मी स्वत: एक 'मांजर प्रेमी' आहे त्यामुळे 'मांजरा' विषयी काहीही असले की माझे कान टवकारतातच! आमच्या 'ज्योतिष विषयक चर्चा' ग्रुप वर एका सभासदाने 'मांजर घरातून निघून गेले आहे कधी परत येईल? ' असा प्रश्न केला ! हरवलेल्या / घर सोडून गेलेल्या व्यक्तीं बद्दलचे अनेक प्रश्न मी पूर्वी हाताळले आहेत, एकदा एकाचा पाळलेला कुत्रा हरवला होता तो ही प्रश्नकुंडलीच्या माध्यमातून हुडकून दिला होता, मांजराच्या बाबतीतली ही पहीलीच केस! एका परदेशी जातकाने प्रश्न होता -  "'मांजर घरातून निघून गेले आहे कधी परत येईल? '" मांजर घरातून निघून गेले आहे आणि ते केव्हा परत येईल हे बघायचे आहे, थोडक्यात मांजर हरवले आहे अशा…

अ‍ॅमेझॉन, ई-बे  अशा अनेक व्हेंडर्स कडून मी असंख्य वस्तू मागवल्या आहेत, काही वेळा वस्तू पोहोचायला अपेक्षे पेक्षा जास्त उशीर झाला तेव्हा त्या केव्हा मिळतील या काळजी पोटी प्रश्न कुंडली मांडून उत्तरे पण मिळवली आहेत. मी गेल्या नोव्हेंबर २०१९ च्या शेवटच्या आठवड्यात अ‍ॅमेझॉन (अमेरीका) वरून एक पुस्तक मागवले, अशी पुस्तकें मी नेहमीच मागवत असतो आणि साधारण पणे आठ ते पंधरा दिवसात पुस्तक घरपोच होते हा माझा नेहमीचा अनुभव आहे. या खेपेला देखील हे मागवलेले पुस्तक साधारण डिसेंबर १५ तारखे पर्यंत मिळावे अशी अपेक्षा होती पण आख्खा डिसेंबर महीना संपला तरी पुस्तकाचा पत्ता नाही ! सव्वा महीना थांबलो तरी पुस्तक नाही, सहसा…

मी फिरंगी ज्योतिष समुहातच जास्त रमतो ! बाटगा म्हणा किंवा नास्तीक म्हणा, पण मी ‘देव देव’ करत नाही, कोणत्या ‘बुवा ,म्हाराज, स्वामी, बाप्पू’ इत्यादींना मानत नाही म्हणून असेल ! या फिरंगी ज्योतिषांचा निखळ बुद्धीवाद, भक्कम गणीत आणि तर्कशास्त्राचा आधार माझ्या स्वत:च्या विचारसरणीत फिट्ट बसत असेल म्हणून कदाचित, फिरंगी म्हणावा आपुला ! असो. अशाच एका फिरंग ज्योतिष ग्रुप वर एकाने आज एक प्रश्नकुंडली दिली आणि त्याचे उत्तर काय असेल असे विचारले, “A woman asks: "When will my grandchild be born?" म्हणजे मराठीत: “एका स्त्रीने विचारले आहे, तिच्या नातवंडाचा जन्म कधी होईल?” आता हा काय प्रश्न आहे का? किती मोठा लॉग शॉट…

मी रोज जॉगिंगला जातो, तिथे नियमीत येणार्‍या अनेकांशी माझ्या चांगल्या ओळखी झाल्या आहेत. श्री जैन त्यातलेच एक. ते माझ्या कडे ज्योतिष विषयक मार्गदर्शना साठी नेहमीच येत असतात, त्यांचे, त्यांच्या धाकट्या भावाचे, मेव्हण्याचे सगळ्यांचे काम माझ्याकडे असते, एखादा फॅमिली डॉक्टर असतो ना तसा मी या जैन कुटूंबियांचा ‘फॅमिली ज्योतिषी’ आहे! २०१९ च्या एप्रिल मध्ये हे जैन कुटंबिय राजस्थानात तीर्थयात्रेला गेले होते, तिथून त्यांचा फोन आला. “सरजी, एक अर्जंट प्रश्न पाहायचा आहे” “काय आहे?” “आम्ही सध्या जयपूर जवळच्या एका लोकेशन वर आहोत, सिझन असल्याने टुरिस्ट लोकांची गर्दी आहे सगळी चांगली लॉजेस फुल्ल झालीत शेवटी एक डबडा लॉज मिळाले कसेबसे, कसल्याही सोयी नाहीत…

बकुळाबाईंशी विवाह / मामांचे मृत्यूपत्र या फंदात न पडता आपण डायरेक्ट संग्राम/ बकुळाबाईंना काही मिळणार आहे का ते तपसणे जास्त सोपे आहे. शेवटी संग़्रामला मालमत्ता ( किंवा त्यातला काही हिस्स) मिळणार का नाही याचे हो / नाही असेच उत्तर द्यायचे आहे , किती हिस्सा असेल 10% , 50%, 100% इ., त्यात नेमके काय मिळणार आहे ( जमीन , फ्लॅट , फार्म हाऊस, दागीने , रोख कॅश, शेअर्स इ) हे पण ठरवायचे नाही (ते अशक्य आहे!) 'सुरी टरबुजावर पडली काय किंवा टरबूज सुरीवर पडले काय ' निकाल एकच आहे ना? बस, आपण त्यावर विचार करायचा , मी तेच केले आहे या…

खेळातल्या या सार्‍या प्रमुख खेळाडुंचा परिचय झाल्या नंतर आता आपण प्रत्यक्ष अ‍ॅनालायसीस कडे वळू. या लेखाचे आधीचे भाग इथे वाचा:  मामाची इस्टेट ! भाग – १ मामाची इस्टेट ! भाग – २   प्रश्न कोणताही असो, प्रथम जातकाशी बोलून जातकाचा प्रश्न नेमका समजाऊन घेणे अत्यंत महत्त्वाचे असते यासाठी जातकाला बोलते करणे हे एक कौशल्य असते , प्रश्न विचारण्या साठी आलेला जातक हा काहीसा काळजीत असतो, भांबावलेला असण्याची शक्यता असते, अशा मन:स्थितीत असताना सुसुत्रपणे चपखलपणे आपला मुद्दा मांडणे भल्याभल्यांना जमणार नाही हे लक्षात ठेवून जातकाशी बोलता आले पाहीजे. अनेक वेळा जातकाला जे विचारायचे असते ते त्याला शब्दावाटे व्यक्त करता येत नाही…

लोकप्रिय लेख

///////////////