मध्यंतरी मी युरेनियन ज्योतिष पद्धती साठी आवश्यक असलेल्या  90 /45 डिग्री डायल्स परदेशातुन मागवल्या होत्या, साधारण पणे 25 ते 30 दिवसांत त्या मिळतील अशी अपेक्षा होती पण  तब्बल 50 दिवस झाले तरी त्या पोहोचल्या नाहीत. मला जरा काळजी वाटायला लागली. काय झाले असेल ? डायल्स पोष्टात गहाळ झाल्या असतील काय? चोरीला गेल्या असतील काय? कस्टम्सवाल्यांनी अटकवून ठेवल्या असतील काय? एक ना दोन अनेक शंका मनात येऊ लागल्या.कधी मिळतील डायल्स? के.पी.  होरारीने अशा पश्नांची उत्तरे चुटकी सारखी मिळतात आणि या ही वेळी ते मिळाले,  अचूक  ठाम आणि परखड… खरे पाहिले तर असल्या क्षुल्लक कारणासाठी ज्योतिषशास्त्राला वेठीस धरणे बरोबर नाही,  असले प्रश्न…

१७ मार्च २०१३ ची गोष्ट, अनिकेत मला भेटला त्यावेळी त्याची अवस्था अगदी केविलवाणी झालेली होती, एव्हढा चांगला हुशार इंजिनियर पण एके दिवशी अनपेक्षितपणे नोकरीतून डच्चू मिळाला, कारण काय तर ‘कॉस्ट रिडकशन’! दुसरी नोकरी काय हसत हसत मिळेल असे म्हणता म्हणता चार महिने निघून गेले आणि मग याच्या तोंडचे पाणी पळाले. मिळेल का अनिकेत ला नोकरी? के. पी. होरारी ने उत्तर दिले.. अचूक – ठाम आणि परखड! “अनिकेत, काळजी करू नको, तुझ्या सारखा चांगला इंजिनियर फार काळ नोकरी विना राहणार नाही, असतो एखादा बॅड पॅच, आपण बघू हा बॅड पॅच कधी संपणार ते” “काका, हे असे ज्योतिषा द्वारे सांगता येते ?”…

सतीश.. मला भेटला त्यावेळी तीन वेळा हातातोंडाशी आलेली परदेशगमनाची संधी हुकल्यामुळे निराश अवस्थेत होता… माझा बेंगलोरचा ट्रेनिंग प्रोग्राम चालू असतानाची ही कथा. ट्रेनिंगच्या दरम्यान एक सुटटीचा दिवस होता,सणसणीत नाष्टा हादडून मी नुकताच पेपर उघडला तोच …. “गुड मॉर्नींग सर..” सतीश ,  ट्रेनिंग प्रोग्रामचा विदयार्थी, पुण्याचा , एकदम स्मार्ट, तल्लख , ट्रेनिंग मन लावून ऐकणारा. “सतीश, आज सुटटीचा दिवस, विश्रांतीचा दिवस, आज अभ्यास नाही ,  डिफिकल्टीज नाही..” ‘नाही सर, मी त्या साठी नाही आलोय, मला तुमच्या कडून दुसरीच मदत हवी आहे” “कोणती मदत?” “सर तुम्ही ज्योतिष बघता असे मला ‘सप्तथी राजू’ म्हणाला” “‘सप्तथी राजू’ , येस,माझा हैद्राबाद च्या कोर्सचा विदयार्थी, पण…

लोकप्रिय लेख

///////////////