आता कृष्णमूर्ती पद्धतीवरचे इंग्रजी मधील ग्रंथ पाहू. यादी खाली दिली आहे.
सी.आर.भट यांचे दोन ग्रंथ वाचणे अत्यावश्यक आहे, हे ग्रंथ जरा दुर्मिळच आहेत, मिळणे अवघडच, पण प्रयत्न करून बघा, मला सुद्धा ते खूप प्रयत्नांनंतर अवाच्यासवा किमतीला मिळाले, पण हा खर्च वाया जाणार नाही याची खात्री बाळगा.
खुद्द कृष्णमूर्तीनीं लिहिलेले सहा ग्रंथ ज्याला ‘रीडर्स’ म्हणतात, ते संग्रही असावेत इतकेच, लगेच बाजारात जाऊन विकत घ्यायची गडबड करू नका, निराशा होईल.
अॅस्ट्रोसिक्रेट ची एकंदर सहा ग्रंथांची मालिका आहे, पण त्यातले पहिले ३ चा वाचायच्या लायकीची आहेत. बाकीचे तीन निव्वळ खोगीरभरती आहे.
सबलॉर्ड स्पीकस ही तीन ग्रंथांची मालिका आहे, पण हे ग्रंथ आता लगेच विकत घ्यायची गडबड करू नका, लेखकाने काही नवे विचार मांडले आहेत, पण यात कृष्णमूर्ती पद्धतीतल्या नियमांची पायमल्ली होत असल्याने नव्या अभ्यासकांचा मोठा वैचारिक गोंधळ होण्याची दाट शक्यता आहे, तेव्हा अभ्यास सुरू केल्या नंतर सुमारे दोन वर्षांनंतर या ग्रंथांकडे वळा.
एस पी खुल्लर यांची एकंदर पाच ग्रंथ आहेत, त्यापैकी महत्त्वाचे जे तीन, त्यांचा समावेश यादीत आहे. श्री खुल्लर यांनी कृष्णमूर्ती पद्धतीचाच आधार घेऊन आपली स्वतः:ची ‘कस्पल इंटरलिंक’ ही पद्धती विकसीत केली आहे, तर्कशुद्ध विचार व विषयांची छान मांडणी यामुळे आपल्याला हे ग्रंथ वाचायला आवडतील. पण हा अभ्यास जरा प्रगत असल्याने, सुरवातीच्या काळात तरी याचा विचार करू नका.
Krishnamurti Paddhati |
||
Book Title |
Author |
|
1 |
Nakshatra Chintamani |
C R Bhatt |
2 |
Future Lights on Nakshatra Chintamani |
C R Bhatt |
3 |
Astrosecrets and Kirshnamurthi Paddhati Part I |
M P Shanmugham |
4 |
Astrosecrets and Kirshnamurthi Paddhati Part II |
Collection |
5 |
Astrosecrets and Kirshnamurthi Paddhati Part III |
Collection |
6 |
KP Reader I: Casting the Horoscope |
K S Krishnamurti |
7 |
KP Reader II: Fundamentals of Astrology |
K S Krishnamurti |
8 |
KP Reader III: Predictive Stellar Astrology |
K S Krishnamurti |
9 |
KP Reader IV: Marriage Married life and Children |
K S Krishnamurti |
10 |
KP Reader V: Transits Gocharapala Nirnayam |
K S Krishnamurti |
11 |
KP Reader VI Horary Astrology |
K S Krishnamurti |
12 |
Sublorad Speaks Vol 1 |
M P Shanmugham |
13 |
Sublorad Speaks Vol 2 |
M P Shanmugham |
14 |
Sublorad Speaks Vol 3 |
M P Shanmugham |
15 |
Your True Horoscope |
S P Khullar |
16 |
Horary Astrology and Cuspal Interlinks |
S P Khullar |
17 |
Kalamsa and Cuspal Interlink Theory |
S P Khullar |
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020