दीर्घ प्रतिक्षे नंतर क्लास पुण्यात चालू करतोय.. 28  /  29 मार्च 2020 पासून  मग इतर लोक्स करतात तशी जैरात केलीच पायजे ना? म्ह्णूण जैरात बनवली, शिरीयसली ! class.suhas@gmail.com या ईमेल वर संपर्क साधा, लगोलग ! त्याचे काय आहे, पुण्यातली जागा लहान असल्याने जास्त लोक्स मावणार नाहीत , दोन बॅच करतो आहे पण तरीही... पैला येणार त्याला शीट भेटणार , स्टॅडींग अलौड नाsssय ! तेव्हा नाव नोंदणी केलेली बरी ... या मंडली, शिकूया जरा ज्योतिष का काय म्हणतात ते ! शुभेच्छा

Lost & Found !

This is once again a ‘Lost & found’ horary, but this time for a change, I have chosen a case already solved by another astrologer. (Jyotish Shastri) Ms. Abha Karandikar is Pune’s renowned astrologer. She recently published a video explaining a case she solved. Today’s case study is the same, except that Ms. Abha solved it using Krishnamurthy Paddhati (KP) and I am solving it by Western Horary techniques. Please don’t misunderstand, I am in no way trying to demean Ms. Abha and her techniques, but rather trying to demonstrate how Western Astrology techniques can be effectively used to solve…

या राजकारणी व्यक्तीच्या पत्रिकेकडे वरवर जरी नजर टाकली तरी अनेक ग्रहयोग डोळ्यात भरतात, या पत्रिकेतले ठळक ग्रहयोग: १) शुक्र – युरेनस अंशात्मक (०३:१७ अंश अप्लाईंग) केंद्र योग २) रवी – युरेनस अंशात्मक (०१:४० अप्लाईंग) केंद्र योग ३) मंगळ – युरेनस पूर्ण अंशात्मक (००:२० सेपरेटींग) ४) बुध (वक्री) – युरेनस अंशात्मक ( ०४:३५ सेपरेटींग) केंद्र योग ५) गुरू – नेपच्युन (वक्री) अंशात्मक ( ०५:२६ सेपरेटींग) केंद्र योग काहीसा वादाचा पण अगदी अंशात्मक असल्याने विचारात घ्यावा असा वाटणारा ६) शनी – नेपच्युन(वक्री) पूर्ण अंशात्मक (०१:१२ अप्लाईंग) षडाष्टक योग या कुंडलीची खास बाब म्हणजे इथे मोठ्या प्रमाणात केंद्र योग आहेत परंतु एकही अंशात्मक…

माझा या शास्त्राचा अभ्यास बराचसा इंग्रजीत झाला आहे (बाटलेला आहे ना!) त्यामुळे माझ्या बहुतेक सर्व नोटस इंग्रजीत असतात (इतकेच काय पत्रिकेचा अभ्यास करतानाचा विचार देखील अभावितपणे इंग्रजीतच होतो, त्याला आता काय करणार? त्यामुळे इथे जे काही लिहणार आहे त्यातला मोठा हिस्सा इंग्रजीत असेल. त्याचे आता ‘माय मराठीत’ भाषांतर करणे वेळे अभावी शक्य होणार नाही, ह्या जरा सांभाळून ! या राजकारणी व्यक्तीच्या पत्रिकेकडे वरवर जरी नजर टाकली तरी अनेक ग्रहयोग डोळ्यात भरतात, या पत्रिकेतले ठळक ग्रहयोग: १) शुक्र – युरेनस अंशात्मक (०३:१७ अंश अप्लाईंग) केंद्र योग २) रवी – युरेनस अंशात्मक (०१:४० अप्लाईंग) केंद्र योग ३) मंगळ – युरेनस पूर्ण अंशात्मक…

महाराष्ट्रातल्या एका बलाढ्य राजकारण्याची पत्रिका सध्या तपासत आहे. या राजकारण्याला मी ‘बलाढ्य’ म्हणतो आहे पण तसे त्या व्यक्तीला मानायचे की नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकतो, काहींच्या मते ही व्यक्ती कसली बलाढ्य? असे असेल, काही म्हणतील’ ही व्यक्ती एकेकाळी बलाढ्य होती पण सध्या नाही’ ! पण या व्यक्तीची पत्रिका अभ्यासल्या नंतर निदान माझी तरी पक्की खात्री झाली आहे की या व्यक्तीत निश्चितच काहीतरी भव्य दिव्य करून दाखवण्याची क्षमता आहे , व्यक्ती खरोखरीची ‘बलाढ्य’ आहे ....पण .... हा ‘पण..’ किती विचित्र असतो नाही? ह्या ‘पण’ चे उत्तर हुडकण्याचा मी प्रयत्न केला जरूर , काही सापडले देखील , पण ते नक्की काय?…

नुकतेच एका ज्योतिष अभ्यासकाशी ‘प्रश्नकुंडली’ या विषयावरती काहीसे ‘शंकासमाधान’ पद्धतीचे बोलणं झाले. तेव्हा मी जी काही माहिती त्या अभ्यासकाला दिली त्याचा इतर अभ्यासकांनाही थोडा फार लाभ होऊ शकेल असे वाटले म्हणून त्या संभाषणातला काही महत्त्वाचा भाग शब्द रूपाने आपल्या समोर मांडत आहे. त्या अभ्यासकाचा एक प्रश्न असा होता: ‘प्रश्न कुंडली’ केव्हा मांडायची म्हणजेच प्रश्नकुंडलीची वेळ कोणती घ्यायची? याचे सरळ सोपे उत्तर आहे जातकाने प्रश्न विचारला ती वेळ! पण तरीही या बाबतीत अभ्यासक गोंधळात का पडला? याचे गोंधळा मागे कारण आहे ‘नक्षत्रपद्धती’ मधल्या काही संकल्पना. नक्षत्रपद्धती मध्ये जातकाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर प्रश्नकुंडलीच्या माध्यमातून सोडवताना जातका कडून १ ते २४९ मधला एक…

लोकप्रिय लेख

///////////////