात चांगले सामंजस्य आहे, एकवाक्यता आहे, व्यवहार दोघांनाही मान्य आहे (म्हणजे जागेची किंमत, व्यवहार कसा व केव्हा करायचा ई.) व्यवहारात कोणतेही अडथळें येण्याची वरकरणी तरी शक्यता दिसत नाही.

खरेदी विक्रीच्या व्यवहारात शुक्र ‘पैसा’ दाखवतो तेव्हा आता जरा या ‘शुक्रा’ कडे पहावे लागेल, शुक्र शनीच्या अंशात्मक केंद्र योगात आहे, आता हा पैसा दाखवणारा शुक्र, शनी च्या (म्हणजेच विक्रेत्याच्या) अशुभ योगात आहे, याचा अर्थ असा होऊ शकतो की विक्रेता पैशाच्या अत्यंत निकडीत आहे आणि काहीही करुन , मिळेल त्या किंमतीला ही जागा विकायचीच असा घायकुतीला आला असण्याची शक्यताही असु शकते. अशा परिस्थितीत व्यवहार झाला तर खरेदी करणार्‍याला फायदा होऊ शकतो. पण त्याचवेळी हा विक्रेता एव्हढा घायकुतीला येऊन , दबावाखाली येऊन , कमी किंमतीत जागा का विकत आहे याचे कारण ही तपासले पाहीजे. काही वेळा विक्रेता खरोखरच आर्थिक अडचणीत सापडलेला असतो आणि जागा विकून पैसा उभा करणे एव्हढाच एक मार्ग त्याच्या पाशी शिल्लक असतो आणि त्यासाठीच व्यवहार झटपट व्हावा म्हणून त्याने जागेची किंमतही कमी ठेवलेली असते. तर काही वेळा मात्र जागेत काही गंभीर समस्या असतात आणि त्याचा बोभाटा होऊन जागेची किंमत आणखी कमी होण्या आधीच जागा मिळेल त्या किंमतीला फुंकून टाकायचे त्याने ठरवलेले असते.

पत्रिके आणखी तपासली की हे लक्षात येते की चतुर्थेश बुध व दशमेश गुरु (जागा व जागेची किंमत) एकमेकाच्या अन्योन्य योगात आहेत. म्हणजे बुध गुरुच्या राशीत (मीनेत) आणि गुरु बुधाच्या राशीत (कन्येत) आहेत. तसेच बुध नवम स्थानात (कायदेशीर बाब) आणि गुरु त्रितीयेत (करार मदार, वाटाघाटीं) याचा अर्थ असा होतो की खरेदीदार व विक्रेता यांच्यात जागेच्या व्यवहाराबद्द्ल चांगल्या वाटाघाटीं होतील व सर्वमान्य करार होऊन व्यवहार पुर्ण होण्याची शक्यता जास्त आहे.

आता ईतके सारे अनुकुल संदेश मिळाले असता व्यवहार पूर्ण व्हायला काहीच अडचण येऊ नये पण मी जातकाला हा व्यवहार त्वरित थांबावायला सांगीतला कारण मला त्यात मोठे धोके दिसले कसे ते पहा:

मला असे दिसले की त्या जागेत कोणाचा तरी अपघाती मृत्यू झालेला असावा किंवा होण्याची शक्यता आहे आणि ह्या  अपघाताचे कारण आग वा स्फोट असावे/असेल. अगदी दशम बिंदू वर असलेला मंगळ (आग) , चतुर्थातल्या युरेनस व प्लुटो ( अपघात व मृत्यू) युती शी प्रतियोग करत आहे, प्लुटो चे अंश (22) हे राहू (जीवाला धोका) च्या अंशा (22) ईतकेच आहेत.
घर जरि आज स्वस्तात मिळत असले तरी पुढे या घराची किंमत आणखी कोसळणार आहे. कारण दशमात (जागेची किंमत) शनी (हानी, तोटा, किंमत घसरणे) आहे. हा शनी देखील आपल्या जातकाशी म्हणजेच चंद्राच्या युतीत असल्याने या जागे पासून आपल्या जातकाला कोणताही आर्थिक फायदा होण्याची सुतराम शक्यता नाही.
मला जागेचे टायटल (मालकी हक्काचा पुरावा) संशयास्पद वाटला , किमान काहीतरी गड्बड जरुर असणार त्यात असे दिसले. शनी-चंद्र युती , शुक्रच्या केंद्र योगात. कागद्पत्राचा कारक बुध मीनेत (संशय, गोंधळ, फसवणुक, घोटाळा) गुरु च्या प्रतियोगात (कायदा) . मला नंतर सांगण्यात आले की त्या भागातल्या सर्व मालमत्ता ह्या ‘ईनाम जमीनी’ वरच्या असल्याने , कोणालाही त्या मालमत्तेचे निर्विवाद मालकी मिळत नाही. जागा ताब्यात राहते,विकता येते, बदल करता येतो पण ‘इनाम जमीनी’ वरचे बांधकाम हा शिक्का कागदपत्रावर कायमचा असतो.
मला असेही दिसले की घराची हिटिंग प्रणाली मोठ्या प्रमाणात बिघडलेली आहे कारण मंगळ (आग, उष्णता) प्लुटो व युरेनस (शेवट, नष्ट होणे, अनपेक्षित बिघाड, अपघात) यांच्या प्रतियोगात आहे. मला नंतर सांगण्यात आले की घराची पाहणी करताना जातकाला ही समस्या आढळली होतीच त्याने हा दुरुस्तीचा खर्च गृहीत धरला होता. मूळातच घर खूपच कमी किंमतीत मिळत असल्याने दुरुस्तीचा खर्च विचारात घेऊन सुद्धा व्यवहार फायद्याचा ठरणार होता.
जातक जरी या हिटिंग प्रणालीची दुरुस्ती करायला तयार असला तरीही मला या जागेला आग व स्फोटापासून धोका आहे हे प्रकर्षाने जाणवले.ह आगीचा वा विस्फोटकाचा धोका घरा बाहेरील कारणांमुळे सुद्धा होण्याची शक्यता दिसली जसे दंगली (प्लुटो) , बाहेरुन अग्नी गोलक घरावर पडणे (दशमातला मंगळ), मी जातकाला सहज विचारले ‘हे घर विमान तळाच्या जवळपास आहे का? (युरेनस) “ जातक म्हणाला “आहे म्ह्णून काय विचारता, विमान तळाला लागूनच तर हा प्लॉट आहे, विमानें घराच्या छ्पराला चाटून जातात की काय असे वाटते !”.
घर ज्या जमीनीवर उभे होती ती जमीन ही मला गंभीर समस्येने ग्रस्त वाटली. बांधकाम भुसभुशित आणि दिवसेंदिवस खचत जाणार्‍या जमीनी वर झालेले असणार कारण चतुर्थातला प्लुटो. ह्याच कारणामुळे घराच्या हिटींग प्रणाली (जी तळघरात असते) ला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो आणि अशा समस्या दूर करणे अशक्यच असते. नंतर मला सांगण्यात आले की ही जागा दलदलीची होती, मातीचा भराव टाकून कशीबशी बांधकाम योग्य बनवण्यात आली होती पण हे भरावाचे काम चांगले झालेले नसल्याने मी उल्लेख केलेली समस्या त्या भागातल्या बहुतांश घरांना भेडसावत आहे.

एकंदर विचार करता ही जागा खरेदी करणे धोक्याचे आहे असा सल्ला मी जातकाला दिला. जातक त्याला फारसा तयार नव्हता कारण जागा अगदि स्वस्तात मिळत होती, जागा विमानतळा नजिक अगदी मोक्याच्या ठिकाणी आणि सभ्य आणि सुसंस्कृत वस्तीतली होती. पण जातकाचा माझ्या ज्योतिष विद्येवर पुर्ण विश्वास असल्याने त्याने हा व्यवहार रहित केला. जागा खरेदी केली नाही.

या पत्रिके कडे पाहताच हे लक्षात येते की युरेनस, नेपच्युन व प्लुटो हे बाह्य ग्रह काही खास संदेश देतात, विषेषत: ज्याला सामाजिक कारणें आहेत किंवा ज्या बाबी जातकाच्या वैयक्तिक परिघाच्या बाहेरच्या आहेत अशा अनेक बाबींबद्दल हे ग्रह बरिच माहीती पुरवत असतात.

हा व्यवहार झाला नाही , आणि आश्चर्य म्हणजे अगदी नजिकच्याच काळात मार्टीन ल्युथर किंग (ज्युनि) यांच्या खुना नंतर त्या भागात ज्या मोठ्या दंगली उसळल्या त्यात हे घर जळून भस्मसात झाले !

ही केस  स्ट्डी ज्या ग्रंथातून घेतली तो हा ग्रंथ:

“Horary Astrology and Judgment of Events” by Barbara Watters

 

http://www.amazon.com/Horary-Astrology-Judgment-Barbara-Watters/dp/0866906258

http://www.amazon.in/Horary-Astrology-Judgment-Barbara-Watters/dp/0866906258

Horary Astrology and the Judgment of Events is the result of the author’s thirty years of using horary methods in her professional practice. Properly used, horary astrology can warn us of dangers and analyze events with uncanny accuracy. Despite it’s usefulness, it has been neglected in modern times because, as traditionally taught, the system was too cluttered with medieval dogmas to appeal to the modern mind. In this book, Barbara Watters has achieved a true breakthrough. She has reexamined the horary system, stripped it of medieval superstition, and translated the ancient methods into modern terms. Using actual questions and events, she gives a step-by-step analysis of this method of solving problems and making decisions about real estate, travel, investments, business, employment, health, missing people, court trials, and many other matters. She also explains how to use the horary method to judge the outcome of national and political events, a field in which her predictions have been amazingly accurate. Introductory chapters focus on signs and rulers, the old planets, the new planets, strictures against judgment, the houses, turning the radical chart, timing events in the horary chart, the aspects, placing events in the horary chart, and additional considerations that affect the judgment of events.

Paperback: 174 pages
Publisher: American Federation of Astrologers (February 15, 2012)
Language: English
ISBN-10: 0866906258
ISBN-13: 978-0866906258
Product Dimensions: 9.1 x 7.5 x 0.4 inches

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.